-धनंजय जोशी
सान सा निमच्या एका शिष्यानं त्यांना विचारलं, ‘‘मी ध्यान करताना आजूबाजूला खूप आवाज येतात. मला ते आवडत नाहीत. मला शांतपणो बसू देत नाहीत. मी काय करू?’’
सान सा निम हसले आणि म्हणाले, ‘‘त्या समोरच्या कार्पेटचा (सतरंजी) रंग काय?’’
तो म्हणाला, ‘‘निळा!’’
सान सा निम म्हणाले, ‘‘निळा? मग तो शांत आहे की खूप आवाज करतोय?’’
साधक म्हणाला, ‘‘शांत आहे.’’
सान सा निम म्हणाले, ‘‘का शांत आहे?’’
साधकाजवळ त्याचं उत्तर नव्हतं!
मग सान सा निम म्हणाले, ‘‘शांत आणि आवाज हे कुठून आले? तुङया विचारामधून! तुला वाटलं फार आवाज तर फार आवाज! तुला वाटलं कमी आवाज तर कमी आवाज! आवाज आणि शांती हे तुङया मनाचे खेळ! एकमेकच पण विरुद्धता दाखवणारे. ही विरुद्धता केवळ आपल्या मनाची.’’
साधक शांत राहिला होता. सान सा निम म्हणाले, ‘‘आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू!
- माझा पण एक प्रश्न आहे. तुला निळा रंग माहीत आहे. मग त्याच्या विरुद्ध काय? कोणता रंग, जो निळ्याच्या विरुद्ध?’’
साधक म्हणाला, ‘‘कसं सांगू मी? मला माहीत नाही. आय डोण्ट नो!’’
सान सा निम म्हणाले, ‘‘अरे, निळा म्हणजे निळा! पांढरा म्हणजे पांढरा! जे आहे ते तसंच्या तसं समजणं म्हणजे सत्याचा अनुभव घेणं. विरुद्धता विरघळणं!’’
मला ङोन साधना का आवडते?
- विरुद्धता विरघळून टाकणारी म्हणून!
ता. क. - मृत्युसाधनेबद्दल काही..
गेल्या वेळी ‘स्वागत’मध्ये मी सांगितलं होतं की हे वर्ष माझं शेवटलं म्हणून!
अनेक वाचकांनी विचारलं त्याबद्दल!
आपल्या शरीरामध्ये कानाचं काम फक्त ऐकणं! डोळ्यांचं काम पाहणं! नाकाचं काम वास घेणं! मग प्रश्न कुठे येतो? तो जिभेमध्ये! तिला दोन कामं. बोलणं आणि खाणं ! झाला की नाही गोंधळ?
माङया साधनेमध्ये, माङया मृत्युसाधनेमध्ये मी माङया गुरूंना हा प्रश्न विचारला, ‘‘हे कसं करायचं?’’
उत्तर आलं ते असं!.
- ‘‘कशावर लक्ष देशील? जीभ काय म्हणोल त्यावर. प्रत्येक शब्द तोंडापुढे येण्याअगोदर तुला दिसला पाहिजे. तू जे म्हणशील त्याची कुणाला खरी मदत होईल का? या प्रश्नाचं उत्तर तुला दिसलं पाहिजे. नसेल तर मौन हे तुझं उत्तर.
तुङया साधनेनं तुला दिलेलं!’’