- दिनकर रायकर
अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीवर लोकसभेत बोलताना संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी वापरलेल्या मराठीमिश्रित हिंदीने सभागृहात खसखस पिकली. जरा हटके ठरलेल्या या भाषणाची स्वाभाविकपणो खुसखुशीत बातमीही झाली. र्पीकर मुदलात गोव्याचे. तिथल्या मराठीचा बाज निराळा. तशात त्यांचा हिंदी लहेजाही खास संघाच्या प्रभावाखालचा. या सगळ्या मिश्रणातून गेल्याच आठवडय़ात ते लोकसभेत जे काही बोलले, ते मुळाबरहुकूम ऐकण्याजोगे आहे.
‘अळू भाजी खाणा:यालाच घशात खवखवते’, असे स्पष्ट करून सांगणा:या र्पीकरांना ‘खाई त्याला खवखवे’ या मराठी म्हणीचा संदर्भ द्यायचा होता. या अळूचा बहुसंख्य सदस्यांना अर्थबोध न झाल्याने त्यांनी ‘हिंदीवाला आलू नव्हे, मराठी आळू’ अशा शब्दांत जे काही मांडले त्याने आणखी संभ्रम निर्माण झाला. सरते शेवटी लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी अळू म्हणजे ‘अलवी का पत्ता’ असा भाषांतरवजा खुलासा करताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले. र्पीकरांच्या याच भाषणात काही लहान घोटाळेबाजांचा नामोल्लेख करीत आणखी एक मराठी म्हण हिंदीतून वापरली. ‘त्यांनी फक्त वाहत्या गंगेत हात धुवून घेतले’, असा आशय व्यक्त करण्यासाठी र्पीकरांनी हिंदीत वाक्य सुरू केले. ‘उन्होने धोते हुए गंगा में.’ त्यावर त्यांच्यामागे बसलेल्या अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा आणि इतरांनी लागलीच दुरुस्ती करून टाकली. ‘धोते हुए नही. बहती हुई गंगा में.’ त्यावरही हंशा पिकला. हा प्रसंग टीव्हीच्या पडद्यावर बघत असताना माङो मन नकळत माङया बातमीदारीच्या काळात डोकावले. विधिमंडळात आणि संसदेत भाषेच्या वापरावरून घडलेले अनेक किस्से लख्ख आठवले. एकूणच मराठी नेते आणि त्यांनी केलेले राष्ट्रभाषेतील ‘प्रयोग’ यानिमित्ताने उजळणीच्या रूपात मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच!
र्पीकरांचा किस्सा हा टिंगल म्हणून इथे लिहिलेला नाही. त्या ताज्या प्रसंगाने एकूणच राजकीय नेते आणि भाषेचा प्रयोग यांचा अन्योन्य संबंध अधोरेखित करण्याची ऊर्मी आली. र्पीकर तर गोव्याचे म्हणजे रूढार्थाने अस्सल मराठी नव्हेत. कोकणीचा प्रभाव त्यांच्या बोलण्यावर असणोही स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्रातच जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनेक नेत्यांनी हिंदी ज्या पद्धतीने वाकवली ते ऐकणो ख:या अर्थाने रंजक ठरले होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार जेव्हा पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून गेले, तेव्हा दीर्घ संसदीय अनुभव गाठीशी असलेल्या पवारांनी सभागृहात पहिले वाक्य उच्चरताना ‘अध्यक्ष महाराज’. अशी सुरुवात केली अन् सभागृह अवाक् झाले. उत्तरेत ‘महाराज’ म्हणजे ‘आचारी’! हिंदी भाषक खासदारांनी पवारांचा हा महाराज त्याच अर्थाने घेतला! अर्थात महाराष्ट्राच्या विधिमंडळात माङयासारख्या अनेक राजकीय बातमीदारांनी भाषेतून निर्माण झालेल्या अनेक गमती वरचेवर अनुभवल्या आहेत. जनता दलाचे नेते निहाल अहमद भन्नाट हिंदी बोलायचे. त्या मराठीमिश्रित बोली हिंदीचे अनेक किस्से आहेत. बातमीदाखल सांगायचे तर निहालभाऊ एकदा म्हणाले होते. ‘इस काम के लिए समिती नेमी गयी है.’
वसंतदादा पाटील म्हणजे तर अस्सल गावरान नेता. दादा द्रष्टे राजकारणी आणि कमालीचे व्यवहारकुशल. आणीबाणीच्या दिवसांत ‘हेडमास्तर’ असा लौकिक लाभलेल्या शंकरराव चव्हाणांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून दादा विराजमान झाले, तेव्हाचा एक प्रसंग मला पक्का लक्षात आहे.
नव्या मुख्यमंत्र्याला चर्चेसाठी बोलावण्याचा उद्योगपतींचा एक प्रघात होता. त्याचाच भाग म्हणून दादांना चर्चगेटच्या इंडियन र्मचट्स चेंबरमध्ये बोलावण्यात आले होते. त्यावेळी तिथे उद्योगजगताशी संवाद साधताना दादा म्हणाले होते. ‘एक एक धरण बांधने को नव्वद लाख खर्च आता है.’ हेच दादा नंतर 198क् मध्ये एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी झाले, तेव्हा काँग्रेसने उत्तर प्रदेशाची जबाबदारी दादांवर टाकली होती. दादा अगत्यशील होते आणि प्रेमळही. त्या काळात त्यांच्या घरी असलेल्या हिंदीभाषक पट्टय़ातील कार्यकत्र्याना ते आग्रहानं सांगायचे. ‘दो- दो घास खाके ही जाना हं!’ वस्तुत: हा प्रश्न केवळ भाषेतून होणा:या गमतीचा किंवा विनोदाचा नाही. मुद्दा आहे, तो एकूणच राजकारणातील भाषेच्या वापराचा. राजकीय संवादात भाषा कशी वापरली जाते, तिचा पोत काय असतो, तो कसा असावा, त्यातून सहिष्णू सभ्यता डोकावते की नाही, अशा अनेक मुद्दय़ांना स्पर्श करणारे चिंतन सहसा कोणाला रुचत नाही. माङया पत्रकारितेतील अनुभवाच्या आधारे आताशा मला एक बाब प्रकर्षाने जाणवू लागली आहे. ती अशी की, राजकारणातील भाषेचा पोत त्या ठिकाणच्या राजकारणाच्या दर्जाचा आरसा असतो. विरोध आणि वैमनस्य यांच्यात अंतर राखण्याचे काम चांगल्या जातकुळीची भाषा करीत असते. ब्रिटनच्या संसदेत याचा प्रत्यय पदोपदी येतो. भारताच्या संसदीय इतिहासातही त्याची उदाहरणो कमी नाहीत. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात पिलू मोदी हे स्वतंत्र पक्षाचे खासदार होते. ते सभागृहात पंतप्रधानांना चिठ्ठी पाठविताना ‘माय डिअर पीएम’ असा मायना लिहायचे. इंदिरा गांधीही त्याला उत्तर लिहिलेल्या चिठ्ठीवर ‘माय डिअर पीएम’ (पिलूृ मोदींचा शॉर्टफॉर्म) असाच मायना लिहायच्या! अमेरिकेत मात्र इंग्लंडसारखी स्थिती नाही. तिथे उक्ती आणि कृतीत अंतर असल्याचा अनुभव सर्वसामान्यांना अनेकदा घ्यावा लागतो. याबाबत अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे उदाहरण बोलके आहे. ते म्हणायचे. ‘फीं िे8 ’्रस्र2, ल्ल ल्ली6 3ं7ी2.’ नंतर लगेचच नवे कर अमेरिकेत लागू झाले! याच रेगनच्या बाबतीत निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्या विरोधकांनी ‘क,6्र’’ ‘्रू‘ ँ्रे ल्ल ँ्र2 ं22.’ अशी भाषा वापरताच रेगन यांनी प्रतिवाद करताना म्हटलं होतं, चला, या निमित्ताने ते माङयापेक्षा मागे आहेत, हे त्यांनीच सांगून टाकले हे बरे झाले! आपल्या देशाच्या राजकारणात अलीकडच्या काळात संवाद सौहार्दाची कमतरता तीव्रतेने जाणवू लागली आहे. अगदी अलीकडच्या काळातील संसदेतील संवादाची, खरे तर विसंवादाची उदाहरणो पुरेशी बोलकी आहेत.
काँग्रेस नेते आनंद शर्मा राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांच्या बाकापाशी जाऊन त्यांचे अभिनंदन करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शर्मा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण त्यावर ‘तुमचे आरोप आणि टीका यामुळे सतत दक्ष राहावं लागल्याने उत्तम आहे तब्येत’ असे कडवट उत्तर देऊन मोदी मोकळे झाले. बरे हे प्रकार उभयपक्षी सुरू आहेत. जयराम रमेश यांच्या हाताला बॅण्डेज बघून मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ‘काय झाले?’ अशी आस्थापूर्वक चौकशी केली, पण.. तुमच्यासारख्यांशी संबंध आल्यावर हे असे काहीबाही होणो अपरिहार्यच आहे ना.. असा शेरा मारून रमेश मोकळे झाले.
भाषेतून दुखावलेली माणसे ती जखम आयुष्यभर विसरत नाहीत. त्याचे अनेक नमुने मी पत्रकार म्हणून जवळून बघितले आहेत. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना सत्ताधारी काँग्रेस पक्षानेच हक्कभंग आणला होता. त्यात सुशीलकुमार शिंदे, सतीश चतुव्रेदी वगैरे मंडळी आघाडीवर होती. या पाश्र्वभूमीवर झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या वादळी बैठकीतून बाबासाहेबांना पळ काढावा लागला होता. त्यानंतर आम्ही काही पत्रकार त्यांना भेटलो, तेव्हा रागाच्या भरात त्यांनी बंडखोर काँग्रेस नेत्यांचे शेलक्या भाषेत वर्णन केले. पण ‘ते छापू नका’, अशी विनंतीही करीत राहिले. अखेरीस त्यांच्या नावाने ते वाक्य छापण्याची मुभाही बाबासाहेबांनी दिली. ‘भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची’ या त्यांच्या एका वाक्याने अल्पावधीतच काँग्रेसच्या अंतर्गत वतरुळात जे काहूर उठले, त्याने त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावे लागले.
राजकारण्यांची भाषा प्रसंगोपात बदलली. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षात वेळोवेळी झालेले भाषेच्या प्रयोगातील बदल कधी प्रकर्षाने जाणवले नाहीत. हिंदीचे विडंबन, इंग्रजी म्हणावे तर तेही मोडके-तोडके. आपली म:हाटी ही भाडभाड बोलणा:यांची भाषा. म्हणूनच एकेकाळी म्हणो भाषेवरून माणूस ओळखला जायचा. आता तो प्रकारच संपला आहे. वादापेक्षा संवादाला महत्त्व येईल तेव्हाच ही परिस्थिती बदलेल अन्यथा ‘शब्देविण संवादू’ हीही भाषा मानून चालायचे!
एक काळ असा होता, की काही नेते, लेखक यांच्या भाषेचे नमुने अभिमानाने सांगितले जात असत. अटलबिहारी वाजपेयी, इंद्रजित गुप्त, सोमनाथ चतर्जी यांची भाषणो संसदेत कानात प्राण ओतून ऐकली जायची. पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या भाषेचे दाखले आजही दिले जातात. खुशवंतसिंगांचं त्यांच्या आजीविषयीचे एक वाक्य माङया स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेले आहे. आजीचे वर्णन करताना त्यांनी लिहिले होते.
She was never pretty,
she was always beautiful...
अशा पद्धतीच्या भाषेतून संवादाचे काम चपखल साधले जाऊ शकते, पण भाषा दुबळी झाली की संवाद आटतो आणि फक्त वाद झडू लागतात.
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)
dinkar.raikar@lokmat.com