शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

‘सिंहिणीं’ची डरकाळी!

By admin | Published: October 11, 2015 7:55 PM

रसिला वढेर, किरण पाथिजा, दर्शना कागडा. अशी कितीतरी नावं. सिंहांबरोबरच गीरच्या जंगलात या महिलांचाही राबता आहे.

गजानन दिवाण

रसिला वढेर, किरण पाथिजा, दर्शना कागडा. अशी कितीतरी नावं. सिंहांबरोबरच गीरच्या जंगलात या महिलांचाही राबता आहे. त्यांनी आजवर केवळ जंगलाचाच सांभाळ केला नाही, तर संकटात सापडलेल्या तब्बल 800 वन्यप्राण्यांचीही सुटका केली. ज्याच्या डरकाळीनंही थरकाप उडावा,

अशा सिंहांची त्यातली आजवरची संख्या आहे तब्बल दोनशे! याच हिंमतवान महिलांच्या जोरावर गीरच्या जंगलातल्या  सिंहांच्या डरकाळ्या आपल्याला ऐकू येताहेत, तिथल्या वन्यप्राण्यांचं आणि 
जंगलाचंही अस्तित्व टिकून आहे ते या महिलांमुळेच!
--------------------------
गुजरातमधील गीरचं जंगल. 
सिंहांसाठी ते जितकं प्रसिद्ध आहे, तितकंच या जंगलाची आणि तिथल्या वन्यप्राण्यांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणो काळजी घेणा:या महिला वनरक्षकांमुळेही ते प्रसिद्ध आहे.
जंगल, तिथले हिंस्त्र प्राणी, जंगलातल्या किमती नैसर्गिक संसाधनांची होणारी तस्करी, आपल्याला विरोध करणा:या कुणालाही थेट ढगात पाठविण्याइतक्या मुजोर असलेल्या तस्करांच्या टोळ्या, वन्यप्राण्यांना मारून त्यांच्या अवयवविक्रीतून गलेलठ्ठ पैसा कमावणारे शिकारी आणि सा:याच ऐशोरामी जीवनापासून दूर असणारं, कित्येक किलोमीटरची रोजची पायपीट नशिबी असलेलं जीवन.
जंगल म्हटलं की या सा:या गोष्टी आल्याच. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही दुर्गम ठिकाणी जायचं म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. होताहोईतो त्यापासून दूर कसं राहता येईल, कार्यालयीन वेळेतली, शहरातली डय़ूटी आपल्याला कशी मिळेल याकडे सर्वाचाच कल असतो. काहीही करून सोयीच्या ठिकाणी आपल्याला ‘बदली’ कशी मिळेल यासाठीही अनेकांचा आटापिटा सुरू असतो.
गीरच्या जंगलातले वनरक्षक मात्र याला अपवाद आहेत. या वनरक्षक आहेत मुख्यत्वे महिला! उलट ‘कार्यालयीन डय़ूटी’ नाकारून अनेकींनी स्वत:हून ‘फिल्ड वर्क’ मागून घेतलं आहे! 
त्याच हिंमतवान महिलांच्या जोरावर गीरच्या जंगलातल्या सिंहांच्या डरकाळ्याही आपल्याला ऐकू येताहेत, जंगलातल्या सिंहाचंच नव्हे, तर अनेक प्राण्यांचं आणि जंगलाचंही अस्तित्व त्यांच्यामुळे टिकून आहे. त्याच महिलांच्या कर्तृत्वाची ही कहाणी.
 
रसिला वढेर
रसिला वढेर ही गीरच्या जंगलातील महिला वनरक्षकांच्या टीमची लीडर. तिच्या नेतृत्वाखाली आजवर जंगलातल्या अनेक मोहिमा सफल झाल्या आहेत. जिवावर उदार होऊन जंगलाचं आणि जंगलातल्या प्राण्यांचं संगोपन करणा:या, आईचं काळीज असलेल्या निडर रसिलाला अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. अनेकदा शिका:यांच्या टोळीला तिनं जेरबंद केलं आहे, तर सिंहासारख्या प्राण्यांनीही तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. त्या जखमांच्या खुणा आजही तिच्या अंगावर आहेत. त्यातून ती बालंबाल बचावली, पण तरीही तिनं आपलं काम सोडलं नाही की त्यापासून माघार घेतली नाही. उलट तिची जिद्द आणखीच वाढली आणि या अनुभवाच्या जोरावर नव्या उमेदीनं ती कामाला भिडली. हाच आदर्श घेऊन तिच्या सहकारी महिलाही जंगलाचं आरोग्य सांभाळताहेत.
वनविभागात रुजू झाल्यानंतर अर्थातच रसिलाला इतर महिलांप्रमाणो सुरुवातीला कार्यालयीन कामच देण्यात आलं. पण जंगलाच्या आणि प्राण्यांच्या सहवासासाठी उत्सुक असलेल्या रसिलानं स्वत: अर्ज करून फिल्डवर्क मागून घेतलं आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली. फिल्डवर जाण्याचं धाडस दाखवलेल्या रसिलाच्या हाताखाली महिलांसोबतच आता 14 पुरुषदेखील काम करतात. या टीमने आतार्पयत 8क्क् प्राण्यांची सुटका केली आहे. यात जवळपास 2क्क् सिंह होते. सध्या गीरमधील सासन डिव्हिजनमध्ये सात महिला आहेत. इतर महिला वेगवेगळ्या विभागात आपली जबाबदारी पार पाडत आहेत. वर्षाला 12 सुटय़ा असतात त्यांना. म्हणजे जंगल हेच त्यांचे कुटुंब. लग्न ठरण्याच्या आधीच रसिलाने आपल्या भावी पतीला हे सर्व सांगितले होते. रात्री उशिरार्पयत मला जंगलातच राहावे लागते. त्यावेळी माङयासोबत पुरुषदेखील असतात. यातले काही खटकत असेल तर लगAाचा पुनर्विचार कर. सर्वसामान्य पुरुषाने नकार दिला असता. रसिलाच्या पतीने या सर्व कर्तव्यासह तिला स्वीकारले.
 
किरण पाथिजा
किरण पाथिजा. वय वर्षे 25. सूर्योदय होताच पेट्रोलिंगसाठी जंगलाची वाट पकडते ती. प्राण्यांच्या पायाचे ठसे वा इतर संकेतावरून दररोज नोंदी ठेवायच्या. यासाठी जंगलातली प्रत्येक वाट पायाखालून घालायची. माणसांच्या वस्तीतही एकटय़ाने बाहेर पडताना महिलांनी हजारदा विचार करण्याचा हा काळ. इथे सिंहाच्या इलाक्यातही ती एकटय़ानेच वावरते. कुठल्या बाजूने कुठला प्राणी समोर येईल याचा नेम नाही. तरीही घाबरत नाही ती. निसर्गानेच सिंहाचे काळीज दिल्यावर भीती कशाची? गुजरातमधील गीर अभयारण्यात सिंहाचे काळीज असलेल्या अशा अनेक किरण भेटतात. प्रत्येकीचा प्रत्येक दिवशी वेगळा थरार. कधी प्राण्याची सुटका करण्याचा, तर कधी जखमी प्राण्यावर उपचार करण्याचा. कुठल्याही परिस्थितीत अत्यंत शांतपणो जबाबदारी पार पाडणा:या या सिंहिणी महिला म्हणून कुठेच कमी पडत नाहीत. उलट कामाला वाहून घेण्याच्या महिलांच्या वृत्तीमुळे कांकणभर जास्तच जबाबदारी घेताना दिसतात त्या. किरणला लहानपणापासून वन्यजिवांची आवड. महाविद्यालयातून बाहेर पडताच तिने वनरक्षकाची नोकरी स्वीकारली. घरात छोटे मूल सांभाळण्याची कसरत करतानाच ती प्राणी आणि जंगल संवर्धनासाठीही धडपडते. लहान मुलामुळे काही मर्यादा येतात. निसर्ग संवर्धनात आणखी  झोकून देण्यासाठी  हे मूल मोठे होण्याची वाट ती पाहत आहे. 
 
दर्शना कागडा
दर्शना कागडा. वय वर्षे 24. वर्षभरापूर्वीची घटना असेल ती. राजुळा गावाजवळ शेतक:यांनी नरभक्षक ठरवून एका सिंहिणीचा बळी घेतला, तर दुसरीला जखमी केले. दुस:या सिंहिणीचाही बळी हवा, यावर शेतकरी ठाम होते. मात्र दोन बछडय़ांना त्यांची आई हवी होती, याची जाणीव त्या आक्रमक जमावात केवळ दर्शनाला होती. जमावाची तिने समजूत काढली. या सिंहिणीवर पाळत ठेवण्याचे ठरले. तिच्या प्रत्येक हालचालींचा अभ्यास करण्यात आला. काही ठिकाणी तिने हल्लाही केला; मात्र तो स्वत:चा बचाव होता. मॅनइटर ती नक्कीच नव्हती. मग तिला प्राणिसंग्रहालयात कशासाठी सोडायचे, या विचाराने दर्शना सर्वाशी भांडली. अहवालही तसाच आला. आज ही सिंहीण ‘गीर’मध्ये मुक्तपणो वावरत आहे. अशा अनेक सिंहिणींना मुक्त करण्यात या महिला टीमचा मोठा वाटा आहे. दर्शनाला सात बहिणी आहेत. दर्शनाच्या वडिलांना सुरुवातीला तिचे वनविभागात जाणो आवडले नाही; नंतर मात्र त्यांनी ते स्वीकारले. 
.आता गीरमध्ये जाण्याचा विचार तुम्ही करीत असाल तर तेथील सिंहांसोबत या सिंहिणींची भेट घ्यायला विसरू नका. कारण परदेशी पर्यटक गीरमध्ये सिंह पाहायला येतातच; मात्र त्यांनाया सिंहिणींसोबत सेल्फी काढण्याचीच अधिक आतुरता असते. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत एका भाषणात हा उल्लेख केला होता. 
 
गीरमधील पहिला थरार..
जखमी सिंहिणीला पकडण्याची मोहीम याआधी तीनदा फसली होती. त्यामुळे दडपण आणखी जास्त होते. कुठल्याही परिस्थितीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नव्हती. टीम लीडर रसिला वढेर स्वत: मोहिमेवर होती. रात्रीची वेळ. चारही बाजूंनी सिंहिणीला घेरण्यात आले. सोबत तीन बछडेही होते तिचे. त्यांना कुठलीही इजा होऊ न देता ही मोहीम पार पाडायची होती. या बछडय़ांना हळूहळू तिच्यापासून बाजूला करण्यात यश येताच गनने अचूक निशाणा साधला. सिंहीण बेशुद्ध झाली. तिच्या पंजाला मोठी जखम झाली होती. तीन बछडे असल्याने सेंटरवर नेऊन उपचार करणो कठीण होते. त्यामुळे डॉ. कमानी आणि त्यांची टीम जागेवरच दाखल झाली. एका मोठय़ा पिंज:यात तिला बंद करण्यात आले. अध्र्या रात्री या सिंहिणीवर उपचार करण्यात आले. तासाभरात उपचार पूर्ण झाले. दुसरे एक औषध देऊन सिंहिणीला शुद्धीवर आणण्यात आले. काळजी तिची होती आणि तिच्या तीन बछडय़ांचीही. त्यामुळे हा बंद पिंजरा त्याच ठिकाणी सोडून टीम परत सेंटरवर दाखल झाली. भल्या सकाळी रसिला पुन्हा घटनास्थळी दाखल झाली. आसपास बछडे दिसले नाहीत. त्यामुळे काहीशी चिंतित झालेली रसिला रात्री पुन्हा टीमसह दाखल झाली. बछडय़ांचा शोध काही लागत नव्हता. रात्रभर पिंज:याच्या भोवतीच थांबायचे ठरले. थँक गॉड! अचानक दोन डोळे चमकले. बछडय़ाचेच डोळे होते ते. बाजूलाच आणखी दोन बछडे होते. पिंज:याभोवतीच फिरत होते ते. पिंजरा जंगलात ठेवण्याची रसिलाची रणनीती यशस्वी झाली होती. दोन दिवस या सिंहिणीवर उपचार करण्यात आले. नंतर तिला जंगलात मुक्त करण्यात आले. पिंज:यातृून जंगलात परतताना आधीप्रमाणोच सोबत तीन बछडय़ांची फौजही होती.
 
थरार दुसरा..
गावच्या शेजारी आमराईत सिंह जखमी झाल्याचा कॉल आला. ही मोहीमही स्वत: रसिलानेच हाती घेतली. यावेळी बछडा असल्याने त्याला बेशुद्ध करणो जोखमीचे होते. गनचा वापर करू नका, अशा सूचना रसिलाने सर्व सहका:यांना दिल्या होत्या. जाळी लावून त्याला पकडण्याचे ठरले. या बछडय़ाची आई जवळच असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. प्रसंगी तिच्याकडून हल्लाही होऊ शकत होता. तशा सूचना वारंवार रसिला सहका:यांना देत होती. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बछडा जाळ्यात अडकला. नंतर त्याला एका छोटय़ा पिंज:यात घालून रेस्क्यू सेंटरला आणण्यात आले. 5 ते 6 महिन्यांच्या या बछडय़ाच्या डाव्या कानाला जखम झाली होती. थोडा वेळ गेल्यानंतर बछडा शांत झाला आणि डॉक्टरांची टीम कामाला लागली. अगदी बेशुद्ध न करता त्याच्यावर हळुवार उपचार करण्यात आले. एक आठवडा असेच उपचार करून नंतर त्याला मुक्त करण्यात आले. 
 
थरार तिसरा..
एका गावात बिबटय़ा शिरल्याचा कॉल आला. रसिलाच्या सोबतीला यावेळी किरणही होती. बिबटय़ाला बाहेर काढण्यासोबत मोठे आव्हान होते गर्दी सांभाळण्याचे. त्यांचाच गोंगाट मोठा होता. त्यामुळे बिबटय़ाला बाहेर काढण्याची मोहीम आणखी अवघड होत होती. दोघींनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दोन महिलांकडून हे आवाहन होत असल्याने गावक:यांनी ब:यापैकी मनावरही घेतले. जाण्यासाठी फारशी जागा नसलेल्या खोलीत या बिबटय़ाने आसरा घेतला होता.  उकाडय़ाने त्रस्त होऊन हा बिबटय़ा गावात शिरला होता.  गीरमध्ये असे वारंवार घडते. बेशुद्ध करण्यासाठी वारंवार नेम चुकत होता. अनेक प्रयत्नांनंतर अखेर नेम लागला. बिबटय़ा बेशुद्ध झाला. खोलीतून बाहेर काढण्यात आले. पिंज:यात बंद करून त्याला शुद्धीवर येण्याचे औषध देण्यात आले. लगेच त्याला रेस्क्यू सेंटरवर आणण्यात आले. गीरमध्ये साधारण 5क्क् बिबटे आहेत. कधी विहिरीत पडतात, कधी गावात घुसतात. अशा वाट चुकलेल्या बिबटय़ांना पुन्हा जंगलात सोडले जाते. सोडण्यापूर्वी त्यांच्या शेपटीला एक चिप बसवली जाते. पुढे ती त्याची ओळख बनते.  
 
थरार चौथा..
सिंह जखमी झाल्याचा आणखी एक कॉल. रसिला स्वत: दुस:या मोहिमेवर असल्याने यावेळी ही जबाबदारी तिच्या अन्य महिला सहका:यांवर होती. दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर राजू (जखमी सिंह) सापडला.  कानठळ्या बसविणा:या डरकाळ्या देत होता तो. त्याच्या एका डोळ्यातून रक्त वाहत होते. साधारण दहा दिवसांपूर्वीची जखम असावी ती. मीलन होत असताना सिंहिणीने पंजा मारला असावा. गनच्या साहाय्याने त्याला बेशुद्ध करण्यात आले. एका पिंज:यात टाकून त्याच ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. तासाभरानंतर शुद्धीवर येण्याचे औषध देऊन त्याला सोडून देण्यात आले. पुढील एक आठवडा म्हणजे ती जखम पूर्णत: दुरुस्त होईर्पयत त्याच्यावर लक्ष ठेवले जात होते. 
 
गीर अभयारण्य
 1212 चौरस कि.मी. क्षेत्रफळ
 
 42 वनरक्षक सहायक 
    (2013च्या आकडेवारीनुसार)
 
 5200 रुपये - वनरक्षक सहायकाचा महिन्याचा पगार
 
 411 एकूण सिंह 
    (2010 च्या आकडेवारीनुसार)
 
 399 सिंह 
    (2005च्या आकडेवारीनुसार) 
 
(लेखक ‘लोकमत’च्या मराठवाडा 
आवृत्तीत उपवृत्तसंपादक आहेत.)
gajanan.diwan@lokmat.com