डॉ. उज्ज्वला दळवी
मसाल्यांमुळेच माणसांना जगाचा भूगोल समजला, जग जवळ आलं. भारतातली मिरी-पिंपळी-वेलची, श्रीलंकेची दालचिनी-तमालपत्रं, इंडोनेशियाचे जायफळ- जायपत्री-लवंग युरोपात पसरले.चीनहून चक्र ीफूल-तिरफळ, मध्यपूर्वेतून राई-ओवा-धणो-जिरे-बडीशेप भारतात आले. नंतर अमेरिकेतून मिरची आली आणि घरचीच झाली. गरम मसाल्याच्या प्रत्येक चमच्यात दर्यावर्दी धाडसाचा इतिहास एकवटलेला आहे.
----------------------
इजिप्तच्या राणीच्या तोंडाची चव गेली. रोजचे बेचव पाले-कंद, फळं आणि खारवलेलं मांस तिला खाववेनात. त्या पुरातन काळात काकडीची मिरची-कोथिंबिरीशी आणि आंब्याची तिखटाशी तोंडओळखही नव्हती. मग तोंडी लावणं कुठलं? राणीच्या चतुर दासीने खमंग भाजलेल्या जि:यामि:याची पूड जेवणावर शिवरली. त्या रु चिपालटावर खूश होऊन राणी पोटभर जेवली आणि तिने दासीला दहा मि:यांच्या वजनाइतकं सोनं दिलं!
हिंदुस्तानातली मिरी इजिप्त-सुमेर-रोमपर्यंत पोचवणा:या ओमानी-बाहरेनी अरबांनी मसाल्यांचं ते मोल सात हजार वर्षांपूर्वीपासूनच जाणलं होतं. नुसता रुचिपालटच नव्हे, मसाल्यांत मुरवून मांसमासे अधिक टिकतही होते. जिभेचे चोचले तर होतेच, पण तीन हजार वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन ममीच्या नाकपुडय़ांतही मिरी ठासलेली होती! बहुतेक मसाले जावा-सुमात्र-इंडोनेशिया या मसाल्यांच्या बेटांवरून हिंदुस्तानच्या पूर्व किना:यावर येत. तिथून खुष्कीच्या मार्गाने दक्षिण भारत ओलांडून मलबार किनारा गाठत. तिथून त्यांना अरबी समुद्रातून कॉन्स्टँटिनोपलपर्यंत न्यायचा ठेका अरबांनी घेतला होता.
हिंदुस्तानला, विशेषत: मलबार किना:याला मसाले-मध्यस्थीमुळे मोठंच स्थानमाहात्म्य आलं होतं. हिंदुस्तानी मध्यस्थ अरबांकडून मसाल्यांची अव्वाच्या सव्वा किंमत उकळत. तेराशे वर्षांपूर्वी हिकमती अरबांनी त्यावर मात केली. त्यांनी थेट मसाल्याच्या बेटांच्या श्रीविजय साम्राज्याशीच व्यापारी संधान बांधलं आणि हिंदुस्तानी मसालेमध्यस्थी डबघाईला आणली. सुमारे हजार वर्षांपूर्वी तामिळ चोला राजांनी स्वा:या करून श्रीविजय साम्राज्याला जबरदस्त धक्का दिला. पण मसाले बेटांजवळच्या चीनशी मैत्री करून त्या आधाराने उंटावरचे शहाणो तिथल्या व्यापारात टिकूनच राहिले. दहाव्या-बाराव्या शतकांत तर त्यांनी रेशीमवाटांवरचा जायफळ-जायपत्रीचा व्यापारही काबीज केला होता.
भूमध्य सागरात प्रवेश देणा:या कॉन्स्टँटिनोपलपर्यंतचा मसाल्यांचा व्यापार आपल्याच ताब्यात राहावा म्हणून अरबांनी मसाल्यांच्या गावांबद्दल भयानक अफवा पसरल्या होत्या. तरीही इजिप्तवरून पिंपळी-मि:यांचा माग काढत रोमन व्यापारी दोन हजार वर्षांपूर्वीच अरबांना शह द्यायला केरळ-किना:याला पोचले होते. कॉन्स्टँटिनोपलहून मसाले युरोपात न्यायचं काम मात्र रोमन-इटालियनांच्या कह्यात होतं. त्यावरूनही व्यापारी सत्तांमध्ये चकमकी चालत. उस्मानी साम्राज्याने 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल काबीज करून पाश्चिमात्यांची मसालेरसद तोडली. मसाले मिळवायचा नवा मार्ग शोधायची युरोपियनांना निकड निर्माण झाली. पण त्यांनी तहान लागण्यापूर्वीच विहीर खोदली होती.
नवे सागरी मार्ग शोधायला त्यांच्यापाशी ज्ञान आणि यंत्रसामग्री होती. अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनच ग्रीक खलाशी नक्षत्रं आणि वेळ यांचा मेळ घालून अक्षांश ठरवत होते. नक्षत्रंच्या हालचालींचं अरबी-युरोपियन पंचांगही त्यांच्यापाशी होतं. तेराव्या शतकापर्यंत त्या शास्त्रत बरीच प्रगती झाली होती. किना:यालगतच्या व्यापारी प्रवासासाठी किना:या बंदरांच्या खाणाखुणांचे नकाशे आणि होकायंत्र वापरणं युरोपियनांना तेराव्या शतकापासूनच अवगत होतं.
शिवाय धाडसी मोहिमा काढायचीही त्यांच्याकडे जय्यत तयारी होती. चौदाव्या शतकातल्या प्लेगने युरोपातले अनेक धंदे बसवले. तेव्हा नशीब काढायला इटलीतले व्यापारी दर्यावर्दी झाले. त्यांना चाच्यांपासून संरक्षण द्यायची जबाबदारी पोर्तुगीजांनी स्वीकारली. दूर पल्ल्याच्या जहाजांना आर्थिक पाठबळ द्यायला इटलीने 14क्7 साली पहिली सरकारी बँकही काढली. परस्पर सहकार्यामुळे त्या देशांना सागरात अधिकाधिक दूरवर जायचं धाडस झालं. पूर्वी आपल्याकडे प्रवासाला ‘अटके’ची लक्ष्मणरेषा होती. तशीच युरोपियन किनारा-मुशाफिरीला उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किना:यावरची ‘केप बोजादोर’ची भयरेषा ओलांडता येत नसे. तिच्या पलीकडच्या धगधगत्या समुद्राच्या अनेक आख्यायिका प्रचलित होत्या. पोर्तुगालच्या दर्यावर्दी राजपुत्रच्या, हेन्रीच्या प्रोत्साहनामुळे 1434 मध्ये पोर्तुगीज जहाजं त्या अटकेपार गेली आणि खलाशांची मनं त्या मानसिक अटकेतून मुक्त झाली.
‘अटलांटिक महासागर हिंदी महासागराला भेटत नाही’ असं इजिप्शियन पंडितांनी जगाला ठासून सांगितलं होतं. मुक्त मनोवृत्तीच्या खलाशांनी त्या विधानाचं खरेपण जाणून घ्यायचा ध्यास घेतला. कॉन्स्टँटिनोपल पडल्यावर तर वर्षाला शंभर मैल या गतीने आफ्रिकेचं दक्षिण टोक गाठायचा चंगच त्यांनी बांधला. त्या उत्साहात आफ्रिकेच्या पश्चिम कुशीतली बिनवा:याची जीवघेणी निश्चलता, विषुववृत्त पार केल्यावर सामोरी ठाकलेली अनोळखी नक्षत्रं आणि तिथे आधीपासूनच उंटावरून सोन्याचा व्यापार करणारे अरब या सा:यांशी त्यांनी जिवावर उदार होऊन यशस्वी सामना केला. आफ्रिकेतून सोनं आणि गुलाम आयात करून त्यांनी पोर्तुगालला बरकत आणली. त्या सुबत्तेच्या जोरावर दक्षिण मोहिमांना नवा जोम आला.
चौदाशे अठ्ठय़ाऐंशीमध्ये एक पोर्तुगीज गुप्तहेर अरबाच्या वेषात, खुष्कीच्या मार्गाने जाऊन आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीची आणि हिंदी महासागराची माहिती काढून आला. त्याचवेळी बार्थलोम्यू डायस हा साहसवीर आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला, केप ऑफ गुड होपला वळसा घालून हिंदी महासागरात पोचला. स्पेनहून निघालेला कोलंबस त्यानंतर चारच वर्षांनी, द्राविडी प्राणायामाने हिंदुस्थान शोधत अमेरिकेला पोचला. तेव्हा पोपच्या आ™ोवरून दिग्विजयी स्पेन आणि पोर्तुगालने उभं जग आपसात वाटून घेतलं! संपूर्ण आफ्रिका आशिया आणि ब्राझीलवर पोर्तुगालने मालकी हक्क सांगितला!
तसं मोकळं रान मिळाल्यावर डायसच्या मार्गदर्शनाखाली मोठी मसाला-मोहीम आखली गेली. आफ्रिकेची निर्वातनिश्चल पश्चिम कूस टाळायला किनारपट्टी सोडून अटलांटिक महासागरात खोलवर सूर मारायचा निर्णय झाला. त्या प्रवासासाठी अरबी जहाजांसारखी हलकी ‘कॅरावेल’ जहाजं वापरायची ठरली. हवी तशी दिशा बदलणा:या अनेक त्रिकोणी-चौकोनी शिडांमुळे ती जहाजं उघडय़ा समुद्रातल्या प्रतिकूल वा:यांनाही सहज पाठ देत. नक्षत्र-पंचांग, होकायंत्र, डायसच्या सफरीचे नवे नकाशे वगैरेंनी सुसज्ज होऊन वास्को-द-गामा निघाला. त्याने केप ऑफ गुड होपला वळसा घातला. मग पूर्व आफ्रिकेच्या एका खलाशाला वाटाडय़ा म्हणून सोबत घेऊन तो 1498 मध्ये हिंदुस्तानात, कालिकतला पोचला. तिथल्या राजाशी बाचाबाची झाल्याने त्याला थोडय़ाशाच मालानिशी मायदेशी परतावं लागलं. पण तेवढय़ामुळेही पोर्तुगालला प्रचंड फायदा झाला. ज्याने हापूस आंब्याची जात बनवली त्याच अॅफाँस-दि-आल्बुकर्कने 1511 त जायफळ-लवंगांचं बांदा बेट जिंकलं आणि मसाल्याच्या बेटांशी राजनैतिक संबंधही प्रस्थापित केले. त्याने इराणच्या आखातातलं होरमस बंदरही जिंकून संपूर्ण मसाला-मार्ग काबीज केला. पोर्तुगीजांनी चीनशीही आधी झुंजून मग मुत्सद्दीपणाने सलोखा केला. त्यामुळे पुढचं शतकभर मसाल्यांच्या व्यापारावर पोर्तुगीजांचा पगडा राहिला. त्यांच्याशी स्पॅनिश, ब्रिटिश, डच आणि फ्रेंचांनी लढा दिला. त्या धुमश्चक्रीतले डच एकोणिसाव्या शतकापर्यंत टिकून राहिले. त्यानंतर स्वातंत्र्यलढय़ांच्या नौबती झडल्या.
एकूणच मसालेमार्गाचा इतिहास जीवघेण्या चुरशीच्या मालमसाल्याने जहाल तिखट केला. पण मसाल्यांमुळेच माणसांना जगाचा भूगोल समजला, जग जवळ आलं. भारतातली मिरी-पिंपळी-वेलची, श्रीलंकेची दालचिनी-तमालपत्रं, इंडोनेशियाचे जायफळ-जायपत्री-लवंग युरोपात पसरले तसेच चीनहून चक्र ीफूल-तिरफळ, मध्यपूर्वेतून राई-ओवा-धणो-जिरं-बडीशेप भारतात आले. नंतर अमेरिकेतून मिरची येऊन घरची झाली. ते ‘जिव्हा’ळ्याचे परदेशी प्रतिनिधी तडक स्वयंपाकघरात घुसले.
गरम मसाल्याच्या प्रत्येक चमच्यात एकवटलेला त्या दर्यावर्दी धाडसाचा, ज्वलंत इतिहासाचा आणि नव्या जगाच्या भूगोलाचा स्वाद सा:यांनी जाणला, तर अन्नब्रrाला जागतिक एकात्मतेची रुची येणं सहज साधेल.
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, संशोधनाचा विषय आहे.)
ujjwalahd9@gmail.com