शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

सुख़न

By admin | Published: June 10, 2016 3:56 PM

ऑक्टोबर 2015 ला अनौपचारिकपणो सादर केलेल्या घरगुती कार्यक्रमात ‘सुख़न’चं रुपडं निश्चित झालं आणि मैफलीला सुरुवात झाली

मुलाखत आणि शब्दांकन

- सोनाली नवांगुळ

उर्दू अदब और हिंदुस्तानी मौसीकी मह़फिल
 
कमी शब्दात खूप काही सांगता येणं
ही उर्दूची खासीयत.
विषय स्वतंत्र मांडण्याची 
आणि तोच विषय पुढे 
न चालवण्याची मुभा.
पहिल्या ओळीत रहस्याचा आभास आणि दुस:या ओळीत 
कोडं उलगडल्याचा भास 
अशी सगळी गंमत. 
भारतातली ही एकमात्र 
हायब्रिड भाषा. 
ती आपली वाटते, समजते 
असे वाटते तेवढय़ात, परकी असल्यासारखी निसटतेही हातातून. 
या गमतीमुळे आकर्षण वाटतंच. 
‘फकिरी में अमीरी का मज़ा देती है उर्दू. हा खजिना अनुभवावा 
व इतरांसाठी लुटावा म्हणून 
‘सुख़न’ची बांधणी सुरू झाली. 
हा संवाद आता रंगत चाललाय.
 
आठ-नऊ र्वष उर्दू शिकण्याच्या काळात हातात जे सापडतंय त्यातून काहीतरी चांगलं बांधूया असं ओम भूतकर, नचिकेत देवस्थळी आणि मित्रमंडळींच्या मनात घाटत होतं. जवळपास अडीच र्वष चाललेल्या चर्चेतून ‘सुख़न’चा जन्म झाला. ओम अभिनयातला सशक्त चेहरा. गुणी कलाकार. नुसरत फतेह अली खान यांच्या प्रेमात असणारा. त्यांचा जन्मदिन साजरा करायचा म्हणून दोन वर्षांपूर्वी त्यानं कव्वालीचा कार्यक्रम घेतला. पुण्याचा जयदीप वैद्य हा शास्त्रीय गायक यात सोबत आला. 13 ऑक्टोबर 2015 ला अनौपचारिकपणो सादर केलेल्या घरगुती कार्यक्रमात ‘सुख़न’चं रुपडं निश्चित झालं आणि मैफलीला सुरुवात झाली. ‘विनोद अॅण्ड सरयू दोषी नॅशनल थिएटर’नंही ‘सुख़न’ टीमला सादरीकरणासाठी आवर्जून आमंत्रित केलं. ‘सुख़न’ म्हणजे - ‘उर्दू कहानियॉँ, नस्त्र, नज्मे, गजलें, कौल, क़व्वालियॉँ’! 
केवळ 15 कार्यक्रम होऊनही त्याची चर्चा रसिकांमध्ये आणि जाणकारांमध्ये घडतेय. भारतीय शास्त्रीय संगीत, सुफी संगीत आणि अस्सल उर्दू बोलीत समा रंगवणा-या ‘सुख़न’मधल्या वेडय़ा माणसांमुळे उर्दू ग़ज़ल, शायरी आणि साहित्याचं वेड व्हायरल होताना दिसू लागलंय. हे ‘वेड’ प्रत्यक्षच अनुभवण्यासारखं. त्यानिमित्त ‘सुख़न’चे संकल्पक, कलाकार व दिग्दर्शक ओम भूतकर यांच्याशी मारलेल्या या गप्पा.
 
‘सुख़न’ मनात अंकुरलं कसं?
- उर्दू वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करताना मी ‘मिङर गालीब’ हे नाटक लिहिलं. दिग्दर्शित केलं. त्यावेळी गजलेंतलं फार कळत नव्हतं, मात्र तिचा फॉरमॅट खूप आकर्षक वाटला. कमी शब्दात खूप काही सांगणं यात साधतं. तोच विषय पुढे जाण्याचं बंधन नसल्यामुळे संदर्भ नसणा-या गोष्टी तुम्ही सांगू शकता. विषय स्वतंत्र मांडण्याची मुभा असते. पहिल्या ओळीतून एखादं रहस्य सांगितल्याचा आभास करायचा आणि दुस-या ओळीत ते कोडं उलगडल्याचा भास अशी सगळी गंमत. याची भूल मला पडली. दुसरी भूल उर्दूची! माझ्या मते ही भारतातली एकमात्र हायब्रिड भाषा आहे. त्या भाषेत एकाचवेळी भारतीयत्वसुद्धा पुरेपूर आहे आणि परकीयत्वही. मुघलांच्या लष्करात तुर्कस्तान, इराण, भारत, अरेबिया असे सगळीकडचे शिपाई होते, त्यांना संवादाची काहीतरी कॉमन भाषा पाहिजे म्हणून जी भाषा आली तिला उर्दू नाव दिलं गेलं, पण ती होती हिंदी, अरबी, फारसी, तुर्की यांचं मिश्रण. तिचं व्याकरण व शब्द हिंदीच्या जवळपास जाणारे. तर ती अशी भारतीय आणि फारसी, अरबी प्रभावामुळे परकीय. आपली वाटते, समजते तोवर वैशिष्टय़पूर्ण उच्चारणामुळे परकी असल्यासारखी निसटते हातातून. या गमतीमुळे आकर्षण वाटतंच. 
कुणी मान्य करो न करो, बहुतांश भारतीयांना या भाषेची ओढ असते. मुघल दरबारातून जन्माला आल्यामुळे तिची अदब, नजाकत, शाहीपण पाहून ती श्रीमंतांची भाषा आहे की काय असा भास होतो. गुलजार एकेठिकाणी म्हणतात, ‘फकिरी में अमीरी का मज़ा देती है उर्दू’ - तर मी खेचला गेलो. या भाषेतल्या उच्चारणाच्या संस्कारासह यातला खजिना अनुभवावा व इतरांना अनुभव द्यावा असं प्रकर्षानं वाटायला लागलं आणि ‘सुख़न’ची बांधणी सुरू झाली. ‘सुख़न’ म्हणजे संवाद.. तो रंगत चाललाय.
 
तुझा उर्दूशी मेलजोल काही फार जुना नव्हे. तरी रंगमंचावर तुझं व इतर कलाकारांचं सादरीकरण पाहून तुम्ही त्याच भाषेत जन्मल्यासारखा माहौल जमवता, ते कसं?
- बारा र्वष अभिनयाचं बॅकग्राउंड असल्याचा फायदा झाला असावा. कॅरॅक्टर प्ले! उर्दू पूर्ण उमगली असा आव नाही व ती अगदीच अंत:प्रेरणोतून येते असंही नाही! मग ‘तात्पुरतं’ असतानाही खरोखरीच आपण त्या ठिकाणी आहोत असं मानून मैफल फुलवावी लागते. आपण जर समजण्यातल्या प्रामाणिकपणाला भिडलो तर दर्शनी अस्सलपणा दाखवता येतो. पुन्हा सांगतो, हे क्रेडिट थिएटरचं आहे.
 
‘सुख़न’मधल्या कंटेटची निवड व सादरीकरणाची पद्धत?
- उर्दू समजण्यात अडचण असल्यामुळे लोक सादर होणा-या कार्यक्रमाशी कनेक्ट नाही झाले तर कसं हा प्रश्न होताच. शोध घेता घेता मुज्तबा हुसेन यांची गोष्ट वाचनात आली व तिथून सुरुवात करता येईल असं वाटलं. शोध चालू राहिला. वेगवेगळ्या नज्म आणि गज़ल एकत्र केल्या. मराठीत फारसीतले खूप शब्द आहेत. शिवाय बॉलिवूडमधील हिंदीमुळे ती उजळणी होत आलेली आहे. तरी कंटेटची निवड हा सगळ्यात जास्त अवघड व क्रिएटिव्ह भाग आहे हे कार्यक्रम बांधताना लक्षात आलं. उर्दूतलं चांगलं, वाईट काव्य समजणं महत्त्वाचं. केवळ उर्दूच्या लहेजावर खपवलं जाणारं सवंग आणि भंपक काव्यही खूपच आहे. हे सर्व बाजूला सारून, मोठय़ा ढिगा-यातून चार-पाच हिरे शोधणं असं हे काम आहे. अजूनही ते आव्हानात्मकच वाटतं. अनेकदा सुंदर काव्य सापडतं, पण ते इतकं अवघड व दुबरेध असतं की नाही घेता येत. तारेवरची कसरत करावी लागते. रिहर्सलपेक्षा त्यात जास्त वेळ खर्च करावा लागतो. मजकुरात विचारांची खोली असेल व समजायला सोपं असेल हे पाहिलं जातं. मुज्तबा हुसैन यांच्या दोन कथा आणि हफीज़ जालंदरी, जॉन एलिया, अल्लामा इकबाल, अहमद फराज़, निदा फाज़ली, फैज़ अहमद फैज़, मीर तक़ी मीर, दाग़, साहीर, गोपालदास नीरज इ. कवींचं काव्य आम्ही घेतलं. नुसरत फ़तेह अली खान यांनी गायलेल्या काही क़व्वाल्या घेतल्या. गालिबच्या ग़ज़ला अवघड, त्यामुळं त्याची पत्रं आम्ही वाचतो. अमीर खुस्त्रोची काही गाणी गातो. विस्मृतीत चाललेल्या ‘दास्तान गोई’च्या फॉर्ममध्ये कथावाचन, काही नजम, गजल असा एकंदर फॉरमॅट. बॉलिवूड बेसिक हिंदी ज्याला कळतं त्याला हा कार्यक्र म कळतो, आवडतो. आणि शब्द न शब्द कळण्याची ब-याचदा गरज नसते. ते कळले नाहीत तरी आशय कळत असतो. रसग्रहण होत असतं. हे नाटक नसल्यामुळे कंटेट बदलायला अनेकदा वाव असतो. काहीतरी नवीन प्रत्येक कार्यक्र मात असावं असं वाटतं. तसा प्रयत्न करतो. सादरीकरण आम्ही अनौपचारिक पद्धतीनं गप्पा मारत, किस्से सांगत, प्रेक्षकांशी संवाद साधत करतो. पहिल्या काही मैफलींत इतके गुंग झालो की आम्हाला व प्रेक्षकांनाही वेळेचं भान राहिलं नाही. त्यावेळी चार तासांहून अधिक रंगलेला कार्यक्रम आता एक मध्यंतर घेऊन तीन तास सादर करतो.
 
‘सुख़न’ करताना मिळालेलं समाधान कशा प्रकारचं आहे?
- या निर्मितीप्रवासात उर्दू भाषेच्या सौंदर्यापलीकडे खोल जाता आलं. अनेक बाजू तपासता आल्या. कवीची आंतरिक वेदना लक्षात येऊन जास्त तरलतेकडे उतरता येतं. कुठलीही कलाकृती समजून घेण्यासाठी जी संवेदनशीलता व जाणीव लागते ती अधिक गहिरी झाली असं वाटतं. उर्दू काव्यामध्ये प्रेमभंग, दु:ख, अध्यात्म असे काही विषय आणि त्यात सूफ़ीज़मचा प्रभाव खूप जास्त. यातून दु:खाकडे बघायची नजर घडते, ताकद मिळते. दु:खात उतरायला मदत होते.
 
अपेक्षा?
- ‘सुख़न’च्या आताच्या रूपबंधामध्ये सादरीकरणासाठी आम्ही सोप्या रचना निवडल्या आहेत. कारण सतत अर्थ उलगडून सांगावा लागतो तेव्हा सौंदर्य हरवून जातं. अपेक्षा अशी की श्रोत्यांनी अधिकाधिक सजग व्हावं म्हणजे आम्हाला दुबरेध कविताही निवडता येतील. यात आमचा स्वार्थ असा की आम्हाला जास्त अभ्यास करता येईल. भाषेशी खेळणं व तिला खेळवणं यातली मौज मिळत राहणं हाही एक स्वार्थ. शायरीसाठी दोन गोष्टी घातक आहेत असं म्हटलं जातं, एक म्हणजे न समजणा:याची दाद आणि दुसरी समजणा:याची शांतता!! - उर्दूचा शौक व जाण राखणा-यांपुढे ही मैफल अधिक खुमारीने रंगवण्याची इच्छा तर आहेच!
 
 
सुखन टीम :
‘‘ऐसी रंग दो, रंग नाही छूटे..
धोबिया धोए चाहे सारी उमरियॉँ ’’
 
जयदीप वैद्य, नचिकेत देवस्थळी, देवेन्द्र भोमे, अभिजित ढेरे, स्वप्नील कुलकर्णी, मंदार बगाडे, मुक्ता जोशी, केतन पवार, शंतनू घुले, कुशल खोत, महेश तळपे, शुभम जिते, ऋचा श्रीखंडे, मालविका दीक्षित, वैभव शेटय़े, क्षितिज विचारे, अधीश पायगुडे, प्रतीक्षा भारती, दिव्या चाफडकर, सानिका गोरेगावकर आणि ओम भूतकर.