आनंद इंगोलेएकविसाव्या शतकाकडे बघताना आपण विज्ञानाचे आणि स्पर्धेचे युग म्हणून बघतो. पण, या स्पर्धेतून घरातील बालकही सुटले नाही. पालकांच्या अपेक्षा आणि शाळेतील पुस्तकांचे ओझे यात चिमुकल्यांचा गोजिरवाणा चेहरा मात्र कोमेजत चालला आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात घरी पालकांचा तगादा तर शाळेत शिक्षकांचा दबदबा असल्याने चिमुकल्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी आता पालकांनाही वेळ नाही आणि शाळांनाही आपली दुकानदारी चालवायची असल्याने पालक आणि शाळा यांच्या घसापीटीत मात्र चिमुकले एकलकोंडे होत आहे.आपणही कधीकाळी विद्यार्थी होतो. तेव्हाचे शिक्षण आणि खेळण्यासाठी मिळणारा भरपूर वेळ याही परिस्थितीत जीवन सार्थकी लावण्यात यशस्वी झालोय. मग, आत्ताचे चिमुकले इतके चिंताग्रस्त, एकलकोंडे व आक्रमक का होत आहे? याचा शोध वर्ध्यातील पालक समीर शेंडे व त्यांच्या चार-पाच मित्रांनी घेण्याचा पयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ‘शाळेत शिकविलेला एखादा भाग त्यांना का समजला नाही, याचा विचार करण्याऐवजी माझा पाल्य पहिला क्रमांक कसा मिळवेल! यासाठी पालकांचा असलेला अट्टाहासच जबाबदार आहे’. तेव्हा त्यांनी शिक्षण प्रणाली व पद्धतीतील चुका काढत बसण्यापेक्षा त्यांनी वेगळ्या शिक्षण पद्धतीनुसार शायनिंग स्टार्स (मॉन्टेसरी हाऊस आॅफ चिल्ड्रन) ह्या नावाने शाळा सुरु केली. एका वर्गात दहा विद्यार्थी आणि एक शिक्षिका असा वर्ग असल्याने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कृतीकडे लक्ष देणे सहज सोपे झाले. बघता-बघता विद्यार्थ्यांचा हा ओघ वाढत गेला आणि अनुभवातून शिक्षण मिळत असल्याने पालकांनीही ही पद्धती समजून घेतली. कसलंही दडपण नाही, कृतितूनच शिक्षण मिळत असल्याने चिमुल्यांच्या चेहऱ्यावरचे हसू खुलेले. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही शाळा आपले घर वाटू लागले तर शिक्षिका मित्र झाल्यात. विद्यार्थ्यांच्या दफ्तराचे ओझे कमी करण्यात अद्यापही शासनाला फारसे यश आले नाही. मात्र ‘ईच्छा तिथे मार्ग’ या उक्तीप्रमाणे पालकांनीच पाऊल उचलेले आणि स्वत: च शाळा काढून दफ्तराचे ओझे न ठेवता गृहपाठ विरहित शिक्षणप्रणाली सुरु केली. ही शिक्षणपद्धती प्रि-प्रायमरीपासून तर इयत्ता पाचवी पर्यंत राबविली जात आहे. कुणालाही शिक्षा न करता ‘स्वयंशिस्तीवर’ भर देण्यात येत असल्याने कोणतीही स्पर्धा किंवा तुलना नाही. म्हणूनच कधीकाळी एकलकोंडे झालेले विद्यार्थीही आता बोलके होत आहे.पण, एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे; खरचं इतक्या कमी वयात स्पर्धेची गरज आहे? गरज आहे ती संस्काराची, मुल्यशिक्षणाची, नैतिकतेची आणि प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याची.परदेशातील शिक्षण पद्धती रु चलीपरदेशात ‘मारिया मॉन्टेसरी’ ही पद्धती ६ वर्षापर्यंत प्रचलीत आहे. हीच पद्धत समीर शेंडे व त्यांच्या सहकार्यांनी जाणून घेऊन अंमलात आणली. यात शिक्षकांचे स्थान, निरनिराळे उपक्रम, विद्यार्थी केंद्री पाठ्यक्रम, मुलांप्रमाणे शिक्षकांना बदलण्याची आसक्ती, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक विकास अगदी सोप्या पद्धतीने साधल्या जाणाºया गतिविधी उत्त्कृष्ठ आहे. शिक्षकाने अधिरतेने नव्हे तर धिराने व उत्साहाने कसे शिकवावे याचे धडे उमजले. त्यानुसारच वर्ध्यातील मॉन्टेसरी हाऊस आॅफ चिल्ड्रनची सुरुवात झाली. यामुळे घोकमपट्टी बंद झाली.मेमरीला केंद्र स्थानापासून बाजूला काढून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेवर भर दिला.मुलांना चूक करण्याची संधी दिल्याने त्यांना ती सुधारण्यासाठी सेल्फ लर्नर बनविले. नकारात्मकता बाजुला सारत स्पर्धा व तुलना टाळली. ज्ञान रचनावादावर आधारित शिक्षण प्रणाली आता विद्यार्थी आणि पालकांनाही रुचली आहे.बदलले विद्यार्थ्यांचे भावविश्वकृतितून शिक्षण देणाºया या शाळेत पिंक टॉवर, बिड्स, ब्राऊण स्टिअर्स, लाँग रॉड, नंबर रॉड, झिप फे्रम, बटन फ्रेम, शु लेस, वेल क्रो फ्रेम, मॅचिंगग कार्ड, वॉटर पोअरिंग, ग्रेन्स पोअरिंग, स्पूनिंग, कलर टॅबलेट्स अशा अनेक उपक्रमाची साधने तसेच विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार व आवश्यकतेनुसार वस्तु उपलब्ध आहे.कोणताही गृहपाठ न देता स्वत:च्या गोष्टी स्वत: करण्याचे प्रात्यक्षिकातून सांगण्यात येते. नॅपकींग फोल्ड करणे, वर्तमानपत्राची घडी करणे, शर्टच्या बटन लावणे, पॅन्टची जीप लावणे, आपली वस्तू जागेवर ठेवणे यासह हात धुण्यापासून तर केस करण्यापर्यंत सर्व गोष्टी शिकविल्या जातात. हळूहळू पॉन्डींग, चर्णिंग, सिलेंडर ब्लॉक्स या उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि आय-हॅन्ड कॉर्डीनेशन वाढू लागले.
शाळा झाले घर अन् शिक्षिका झाल्या मैत्रिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 7:01 AM