शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

घुघवा!

By admin | Published: December 12, 2015 4:48 PM

निलगिरीची झाडे ही ऑस्ट्रेलिया खंडाची देणगी मानले जाते. पण मध्य प्रदेशात त्याची जिवाश्मं कशी सापडतात? - याचे उत्तर शोधायचे तर वीस कोटी वर्ष मागे जावे लागते! तिथल्या जिवाश्मांच्या खजिन्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या आहेत..

- मकरंद जोशी
 
मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगडसारख्या जंगलांमध्ये फिरताना, सर्वात आधी मनात भरते ती तिथली गर्द वनराई. हिरव्याकंच पानांनी लगडलेले, उंचच उंच साल वृक्ष, बांबूंची दाट बने, आंबा, चिंच, पिंपळ, जांभूळ, वड, हिरडा, बेहडा, ऐन, अर्जुन, मोह यांची सदाहरीत झाडे असे मध्य प्रदेशच्या हिरवाईचे वैभव आपल्या डोळ्यांना आणि मनाला सुखावते. आता याच भूमीवर कधीकाळी यूकॅलिप्टस् अर्थात निलगिरी आणि नारळाची झाडेदेखील होती असे सांगितले तर विश्वास बसणो कठीण. ही झाडे मध्य प्रदेशच्या भूमीवर होती हे पु.लं.च्या हरितात्यांप्रमाणो अगदी ‘पुराव्याने शाबित’ करता येते. आता हजारो-लाखो वर्षांपूर्वी एखाद्या भूभागावर कोणती झाडे होती, कोणते प्राणी होते हे कसं कळतं? तर त्यासाठी निसर्गाकडे भूतकाळाकडे उघडणारी एक जादुई खिडकी आहे, ही जादुई खिडकी म्हणजेच ‘फॉसिल्स’ अर्थात ‘जिवाश्म’. फॉसिल्स म्हटल्यावर आपल्याला सर्वात आधी आठवतात ते डायनॉसॉर. आपल्या अवाढव्य, महाकाय शरीराने पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांमध्ये वरचढ ठरलेले डायनॉसॉर सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरून कायमचे नष्ट झाले. पण त्यांच्या खाणाखुणा आजही सापडतात त्या फॉसिल्समधून. अर्थात फॉसिल्स काही फक्त डायनॉसॉर्सचेच नसतात. प्रागैतिहासिक काळातील वनस्पती, किटक, जलचर, शंख-शिंपले यांचेही फॉसिल्स बनतात. फॉसिल्स म्हणजे जणू लाखो - करोडो वर्षापूर्वीच्या भूतकाळात उघडलेली जादुई खिडकीच. या खिडकीतून घडणारे भूतकाळाचे दर्शन थक्क करणारे असते. फॉसिल्सच्या या अनोख्या दुनियेची झलक पाहायला मिळते ती घुघवा फॉसिल्स पार्कमध्ये. मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात हा फॉसिल पार्क आहे. घुघवा आणि उमारिया या दोन गावांमध्ये मिळून 27.34 हेक्टर परिसरात हा आगळा वेगळा नॅशनल पार्क पसरलेला आहे.
या ठिकाणी प्रामुख्याने झाडांचे फॉसिल्स पाहायला मिळतात. या फॉसिल्सच्या रूपाने सुमारे साडेसहा कोटी वर्षापूर्वीच्या वृक्षसंपदेचं दर्शन इथे घडतं. हा काळ वनस्पतींच्या इतिहासातील महत्त्वाचा काळ आहे, याच काळात अपुष्प वनस्पती मागे पडून सपुष्प वनस्पतींचे प्रकार वाढायला सुरुवात झाली होती. तसेच आज आपण वनस्पतींची जी रूपे पाहातो त्यांना आकार यायला सुरुवात झाली होती. आज घुघवा येथे जांभूळ, आवळा, खजूर, नारळ, केळी, रुद्राक्ष, आंबा अशा झाडांच्या खोडांचे, फांद्यांचे, मुळांचे, पाना-फुलांचे, फळांचे आणि बियांचे फॉसिल्स आढळतात. ही सगळी झाडे सदाहरीत असून, दमट हवामानात वाढणारी आहेत. या झाडांना भरपूर पाऊसही लागतो. सध्या घुघवामध्ये 14क्क् मिलिमिटर पाऊस पडतो, पण तेव्हा म्हणजे सहा कोटी वर्षांपूर्वी इथे 2क्क्क् मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असे. त्यामुळे आज जरी हा परिसर कोरडा, रखरखीत असला तरी त्याकाळी इथे घनदाट असं अरण्य होतं याची साक्ष हे फॉसिल्स देतात.
इथल्या फॉसिल्सच्या खजिन्यातील एक आश्चर्य म्हणजे इथे युकॅलिप्टस म्हणजे निलगिरीच्या झाडांचे जिवाश्म सापडतात. आधुनिक जगात युकॅलिप्टस हे झाड ऑस्ट्रेलिया खंडाची देणगी मानले जाते. मग या मूळ ऑस्ट्रेलियन झाडाचे फॉसिल्स भारताच्या मध्यभागी असलेल्या घुघवात कसे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वीस कोटी वर्षे मागे जावे लागते. आज आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूभागांची वाटणी सात खंडांमध्ये केली आहे. पण वीस कोटी वर्षांपूर्वी एकच विस्तीर्ण भूभाग होता. त्याला पॅनेजिया म्हटले जाते. पंधरा कोटी वर्षांपूर्वी हा पॅनेजिया हलला आणि त्याचा उत्तर भाग दक्षिण भागापासून वेगळा झाला. उत्तर भागाला लॉरेशिया तर दक्षिण भागाला गोंडवन म्हणतात. दहा कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींनी या खंडांचेही तुकडे झाले. गोंडवनातील साउथ अमेरिका, आफ्रिका, भारत वेगळे झाले. सर्वात शेवटी पाच कोटी वर्षांपूर्वी त्यातून ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिका वेगळे झाले. पण त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत हे आजचे देश एकाच भूभागावर होते, याचा पुरावा घुघवातील युकॅलिप्टसच्या फॉसिलमधून मिळतो. 
फॉसिल्सचे वय शोधण्यासाठी रेडिओमेट्रीचा वापर करतात. सजीवांच्या शरीरातील कार्बन 12 आणि कार्बन 14 या घटकांच्या मदतीने सापडलेल्या अवशेषांचे वय शोधता येते. घुघवामधील हा जिवाश्मांचा खजिना शोधला तो मंडला जिल्ह्याचे स्टॅटिस्टीकल ऑफिसर डॉ. धर्मेंद्र प्रसाद यांनी. ते डिस्ट्रिक्ट आर्किऑलॉजी युनियनचे मानद सचिवही होते. घुघवा, पारापानी, सामनापूर, मोहगाव, कलान या परिसरातील विखुरलेल्या फॉसिल्सचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून, वर्गवारी करण्याचे काम जबलपूर सायन्स कॉलेजचे एस. आर. इंगळे आणि बिरबल साहनी इन्स्टिटय़ूट ऑफ पालिओबॉटनीचे डॉ. एम. बी. बांडे यांनी केले. आज या पार्कमध्ये एक सुरेख प्रदर्शन उभारलेले आहे, जिथे या जागेचा इतिहास, फॉसिल्स कशी बनतात ते आकर्षक मॉडेल्स आणि तक्त्यांमधून पाहायला मिळते. तसेच उघडय़ावर मांडलेल्या फॉसिल्सच्या नमुन्यांतून सहा कोटी वर्षांपूर्वीचा काळ उलगडतो. भूतकाळात उघडललेल्या या खिडकीतून घडणारे दर्शन थक्क करणारे आहे.
 
 ‘पत्थरके पेड’!
 
पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उत्पत्तीचं आणि उत्क्रांतीचं कोडं सोडवायला अशी मदत करणारे हे जिवाश्म निर्माण तरी कसे होतात? एखाद्या वनस्पतीचे वा प्राण्याचे फॉसिल तयार होणो ही तशी दुर्मीळच गोष्ट आहे. सर्वसाधारणपणो एखादा जीव मृत झाल्यानंतर त्याच्यामधील सेंद्रिय म्हणजे ऑरगॅनिक भाग कुजून नष्ट होतो. पण जेव्हा त्या प्राण्याचा मृतदेह किंवा वनस्पतीचा भाग मेल्यानंतर पाण्याखाली किंवा गाळाखाली गाडला जातो तेव्हा मात्र ही कुजण्याची प्रक्रि या पूर्णत्वास जात नाही. अशावेळी त्या प्राण्याच्या शरीराची आकृती त्या गाळावर उमटते, त्यालाच आपण जिवाश्म म्हणतो. म्हणूनच बहुतेक फॉसिल्स हे गाळाच्या खडकांमध्ये, कोळशाच्या थरात, सरोवराच्या तळाशी किंवा सागराच्या तळाशी सापडतात. काही फॉसिल्समध्ये मूळ जिवाचे सारे अवशेष नष्ट झाल्यानंतर उरलेला ठसा पाहायला मिळतो. 
घुघवामध्ये सापडतात ती पेट्रिफाइड प्रकारची फॉसिल्स आहेत. या प्रकारात मूळ वनस्पती किंवा प्राण्यातील सेंद्रिय घटकांची जागा भोवतालच्या गाळातील किंवा पाण्यातील मिनरल्सनी घेतलेली असते. या परिसरातले स्थानिक लोक या फॉसिल्सना ‘पत्थरके पेड’ अस म्हणतात, कारण एखाद्या दगडात नारळाच्या झाडाचे शिल्प खोदले तर जसे दिसेल तशी फॉसिल्स इथे पाहायला मिळतात. घुघवा येथे अठरा फॅमिलीतील झाडांचे अवशेष सापडले आहेत. 
आज इथे एकही तलाव, सरोवर किंवा नदी नाही, पण कवच धारी जलचरांचे फॉसिल्स मात्र सापडतात. त्यावरून प्राचीन काळी अरबी समुद्राचा एक फाटा मध्य भारतात आजच्या नर्मदा नदीच्या खो:यात शिरलेला होता या मताला पुष्टी मिळते.
 
makarandvj@gmail.com