शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

लाइकशाही...‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 4:00 AM

उत्स्फूर्त संवाद क्रांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातून सोशल मीडिया आता बाहेर आला आहे. पण जगभरच्या तज्ज्ञांना नवी काळजी वाटते आहे : ‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी सरकू लागला आहे का?’

विश्राम ढोले

तुम्ही फेसबुकवर बहुधा असाल. व्हॉट्सअ‍ॅपवर तर असालच...हल्ली तुमच्या लक्षात आले असेल की, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर मोदी आणि भाजपाविरोधातील सूर आणि ताल वेगाने वाढू लागलाय. अगदी दीड दोन वर्षांपूर्वीपर्यंत सोशल मीडियावरील आसमंत दणाणून टाकणारा मोदी-भाजपा भक्तनाद आवाजाची पट्टी हरवल्यासारखा भासू लागलाय. तेव्हा पप्पूसारखे वाटणारे आवाज आज टिपेचा सूर लावू लागले आहेत. प्रत्यक्षात असेल किंवा नसेल; पण सोशल मीडियावर राजकीय प्रवाहाची दिशा बदलताना भासतेय. तुम्ही थोडा देशाबाहेरच्या राजकारणाचा माग ठेवत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की, तिथे बरेच काहीतरी अनपेक्षित घडले/घडते आहे. म्हणजे असे की, वागण्या-बोलण्याने अगदी रावडी किंवा तिकडम टाइप वाटणारे ट्रम्प नावाचे गृहस्थ सार्वजनिक आयुष्यात बेतशुद्धपणा बºयापैकी पाळणाºया हिलरी क्लिंटनसारख्या उमेदवारावर मात करून अमेरिकेचे अध्यक्ष झाले आहेत. युरोपिय युनियनमधून बाहेर पडण्याला-ब्रेक्झिटला-अनपेक्षित कौल मिळतोय. जर्मनीत निवडणुकीमध्ये पराभूत झाले असले तरी अतिउजव्यांनी अनपेक्षितपणे लक्षणीय असे जनमत मिळवले आहे. थोडी शोधाशोध केली तर फिलिपाइन्स, दक्षिण आफ्रिका, म्यानमार वगैरे एरवी आपल्या यादीत फार न येणाºया देशांमध्येही वेगळ्याच राजकीय घडामोडी घडताना दिसताहेत.- या घटना वा प्रक्रि या निरनिराळ्या आहेत. स्थळ-काळ परिस्थितीही वेगवेगळी आहे. राजकीय संदर्भ तर खूपच भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. तरीही त्यांच्यात एक धागा समान आहे. सोशल मीडिया राजकीय प्रक्रि येच्या केंद्रस्थानाकडे सरकत चालला आहे. खरे तर यातही नवल वाटावे असे काही नाही. कारण अगदी २००९ साली इराणमध्ये आणि २०१०-११ या काळात ट्यूनिशिया, इजिप्त, लिबिया वगैरे अरब देशांमध्ये झालेल्या मोठ्या राजकीय घडामोडींना फेसबुक क्र ांती, ट्विटर क्र ांती अशी विशेषणे लावण्यात आली होतीच. त्यावेळच्या संदर्भात ही विशेषणे जरा अतिशयोक्तीच होती. पण सोशल मीडियाविषयी औत्सुक्याला आणि अनुभवाला बहर येण्याच्या त्या काळात ती खपून गेली. आज तसे राहिले नाही. उत्स्फूर्त संवाद क्र ांती वगैरे वाटण्याच्या टप्प्यातून सोशल मीडिया आता बाहेर आलाय. तेव्हा क्र ांती वगैरे भासणाºया बाबी आता सामान्य राजकीय व्यवहाराचा भाग झाल्या आहेत. क्र ांतीचे आता शास्र बनले आहे. राजकीय प्रक्रि येमध्ये सोशल मीडिया असणे हे आता नॉर्मल वाटू लागले आहे. पण जे नॉर्मल असते ते खोलवरचे पॉलिटिकलही असतेच. एखादी गोष्ट खूप गृहीत धरल्यासारखी सर्वसामान्य वाटू लागते तेव्हा समजावे की, तिने गुंतागुंतीचा प्रवास पार करून एक मोठी; पण अदृश्य राजकीय प्रभावशक्ती प्रस्थापित केली आहे. इथे राजकीय याचा अर्थ फक्त सत्तेचे राजकारण इतकाच नाही. व्यक्ती किंवा समुदायाची मते, कल्पना आणि कृतींवर प्रभाव टाकण्याची क्षमता म्हणजे खरी राजकीयता. एखादी गोष्ट नॉर्मल झाली की, त्याविषयी आपली उत्सुकता सर्वसाधारणपणे संपते. त्यास हरकत नाही. पण तिथे चिकित्सा सुरू होणे गरजेचे असते. कारण नॉर्मल झाल्यानंतर त्या गोष्टीची खरी राजकीयता, खरा प्रभाव आणि खरे रूप दिसायला लागते. नव्याची नवलाई संपल्यानंतर दहाव्याला वास्तवाचे खरे पदर जाणवू लागतात. म्हणूनच ‘सोशल मीडिया राजकीय प्रक्रि येच्या केंद्रस्थानी सरकू लागलाय’ हे विधान नॉर्मल टाइपचे वाटणे याचाच एक अर्थ त्याच्या विविधांगी स्वरूपाविषयीची चिकित्सा करण्याची वेळ आलेली असणे. अर्थात ती करायलाही काही तात्कालिक कारणांची निमित्ते लागतातच. वर उल्लेख आलेले सारे प्रसंग ती निमित्ते नक्कीच पुरवतात. निमित्ताने असो की बिननिमित्ताने, जगभरातले संशोधक, तज्ज्ञ, सैद्धांती वगैरे मंडळी अशी चिकित्सा करतच असतात. ती बरेचवेळा त्यांच्या त्यांच्या वर्तुळात आणि त्यांच्या परिभाषेत मर्यादित राहते. पण कधी कधी तशी चिकित्सा लोकपंडित (पब्लिक इंटलेक्चुअल्स) करतात. ती विविध माध्यमांमधून लोकांपर्यंत पोहचते आणि नॉर्मलतेचा - सर्वसाधारणतेचा एक नवा प्रवास सुरू होतो.‘दी इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध साप्ताहिकाने अलीकडेच दोन लेख छापून सोशल मीडियासंबंधी अशा चिकित्सेला पुन्हा सार्वजनिक चर्चेच्या वर्तुळात आणले आहे. त्यापैकी एकाचे शीर्षक तर सोशल मीडियावर थेटच हल्ला करते. ‘एकेकाळी लोकशाहीसाठी वरदान वाटणारा सोशल मीडिया भस्मासूरासारखा वाटू लागलाय’ अशा आशयाचे ते शीर्षक आहे. दुसºया लेखाचेही शीर्षक ‘सोशल मीडियाचा लोकशाहीला धोका आहे का?’ असे आहे. ‘इकॉनॉमिस्ट’सारखे साप्ताहिकच नव्हे तर स्टॅनफर्डसारख्या ख्यातनाम विद्यापीठाच्या कायदा विभागातर्फे प्रसिद्ध होणाºया ‘जर्नल आॅफ डेमोक्र सी’ या संशोधनपत्रिकेमधील एका लेखाचे शीर्षकही ‘२०१६ यू एस इलेक्शन- कॅन डेमोक्र सी सर्व्हाइव्ह दी इंटरनेट?’ असेच आहे. या लेखांना अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. मुख्यत्वे सोशल मीडियावरील व्यूहरचनेमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले हे एव्हाना बºयापैकी प्रस्थापित झाले आहे. केवळ सोशल मीडियावरून देमार पोस्ट टाकत जाणे एवढ्यापुरतीच ही व्यूहरचना मर्यादित नव्हती. सोशल मीडियावरील लोकांच्या वावराचा अगदी पद्धतशीरपणे अभ्यास करून, त्याचे विश्लेषण करून अगदी ‘एक एक को चुन चुनके मारुंगा’ स्टाइलने मतदारांना निवडून प्रचारलक्ष करण्यात आले. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका नावाच्या कंपनीने त्यासाठी आपली शक्ती पणाला लावली. याच कंपनीने ब्रेक्झिटमध्येही यश मिळविले होते. व्यूहरचनेबाबतची ही माहितीदेखील काही नवी नव्हती. ट्रम्प यांच्या विजयासाठी रशियाचे पुतीनही तितकेच ‘उत्सुक’ होते आणि त्यांनी त्यांच्या पाताळयंत्री व्यवस्थेमार्फत त्यासाठी तजवीजही केली होती हेही माहिती होते. पण त्यासाठी सोशल मीडियाचा कसा वापर झाला आणि फेसबुक, यू ट्यूब, ट्विटरवरून त्यासाठी काय उलाढाली करण्यात आल्या याच्या चमत्कारिक आणि धक्कादायक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यांच्या निमित्ताने या चर्चा आणि चिकित्सा पुन्हा होऊ लागल्या आहेत.या सर्व चर्चांचे बरेच संदर्भ तिकडचे असले तरी त्या संदर्भांच्या तळाशी असणारे मुद्दे फक्त अध्यक्षपदाच्या निवडणुकीपुरते किंवा अमेरिकेपुरतेच मर्यादित नाहीत. ते सोशल मीडियाच्या व्यवस्थेशी संबंधित आहेत. म्हणूनच ते आपल्यालाही तितकेच लागू आहेत. हे मुद्दे तसे बरेच आहेत आणि फक्त सोशल मीडियाच नव्हे तर इंटरनेटच्या व्यवस्थेलाही लागू आहेत. पण ट्रम्प महाशयांच्या विजयाच्या निमित्ताने जे ठळकपणे अधोरेखित झाले ते प्रामुख्याने पाच मुद्दे आहेत. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो सोशल मीडियावर आपणच उपलब्ध करून देत असलेल्या आपल्याविषयीच्या प्रचंड माहितीचा. (चौकट पाहा)- व्यक्तीवर प्रभाव टाकण्यास, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यास उत्सुक असणाºया कोणत्याही व्यवस्थेला तर या सोयीचे आकर्षण नाही वाटले तरच नवल. ट्रम्पच कशाला कोणाही राजकीय व्यक्ती वा पक्षाला अशा माहितीसाठ्याची भूरळ पडू शकते. आणि मग निवडणुका जिंकण्यासाठी, आपल्याला अनुकूल किंवा विरोधकांना प्रतिकूल जनमत तयार करण्यासाठी किंवा विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी या माहितीसाठ्याचा व्यूहरचनात्मक वापर करता येतो. ट्रम्प यांनी तेच केले. ब्रेक्झिटच्या काळात तेच झाले होते. मागच्या लोकसभेच्या वेळी भाजपाच्या व्यूहरचनेमध्येही त्याचा कमी अधिक प्रमाणात वापर झाला होता आणि पुढील निवडणुकांमध्ये तसेच काही करण्यासाठी काँग्रेस केम्ब्रिज अनालिटिकाला सुपारी देण्याच्या विचारात आहे. यातून एकीकडे आपल्या खासगीपणाचे एकेक बुरूज ढासळत जातात तर दुसरीकडे आपण मतदार न राहता वैयक्तिक किंवा समुदायाच्या पातळीवर ‘लक्ष’ अर्थात टार्गेट बनत जातो. अधिक स्वयंभू, स्वायत्त पद्धतीने मत बनविण्याच्या, आपल्या मताचा आपणच शिल्पकार पद्धतीने राजकीय भान निर्माण करण्याच्या आपल्या क्षमतांचा संकोच होत जातो. एरवी कोणत्या प्रसारमाध्यमांमध्ये नसलेले हे टोकदार, धारदार अस्र सोशल मीडियाचा अजस्र माहितीसाठा मिळवून देऊ शकतो. आपले एकेक किरकोळ लाइक बुमरँग बनून आपला वेध घेण्याची संधी मुठभरांना मिळून देऊ शकते.म्हणून सोशल मीडिया आणि लोकशाहीचा संबंध फक्त तिथे झडणाºया चर्चांच्या फैरीपुरताच मर्यादित नाही. तो तर महत्त्वाचा आहेच. पण तिथून उलगडणारी ही ‘लाइकशाही’ही तितकीच महत्त्वाची आहे. आपल्या लोकशाहीच्या भवितव्याशी तिचाही संबंध आहे. या लाईकशाहीचे इतरही काही आयाम आहेत. ते पुढच्या लेखात. तोपर्यंत आपण आपला सोशल स्क्र ीन रिफ्रेश करूयात.

तुमचे-आमचे काय होते आहे?१. सोशल मीडियावर असताना आपण कुठे लाइक कर, कुठे कमेंट कर, कुठे आपले फोटो टाक, कुठे मतांची पिंक टाक, कुठे शेअर कर, कुठे कुठल्या पोस्टवर जरा निवांत बस, कुठे घुटमळ असे करत वणवण फिरत असतो. ही आपली वणवण अक्षरश: प्रत्येक कीस्ट्रोकसरशी या सोशल मीडिया कंपन्यांकडे लॉगबद्ध होत असते.२. या फक्त नोंदी नसतात. त्यांना एकत्र वाचता आले तर ते तुमच्याविषयी बरेच काही सांगू शकतात. ही माहिती इंटरनेटवरील तुमच्या इतर वावराच्या नोंदीशी- म्हणजे तुम्ही नेटवरून काय आणि किती विकत घेता, काय सर्फ करता वगैरे नोंदीशी - जोडता आली तर तुमच्याविषयी भरपूर काही सांगता येते.३. या माहितीमध्ये तुमची इतरत्र गोळा होत असलेली डिजिटल आणि सामाजिक माहिती जोडता आली तर मग अनेकदा तुमच्याविषयी जवळपास सगळेच काही सांगता येते. अगदी अशा डेटा विश्लेषकांच्या शब्दात सांगायचे तर तुमची बायको किंवा आई (किंवा नवरा किंवा बाप) तुम्हाला जितके ओळखत नसतील तितके या एकात्मिक नोंदीसाठ्याला तुम्हाला ओळखता येते.४. एकदा असे ओळखता आले की मग तुम्ही विशिष्ट परिस्थितीत कसे वागाल, तुम्ही कशाला बळी पडाल, कशावर मात कराल याचाही बºयापैकी अंदाज बांधता येऊ शकतो.५. व्यक्तिवैशिष्ट्ये, समूहवैशिष्ट्ये ओळखण्याचे इतके नेहमीचे, इतके इतके अंगवळणी पडलेले आणि इतके नेमके व्यासपीठ आजवरच्या मानवी इतिहासात कधी उपलब्ध झाले नव्हते. आपल्याविषयीचे इतके अमीट सुगावे क्षणोक्षणी आणि कळतनकळत मागे ठेवत जगत राहणे या आधीच्या मानवी इतिहासात कधीही घडले नव्हते.

(लेखक संज्ञापन आणि माध्यमतज्ञ आहेत.)

टॅग्स :Facebookफेसबुक