शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

सोनाली चौकेकर

By admin | Published: June 06, 2015 3:10 PM

प्रवास अवघडच होता, पण मदत मागितली आणि मिळालीही! आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं आणि मगच व्यक्तिगत स्वातंत्र्याची लढाई सुरू केली.

मुलांच्या शाळेमध्ये जाणा:या राजला अनेकदा मेंदी काढावीशी वाटे, नाच करावासा वाटे. त्याच्या अशा भलत्या आवडीनिवडींमुळे त्याला अनेकदा आई-बाबांचा ओरडाही खावा लागला. त्याच्या मुलींसारख्या हावभावामुळे, हालचालींमुळे त्याला शाळेत नेहमीच टोमण्यांना, चिडवण्याला तोंड द्यावे लागे. कॉलेजमध्ये गेल्यावर या गोष्टी अधिकच वाढीस लागल्या. ही शेरेबाजी, चिडवाचिडवी सुरू असताना राजच्या मनामधली खळबळ अधिकच उकळत राहिली.
आपण असे का आहोत, आपण नक्की कोण आहोत, आपण मुलगी आहोत का असे प्रश्न राजच्या मनामध्ये येत. टोमण्यांमुळे येणारा ताणही असह्य व्हायचा शेवटी त्याने आपण मनाने जे आहोत ते म्हणजे स्त्री होण्याचा निर्णय घेतला. 
- लिंगपरिवर्तनाची शस्त्रक्रिया झाल्यावर ती गुरुकडे इतर विधींसाठी चाळीस दिवस राहायला गेली. पण कुटुंबाची आठवण तिला येतच असे. आपले आई-बाबा आपल्याला स्वीकारतील का या प्रश्नामुळे तिला सतत काळजी वाटत असे. चाळीस दिवस रोज आईला फोन करून ती त्यासाठी आईची विनवणी करत असे. राजची सोनाली झाल्यावरही तिच्या आई-बाबांनी तिला स्वीकारले आणि कुटुंबातील पूर्वीचाच दर्जा तिला मिळाला.
लिंगपरिवर्तनाचा निर्णय अंमलात येईर्पयत राजला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. सहावीत असतानाच वडिलांची मिलमधील नोकरी सुटल्यामुळे त्याने दवाखान्यात कंपाउंडरचे काम सुरू केले. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यावर त्याने एका चार्टर्ड अकौंटंटकडे सफाईचे काम सुरू केले. हे करत असताना त्याने कधीही अभ्यासावरील लक्ष कमी केले नाही. महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय समाजात आपल्याला स्वीकारले जाणार नाही, शिक्षणाविना आपण तगणार नाही हे माहीत असल्यामुळे जिद्दीने त्याने शिकायला सुरुवात केली. नोकरी आणि शिक्षण सुरू असताना त्याने टायपिंग, संगणक, अकांउंटिंग वगैरे गोष्टी शिकून घेतल्या आणि त्यानंतर पदवीच्या द्वितीय वर्षार्पयत दुस:या सीएकडे नोकरी केली. अकौंट्सची बाहेरून कामे मिळू लागल्यावर त्याने नोकरी थांबवली व स्वत:चे काम सुरू केले. -आज हमसफर ट्रस्टमध्ये सोनाली चौकेकर राज्य समन्वयक पदावरती  काम करत आहे. राजपासून सोनाली होईर्पयत ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्याकडे सोनाली अत्यंत समंजसपणो पाहते.  
‘मला चिडवून तुम्हाला आनंद होतो ना, तर मग ठीक आहे’ असे म्हणून तिने चिडवणा:यांकडे दुर्लक्ष केले. त्या तशा वातावरणात आपला झगडा समजून घेऊन आपल्याला आधार दिलेल्या चार्टर्ड अकौंटंट बॉसबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला सोनालीला शब्द सापडत नाहीत. अशा लोकांमुळेच आज मनाप्रमाणो जगण्याची संधी मिळाली हे ती स्पष्ट सांगते.
आपल्याला  मनाप्रमाणो जगण्याचे स्वातंत्र्य हवे असेल तर आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण असण्याला पर्याय नाही, हे सोनालीने वेळीच ओळखले आणि तशी पावलेही उचलली. 
‘माङयामुळे आई-बाबांना समाजाच्या टीकेला, टोमण्यांना सामोरे जावे लागले, त्यांच्या उतारवयात मी त्यांचा आधार होणार’ अशा निश्चयाने सोनाली तिच्या आई-वडिलांची म्हातारपणची काठी बनली आहे.
आज सोनाली स्वत: ताठ मानेने समाजात जगते. नीटनेटके राहण्यावर विशेष भर देते. सन्मान हा मागून किंवा हिसकावून घ्यायचा नसतो, तुम्ही तो तुमच्या आचरणातून मिळवत असता, असे तिचे म्हणणो आहे, आणि अनुभवही! 
 
कायद्याआधी
संवेदनशीलता हवी!रा प्रश्न आहे, तो समाजाच्या संवदेनशीलतेचा. समाजातील प्रत्येक घटकाला तृतीयपंथीयांबद्दल संवेदनशील बनविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.  केवळ महाविद्यालयांनी ट्रान्सजेण्डर असा एक रकाना अर्जामध्ये ठेवला म्हणजे तृतीयपंथीयांच्या शिकण्याचा मार्ग मोकळा होईल असे नाही. त्यासाठी त्यांना शिक्षण घेता येईल अशा वातावरणाची निर्मिती करावी लागेल. आज हे वातावरण नसल्यामुळेच लिंगपरिवर्तनाचा निर्णय शिक्षण पूर्ण झाल्यावर घेतला जातो. 
आपण मुलांशीही याविषयी नीट बोलत नाही. टिंगलटवाळी, टोमणो हे सारे बंद करायचा तोच एक मार्ग आहे. या मोकळेपणाखेरीज भिन्नलिंगियांचें जगणो सुकर होणो कठीण-अशक्यच आहे. लिंगपरिवर्तनाचा निर्णयही घरामध्ये सहजासहजी स्वीकारला जात नाही. कित्येकांना आपले गाव सोडून दुस:या गावात जाऊन राहावे लागते. पुन्हा कधी घरी यायचे झाल्यास जुन्या वेशात परतावे लागते. तृतीयपंथीयांना काही आजार झाल्यास दुर्दैवाने त्यांची काळजी घेण्यास कोणी नसेल तर नरकयातनांना सामोरे जावे लागते. योग्य उपचार न मिळणो, कार्यालयांमध्ये लिंगपरिवर्तित लोकांनी कोणत्या टॉयलेटमध्ये जावे यावरून प्रश्न निर्माण होणो अशा कितीतरी गोष्टी संवेदनशीलतेने सुटू शकतील.
 
 - पल्लव पाटणकर,
प्रोग्रॅम डायरेक्टर, हमसफर ट्रस्टकलम 14
 
घटनेतील कलम 14नुसार ‘जात, धर्म, लिंग. इत्यादिंच्या आधारे भेदभाव केला जाऊ शकत नाही. कायद्यापुढे सर्वजण समान आहेत आणि प्रत्येकाला कायद्याने समान सुरक्षा असली पाहिजे असे संविधानात म्हटले आहे; मात्र कलम 14चा नेमका अर्थ काय काढायचा यासंदर्भात कायदेशीर अडचण होती. कारण कायद्यात ‘सेक्स’च्या आधारे भेदभाव करता येणार नाही असे म्हटले होते. त्यात ‘जेण्डर’ हा शब्द वापरलेला नव्हता. मात्र न्या. राधाकृष्ण यांनी स्पष्ट केले की ‘सेक्स ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे तर जेण्डर ही त्याच संदर्भातील सामाजिक-सांस्कृतिक संज्ञा. त्यामुळे तृतीयपंथीयांना मिळणारी भेदभावपूर्ण वागणूक त्यांच्या हक्कांचे उल्लंघन आहे. तृतीयपंथीयांना स्वत:ची लैंगिकता सिद्ध करण्यासाठी कोणत्याही जैविक चाचण्यांची गरज नाही त्याऐवजी त्या त्या व्यक्तीला स्वत:च्या संदर्भात काय वाटते हे महत्त्वाचे मानले जाणार आहे. 
 
काली, मुन्नी, शबनम मौसी
 
अलीकडच्या काळात राजकारणातही तृतीयपंथी आपला ठसा उमटवू पाहात आहेत. तृतीयपंथीयांची संघटना ‘अखिल भारतीय हिजडा कल्याण सभा’ किमान दशकभरापेक्षाही जास्त कालावधीपासून तृतीयपंथीयांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडत आहे. काली या तृतीयपंथीयाने पाटणा येथे आणि मुन्नीने दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवताना प्रस्थापितांना कडवी झुंज दिली. त्यानंतर काही वर्षानी मध्य प्रदेशातील कटनी येथील पहिला तृतीयपंथीय महापौर बनण्याचा मान कमला जान यांनी मिळवला. शबनम मौसी यांनीही देशातला पहिला तृतीयपंथीय आमदार म्हणून 1998 ते 2क्क्3 या काळात विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर 2क्क्क्मध्ये आशादेवी गोरखपूरच्या महापौर बनल्या. अगदी अलीकडे म्हणजे चार जानेवारी 2क्15ला छत्तीसगडच्या रायगड येथील महापौराचा मानही तृतीयपंथी मधूबाई यांनी मिळवला.