शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पूल कोसळण्याआधी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 6:02 AM

कुठलाही पूल, इमारत कोसळली, की पहिला प्रश्न उभा राहतो, तो त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा. एखादा ढाचा किती काळ टिकेल, त्याचे आयुष्य किती, हे मुख्यत: ठरते ते दोन कारणांनी. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित. त्याच्या जबाबदार वापराचाही प्रश्न असतोच; पण यातले काहीच लक्षात घेतले जात नाही.

ठळक मुद्देएखादी दुर्घटना घडली की स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो; पण त्यामागची कारणे दुर्लक्षित केली जातात.

- डॉ. अभय खानदेशेपूल कोसळण्याच्या घटना आपल्याकडे नवीन नाहीत. दीड वर्षांपूर्वी एलफिन्स्टन पूल दुर्घटना घडली. गेल्या वर्षी अंधेरी येथील पादचारी पूल कोसळला. सीएसएमटी रेल्वेस्थानकाजवळील ‘हिमालय’ पूल कोसळल्याची घटना तर अगदी ताजी..पूल कोसळण्याची कारणे मूलत: दोन प्रकारात मोडतात. निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित. निसर्ग निर्मित कारणामध्ये वादळे, भूकंप, सुनामी, पूर, वीज इत्यादीचा समावेश होतो, तर मानवनिर्मित कारणांमध्ये अपघात, पुलावर ताकदीपेक्षा जास्त भार टाकणे, गंज प्रतिबंधक क्षमता कमी होणे, फटिंग इ. कारणांचा समावेश होतो.पुलाच्या सुरक्षेचा विचार करताना दोन मुद्द्यांचा विचार केला जातो. एक त्याचे आराखडा वय (डिझाईन लाईफ) व दुसरे वापरातील वय (सर्व्हिस लाईफ). आजच्या काळात बहुतांशी महत्त्वाची बांधकामे, पूल इ.चे आराखडे १०० वर्षे डिझाईन लाईफ धरून बनविले जातात. पूल वापरात केव्हापासून आहे ते रेकॉर्ड तपासून पुलाचे सध्याचे वय काढता येते. आता प्रश्न राहतो अजून पूल किती टिकेल याचा.पुलाच्या उर्वरित आयुष्याचा अंदाज काढण्यासाठी पुलाची सध्याची भारवहन क्षमता, वर्तमान पिलर, स्लॅब, बीमची स्थिती, प्रदूषित वातावरणाचा आढावा, संभाव्य धोक्याची भीती, बिघाडाचा दर, वेळोवेळी करण्यात येणाऱ्या दुरुस्त्या इत्यादींचा एकत्रितपणे विचार करावा लागतो.वातावरणाचा विचार करताना पाऊस, त्याची तीव्रता, विविध रसायनांचे (अ‍ॅसिड, अल्कली) प्रमाण, विविध जैविक घटक (शेवाळ, अल्गी इ.), तापमानातील चढउतार यांचा एकत्रित अभ्यास होतो. जैविक व रासायनिक अशा दोन्ही घटकांमुळे कॉँक्र ीट व पोलादावर घातक परिणाम होतो.कायम तणावाखाली असणाऱ्या व्यक्तीची ताण घेण्याची क्षमता काही वर्षांनी कमी होते. अगदी हाच प्रकार कॉँक्र ीटबाबत होतो. हा जास्तीचा भार कॉँक्र ीट सोबत असणाºया पोलादाला हस्तांतरित होतो. त्यामुळे पोलादाच्या आयुष्याला मर्यादा यायला लागते.पुलाचे आरेखन करताना त्यावरून जाणाºया, वाहनांच्या चाकावरील शासनाने प्रमाणित केलेला भार गृहीत धरलेला असतो. प्रत्यक्ष ट्रक भरताना बºयाच वेळा हा भार जास्तही होतो.पुलाचा सर्वात वरचा भाग कॉँक्र ीट किंवा डांबरी रस्ता असतो. अनेक कारणांनी त्याला खड्डे पडत असतात. हे खड्डे मोठे झाले की वाहने त्यातून जाताना, आपटायला सुरुवात होते. हा आपटण्याचा भार (इम्पॅक्ट लोड) समजण्यासाठी एक सोपा प्रयोग करून पहा. एक वजनदार हातोडा टेबलावर हलकेच ठेवा. नंतर तोच हातोडा उचलून टेबलावर आपटा. दोन भारातील परिणामाचा फरक सहज लक्षात येईल.लोखंड/पोलादाला लागलेला गंज हा कर्करोगासारखा आहे असं समजलं जातं. एकदा लागला की पूर्ण बरा होणे अवघड. तुम्ही पेशंटची/पुलाची किती व्यवस्थित काळजी घेता त्यावर त्याचं उरलेले आयुष्य अवलंबून. पोलाद गंजण्याचा दर हा तापमान, हवेतील आर्द्रता या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतो. यावर आपण काहीच नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे सतत काळजी घेत राहावी लागते.हल्ली महत्त्वाच्या बांधकामांना, त्यात पूल आलेच, इपॉक्सी कोटेड पोलाद वापरले जाते. त्यामुळे गंजाला बºयाच अंशी प्रतिबंध होऊ शकतो. अर्थात हे तंत्रज्ञान नसताना बांधण्यात आलेल्या पुलांचा प्रश्न उरतोच.स्ट्रक्चरल आॅडिटआता प्रश्न उरला स्ट्रक्चरल ऑडिटचा.ढोबळमनाने बोलायचं झालं तर पूल, इमारत किंवा कुठल्याही बांधकामाची सद्यस्थिती वर्णन करणारा तांत्रिक अहवाल म्हणजे स्ट्रक्चरल आॅडिट. बांधकामातील किरकोळ व गंभीर त्रुटी कशा दूर कराव्यात आणि स्ट्रक्चर कमकुवत झाले असले तर त्याचा वापर थांबवून, धोकादायक बनले असल्यास कसे पाडून टाकावे इतपर्यंत मार्गदर्शन काही अहवालात असते. अर्थात प्रश्न येतो सर्व स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पुढचा भाग का नसतो? तर याचं कारण असतं कामासाठी आखून दिलेली चौकट. अर्थात कायद्याच्या भाषेत टर्म्स ऑफ रेफरन्स. ऑडिटच्या कार्यादेशात जर फक्त स्ट्रक्चरची सद्यस्थितीच मागितली असेल तर अहवाल तेवढाच येणार हे उघड आहे.बहुतांश वेळा स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल सरकारी कार्यालयात निधीच्या तरतुदीअभावी किंवा प्रकल्प तांत्रिक मंजुरीअभावी धूळ खात पडतात. निमसरकारी आणि खासगी आस्थापनांच्या बाबतही हाच प्रकार होतो. प्रस्तुत लेखकाने महाराष्ट्रातील तालुक्याच्या गावातील एक पाण्याची उंच टाकी धोकादायक म्हणून पाडली जावी, असा अहवाल दिला होता. त्या टाकीच्या सभोवती आठवडी बाजार भरत असे. जवळपास सहा वर्षे त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. एका रात्री ती टाकी अकस्मात (?) कोसळली. केवळ सुदैवाने प्राणहानी झाली नाही.ऑडिट करताना मूळ बांधकामाच्या वेळेचा स्ट्रक्चरचा नकाशा अत्यंत उपयुक्त ठरतो. सरकारी कार्यालये तर सोडाच; पण बहुद्देशीय कारखान्यातही ही ड्राइंग फारशी मिळत नाहीत. अर्थात त्यामुळे अंदाजाने तपासणी करावी लागते. बहुमजली इमारतींच्या ऑडिटच्या वेळी आर्किटेक्चरल नकाशा मिळाला तर नशीब, अशी बहुतेक ठिकाणी परिस्थिती असते.स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आज बरीच उपकरणे उपलब्ध आहेत. अर्थात त्याद्वारे तपासणी खर्चिक असते. ज्याप्रमाणे डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितल्यावर पेशंट आणि नातेवाईक यांचा जो समज होतो तोच या ठिकाणी होतो. त्यावर उतारा म्हणून, आजकाल बहुतेक सरकारी स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामांमध्ये कोणत्या उपकरणाद्वारे, किती तपासण्या कराव्यात हे आधीच ठरवून दिले जाते. (तेवढ्याचेच पैसे दिले जातात). यावरून जी माहिती मिळेल त्यावरून अहवाल लिहिला जातो.स्ट्रक्चरल इंजिनिअर हा गरीब बिचारा असून, त्याची कुठलीच चूक नसते असं सांगणे हा मुळीच उद्देश नाही. शेवटी तोही समाजाचाच एक घटक असल्याने त्यातील भलेबुरे गुणदोष त्यातही असतात. गळाकापू व्यावसायिक स्पर्धेत कितीही कमी दरात काम घेणे, त्यामुळे पुरेसा वेळ न देणे, गुणवत्ता न राखणे, कमी दर्जाची किंवा कालबाह्य उपकरणे वापरणे, उपकरणांच्या निष्कर्षांचा योग्य तांत्रिक अर्थ न लावता येणे, वैयक्तिक ज्ञानांत कालानुरूप वाढ न करणे, क्वचितप्रसंगी बाहुबलीच्या किंवा उच्चपदस्थांच्या आग्रहाला बळी पडून अहवालात फेरफार करणे या सर्व बाह्य जगतातील गोष्टी तितक्याच टक्केवारीने या क्षेत्रातही घडत असतात. एखादी दुर्घटना घडली की स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो; पण त्यामागची कारणे बºयाचदा दुर्लक्षित केली जातात.सीएसएमटीच्या बळींना श्रद्धांजली वाहताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी नीट पार पाडणं हेच सर्वाधिक महत्त्वाचं आहे.सांगा, या बांधकामाचेउरलेले आयुष्य किती?स्ट्रक्चरल इंजिनिअरला जवळपास प्रत्येक ऑडिटच्या वेळी विचारला जाणारा एक प्रश्न - ‘या बांधकामाचे उरलेले आयुष्य किती?’ कुठल्याही डॉक्टरला रोग्याचे उर्वरित आयुष्य विचारण्यासारखा. जगातल्या कितीही तज्ज्ञ डॉक्टरला याचे तंतोतंत उत्तर देता येणार नाही. अगदी याच धर्तीवर जगातील कितीही नामांकित स्ट्रक्चरल इंजिनिअरला बांधकामाचे उरलेले आयुष्य अचूक सांगता येणार नाही. अंदाजे सांगितलं तरी तो रोगी आपल्या सर्व सूचना अमलात आणेल यावर विसंबून सांगणार. खरा घोटाळा होतो तो इथेच. जादा एफएसआय (किंवा टीडीआर) मिळाला की मजले वाढवणार, छतावर मोबाइल टॉवर उभारणार, एवढेच काय; पण अंतर्गत सजावटीत शोभत नाही म्हणून तळ मजल्याचे कॉलम कापणार आणि इमारतीला काही झालं की ऑडिटरला दोष देणार !..(लेखक स्ट्रक्चरल इंजिनिरिंगमध्ये डॉक्टरेट असून, २० वर्षांपासून स्ट्रक्चरल ऑडिट क्षेत्रात कार्यरत आहेत)

abhay@khandeshe.com