शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
2
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
3
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
4
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
5
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
6
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
7
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
8
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
9
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
10
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
11
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
12
धक्कादायक! पोस्टमार्टमपूर्वीच तरुण स्ट्रेचरवरुन उभा राहिला, म्हणाला, "मी जिवंत आहे भाऊ"; हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली
13
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
14
Shankh Air Airline : Indigo ला टक्कर देणार? आणखी एक एअरलाईन्स उड्डाणासाठी तयार; सरकारची मंजुरी
15
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या
16
पोलीस शिपायासोबत पळाली भाजपा नेत्याची पत्नी, सोबत मुलगा आणि कोट्यवधी रुपयेही नेले
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह रेट
18
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
19
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
20
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय

सिक्कीमच्या राजभवनात..

By admin | Published: July 01, 2016 5:58 PM

श्रीनिवास पाटील यांनी राज्यपाल म्हणून सिक्कीमच्या सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. त्यांच्यासोबतचा एक दिवस..

सुरेश भटेवरा
(लेखक ‘लोकमत’चे राजकीय संपादक आहेत.)
 
श्रीनिवास पाटील यांनी राज्यपाल म्हणून सिक्कीमच्या सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. त्यांच्यासोबतचा एक दिवस..
 
सिक्कीमची राजधानी गंगटोक. या परिसरात हिंडताना तुम्ही महाराष्ट्रातले आहात असे कोणत्याही टॅक्सीचालकाला जाणवले तर एक प्रश्न हमखास तो तुम्हाला विचारील. गव्हर्नर साहबसे मिले या नही? अगर नही मिले तो जरूर मिलिएगा। बडे अच्छे आदमी है। सब से मिलते है। सिक्कीम को पहली बार पब्लिक का गव्हर्नर मिला है। 
सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र श्रीनिवास पाटील. सलग दहा वर्षे लोकसभेत क-हाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर पाटीलसाहेबांनी 13 जुलै 2013 रोजी सिक्कीमच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. या घटनेला तीन वर्षे उलटून गेली. तेव्हापासून महाराष्ट्रातला कोणीही सामान्य पर्यटक गंगटोकला गेला तर त्याच्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे, सिक्कीमच्या राज्यपालांचे राजभवन..! 
गंगटोकच्या पॉइंट झिरोजवळ आहे राजभवनाचे प्रवेशद्वार. इथले सुरक्षारक्षक अदबीने तुमचे स्वागत करतात. त्यानंतर 180 फूट उंचीर्पयत नेणारा गोलाकार उंच चढत जाणारा रस्ता पार केला की चौतर्फा घनदाट वृक्षराजीच्या कोंदणात दडलेल्या राजभवनाच्या अनुपम दुमजली वास्तूचे दर्शन घडते. किती तरी वेळ त्या वास्तूकडे, सहसा न पाहिलेल्या सभोवतालच्या रंगीबेरंगी पहाडी फुलांकडे, मुक्तपणो विहरणा-या पक्ष्यांच्या थव्यांकडे, फुला- पानांभोवती विहरणा-या लक्ष वेधणा-या किटकांकडे पाहत राहावेसे वाटते. 
राजभवनाच्या दुस-या मजल्यावर सकाळचा चहा पिण्यासाठी एक प्रशस्त दालन आहे. इतिहासकाळापासून या दालनाला ‘सोलजा खांग’ संबोधले जाते. वातावरणात ढगांचे आच्छादन नसले तर हिमालयातील कांचनजंगाच्या हिमाच्छादित शिखराचे लावण्य सोलजा खांगमधून सहज न्याहाळता येते. करडय़ा शिस्तीत वाढलेले राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची सकाळ सोलजा खांगमधे चहाचा आस्वाद घेत पहाटे 6.30 वाजता सुरू होते. राज्यपाल या नात्याने सार्वजनिक जीवनात राबवता येणा-या अनेक कल्पक कल्पना त्यांना इथेच सुचतात. मग दिवसभराच्या लोकसंपर्कासह त्यांचा दिनक्रम सुरू.
राज्यपाल पाटलांनी सिक्कीमचे लोकाभिमुख क्रियाशील राज्यपाल म्हणून तीन वर्षात लौकिक संपादन केला आहे. सिक्कीम हे भारतातले 100 टक्के जैविक शेती करणारे पहिले राज्य. इथल्या मूळ वनस्पतींचे व फुलांचे जतन करण्यासाठी 2003 पासून या प्रयोगाला प्रारंभ झाला. अलीकडेच सिक्कीम सरकारने राज्यात जैविक शेती सक्तीची करण्यासाठी कायदा करण्याचे ठरवले. या कायद्यानुसार राज्याबाहेरून एक किलोदेखील खत, बियाणो अथवा रसायने आणायची परवानगी नाही. बाहेरच्या कोंबडय़ा, पशुखाद्य आणायला अर्थातच बंदी आहे. इथल्या गायीच्या दुधाचे चीज जगात पहिल्या क्रमांकाचे आहे. सिक्कीमला हे वैभव प्राप्त करून देणा:या कायद्याचा वटहुकूम राज्यपाल पाटील यांच्या स्वाक्षरीने बजावला गेला. सिक्कीमच्या राजभवनात नुकताच दिवसभराच्या वास्तव्याचा आणि राजभवनाच्या पाहुणचाराचा योग आला. यावेळी दोन तासांच्या गप्पांमध्ये महाराष्ट्राच्या मातीत वाढलेले पाटील सिक्कीमच्या जैविक शेतीबद्दल अतिशय भरभरून बोलत होते.
राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय वर्षातले 293 दिवस राज्यपालाला राज्याबाहेर जाता येत नाही.  मुख्यमंत्री पवन चामलिंग यांचे सरकार राज्यात स्थिर असल्यामुळे राज्यपाल या नात्याने पाटील यांना सरकारच्या कामकाजात विशेष हस्तक्षेप करण्याची वेळ कधी येत नाही. निसर्गात आणि पानाफुलात रमलेल्या पाटील यांनी या संधीचा वापर राज्यात अनेक सकारात्मक उपक्रमात सहभागी होण्यासाठी केला आहे. 
इतिहासाची पाने चाळली तर महाराष्ट्र आणि सिक्कीमचे ह्रणानुबंध साता:याच्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींमुळे जोडले गेले. 16 मे 1975 साली सिक्कीम हे 22 वे राज्य म्हणून भारताच्या नकाशाला जोडले गेले. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्यांच्याच प्रस्तावानुसार अविभाज्य भारतात सिक्कीमचा समावेश झाला. सातारच्या अप्पासाहेब पंतांकडे पंडित नेहरूंनी त्यापूर्वी सिक्कीमच्या पोलिटिकल ऑफिसरची जबाबदारी सोपवली होती. याखेरीज सिक्कीमचे दुसरे राज्यपाल महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री होमी जे. एच. तल्यारखान होते आणि आता सातारचे श्रीनिवास पाटील इथले 15 वे राज्यपाल आहेत. सिक्कीमच्या 70 कलाकारांच्या पथकाचे विविध कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत घडवून पाटीलसाहेबांनी दोन राज्यांच्या सांस्कृतिक संबंधांचा नवा पूल जोडला आहे. गंगटोकमध्ये गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय योग दिन व अन्य सार्वजनिक कार्यक्रमांतही पाटीलसाहेबांचा सक्रिय सहभाग असतो. दिव्यांगांसाठी काम करणा:या एका संस्थेला मदत करण्यात राज्यपालांचा विशेष पुढाकार असतो.  सिक्कीममधील विद्यापीठातल्या तरुणांशी, कलाकारांशी, नृत्य पथकांशी संपर्काची आणि हितगुज करण्याची एकही संधी पाटील सोडत नाहीत. 
याखेरीज महाराष्ट्रातून सिक्कीमला पर्यटनासाठी आलेल्या अभ्यागतांची सरबराई आपणहून राज्यपाल पाटलांनी स्वीकारली आहे. भारत-चीन सीमेवरील नथुला पासला जाण्यासाठी पर्यटकांना पास मिळवून देणो, ज्यांची निवासाची सोय नसेल त्यांची शक्य असल्यास राजभवनाच्या विश्रामगृहात अथवा अन्य ठिकाणी सोय करून देणे, अडल्या- नडल्यांची रेल्वे प्रवासाची आरक्षणोदेखील राजभवनाचे कर्मचारी करून देतात. 
सिक्कीममध्ये आजवरच्या राज्यपालांचा लोकसंपर्काविषयी फारसा लौकिक नव्हता. राज्यपाल पाटलांनी मात्र या पदाचा बडेजाव बाजूला ठेवून सिक्कीमच्या राजभवनाच्या निसर्गरम्य वास्तूची दारे सामान्य जनतेसाठी खुली केली आहेत. सिक्कीमच्या राजभवनाशी संपर्क साधून आपल्या आगमनाची फक्त पूर्वकल्पना तेवढी द्यावी लागेल. तुमचे नशीब जोरदार असेल तर बाकी सारे काही पाटीलसाहेब पाहून घेतील.
देखण्या वास्तूचे वैभव
1890 साली बांधलेल्या या राजभवनाला पूर्वी रेसिडेन्सी म्हणत. ब्रिटिश सरकारचे पोलिटिकल ऑफिसर सर जॉन क्लॉड व्हाईट या वास्तूचे पहिले मानकरी. त्यानंतर 1975 साली सिक्कीम अधिकृतरीत्या भारतात विलीन होईर्पयत अनेक पोलिटिकल ऑफिसर्सचे वास्तव्य या राजनिवासात होते. 
14 फेब्रुवारी 2006 रोजी सिक्कीमला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. राजभवनही त्यातून सुटले नाही. वास्तूच्या आत बरीच पडझड झाली. दगडी भिंतींना जागोजागी तडे गेले.  त्यानंतर सलग तीन र्वष ही ऐतिहासिक वास्तू भूतकाळातल्या आठवणीत बंद अवस्थेत पडून होती. सिक्कीम सरकारने या काळात या वास्तूपासून 100 मीटर अंतरावर राजभवनाची नवी वास्तू बांधली. ही वास्तू आधुनिक असली, तरी जुन्या इमारतीच्या देखण्या रूपाची सर मात्र त्याला नाही. अखेर तत्कालीन राज्यपाल, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रलयाने या वास्तूचा जीर्णोद्धार करून त्याला पुनरुज्जीवन देण्याचे ठरवले. या हेरिटेज वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी पटियालाच्या थापर विद्यापीठातील प्रा. अभिजित मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या टीमची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 100 कारागिरांनी दिवसातले 18-18 तास  खपून या इमारतीचा अंतर्बाह्य कायाकल्प घडवला. तिचे जुने देखणो रूप बदलणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. डिसेंबर 2009 पासून ही इमारत पुन्हा एकदा राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान बनले.