अनिता पाध्ये -
आजही तो दिवस मला स्पष्ट आठवतो... सकाळी ११:३० ची वेळ. सुरुवातीच्या काळात एखाद्या मोठ्या कलाकाराची मुलाखत घेत असताना मनावर अनामिक दडपण येत असे; परंतु नंतरच्या काळात हळूहळू ते दूर झालं होतं. पण दिलीपकुमारना भेटायला जात असताना मी कमालीची नर्व्हस झाले होते. याची दोन प्रमुख कारणं होती. एक तर दिलीपकुमार यांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि दुसरं म्हणजे उर्दू भाषेवर असलेलं त्यांचं प्रभुत्व. शाळेमध्ये असताना प्रवीण, प्रज्ञा वगैरे हिंदी भाषेच्या परीक्षा दिल्या असल्याने समवयीन मुलामुलींपेक्षा माझं हिंदी बरं तसं बरं असलं तरी माझ्या हिंदी संभाषणामध्ये त्या काळात ‘मराठीपण’ डोकावत असे. अस्खलित हिंदी बोलता यावं, उर्दू, हिंदीचे योग्य उच्चार (तफल्लुज) करता यावेत, यासाठी उर्दू भाषेचे धडे घेण्यास सुरुवात केली होती; परंतु त्यात प्रभुत्व मिळविण्यासाठी निश्चितच आणखीन बराच वेळ लागणार होता. माझं सदोष हिंदी ऐकून दिलीपकुमार आपल्याला हसतील, आपल्याला कमतर समजतील, या विचाराने मनामध्ये प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला होता. मनावरचं ते दडपण घेऊनच मी पाली हिलमधील त्यांच्या (खरं म्हणजे हा सायराबानोचा बंगला आहे, दिलीपकुमार एकमेव स्टार कलाकार असतील जे सासुरवाडीत राहतात) बंगल्यात प्रवेश केला. त्यांच्या सचिवानं आगत्यपूर्वक माझं स्वागत केलं. ‘सर पाचएक मिनिटांत येत आहेत, तुम्ही चहा घेणार का कॉफी?’ मी नकाराची मान हलवली. ‘शुअऽऽऽ?’ असं विचारून तो आपल्या कामाकडे वळला.क्षणागणिक माझी अस्वस्थता, हृदयाचे ठोके वाढत चालले होते. आणि पाचएक मिनिटांतच साक्षात दिलीपकुमार माझ्यासमोर उभे राहिले. माझं हृदय फक्त बंद पडायचंच बाकी होतं. ‘हॅलो, कैसी है आप?’ मंद हास्य करत त्यांनी विचारलं. ‘मैं ठीक हूं, आप कैसे है सर?’ असं विचारून मी त्यांच्या पायाशी झुकले. तो दंडवत त्यांच्यातील कलावंताला होता. ‘अरे, लडकियां पैर नहीं छुती है’... अतिशय आपुलकीपूर्वक बोलणं, स्वरामध्ये आर्द्रता, आपुलकी. आलिशान खुर्चीमध्ये दिलीपकुमार यांनी विरजमान होत समोरच्या खुर्चीकडे हाताने इशारा करत मला बसण्याची खूण केली. हा माझा बावळटपणा समजा किंवा अती नर्व्हस झाल्यामुळे असेल; पण मी त्यांच्या चेहºयाकडे बघतच बसले. काय बोलावं? मुलाखतीची सुरुवात कशी करावी? हे मला समजतच नव्हतं. ‘क्या लोगी आप, चाय और कॉफी?’ दिलीपकुमारनी मला विचारलं. ‘जी, नहीं, शुक्रिया?’ मी कसंबसं म्हंटलं. ‘नहीं क्यू? कुछ तो लेनाही पडेगा... हम बिना चाय-कॉफी के किसीको जाने नहीं देते।’ एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्यांचं बोलणं होतं. चेहरा, देहबोलीमध्ये जराही ‘दिलीपकुमार असल्याचा’ गर्व नाही. ‘मैं आपको, तुम्हें कहू तो कोई ऐतराज नहीं हैं ना?’ त्यांच्या या प्रश्नावर मी मान हलवत होकार दिला. पटकथालेखकानं स्क्रिप्टमध्ये न लिहिलेल्या बिटवीन द लाईन्ससुद्धा वाचणाºया या महान अभिनेत्याला माझा चेहरा वाचणं मुळीच अशक्य नव्हतं. ‘क्या नाम है तुम्हारा? कहां से हो? कबसे इस फिल्ड में काम कर रही हो?’ बरेच पॉझ घेत त्यांनी एकापाठोपाठ प्रश्न विचारले. खरंतर मी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आले होते; पण त्यांनीच माझा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली होती. मी थोडक्यात माझ्याविषयी माहिती सांगितली. ‘अच्छा, तू मराठी आहेसऽऽ?’ मी ओरिजनल मुंबईकर असून महाराष्ट्रीयन आहे हे कळताच ते माझ्याशी मराठीत बोलू लागले. दिलीपकुमार खूप छान मराठी बोलत असत. ‘हंऽऽऽ आज सकाळपासून मी थोडा नर्व्हस आहे’ हे वाक्य ऐकून मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. ‘म्हणजेऽऽऽ, काय आहे नाऽऽऽ, मी काही हल्लीचा हिरो नाहीए. आमचा जमाना वेगळा होता. आता सगळ्याच बाबतीत किती मोठे बदल झाले आहेत, आत्ताची पिढी एकदम स्मार्ट आहे. त्यामुळे एक तरुण पत्रकार मुलगी काय काय प्रश्न विचारेल? तिच्या प्रश्नांची मला नीट उत्तरं देता येतील का? हा विचार सकाळपासून मला अस्वस्थ करतोए.’ हलकसं स्मित करत ते म्हणाले. आपुलकीनं भरलेल्या त्यांच्या बोलण्या-वागण्यामुळे तोपर्यंत मी बºयापैकी रिलॅक्स झाले असले तरी त्यांच्या वरील वाक्याने माझ्यावर अशी काय जादू केली की बस्स! माझी अस्वस्थता, तणाव, दडपण एकाएकी नाहिसे होऊन त्याची जागा आत्मविश्वासानं घेतली आणि काही मिनिटांतच पूर्ण आत्मविश्वासानं मी त्यांची मुलाखत घेऊ लागले. मुलाखत देत असताना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी टाळलं नाही किंवा प्रश्नाला बगलही दिली नाही. परंतु चित्रपटात पॉझ घेत संवाद बोलतात त्याचप्रमाणे प्रत्यक्ष जीवनातही दिलीपकुमार पॉझ घेत बोलतात, याविषयी अनभिज्ञ असल्याकारणानं सुरुवातीला त्यांचं बोलणं संपलंय असं समजून मी पुढचा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, की ते पुन्हा बोलणं सुरू करत आधीच्या प्रश्नाचं उरलेलं उत्तर देत होते. दोनएक वेळा असं घडल्यावर मात्र त्यांचं बोलणं संपल्याची खात्री करूनच मी प्रश्न विचारणं सुरू करत होते. ‘मी नीट उत्तरं दिली ना तुझ्या प्रश्नांची?’ मुलाखत संपताच दिलीपसाहेबांनी मला विचारलं. उत्तरादाखल मी फक्त स्मितहास्य केलं आणि त्यांचा निरोप घेत बंगल्याबाहेर पडले. दिलीपकुमार यांची पुन्हा भेट झाली ती अगदी अचानक. आत्ता नीटसं आठवत नाही; परंतु कोकण रेल्वे प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारच्या संबंधित खात्याद्वारे काहीतरी बॉण्ड्स योजना राबवली जाणार होती. सर्वसामान्य जनतेला ता सदर बॉण्ड्स खरेदी करण्यासाठी आकर्षित करण्याकरिता कोकण रेल्वे प्रकल्पाला उत्तेजन प्रोत्साहन देणारी छापील शुभेच्छापत्रे तयार करून त्यावर विविध क्षेत्रांतील नामवंतांच्या स्वाक्षºया घेतल्या जात होत्या. ‘आज आप कैसे भी दिलीपकुमार को मिलकर उनकी आॅटोग्राफ लेकर आइए।’ संपादकांनी फर्मावलं. पूर्वसूचना न देता, अपॉइन्टमेंट न घेता त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेत मी आॅफिसबाहेर पडले. दिलीपकुमार यांच्या बंगल्यात पोहोचले, तर सुदैवाने त्यांचे सचिव जॉन बंगल्यातच हजर होते. त्यांच्याशी माझा बºयापैकी परिचय असल्यामुळे सहजपणे बंगल्यात प्रवेश करता आला. अपॉइंटमेंट न घेता आल्याबद्दल सर्वप्रथम त्यांची माफी मागत सदर प्रकल्पाविषयी मी त्यांना माहिती देत छापील शुभेच्छापत्रावर दिलीपसाहेंबाची स्वाक्षरी हवी असल्याचं सांगितलं. ‘बरंऽऽऽ सरांना विचारून येतो,’ असं म्हणून जॉन पहिल्या मजल्यावर असलेल्या दिलीपकुमार यांच्या रूममध्ये गेले. दहाएक मिनिटांतच सिल्कची लुंगी आणि त्यावर गुडघ्यापर्यंत लोंबणारा सिल्कचा गाऊन घातलेले दिलीपकुमार जिने उतरून येत असल्याचं माझ्या नजरेसं पडलं. ‘कशी आहेस?’ जिने उतरत असतानाच त्यांनी विचारलं. ‘मी ठीक आहे सर, आपण कसे आहात?’ खुर्चीतून उठत मी नम्रपणे उभी राहिले. ‘अल्ला का शुक्र है,’ असं म्हणत आपल्या आलिशान खुर्चीत ते विराजमान झाले. जॉननी त्यांना प्रकल्पाविषयी माहिती दिली होती. तरीही त्यांनी पुन्हा ती जाणून घेतली. ‘बताओ, दस्तखत कहां करने है?’ असं म्हणत पेन घेण्यासाठी त्यांनी माझ्याकडे बघितलं. कुणीही पेन मागितलं, की पेनाचं टोपण काढून ते देण्याची माझी नेहमीची सवय. कारण कुणाला पेन दिलं तर ते परत मिळत नाही, हा अनुभव घेतल्यानंतर मी ही सवय जाणीवपूर्वक अंगीकारली होती. त्यामुळे दिलीपसाहेबांनी सही करण्यासाठी पेन मागितल्यावर पेनाचं टोपण काढून मी पेन त्यांच्या हातात दिलं होतं. मी सांगितलेल्या ठिकाणी तत्काळ सही करून त्यांनी पत्र माझ्या हातात दिलं.पेन त्यांच्या हातातच होतं. ‘और कुछऽऽ?’ स्मित करत मंद स्वरात त्यांनी विचारलं. ‘नो सर, ळँंल्ल‘२ ं ’ङ्म३’. दोन्ही हात जोडून मी आभार मानले. ‘तुम्हे क्या लगा, की मैं पेन वापस नहीं दूंगा?’ त्यांच्या या प्रश्नाने मी चांगलीच गांगारले. टोपण काढून पेन दिलं ही गोष्ट त्या वेळी त्यांच्या नजरेनं टिपली होती, हे माझ्या लक्षात आलं. खरं उत्तर द्यायचं की खोटं ? मला पेच पडला.