शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
4
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
6
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
7
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
8
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
9
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
10
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
11
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
12
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
13
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
14
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
15
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
17
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
18
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
19
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
20
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना

छापल्या शब्दांचा दरारा

By admin | Published: July 15, 2016 4:32 PM

सत्तर ते नव्वदच्या दशकात साहित्याचा दबदबा होता. पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत. आज मराठी पुस्तकांच्या दुकानात स्मशानात गेल्यासारखे वाटते. पूर्वी तसे नव्हते. लिहिते लेखक होते. वाचता तरुण समाज होता

सचिन कुंडलकर
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
 
 
सत्तर ते नव्वदच्या दशकात साहित्याचा दबदबा होता.  पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत.  आज मराठी पुस्तकांच्या दुकानात स्मशानात गेल्यासारखे वाटते. पूर्वी तसे नव्हते. लिहिते लेखक होते.
वाचता तरुण समाज होता.  श्री. पु. भागवत यांच्यानंतर तर संपादक ही व्यक्ती नगण्य पगारी 
आणि कमकुवत होत गेली.  खंडीभर प्रकाशक आणि  पुस्तक प्रदर्शने एवढेच  साहित्याचे स्वरूप उरले.
चांगली बेफिकिरी आणि आवश्यक उद्धटपणा आपल्याला घरात शिकवलाच जात नाही.  त्याचाही परिणाम आपल्या साहित्य संस्कृतीवर पडतोच. 
 
मराठीतले सुप्रसिद्ध संपादक, मौज प्रकाशनाचे प्रमुख श्री. पु. भागवत यांच्यासमोर मी माझ्या पहिल्या कादंबरीचे, ‘कोबाल्ट ब्लू’चे हस्तलिखित घेऊन बसलो होतो. ते त्यांनी एकदा बारकाईने वाचून संपवले होते. मला त्यांचे पत्र आले होते. माझ्यायाशी इतर आवश्यक चर्चा करून, कादंबरीविषयी बोलून 
श्री. पु. भागवत असे म्हणाले होते की तुम्ही चित्रपट क्षेत्रत लेखक म्हणून आणि साहित्य क्षेत्रात 
चित्रपट दिग्दर्शक म्हणून मिरवत बसाल आणि असे करण्यात तुमचा फार वेळ वाया जाईल तर कृपया तसे होऊ देऊ नका. शिस्तीने लिहित राहा कारण तुमच्यामध्ये चांगल्या शक्यता आहेत. सिनेमे बनवण्यात आपला फार वेळ जात नाहीना याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
मला ते काय म्हणतायत हे तेव्हा नीट कळले नव्हते. पण ते जे बोलत होते ते खरे होते. ज्याचा मला आज रोज आतून साक्षात्कार झाल्यासारखा होत राहतो. त्यावेळी मी दोन्हीही नव्हतो. मी लेखक नव्हतो कारण ‘कोबाल्ट ब्लू’ सोडून मी काही लिहिले नव्हते आणि मी चित्रपट दिग्दर्शक तर अजिबातच नव्हतो. त्या भेटीनंतर चार वर्षानी मी माझा ‘रेस्टॉरण्ट’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित करणार होतो. माझ्या मनात कोणतेही आराखडे किंवा वेळापत्रके नव्हती. आयुष्य जास्त अनिश्चित, सोपे आणि उघडेवागडे होते. त्याला कोणताही घट्ट आकार दिला गेला नव्हता. मी लिहिलेले काही प्रकाशित होईल हेच मला खरे वाटत नव्हते. मी आपोआप आणि माङयासाठी लिहिले होते. पण ते तिथे थांबणार नव्हते. त्या लिखाणाचा, त्या गोष्टीचा स्वतंत्र आपापला प्रवास विधिलिखित होता. श्रीपु त्यादिवशी जे म्हणाले ते मी आयुष्यात खरे करून दाखवले. ते म्हणत होते त्या चुका केल्याच. किती द्रष्टेपणाने आणि सोप्या साधेपणाने सांगत होते ते. पण ते काय सांगत आहेत हे समजून घेण्याची पात्रता तेव्हा माङयात नव्हती याची मला खंत वाटते.
महाराष्ट्रात, केरळात आणि बंगालमध्ये लेखक होणो एकाच वेळी फार सोपे आणि एकाच वेळी महाकठीण. कारण मोठी साहित्य परंपरा हे एक छोटे कारण आणि सांस्कृतिक आणि सर्जनशील उपद्व्याप करण्याची हौस सामान्य माणसांमध्ये फार मोठय़ा प्रमाणात असणो हे दुसरे कारण. काही घडले की ओढला कागद पुढे, लिहून काढले आणि दिले मासिकाला पाठवून. झालो लेखक. लिहित्या माणसावर अतिशय मोठय़ा लेखकांचे वजन आणि दडपण, त्याचप्रमाणो दुस:या बाजूला जवळजवळ सर्व साक्षर माणसांना कागदावर खरडले की लिहून झाले असे वाटायचा धोका मोठा. त्यामुळे एकाच वेळी या तिन्ही राज्यांमध्ये खूप जास्त लेखक असतात आणि त्याच वेळी खरे कसदार लेखक फार कमी असतात अशी परिस्थिती. जी महाराष्ट्रात अजुनी चालू आहे. इंग्रजी भाषेमध्ये लिखाण आणि साहित्य यातली जी सीमारेषा मानतात ती मराठीमध्ये संपून गेली आहे. प्रकाशित होणो सोपे होऊन बसले आहे. आणि सातत्य, संशोधन आणि परिश्रमपूर्वक सावकाश केल्या गेलेल्या लेखनाचा मराठीतला काळ जवळजवळ संपुष्टात आला आहे. माङया संपूर्ण जाणिवेचे पोषण लहानपणी पुस्तकांनी केले. चित्रपटाचा मोठा पगडा मनावर तयार व्हायचा आधी. टीव्ही आणि मराठी रंगभूमी ही दोन्ही माध्यमे माङया वाटय़ाला आली नाहीत. कारण माङया घरात कुणालाही त्यांची आवड नव्हती. पुस्तकांची आवड असायला हवी हे वातावरण होते आणि जवळजवळ सगळ्यांना सिनेमाचे व्यसन होते. आणि त्यामुळे माङो मन अजूनही वाचणारे मन आहे, पाहणारे मन नाही. माङयापेक्षा जी लहान वयाची भारतीय पिढी आहे, त्या पिढीचा ज्ञानाचा आणि अनुभवाचा मार्ग ‘पाहणो’ हा आहे. तसा माझा ‘वाचणो’ हा आहे. कारण मी एकोणीसशे नव्वदच्या आधीच्या ‘अॅनालॉग’ काळात जन्मलेला मुलगा आहे. डिजिटल क्रांती भारतात घडण्यापूर्वी आणि त्याचे परिणाम मध्यमवर्गाच्या रोजच्या आयुष्यात उमटण्यापूर्वी जन्मलेला. त्यामुळे माङया ज्ञानेंद्रियांना वाचणो जास्त सुलभ जाते. बघणो नाही. त्याच्या बरोबर उलट माङया कुटुंबातील माङयाहून लहान भाचरे आहेत. माङयासोबत काम करणारे लहान वयाचे हुशार तंत्रज्ञ आहेत त्यांना पाहायला आवडते. वाचायला नाही. कोणताही अनुभव, माहिती, भावनेचा आविष्कार त्यांना दृश्य स्वरूपात असला की कळतो. मला साधे, सोपे शब्द लागतात. मला वर्तमानपत्र वाचले तरी चालते. त्यांना छोटय़ा व्हिडीओच्या स्वरूपात बातम्या पाहायच्या असतात. मी जुना आहे. मला भाषा लागते. भाषेचे व्याकरण लागते. लिखित किंवा बोली शब्दातून उत्तर लागते. त्यांना नाही. मी कोणत्याही अनुभवाचा पटकन फोटो काढून ठेवत नाही. मी तो अनुभव स्मृतीमध्ये ठेवतो आणि जर महत्त्वाचा वाटला तर त्याविषयी काही दिवसांनी लिहितो. 
विकसनशील देशांमध्ये आपण फार पटकन जातीय राजकारण, अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञानाला  वैयक्तिक पातळीवर बळी पडतो. आयुष्यातले पटकन सगळे घाबरून बदलून टाकतो. आपली आपली खास रचना ठेवत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या देशातील लहान पिढीवर जाणिवेचे संस्कार करताना तांत्रिक व्यवस्था आणि जातिव्यवस्था फार ताकदवान ठरते. आपल्याला मुले कशी वाढवायची आहेत याच्या निवडीची फारशी संधी मिळत नाही. आपल्याला साधे मातृभाषेत आपल्या मुलांना शिकवायची सोय राहिलेली नाही. मराठी शाळांची जी सध्या शहरांमध्ये भीषण अवस्था आहे त्यात आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये घालणो हे त्या मुलांच्या आयुष्याचे कायमचे नुकसान करणो आहे. मराठी शाळेतल्या शिक्षकांच्या हाती आपली मुले देण्यापेक्षा ती मुले घरी शिकवलेली बरी असा आजचा काळ आहे. त्यामुळे भारतीय पालकांनी आधी पुस्तके सोडून टीव्ही बघणारी पिढी पटकन तयार केली. ती त्यांना सोयीची होती. त्यानंतर इंटरनेट वापरणारी पिढी तयार केली. जी फारच सोयीची होती. जे सोपे आणि चारचौघांसारखे असते ते आपल्याला करता येते. आपली कुवत तेवढीच असते. सोयीपुरती. आपण मुलेसुद्धा म्हातारपणाची सोय म्हणून जन्माला नाही का घालत? शिवाय लोक काय म्हणतील याची सर्वसामान्य भारतीय माणसाला खूप भीती असते. आपण शेजा:यासारखे वागणारा भित्र समाज आहोत. चांगली बेफिकिरी आणि आवश्यक उद्धटपणा आपल्याला घरांमध्ये शिकवला जात नाही. या सगळ्याचा परिणाम पुस्तके, साहित्य, वाचनसंस्कृती, लेखकांना त्या समाजात मिळणारे स्थान, त्या समाजात असणारी किंवा नसणारी पुस्तकांची दुकाने यावर पडत असतो. आपणच आपला देश आणि आयुष्य आपल्या प्रत्येक निर्णयामधून घडवत असतो. मला वाचनाची गोडी घरातून प्रोत्साहन मिळून लागली त्याचप्रमाणो अतिशय उत्तम शालेय शिक्षकांनी ती अतिशय तळमळीने लावली. 
असे म्हणतात की ‘ये रे घना ये रे घना’ ही कविता आरती प्रभूंनी आपल्या कविता आता प्रकाशित होणार, लोक त्या वाचणार, त्या आपल्या उरणार नाहीत या संकोचाने केली. ‘फुले माझी अळुमाळू वारा बघे चुरुगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना’.
मी लहान असताना मराठी भाषेत प्रकाशन संस्था आणि त्यांचे स्वत:चे हुशार आणि तीक्ष्ण जाणिवेचे संपादक यांच्या दुपेडी जाणिवेतून साहित्य आकार घेत होते. स्वत:चे लिहिलेले इतक्या चटकन प्रकाशित करणो सोपे नव्हते. लेखक आमच्यासाठी महत्त्वाचा होता. मी मोठा होताना मराठीतील जे महत्त्वाचे लेखक समजले जातात ते मरून गेले होते किंवा वृद्ध झाले होते. महाराष्ट्र तेव्हाच जुना होऊ लागला होता. तरीही महाराष्ट्र नावाची एक जाणीव साहित्यात आणि रंगभूमीवर जिवंत होती. आज ती प्रादेशिक जाणीवच संपली आहे. सत्तर ते नव्वदच्या दशकामध्ये साहित्याचा दबदबा होता. मराठी पुस्तकांची दुकाने ताजीतवानी असत. आज जे स्मशानात थडगी पाहायला गेल्यासारखे मराठी पुस्तकांच्या दुकानात वाटते तसे तेव्हा वाटत नसे. लिहिते लेखक होते आणि मुख्य म्हणजे वाचता तरुण समाज होता. पुढच्या काळात श्री. पु. भागवत यांच्यानंतर हळूहळू संपादक ही व्यक्ती नगण्य पगारी आणि कमकुवत होत गेली. नुसतेच खंडीभर प्रकाशक आणि मोठमोठी पुस्तक प्रदर्शने एवढेच आपल्या भाषेत साहित्याचे स्वरूप उरले. आता गेल्या तीन-चार वर्षात मग नव्या कवींच्या पिढीने प्रकाशन आणि संपादक या दोन्ही संस्था झुगारून लावल्या आणि आक्रमक होऊन इंटरनेटवर कविता जन्माला घालून पसरवली. कुणीही आपल्याला समजून घेण्याची वाट पाहत ते लोक बसले नाहीत. कारण जळमटे लागलेल्या जुन्या प्रकाशन संस्थांना आपली जाणीव कळणार नाही हे त्यांना माहीत होते. छापलेल्या शब्दांचा दरारा संपुष्टात येऊ लागला आणि मराठी वृत्तपत्रंच्या संपादकाला दबकून असण्याचे दिवस संपले. शेजारचा किंवा वरच्या मजल्यावरचा माणूसही मराठी वृत्तपत्रचा संपादक बनू लागला.