शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रन फॉर पीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 3:58 PM

संवादी बदलांसाठी एक पाऊल पुढे..

-  संजय नहार

खेळांसाठी मैदानं नाहीत, करमणुकीसाठी चित्रपटगृहे नाहीत. अशांततेचं प्रतीक असलेला कर्फ्यू मात्र कायमच सोबतीला. सततच्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम मुलांच्या मनावर होतोच. त्यात देशाच्या दोन्ही भागांत कायम संशयाचं वातावरण. ही दरी दूर व्हावी म्हणून पुण्याच्या ‘सरहद’ या संस्थेनं कारगिलमध्ये नुकतीच एक अनोखी संकल्पना राबवली..

कारगिल फक्त युद्धभूमी नव्हे. कारगिल म्हटलं की आपल्याला आठवते ती हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेली तिथली युद्धभूमी. १९९९ मध्ये पाकिस्तानच्या हल्ल्याला सडतोड उत्तर देत कारगिलचं युद्ध भारतीय जवानांनी जिंकलं होतं. परंतु यापलीकडे कारगिलविषयीची माहिती आपल्याला नसते.कारगिल ही केवळ युद्धभूमी नाही. तिथंही आपल्यासारखीच माणसं राहतात. त्यांचंही म्हणून एक जनजीवन सुरू असतं. रोजची जगण्याची मारामारी सुरू असते हे आपल्या गावीच नसतं. कारण आपण तिथवर पोहचत नाही.एकूणच जम्मू-काश्मीरबाबत आपल्याला माहीत असतं, ते केवळ बातम्यांतून. त्याव्यतिरिक्त ना आपला त्यांच्याशी काही कनेक्ट असतो ना त्यांचा आपल्याशी.इथल्या मुलांचा जन्म हिंसाचाराच्या बातम्या ऐकण्या-पाहण्यात, गोळीबाराचा आवाज ऐकण्यात होतो. ती वाढतातही ‘कर्फ्यू’च्या साथीनं. सततचं कोंडलेपण, दबलेपण आणि विस्कटलेपण अशा वातावरणात मुलं वाढत राहिली तर त्यांच्या सळसळत्या ऊर्जेचं काय करायचं? वयात येणारी मुलं कुठल्या ना कुठल्या कामात गुंतून राहिली नाही तर ती भरकटणार, विस्कटणार आणि स्वत:ला हरवून बसणार.इथं खेळांसाठी मैदानं नाहीत, करमणुकीसाठी चित्रपटगृहे नाहीत. पाचवीला पुजलेला कर्फ्यू मात्र असतो. मग घरात बसून सतत टीव्ही आणि त्यावरच्या बातम्या. सामाजिक-राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणारा हा भूप्रदेश. सततच्या नकारात्मक बातम्यांचा परिणाम या मुलांवर होतोच. नैराश्यात जातात. अशा मुलांच्या ऊर्जेचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो, तिथल्या स्थानिक मुला-मुलींसाठी काय करता येईल असा विचार आमच्या मनात सुरू होता. त्यातूनच आकाराला आली, ‘कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’ ही संकल्पना. ‘रन फॉर पीस’, ‘रन फॉर सरहद’ म्हणत स्थानिक मुले, तरुण-तरुणींसह शांततेच्या भावनेसाठी धावायचं असं ठरलं.कारगिलचा प्रदेश लडाख या भूभागात येतो. कारगिल प्रदेशात बहुसंख्य मुस्लीम. कारगिलचं वैशिष्ट्य म्हणजे इथली माणसं मुळातच भारतीयत्वाशी बंध सांगणारी आहेत. पुण्यातील ‘सरहद’ या आमच्या संस्थेतही काश्मीरमधील १५० मुले-मुली शिकण्यासाठी दत्तक घेतलेली आहेत. त्यापैकी ३९ मुले कारगिलमधील आहेत.या सर्व मुलांच्या मनात आपल्या भूप्रदेशाविषयीच्या चांगल्या आठवणी रुजणे आवश्यक आहे. शिक्षण घेऊन झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या प्रदेशात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळायला हवी, अशी आस ठेवून सरहदमधील आम्ही साथी कामाला लागलो. खरंतर हा उपक्र म मागील वर्षी म्हणजे २०१६ मध्येच करायचा होता. पण बुरहान वाणीच्या खुनामुळे परिस्थिती चिघळली आणि आम्हाला आमची सर्व तयारी गुंडाळावी लागली. याही वर्षी अमरनाथ यात्रेच्या हल्ल्याची पार्श्वभूमी होतीच. तरीही आमचा निश्चय पक्का होता. मागील काही महिन्यांपासून आम्ही याबाबत तयारी करत होतो. ‘सरहद’ने काश्मीरमध्ये प्रत्यक्ष काम केल्याने आमच्याविषयी तिथे एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे. शांतता प्रत्येकालाच हवी आहे. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत कारगिलमधल्या नागरिकांसाठी कधीही, कुठलीही कृती, कार्यक्र म झालेला नव्हता. त्यांच्यासाठीही हे विशेषच होते. पर्यटक आले तरी ते कारगिल युद्धाच्या जागा पाहून लगेच निघतात. श्रीनगर ते लेह या दरम्यानच्या प्रवासाचा ‘एक थांबा’ इतकाच काय तो कारगिलचा संबंध. इथल्या नागरिकांशी संपर्क, संवाद, नवनवीन जागांचा पर्यटनासाठी उपयोग असं काहीही घडत नव्हतं. या संवादाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही मॅरेथॉनचा विचार करत होतो. मॅरेथॉनच का तर हा एक खेळप्रकार आहे. यात भरपूर ऊर्जा लागते. कुठलेही छुपे हेतू नसल्यानं माणसं एकत्रित येण्याचा हा सोपा मार्ग आहे, ज्यामुळे संवादही शक्य होतो. पुण्यातील सरहदचे सोबती संजीव शहा यांनी पुढाकार घेऊन दीडशे जणांची फळी तयार केली. पुणे, मुंबई, दिल्ली, देशातील इतर अनेक ठिकाणांहून काही सोबती बरोबर घेतले. या उपक्र मात स्वानंद अ‍ॅडव्हेंचर्स, रनबडी आणि कारगिलमधील काही संस्थाही सहभागी झाल्या होत्या.सुरुवातीला आमच्याही मनात शंका होती की लोकांचा प्रतिसाद कसा असेल, पण हळूहळू कारगिलवासीयांतला उत्साह वाढू लागला. युद्ध, घोषणा आणि भाषणबाजीच्या पलीकडे नेणारा, त्यांना त्यांचा वाटणारा, सहभागी होता येणारा कार्यक्र म त्यांना हवा होता. तिथल्या हॉटेलवाल्यांनीही अगदी उत्साहाने कारगिलबाहेरून आलेल्यांसाठी राहण्याची सोय केली. काश्मिरीयत-सुफी/बुद्धिजम आणि एकूण मानवतावादाचं दर्शन दिलं.आमच्यासोबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे होते. एक केंद्रीय मंत्री असा कारगिलवासी पर्यायाने काश्मीरवासीयांशी थेट संवाद साधायला त्यांच्यात मिसळतोय अशी ही पहिलीच घटना होती. त्याचा प्रतिसाद जनतेतून उमटत होता. आॅलिम्पिकमधील राम यादव, संजय चिकार, याशिवाय कारगिल युद्धात लढलेले डी. पी. सिंग हेही या मॅरेथॉनमध्ये धावले. सिंग यांना तर कारगिल युद्धाच्या वेळी मृत घोषित करण्यात आलं होतं. पण काही दिवसांनी कळलं, या युद्धात त्यांनी पराक्रमही गाजवला आणि ते जिवंतही आहेत! त्यामुळे सिंग दरवर्षी त्यांचा ‘स्मृतिदिन’ साजरा करायला कारगिलला जातात. यंदा ते ‘रन फॉर पीस’ मध्ये आमच्यासोबत धावले.या मॅरेथॉनमध्ये २० ते २५ टक्के मुलीही सहभागी होत्या. आपल्या मनात काश्मिरी मुस्लीम मुली म्हणजे अतिशय परंपरावादी असतील अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. पण या मुली अत्यंत आनंदाने यात सहभागी झाल्या होत्या. मॅरेथॉनच्या दिवशी प्रत्यक्षात १२ वर्षांच्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रस्त्यावर धावले. त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं, त्यांना संवाद हवाय. कारगिलमध्ये साधारण लाख- सव्वा लाख नागरिक आहेत. मात्र त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांचं म्हणणं समजून घ्यायला कोणीही जात नाही. त्यांच्या मनात अढी आहे की, आम्हाला समान वागणूक दिली जात नाही. सर्वांसोबत सामावून घेतलं जात नाही. काही स्थानिक लोक सांगत होते, ‘पोलीस भरती, लष्कर भरती’त आम्हाला घेतले जात नाही. आमच्या देशभक्तीविषयी शंका का? उलट इथल्या लष्करांना तर आम्ही सर्वाधिक मदत करतो. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देतो. तरीही आम्हाला संधी दिली जात नाही. राज्य संरक्षणमंत्र्यांना ते गळ घालत होते, ‘आम्हाला लष्करात घ्या, शत्रूविरुद्ध लढण्याची संधी द्या’. आपली सगळी खदखद हे तरुण व्यक्त करीत होते. तरुण दगडफेक करतात असं म्हणणाºयांनी इथली ऊर्जा पाहायला हवी होती. त्यांच्या हातात चांगलं काही नसेल तर ते दगड घेणारच. पण खरंतर दगड घेणाºयांची संख्या खूप तुरळक आहे. त्यांना संवादी कार्यक्र म दिल्यास नक्कीच चांगला बदल होईल. नकारात्मक शक्तींना वेगळं पाडण्याचा प्रयत्न करण्याकरिता इथल्या नागरिकांसाठी अशा कृतिशील कार्यक्र मांची गरज आहे. या गोष्टींचा लष्करालाही फायदाच होणार हे लष्कराच्याही लक्षात आले आहे.नागरिक जर भारतीय लष्करासोबत उभे नसले तर त्याचा फायदा अतिरेक्यांना होतो. तरुणांना हा देश आपला वाटावा अशा उपक्रमांची येथे गरज आहे.इथल्या नागरिकांना संवाद हवाय, लोकांची सोबत, साथ हवीय. रोजगार हवाय. ते इथं निर्माण होऊ शकतं आणि स्थानिकांच्या हातांना काम मिळू शकतं ही शक्यता या कार्यक्र माने करून दाखवली आहे.पुढच्या वर्षीची तयारीही आत्तापासूनच सुरू झाली आहे. संवादाची, समजून घेण्याची आणि बदलाची प्रक्रिया एका दिवसाची नाही.. ती सतत होणं आवश्यक आहे. स्थानिक कारगिलवासीयांना शांततापूर्ण जगण्याची आस आहे, तर त्यांच्या गोळीबाराच्या आवाजातून ही उसंत काढून देणं आम्हाला आमची गरज वाटतेय..

(लेखक ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.) शब्दांकन- हिनाकौसर खान-पिंजार