शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

अध्यात्मिक: पराक्रमाचे अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 6:02 AM

माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही.

संकलन बाबा मोहोडमाणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही. अशावेळी माणूस स्वत:ची जात आणि वैयक्तिक स्वार्थ विसरून जातो. एक विशाल ध्येय त्याच्यासमोर दिसू लागते आणि त्या ध्येयासाठी तो आपले जीवन-सर्वस्व समर्पण करतो.पाकिस्तानशी आपण केलेल्या युद्धात याची पदोपदी अनुभूती आलेली आहे. आपल्या सैन्यातील कितीतरी मुसलमान सैनिक बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूचे तोफखाने बंद पाडले आहेत. शत्रूचे रणगाडे ताब्यात घेतले आहेत आणि शत्रूवरच त्यांचा उपयोग केला आहे. ही सर्व शक्ती कुठून आली? ही देशप्रेमाची शक्ती आहे. तिची जोपासना आपण मनपूर्वक केली पाहिजे.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अठरा अध्यायाची गीता सांगितली. अर्जुनाने ती ऐकली. पण तिचा परिणाम अर्जुन संन्यासी होण्यात झाला नाही. उलट त्याला त्याच्या प्राप्त कर्तव्याची जाणीव झाली आणि तो स्थिर चित्ताने युद्ध कार्यात रमून गेला. कुणातरी कवीने त्याचे वर्णन केले आहे.‘‘अर्जुना देऊनी समाधी,सवेचित घातला महायुद्धी’’आजची गरज:-हे वीरतेचे ज्ञान, ही पराक्रमाची कला तुम्ही अवगत करण्याची आज आवश्यकता आहे. देश फक्त धान्यावर जगत नाही, शस्त्रास्त्रांवर जगत नाही, अधिक लोकसंख्येवरही तो जगत नाही. यासाठी स्वाभिमान आणि वीरता हवी. ज्या देशाजवळ नैतिक आणि सांपत्तिक असे दुहेरी बळ असते तोच देश अशा धुमश्चक्रीत जिवंत राहू शकतो. इतर देश किड्यामुंगीसारखे मरगळून जात असतात.म्हणून शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कवायत आली पाहिजे. सुरावर गाता आले नाही तरी चालेल, परंतु त्याला तालावर चालता आले पाहिजे. तो महाविद्यालयात आला की एक शूर सैनिक म्हणून देशाने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. या देशाचा प्रत्येक तरुण आधी सैनिक आणि नंतर विद्यार्थी, शेतकरी, कामगार असा कुणीतरी असला पाहिजे. जोपर्यंत माणसाच्या मनातला द्वेष संपत नाही तोपर्यंत युद्धाचा धोका टळू शकत नाही. पराजयातून द्वेषाची भावना बळावत असते. पाकिस्तानवर ती प्रतिक्रिया ताबडतोब होईल. तो नाना मार्गांनी आपल्याला उपद्रव देईल. तुमचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा मातीत घालण्यासाठी सतत धडपडेल. त्या दुष्ट वृत्तीचे दमन अपरिहार्यपणे आपणास करावे लागेल. ही देशाची गरज आणि वस्तुस्थिती तुम्ही महाविद्यालयाच्या तरुण विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे आणि सर्वतोपरी सावध राहिले पाहिजे. पूर्वीच्या काळात साधू, पंडित, विद्वान हे अशा गोष्टींचा विचार करीत असत. मग ते तरुणांना मार्गदर्शन करीत आणि आज्ञा देत. त्या व्यवस्थेतील मर्म आपण समजून घेतले पाहिजे.स्वामीच्या आज्ञा, सेवका प्रमाण ।तेथे हुतू पण, कामानये ।।अशी स्थिती असली पाहिजे.दुबळ्या माणसाला कुठेच प्रतिष्ठा मिळू शकत नाही. देवसुद्धा दुबळ्याला कधीच प्रसन्न होत नाही. म्हणून आपण विद्येसोबतच बळाची उपासना केली पाहिजे. बलवंत बनले पाहिजे. आम्ही कुणावरही आक्रमण करणार नाही. कुणाला उपद्रव देणार नाही. आक्रमणांचा प्रतिकार मात्र प्राणपणाने करू. आमचे युद्ध कोणाही धर्माच्या विरोधात नाही, तर देशाशी बेईमानी करणाऱ्यांशी, इथे राहून घातपाती कृत्ये करणाºयांशी, सरहद्दीवरून आम्हाला उपद्रव देणाºयांशी, आमच्याशी मैत्रीच्या वल्गना करून छातीत खंजीर खुपसणाºयांशी आमचे युद्ध आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक