शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

क्रीडा जगतातील खेळ पैशांचा

By admin | Published: June 22, 2014 1:23 PM

एका बाजूला जगाला खिळवून ठेवणारा खेळाचा जल्लोष... तर दुसरीकडे त्यासाठी होणारी डोळे दिपवणारी उलाढाल... या अतिप्रचंड उलाढालीतून देशाचा डोलारा सावरेल?

विश्‍वास चरणकर

 
एका बाजूला जगाला खिळवून ठेवणारा खेळाचा जल्लोष... तर दुसरीकडे त्यासाठी होणारी डोळे दिपवणारी उलाढाल... या अतिप्रचंड उलाढालीतून देशाचा डोलारा सावरेल?
---------
ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या ‘फिफा वर्ल्डकप २0१४’ स्पर्धेची चर्चा आता विश्‍वव्यापी बनली आहे. फुटबॉल हा खेळच असा आहे, जो कोणालाही मोहात पाडतो. त्यामुळे चर्चा तर होणारच.! मग ती खेळाची असो, खेळाडूची असो, किंवा त्यामागच्या राजकारणाची असो अथवा त्यातील अर्थकारणाची; पण काहींना या स्पर्धेतील खेळापेक्षा स्पर्धेमागच्या अर्थकारणात रस असतो. त्याला कारणही तसे आहे. ब्राझीलमध्ये होणार्‍या स्पर्धेचा खर्च हा १८ अब्ज डॉलर्स इतका प्रचंड आहे. (भारतीय चलनात ही रक्कम ८.४३२९ खर्व रुपये इतकी होते.) तो आतापर्यंतच्या स्पर्धांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. ही रक्कम एखाद्या छोट्या देशाच्या वार्षिक अर्थसंकल्पाइतकी आहे. यापैकी १४ अब्ज डॉलर्स ब्राझील सरकार करणार आहे, तर चार अब्ज डॉलर्सचा वाटा ‘फिफा’ उचलणार आहे. या पैशातून देशात नवीन स्टेडियमची उभारणी करणे, जुन्या स्टेडियमची दुरुस्ती करणे, रस्ते, विमानतळ, पंचतारांकित हॉटेल्स बांधणे, पर्यटनस्थळांचा विकास करणे, सुरक्षाव्यवस्था बळकट आणि अत्याधुनिक करणे यांसारख्या गोष्टी केल्या जातात. 
स्टेडियम उभारणी : यंदाच्या विश्‍वचषकासाठी स्टेडियम बांधणी आणि दुरुस्तीवर संयोजकांनी ११ लाख डॉलर्स इतका खर्च अपेक्षित धरला होता; पण तो वाढून ३६ लाख डॉलर्सवर गेला. यामध्ये पाच शहरांत नवी स्टेडियम उभारण्यात आली. राजधानी शहरातील जुने स्टेडियम पाडून नवीन स्टेडियमची उभारणी करण्यात आली. इतर सहा ठिकाणी स्टेडियमचा मेकओव्हर करण्यात आला.  
मेगा प्रोजेक्टस : जानेवारी २0१0 मध्ये ब्राझील सरकारने पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी १.१ अब्ज डॉलर्स इतका निधी उभारण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी सरकारने गुंतवणूकदारांना अनेक करातून सवलती दिल्या.  ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या कमी होती. ही आयोजकांच्या समोरील मुख्य अडचण होती. स्पर्धेसाठी सहा लाख लोक विमानाने येतील आणि स्पर्धेदरम्यान देशांतर्गत विमानप्रवास करणार्‍यांची संख्या तिपटीने वाढेल, असे गृहीत धरण्यात आले होते. यासाठी जितकी टर्मिनल्स हवी होती, ती स्पर्धेपूर्वी तयार होणे अशक्य वाटल्याने तेथील सरकारने खासगी कंपन्यांना या कामाची दारे खुली केली. तीन विमानतळांच्या व्यवस्थेसाठी लिलावातून खासगी कंपन्यांना निवडण्यात आले. यातून सरकारला १0.८ अब्ज डॉलर्स इतके उत्पन्न मिळाले. 
विमानतळ ते शहर आणि शहरातून स्टेडियमपर्यंत किंवा एका स्टेडियममधून दुसर्‍या स्टेडियमकडे जाण्यासाठी पक्के रस्ते, मोनोरेल किंवा जलदगती बसेस यांची आवश्यकता होती. यासाठी ४,३00 कि.मी. इतक्या अंतराचे रस्ते पक्के करण्यात आले.  येणार्‍या पर्यटकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, म्हणून हॉटेल व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी ब्राझीलियन डेव्हलपमेंट बँकेने दोन अब्ज डॉलर्स इतका निधी उपलब्ध करून दिला. 
या संपूर्ण स्पर्धेला लागणारी सुरक्षाव्यवस्था अत्याधुनिक करण्यात आली आहे. रोबोटिक सिस्टीमबरोबरच १५ लाख सरकारी सुरक्षा कर्मचारी आणि २0 हजार खासगी कर्मचारी स्पर्धा काळात तैनात राहतील. एकूण ९६ मोठय़ा कामांपैकी केवळ ३६ प्रकल्पच वेळेवर पूर्ण होऊ शकले. या कामात अडथळा येण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील लोकांचा या स्पर्धेला असणारा विरोध. सरकारी पैशाची गुंतवणूक वर्ल्डकपसारख्या अनप्रॉडक्टिव्ह बाबींवर करू नये, असे ४८ टक्के लोकांचे म्हणणे होते. स्पर्धेनंतर ही मोठमोठी स्टेडियम्स ओस पडतील. रेल्वेसेवा बंद करावी लागेल. मग हा अनाठायी खर्च का ? असा त्यांचा सवाल आहे. हा पैसा शाळा, रुग्णालये आणि इतर पायाभूत सुविधांवर खर्च व्हावा, असे या लोकांचे म्हणणे आहे. त्यासाठी ते सातत्याने निदर्शनेही करीत आहेत.
हा इतका सगळा खर्च करून ब्राझील सरकारने काय साधले? तर या स्पर्धेमुळे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत ३.0३ अब्ज डॉलर्स इतकी भर पडेल, असा तेथील पर्यटन मंत्रालयाचा कयास आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने होणार्‍या पर्यटनाचा लाभ उठविण्यास तेथील पर्यटन खाते सज्ज झाले आहे. ३७ लाख पर्यटक यानिमित्ताने ब्राझीलमध्ये दाखल होतील. या ३७ लाख लोकांपैकी १९ लाख प्रेक्षक फक्त सामने पाहतील, तर उर्वरित १८ लाख लोक स्पर्धेबरोबरच देशात पर्यटनाचा आनंद लुटतील. एक परदेशी पर्यटक सरासरी चार सामने पाहील, असे गृहीत धरले तर अडीच हजार अमेरिकन डॉलर्स ब्राझीलमध्ये खर्च करेल. या सार्‍याचा एकत्रित परिणाम म्हणजे ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत ३.0३ टक्के भर पडेल. 
ब्राझीलमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने ३६.३ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ब्राझीलमध्ये सलग तीन मोठय़ा स्पर्धा होत आहेत. गेल्यावर्षी कॉन्फडरेशन चषक फुटबॉल २0१३ स्पर्धा झाली. त्यानंतर आता सुरू असलेला फिफा वर्ल्डकप २0१४ आणि २0१६ ला होणारे ऑलिम्पिक. या तीन स्पर्धा सलग घेतल्यामुळे खर्चात थोडी बचत होणार असली तरी आधीच डळमळीत असलेल्या ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेला यामुळे बूस्ट मिळेल की नाही, याचे उत्तर मात्र काळाच्या पोटात दडले आहे.
७७0 अब्ज मिनिटांचा मामला : फिफा वर्ल्डकप स्पर्धेला कॅश करण्यासाठी कंपन्या अनेक दिवसांपासून सरसावून बसल्या आहेत. ३२ देशांमध्ये रंगणारे हे विश्‍वयुद्ध जगातील ३.२ अब्ज प्रेक्षक ७७0 दशलक्ष मिनिटस ‘याची डोळा’ पाहताहेत. याचा हिशेब केला तर २३ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम ‘फिफा’ला टी.व्ही.वरील जाहिरातीतून मिळणार आहे. तिकिटांच्या माध्यमातून ‘फिफा’ला १६0 दशलक्ष डॉलर्स इतके उत्पन्न मिळेल. जगभरातील कंपन्यांची त्यांच्या वार्षिक उलाढालीनुसार यादी केली, तर ‘फिफा’चा त्यात सातवा क्रमांक लागेल इतका ‘बिझनेस’ फिफा या महिन्याभरात करेल. स्पर्धेतील बक्षिसापोटी ‘फिफा’ ३0 कोटी डॉलर्स रक्कम वाटणार आहे.  
‘फिफा’ला जे उत्पन्न मिळते, त्यासाठी फक्त ४00 कर्मचारी राबताहेत. याच उत्पन्नासाठी एका कार बनविणार्‍या कंपनीकडे ३ लाख ३0 हजार कर्मचारी आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल, की ‘फिफा’ची पाचही बोटे तुपात आहेत. 
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
 
पारितोषिकांची रक्कम 
(आकडे डॉलर्समध्ये) 
 
विजेता : ३ कोटी ५0 लाख  
उपविजेता : २ कोटी ५0 लाख   
तिसरा क्रमांक : २ कोटी २0 लाख  
चौथा क्रमांक : २ कोटी डॉलर्स 
उपांत्यपूर्व फेरीतील पराभूत संघास प्रत्येकी : १ कोटी ४0 लाख 
बाद फेरीत पराभूत झालेल्या ८ संघांना प्रत्येकी : ९0 लाख 
गट साखळीत बाहेर पडणार्‍या १३ संघांना प्रत्येकी : ८0 लाख 
 
फिफा विश्‍वचषकातील खर्च (डॉलस)
ब्राझील (२0१४)१८ अब्ज
र्जमनी (२00६)६  अब्ज
कोरिया/जपान (२00२)५  अब्ज
इटली (१९९0)५  अब्ज
सॅन्फ्रॅन्सिस्को  (२0१0)४  अब्ज
फ्रान्स (१९९८)340 द.लक्ष
अमेरिका (१९९४)३0 द.लक्ष