शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'महायुतीत अजित पवारांना बाजूला करण्याचे प्रयत्न'; काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
2
देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा
3
"माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो..."; शिवसेना दसरा मेळाव्याआधीच राज ठाकरे चर्चेत
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
5
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
6
५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा सुत्रधार दुबईतून ताब्यात; सौरभ चंद्राकरला आणणार भारतात
7
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
8
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
9
Khyati Global Ventures IPO Listing : लिस्ट होताच 'या' शेअरला लोअर सर्किट, गुंतवणूकदारांची निराशा; डोकं धरण्याची आली वेळ 
10
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतीच्या २८ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
11
Demat Account Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
12
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
13
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
14
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
15
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
16
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
17
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
18
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
19
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती

मीठ-लिंबू

By admin | Published: August 26, 2016 4:57 PM

माझ्या धरणाचे दरवाजे पटापट उघडले आणि मला मोकळे मोकळे वाटू लागले. आपल्याला समजून घेणारे आणि आपल्या मनातील रागाला वाईट न म्हणणारे कुणीतरी या जगात आहे या भावनेने मी मायकल जॅक्सनच्या संगीताशी जोडला गेलो.

 - सचिन कुंडलकर

पाश्चिमात्य संगीताने माझ्या धरणाचे दरवाजे पटापट उघडले आणि मला मोकळे मोकळे वाटू लागले. आपल्याला समजून घेणारे आणि आपल्या मनातील रागाला वाईट न म्हणणारे कुणीतरी या जगात आहे या भावनेने मी मायकल जॅक्सनच्या संगीताशी जोडला गेलो. मीच नाही तर त्या काळात सगळे जग मायकल आणि मडोना या दोघांनी काबीज केले होते. कारण त्यांचे ऊर्जा देणारे सळसळते संगीत होते. गरिबांना, कुरूप माणसांना, एकट्या जिवांना, हतबल अपयशी माणसांना ते संगीत जागे करून आत्मविश्वास देत होते.मोठा होत असताना मला माणसे सोडून गेली, माझ्या आजूबाजूच्या जागा अनोळखी होत गेल्या, मी लोकांना त्रास दिले आणि लोकांनी मला. या सगळ्या प्रक्रि येत एक गोष्ट माझ्यासोबत सतत शांतपणे चालत राहिली ती म्हणजे माझ्या आजूबाजूला असणारे, वाजणारे, ऐकू येणारे, गायले आणि वाजवले जाणारे संगीत. विविध प्रकारचे संगीत कानी पडत गेल्याने आणि संगीताचा संग्रह करण्याची आवड आणि वातावरण आमच्या घरामध्ये असल्यामुळे शब्द आणि रंग यांच्या पलीकडील फार मोठे संस्कार माझ्या कानावर होत राहिले. मी जिथे जन्माला आलो आणि वाढलो त्या वातावरणापेक्षा आज अतिशय वेगळ्या वातावरणात राहतो आणि वावरतो. अशा परिस्थितीत मला तरंगत पण संतुलित ठेवते ते म्हणजे मी सतत ऐकत असलेले संगीत.आमच्या घरी रेडिओ लावून ठेवायची सवय कुणाला नव्हती. त्यामुळे मराठी नाट्यगीते, भावगीते, गीत रामायण अशा गोष्टींची जी आपसूक ओळख लहानपणी आकाशवाणीमार्फत सर्व मुलांना नकळत होत असते ती मला झाली नाही. माझ्या लहानपणीच्या स्मृतीमधील सगळ्यात जुना आणि एखाद्या दाट महागड्या अत्तरासारखा आवाज जर कुणाचा असेल तर तो आहे भीमसेन जोशींचा. तो भाषेच्या आणि कवितेच्या पलीकडे असलेला आत्म्याचा हुंकार असावा तसा आवाज आहे. आमच्या घराच्या भिंतींवरून वाहत असलेला. अतिशय चांगले शास्त्रीय संगीत लहानपणापासून माझ्या कानावर सातत्याने पडत राहिले कारण माझे वडील आणि माझा धाकटा भाऊ. मला आठवते आहे तेव्हापासून घरामध्ये सुयोगचा हार्मोनियमचा रियाज चालू असे आणि रियाज संपल्यावर आमच्याकडे असलेल्या एका टेपरेकॉर्डरवर भीमसेन जोशींचा आवाज उमटून घरभर प्रसृत होत राही. पावसाळ्यात अंधारात बुडालेल्या घरात, दिवाळीच्या दिवशी उत्साहाने उजळून गेलेल्या घरात तो आवाज सतत सोबत करीत असे. हार्मोनियमच्या रियाजाचा आवाज आणि भीमसेन जोशींचा आवाज जगात कुठेही आला तरी मला अचानक घरी आल्यासारखे वाटते, याचे ते कारण आहे. मी जे संगीत जाणीवपूर्वक मनामध्ये रु जवले आणि माझ्या आवडीने लहानपणापासून सोबत बाळगले ते म्हणजे आर. डी. बर्मन यांचे संगीत. माझ्या संपूर्ण लहानपणावर आर.डी.ची फार मोठी प्रेमळ सावली आहे. माझ्यात जे लिंबू आणि मीठ आहे ते माझ्या शिक्षणाचे नाही किंवा मी वाचलेल्या पुस्तकांचे नाही. ते आर.डी.ने माझ्यात पिळलेले आहे. माझ्या चांगल्या-वाईट सवयी, माझी स्वप्ने बघायची पद्धत, माझे रागलोभ या सगळ्या रसायनांची सिद्धता माझ्या लहानपणी आर.डी.ने केली. मी सिनेमा बनवायचा निर्णय घेतला त्याला अप्रत्यक्षपणे आर.डी. कारणीभूत असणार याविषयी मला शंका नाही. संगीत घरामध्ये साठवून ठेवून आपल्याला हवे तेव्हा ऐकण्याचा काळ आता सोपा वाटत असला तरी अनेक वर्षे कानावर चांगले गाणे पडायला टीव्ही किंवा रेडिओवर अवलंबून राहावे लागत असे. घरात टेपरेकॉर्डर यायच्या आधीचा काळ मी अनुभवला आहे. कुठे रस्त्याने जाताना आपले आवडते गाणे कुठल्या दुकानाच्या किंवा घराच्या रेडिओवर लागले असेल तर तिथेच रस्त्यात थांबून ऐकून मी पुढे जात असे. मग यथावकाश टेपरेकॉर्डर आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा माझा वॉकमन माझ्या सोबतीला आले. वॉकमनने माझ्या आयुष्याला आणि भावनांना खासगीपणा मिळवून दिला. खासगी जगामध्ये मोठी रंगीत स्वप्ने रंगवता येतात. माझे घरापासून डेक्कनवर चालत राहणे आणि कानात हेडफोन्सवर आवडते संगीत ऐकत राहणे माझ्यासाठी बहुमोल असे कारण मी ते ऐकत चालताना अनेक निर्णय घेत असे. तरुण माणसाचे साधेसोपे निर्णय असतात. त्यात एक खुळेपणा असतो. स्वप्नरंजकता असते. पण ती किती आवश्यक असते. गुलजारांनी मला ती शिकवली. त्यांच्या सिनेमाच्या गाण्यांमधून. माझी भावनिक वाढ करून माझ्या साध्या स्वप्नांना गुलजारांनी मोकळ्या खिडक्या दिल्या. मला लिखित शब्दांचे महत्त्व सगळ्यात आधी गाण्यांमधून गुलजारांनी शिकवले. माझ्या हेडफोनला लागलेल्या माझ्या घामात ते उतरत असत. माझा खोल खोल अंधारा खासगीपणा मी सजवायला शिकलो, तिथे झुंबरे पेटवून आयुष्य सोपे करायला शिकलो याला गुलजार कारणीभूत ठरले. आणि त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेली सुंदर गाणी आणि कविता. आर.डी.च्या गाण्यांमध्ये जो अंतराळ असतो, ज्याला संगीताच्या रचनेमध्ये इंटरल्यूड असे म्हणतात; तो अंतराळ जादूने भरून टाकायचा. ‘इजाजत’मधील ‘कतरा कतरा मिलती है’ या गाण्यातले अंतराळ असे विस्मयकारक जादूई रंगांनी भरलेले आहेत. आपल्या मनात संगीताच्या उत्कट अनुभवामुळे अनेकविध दृश्ये, आठवणी आणि जुन्या जखमा जाग्या होतात. संगीत आपल्या मनाची स्वच्छता राखते. नको त्या गोष्टी बाहेर फेकून देते. आपल्याला खूप ठोसपणे ही जाणीव करून देत राहते की कितीही गर्दीमध्ये राहिले तरी एकटेपणाला आणि त्यामुळे येणाऱ्या हतबलतेला आयुष्यात पर्याय नसतो. मी आवडत्या संगीतकारांचा, लेखकांचा आणि गायकांचा उल्लेख एकेरीमध्ये करतो याचे कारण माझ्या मनातील उद्धटपणा नाही. मी उद्धट आहे पण तो याबाबतीत अजिबात नाही. माझे ज्या कलाकारांशी वर्षानुवर्षांचे जवळचे नाते तयार झाले आहे, ते नाते असे करवून घेते. मी कुणालाही व्यक्ती म्हणून ओळखत नव्हतो आणि नाही. संगीताने तुमचे कर्त्यासोबत एक फार घट्ट नाते तयार होते. त्यातून हे तो आणि ती असे शब्द येतात. ए. आर. रेहमान आयुष्यात येऊन वादळ तयार करण्याआधी काही छोट्या पण फार महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. १९८४-८५ च्या आसपास मी दहाएक वर्षांचा असताना मायकल जॅक्सनचे थ्रिलर ऐकले. माझ्या मुंबईत राहणाऱ्या बहिणीच्या खोलीत ते लागले होते. शाळेत असण्याचा काळात भारतात एम टीव्ही आणि चॅनेल व्ही आले आणि तोपर्यंत आम्ही ज्या पद्धतीने संगीताकडे पाहत होतो ती दृष्टी आणि परिणाम बदलले (शारदादेवी नावाची एक देवी आहे. ती सकाळी उठून आवरून वीणा बिणा घेऊन आपण काय काय गाणी गातोय, ऐकतोय, काय काय अभ्यास करतोय, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा आदर करतोय की नाही यावर लक्ष ठेवायला देवांच्यातर्फेबसून असते. संगीत हा देवाचा प्रसाद आहे, भारतीय संस्कृतीच्या गळ्यातील पदक हे भारतीय संगीत आहे, संगीतकार देव आहे. लेखक आणि कवी हे देवांचे पणजोबा आहेत. वादक देवांचा मामेआजोबा आहे. गायक अजूनच काहीतरी म्हणजे देवांच्या देवाचा देव आहे.) अशा सगळ्या उदबत्तीच्या धुराने गुदमरलेल्या सांगीतिक वातावरणात अचानक मडोना आणि मायकल जॅक्सन माझ्या आयुष्यात आले आणि माझी मुंज झाली. मी अचानक गुरुगृही जाऊन पडलो आहे असे मला वाटले. आपल्या मनात प्रेम-आदर आणि आदर आणि प्रेम याच्या पलीकडे खूप भावभावनांचे जंजाळ असते. लहान वयात ते जंजाळ अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघड असते. राग असतो, नव्याने तयार झालेल्या आणि सतत उफाळणाऱ्या शारीरिक वासना असतात. त्यातून तयार होणारे गडद एकटेपण आणि रंगीत रोमान्स असतो. स्पर्धा असते, ईर्ष्या असते, तुच्छता असते. या सगळ्या भावनांकडे भारतीय शिक्षणात, भारतीय कुटुंब पद्धतीत बघायला किंवा त्या भावनांना हाताळायला शिकवत नाहीत. पाश्चिमात्य संगीताने माझ्या धरणाचे दरवाजे पटापट उघडले आणि मला मोकळे मोकळे वाटू लागले. आपल्याला समजून घेणारे आणि आपल्या मनातील रागाला वाईट न म्हणणारे कुणीतरी या जगात आहे, या भावनेने मी मायकल जॅक्सनच्या संगीताशी जोडला गेलो. मला आज हे लक्षात आले तरी आश्चर्य वाटते की मला इंग्रजी भाषेचा एकही शब्द त्या काळात कळत नसे. मी सोळा सतरा वर्षांचा होईपर्यंत सलग एक वाक्य इंग्रजीत बोलू शकत नव्हतो आणि तरीही दहा अकरा वर्षांचा असल्यापासून मी मडोना आणि मायकल जॅक्सन यांच्या संगीताकडे कसा काय ओढला गेलो असेन? मीच नाही तर त्या काळात सगळे जग त्या दोघांनी काबीज केले होते. याचे कारण त्यांचे ऊर्जा देणारे सळसळते संगीत होते. गरिबांना, कुरूप माणसांना, एकट्या जिवांना, हतबल अपयशी माणसांना ते संगीत जागे करून आत्मविश्वास देत होते. संगीताला एक दृश्यात्मकता आली होती. एम टीव्हीवर गाण्यांचे म्युझिक व्हिडीओ दिसायला सुरुवात झाली होती. अमेरिकेने जगाला दिलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे अमेरिकेने निर्माण केलेले संगीत. मला ते आयुष्यात फार योग्य वेळी मिळाले.मलाच नाही तर संपूर्ण भारतातील तरु ण मुलांना..