- नितीन कुलकर्णी
शाळा म्हटलं की काही परवलीचे जोडशब्द आठवतात. दप्तर-वॉटरबॉटल, वह्या-पुस्तकं, पेन-पेन्सिली, कंपास-पट्टी, परीक्षा-निकाल आणि क्र ाफ्ट-प्रोजेक्ट्स. पूर्वी असे प्रोजेक्ट कला व हस्तकला या विषयांमध्ये यायचे. आजकाल असे प्रोजेक्ट अथवा चार्ट्स प्रत्येक विषयात असतात. अनुभवजन्य शिक्षणाच्या नावाखाली अशा प्रकारचे प्रोजेक्ट चालू केलेले असावेत. हे प्रोजेक्ट मुलांनी शाळेतच करायचे असतात, परंतु बहुतेक वेळा त्यांचे रूपांतर गृहपाठात झालेले दिसते. त्यामुळे हे प्रोजेक्ट्स संपन्न करण्याची जबाबदारी मुलांपेक्षा पालकांवर बेतलेली असते. ‘कसा करावा प्रोजेक्ट, जेणोकरून इतरांपेक्षा वेगळा दिसेल?’ (अशी चिंता वडिलांपेक्षा आयांनाच जास्त असलेली दिसेल) या चिंतेचे निराकरण करायला गूगल-गुरू विकीपिडीयाच्या रूपाने हजर असतात. अर्थातच त्यासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, प्रिंटर घरी असणं नितांत गरजेचं असतं. अशी या काळाचीच गरज आहे असं कॉम्प्युटर व प्रिंटरचे निर्माते जाहिरातींद्वारे आपल्या मनावर बिंबवत असतात म्हणून ती असते असं नाही, तर आपल्यालाही असंच वाटत असतं. या परिस्थितीचा परिणाम पालक-विद्यार्थी व शिक्षकांवर व एकंदरीत अभ्यासाच्या पोतावर होत आहे. माध्यमिक इयत्तेत साधारणपणो वर्षाला वीस प्रोजेक्ट्स करायला लागतात. यात सगळ्याच विषयांचा अंतर्भाव होतो. हे प्रोजेक्ट्स प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक द्विमितीय- बोर्ड अथवा पोस्टर असलेले. यात चित्रे, प्रिंटआउट व अक्षरलेखन यांचा समावेश होतो. दुसरे त्रिमीतीय- यात मॉडेल्स येतात. प्रामुख्याने यात विज्ञानातील संकल्पना समजावून दिलेल्या असतात. प्रामुख्याने माउंटबोर्ड वा थर्माकोलचा वापर यात केलेला असतो. अभ्यासक्र मातील अशा क्रि यात्मक कामाचं खरं तर आंतरविद्याशाखा (्रल्ल3ी1्िर2्रूस्र’्रल्लं18) प्रणालीत खूप मोठं योगदान ठरू शकतं. उदाहरणार्थ विज्ञानातल्या आकृत्यांचा संबंध भूमितीशी असू शकतो व अशा अनुभवाचं वर्णन भाषेच्या माध्यमातून प्रभावीपणो कसं करायचं हा एखाद्या भाषेचा प्रांत असू शकतो. आणि हे मॉडेलच्या माध्यमातून मांडणं हे हस्तकलेच्या वर्गात शिकवलं जाऊ शकतं.
आज असं दिसतं की असे प्रोजेक्ट्स विभक्त ठेवलेले असतात आणि हे कसे करायचे त्याचं तंत्र, माध्यमाची हाताळणी यांची माहिती व कल्पनानिर्मितीसाठी चालना यांचा अंतर्भाव अभ्यासक्र मात नसतो.
सोबतच्या उदाहरणात ‘सक्सेस कम टू दोज हु विल अॅण्ड डेअर’ या विषयावर इंग्रजी विषयात आठवीमधल्या विद्यार्थिनीने बोर्ड बनवलेला आहे. यात स्टिफन हॉकिंग्ज या खगोलशास्त्रज्ञावर माहितीवजा लेखन केले आहे व इंटरनेटवरून काढलेल्या फोटोंचे प्रिंटआउट कापून लावले आहेत. पाश्र्वभूमीवर तारकापुंज वाटतील असा पोत रंगवला आहे. हे सर्व स्वत:च्या (पालकांच्या) बळावर केलं आहे.
शलाका भिसे या कला शिक्षणात कार्यरत असलेल्या एक अनुभवी व्यक्ती आहेत. या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्यावर समजलं की शालेय अभ्यासक्रमात बदलांचे वारे वाहत आहेत. काही बदल हे अंमलात आलेदेखील आहेत. अर्थात, कला व हस्तकला शिक्षणातील प्रगतीसाठी खूप कमी प्रयास होताना दिसतात. मुख्य प्रवाहात बदलांसाठी बरंच काम झालंय. परंतु इथे मूळ आव्हान अभ्यासक्रम राबविण्यातल्या अडचणींवर मात करणारी कार्यप्रणाली तयार करून ती वापरणं हे आहे. ब:याच अभ्यासक्र मांत कन्स्ट्रक्टीव्हीझम या जीन पियाजे या शिक्षणशास्त्रज्ञाच्या (ज्ञान ग्रहण करण्याची एक प्रणाली) प्रणालीवर आधारित अभ्यासक्र म आला आहे. या प्रणालीत बालकांच्या सहजप्रेरणा व खेळातून शिकण्याची त्यांची वृत्ती याला महत्त्व देण्यात आलं आहे. अनौपचारिकतेला या प्रणालीत स्थान देण्यात आलं आहे. ज्ञानाची प्रक्रिया ही अनुभवजन्य असते व नवीन अनुभवाची निर्मिती व त्याचे अर्थन करण्यातूनच नवीन ज्ञान तयार होतं, असा विश्वास या प्रणालीचा पुरस्कार करणा:यांचा असतो. शिक्षकाच्या भूमिकेचा विचारदेखील यात केलेला आहे. शिक्षक शिकवतो म्हणजे माहितीवजा सूचना करतो आणि विद्यार्थी शिकतो, तो प्रश्न विचारतो आणि शिक्षक उत्तर देतो, ही झाली रूढ पद्धत. या नव्या पद्धतीनुसार शिक्षकाची भूमिका ही सहायकाची असायला लागते. यात शिकवण्यापेक्षा शिकायची परिस्थिती निर्माण करणो असे असते. आणि आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात आमूलाग्र माहिती उपलब्ध असताना हे करणो अवघड नाही. इथे विद्याथ्र्यांना वेगवेगळ्या पद्धतीद्वारे अनुभव घ्यायला लावणं हे महत्त्वाचं ठरतं आणि इथेच सूचनेची रचना करणं (इन्स्ट्रक्शनल सिस्टिम डिझाइन) याचा भाग येतो. ही पद्धत जरी दूरस्थ शिक्षण पद्धतीत वापरली जात असली, तरी त्यातला काही भाग इथं उपयोगी पडू शकतो. शिक्षणाचं डिझाइन असं ते असू शकेल. आपली एकूण शिकवण्याची पद्धत ही अनुभव घेण्यासाठी प्रेरित करणं व नंतर इतरांनाही आपल्या अनुभवात सहभागी करून घेणं अशी असली पाहिजे. शिक्षक हा सर्वज्ञाता आहे व तो वर्षानुवर्षे ज्ञान वाटतो आहे ही झाली जुनी संकल्पना. आजच्या संकल्पनेप्रमाणो ज्ञान हे शिक्षकाने विद्याथ्र्याच्या समवेत प्रेरणोने ओतप्रोत वातावरणात शोधून काढायचे आहे.
अर्थात हे करण्यासाठी विविध साधनांचा, सरावांचा वा खेळांचा वापर करावा लागणार हे उघड आहे. इथे एखाद्या विषयाचा वर्ग म्हणजे एक परफॉर्मन्स असायला हवा.
अरविंद गुप्ता हे असे अवलिया आहेत ज्यांनी आपले आयुष्य मुलांचे विज्ञान व गणिताचे शिक्षण रंजक व सोपे व्हावे यासाठी दिले आहे. गुप्ता यांनी आय.आय.टी. कानपूरहून बी.टेक. डिग्री संपादन केली व लोकांना अप्रूप वाटेल असा व्यवसाय निवडला.
एका वृत्तपत्रतल्या वर्णनानुसार गुप्ता आपल्याजवळचा एक मोठ्ठा डबा घेऊन छोटय़ा विद्याथ्र्याच्या जवळ बसतात. या डब्यात सुईदोरे, प्लॅस्टिकचे स्ट्रॉ, टाकाऊ टेट्रापॅकस, रद्दी पेपर, झाडूंच्या काडय़ा, सायकलच्या टायरच्या टय़ूब्ज, लोहचुंबक, मणी, रबरबॅण्ड अशी अनेक स्वस्त साधनं असतात. एखाद्या जादूगाराने त्याच्या पोतडीत हात घालावा त्याप्रमाणो ते एक आइस्क्रीमची काडी रबरबॅण्ड व ट्वाइनचा धागा काढतात व काही सेकंदात खेळण्यातली पिस्तूल जन्म घेते. दिसायला व बनवायला अगदी साधी; परंतु विज्ञानातील सिद्धांताने भरलेली अशी ही खेळणी मुलांना बरंच काही शिकवून जातात.
हे एक प्रकारचं खेळचिंतन ठरतं. टॉइज फ्रॅाम ट्रॅश या त्यांच्या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे.
डिझाइनच्या शिक्षणाचा पायादेखील अशाच दृष्टिकोनातून बनलेला असतो. करता करता शिका असं नसेल तर शिक्षण केवळ पुस्तकी उरेल आणि निर्मितीक्षमता व कल्पकतेचा त्यात अभाव असेल. शाळांमधून सर्वच विषयांचं शिक्षण अशाप्रकारे जर दिले गेले, तर डिझाइनच्या शिक्षणातला पायाभूत अभ्यासक्र म घेणं विद्याथ्र्यांना खूप सोपं होईल.
(लेखक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी
या संस्थेत डिझाइन या विषयाचे प्राध्यापक आहेत.)
nitindrak@gmail.com