त्या दोघींचं लग्न
- संध्या कर्णिक
रात्री राहीचा फोन खाली ठेवला आणि मी आणि माझा नवरा सुन्नपणो बसून राहिलो.
आपली राही गे आहे.
कसं शक्य आहे हे?
खोटं कशाला सांगू, धक्का बसलाच.
नंतर हळूहळू कळलं, हा धक्का अनेक स्तरांवरचा आहे. स्वत:च्या मनात इतकी र्वष जपलेल्या स्वत:च्या प्रतिमेलाच गेलेला तडा आहे हा.
माङया लेकीनं हे गुपित मला का सांगितलं नाही? तिच्या-माङयात तेवढा विश्वास निर्माण करण्यात कमी पडले का मी? का ती एकटीच तिच्यातल्या बदलाशी झुंजत राहिली? का मला कळल्या नाहीत गोष्टी? कसं सुटलं नजरेतून सगळंच? मी स्वत: अत्यंत टोकाची व्यक्तिस्वातंत्र्यवादी. त्यात अमेरिकेत मन:पूर्वक जगलेली. वेगळं असलेल्या, वेगळं जगणा:या, त्या वेगळेपणाचा आग्रह धरणा:या, वेगळेपणाच्या हक्कांसाठी भांडणा:या सगळ्या समाजगटांना मी कायम पाठिंबा दिलेला. विचाराने आणि संधी मिळाली तेव्हा कृतीनेही.
आता माझी मुलगीच मला सांगत होती, की ममी, मी गे आहे. समलिंगी.
तर मग ते स्वीकारायला एवढा त्रस का होतो आहे आपल्याला?
- किती किती त:हांनी जीव घुसमटत होता. अगणित प्रश्नांनी माङया डोक्यात फेर धरला. आपल्याला इतक्या वर्षात कसं कळलं नाही? आणि महत्त्वाचं म्हणजे, इथून पुढे राहीचं काय? बाहेरच्या समाजाकडून तिला किती त्रस होईल? तिची जोडीदार कोण असेल? मनासारखी सोबत तिला मिळेल का? गे लोकांच्या विरुद्ध अगदी अमेरिकेसारख्या देशातसुद्धा केवढी मोठी आघाडी आहे. तिच्या सुरक्षिततेचं काय? आपण खरंच गे आहोत ह्याची तिला खात्री आहे का? ती सुखी होईल का?
..ती सबंध रात्र मी आणि माझा नवरा - आम्ही दोघेही जागे होतो. मूकपणो रडत होतो. माझा आतला आवाज विचारत होता, मी आणि तू दोघांनाही मान्य आहे हे. मग हा त्रस कसला? शंका कसली? विचारांच्या या सगळ्या गोंधळात स्वत:ला माफ करून टाकणं आणि राहीला स्वीकारणं या दोन अपरिहार्य गोष्टी होत्या, ज्या मी प्रामाणिकपणो करण्याचं ठरवलं. आई असूनही आपल्याला हे का कळलं नाही या गिल्टमधून सगळ्यात पहिल्यांदा बाहेर यायचं ठरवलं. आपल्याला कालर्प्यत हे समजलं नाही, पण आज समजलं आहे, तर आता यापुढे आपण राहीच्या पाठीशी ठामपणो उभं राहायचं असं मनाशी पक्कं केलं आणि दुसरी गोष्ट केली ती म्हणजे, यात काहीही वावगं नाही हे आम्ही आधी स्वीकारून टाकलं. खरंतर ही गोष्ट तात्त्विक पातळीवर माहीतच होती, पण प्रत्यक्ष मूलच गे आहे म्हटल्यावर विचारांचं अधिष्ठानही जरासं हललं होतं. ते पुन्हा पक्कं केलं. माझा भांबावलेपणा त्यामुळे आपोआप कमी झाला. राहीशी मोकळ्या संवादाला सुरुवात झाली. तिच्या मनातल्या भावना ती मोकळेपणानं बोलू लागली.
जसजसे दिवस उलटत गेले तसं दडपण कमी होत गेलं.
काही दिवसांनी एक सुंदर वळण आलं. राहीला मैत्रीण मिळाली. एलिझाबेथ. तिच्याच ऑफिसातली. त्यांचं डेटिंग सुरू झालं..
(पुढल्या वळणांची शहाणी आणि सुंदर कहाणी :
यंदाच्या ‘दीपोत्सव’ मध्ये)