शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात कट्टरतावादाला चिथावणी देणाऱ्या घटनांमध्ये अचानक वाढ"; सरसंघचालकांनी व्यक्त केली चिंता
2
"OTT प्लॅटफॉर्ममुळे तरुणांवर वाईट परिणाम"; नियंत्रणासाठी कायदा करण्याची सरसंघचालकांची मागणी
3
प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी ३ मित्रांचा कारनामा; खावी लागली जेलची हवा
4
Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
5
Zerodha Nithin Kamath : ब्रोकर्स कधीही करू शकणार नाही 'हे' काम, SEBI च्या नव्या नियमांवर काय म्हणाले नितीन कामथ
6
"गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन..."; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन
7
सूर जुळले! अखेर अंकिताने दाखवला कोकण हार्टेड बॉयचा चेहरा, कोण आहे तो?
8
कमी पैशांमध्ये अधिक व्हॅलिडिटीचा प्लॅन शोधताय? BSNL चा हा प्लॅन ठरेल बेस्ट
9
७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?
10
Ratan Tata Successor Noel Tata : बुर्ज खलिफाशी आहे 'टाटा'चं कनेक्शन; Tata Trust चे अध्यक्ष नोएल टाटांवर आहे जबाबदारी
11
खळबळजनक! ऑनलाईन गेममध्ये अडकला जवान; रायफलसह आर्मी कँपमधून झाला फरार अन्...
12
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
13
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
14
जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
16
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
17
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
18
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
19
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
20
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत

घेणे... आणि देणे?

By admin | Published: August 20, 2016 8:48 PM

इंटरनेटने जर काही मुख्य केले तर साधारण १९४७ च्या आसपास जन्मलेल्या पिढीचे तोंड बंद केले. त्या पिढीच्या हातून ज्ञान, संधी आणि माहिती हिसकावून घेतली गेली आणि हवी आहे त्यांना मोफत वाटली गेली. ज्ञान माहिती आणि पर्यायाने पैसा या गोष्टी साठवण्या-वापरण्याची सगळी व्यवस्थाच बदलली.

- सचिन कुंडलकर
 
इंटरनेटने जर काही मुख्य केले तर साधारण १९४७ च्या आसपास जन्मलेल्या पिढीचे तोंड बंद केले. 
त्या पिढीच्या हातून ज्ञान, संधी आणि माहिती हिसकावून घेतली गेली आणि हवी आहे त्यांना 
मोफत वाटली गेली. ज्ञान माहिती आणि पर्यायाने पैसा या गोष्टी साठवण्या-वापरण्याची 
सगळी व्यवस्थाच बदलली. इंटरनेट हे आमच्या पिढीसाठी मोठे स्वातंत्र्य घेऊन आले. त्याचबरोबर अनेक धोके आणि जबाबदाऱ्या. आपापले आयुष्य हवे तसे रचून पाहण्याचे, नाही जमले तर पुन्हा नव्याने रचण्याचे शहाणपण मिळाले. न पटणारी लग्ने तोडली, मोडली, नव्याने रचली गेली. प्रवास केले गेले. नव्या भाषा कानावर पडल्या. हे सगळे घडले कारण.. कारण इंटरनेट!
 
जोपर्यंत मला इंटरनेट मिळाले नाही तोपर्यंत मी माझ्या कॉम्प्युटरचा पुरेसा वापर करत नव्हतो. इंटरनेट मोकळेपणाने आणि भरपूर वेगाने घरात मिळायला खूप वर्षे जावी लागली. हातातल्या मोबाइल फोनवर ते कधी येईल असे वाटले नव्हते. मोबाइल फोन असेल हेच कधी वाटले नव्हते. पण नव्या सहस्रकात प्रवेश करताना भारताने इंटरनेट प्रणाली आणि संपर्काचे तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात परदेशी कंपन्यांना व्यापार करायला परवानगी दिली आणि आयुष्याचे दोन भाग करता येतील अशा गोष्टी घडू लागल्या. - इंटरनेटपूर्वीचे आयुष्य आणि त्यानंतरचे आयुष्य. मी माझे पहिले ई-मेल अकाउंट २००० साली उघडले. फिल्म इन्स्टिट्यूटच्या पहिल्या वर्षात डिजिटल टेक्नॉलॉजी वर्गाच्या पहिल्या दिवशीच आपापले खासगी मेल अकाउंट उघडण्याचे ट्रेनिंग आम्हाला दिले गेले. हे सगळे फक्त सोळा वर्षांपूर्वी घडले आहे यावर आता माझा विश्वास बसत नाही. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाला नाकारण्याची खूप मोठी आणि महत्त्वाची सवय आमच्या शहराला होती. कारण शहरात प्रोफेसरकी करणारे आणि डाव्या लोकांच्या पैशांवर सेमिनारसाठी जगभर फिरणारे लोक पुष्कळ होते. काही नवीन आले की विरोध करणे हे अशा लोकांचे मूळ काम असते; कारण समाज सुखी आणि सबळ झाला तर मग अशा लोकांचे करिअर कसे होणार? त्यामुळे सतत नव्या गोष्टींविषयी साशंकता पसरवणे ही अशा अति बुद्धिमान लोकांची सवय असते. त्यासाठी ते आमच्या शहरात सूर्याच्या चुलीवर शिजवलेले अन्न खाऊन, विद्यापीठात चालत किंवा सायकलवर जाऊन, संध्याकाळी सातनंतर विजेचा वापर टाळून, पाठकोऱ्या कागदाच्या शिवलेल्या वह्या लोकांसमोर वापरून, खादीचे भरड कपडे घालून जगतात. महात्मा गांधी हे अशा लोकांसाठी जगासमोर वापरायचे हुकमी चलन असते. गांधीजींच्या नावावर बिल फाडले की भारतातले लोक काहीही ऐकतात. शहरात जन्मलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात शहरात बाहेरगावहून, ग्रामीण भागातून शिकायला आलेल्या मुलांना अशा रशियन कम साबरमती ब्रॅण्ड वागण्याची मोठी ग्लोरी तयार व्हायची. अशा सगळ्या तरु ण विद्यार्थ्यांना कार्यकर्ते म्हणून वापरता यायचे. अशा सगळ्या पर्यायी आयुष्य जगण्यात करिअर करणाऱ्या लोकांनी माहिती नवे तंत्रज्ञान आणि कॉम्प्युटर्सविषयी वातावरणात एक साशंकता पसरवलेली असे. ज्या गावात मोठी प्रसिद्ध विद्यापीठे असतात तिथे आयुष्याचा वेग संथ असतो. तो खरेतर चांगला प्रवाही आणि बदलता असायला हवा. पण तसा राहिला तर आखीव प्रोफेसरकी करून पोट भरणाऱ्या विद्वानांचे घर कसे चालेल? आमच्या शहरातल्या बुद्धिमान लोकांना कोणतीही राजकीय किंवा सामाजिक बांधिलकी नव्हती. त्यांना फोर्ड फाउंडेशनपासून ते रशियन देशांमधील देण्ग्यांपर्यंत कोणताही पैसा चालत असे. २००० साल उजाडले तरी आमच्या शहरात १९६८ ची फ्रेंच क्र ांती नुकतीच झाली आहे, असे हे लोक वागत असत. त्या सगळ्या लोकांच्या बाष्कळ बडबडीला आणि चळवळीना इंटरनेट आणि मोबाइल फोन्सनी मारून टाकले. अतिहुशार विचारवंत आणि भाबडे कार्यकर्ते यांचे नाते संपले. अनेक लोकांना सामाजिक चळवळी संपल्या आहेत असे वाटते; पण त्या संपल्या नसून त्या ज्या भोंगळ पद्धतीने आजपर्यंत चालवल्या जात ती पद्धत मोडीत निघाली. भारतात उरलेसुरले सोविएत साम्राज्य खऱ्या अर्थाने इंटरनेटने संपवले. इंटरनेटने जर काही मुख्य केले तर साधारण १९४७ च्या आसपास जन्मलेल्या पिढीचे तोंड बंद केले. ती पिढी ‘तुम्हाला हे कळतच नाही’, ‘तुम्हाला हे समजतच नाही’, ‘तुम्हाला याची पर्वाच नाही’, ‘तुम्हाला कसलीही जबादारीच नाही’ असे सतत बडबडत बसायची. त्या पिढीच्या हातून ज्ञान, संधी आणि माहिती हिसकावून घेतली गेली आणि हवी आहे त्यांना मोफत वाटली गेली. तोपर्यंत ज्ञान माहिती आणि पर्यायाने पैसा या गोष्टी ठरावीक पद्धतीच्या, जातीच्या आणि मुख्य म्हणजे ठरावीक वयाच्या लोकांकडे साठवून ठेवलेल्या असत. त्याची व्यवस्था बदलली. इंटरनेट हे आमच्या पिढीसाठी मोठे स्वातंत्र्य घेऊन आले. त्याचबरोबर अनेक धोके आणि जबाबदाऱ्याही.इंटरनेटचा वापर करायला शिकण्यात काही वर्षे जावी लागली. नुसते फेसबुकवर चहाटळपणा करण्याच्या पलीकडे इंटरनेटची एक भूमिका आणि एक उद्देश आहे हे समजायला काही वेळ जावा लागला. या काळात माझ्या आजूबाजूच्या अनेक मुलामुलींनी करिअरचे योग्य आणि स्वत:ला पटतील असे पर्याय निवडले. निर्णय घेऊन मग तो घरी सांगणे अशी सवय तरुण पिढीला लागली. कारण मोठ्या वयाच्या घरातील लोकांना नव्याने जोडलेल्या जगातील अनेक गोष्टी समजेनाशा झाल्या. माहिती विचारणे आणि ती मिळवण्याची वाट पाहत बसणे याचा काळ संपला.पूर्वी मराठी घरातील वयस्कर बायका फक्त मुलींची बाळंतपणे करण्यासाठी कॅलिफोर्नियाला जात. त्या आता टोप्या, गॉगल घालून आपल्या वयाच्या इतर बायकांसोबत इजिप्तच्या पिरामिडसमोर सेल्फ्या काढू लागल्या... यू ट्यूबवर आपल्याला येणाऱ्या नागपुरी वडाभाताचे व्हिडीओ अपलोड करू लागल्या... अतिशय तरु ण आणि अतिशय ज्येष्ठ पिढीने या काळात धमाल सुरू केली आणि साधारण पन्नाशीला आलेली मधली पिढी रागावून, घाबरून, कटकट करत, नोकऱ्या करत, हप्ते फेडत, जुनी होत घरी मालिका पाहत बसून राहिली. १९५० ते १९६० या स्वातंत्र्यानंतरच्या दहा- पंधरा वर्षांत जन्मलेली सगळी भारतीय पिढी किती बिचारी आणि असुरक्षित आहे हा अभ्यासाचा विषय करावा इतके बदल २००० साली डोळ्यांना दिसू लागले. इंटरनेटवर मुबलक प्रमाणात हजारो लोकांनी साठवून ठेवलेले अनुभव वाचता - पाहता - ऐकता येऊ लागले. त्यामुळे जगामध्ये लोक किती विविध आणि मजेशीर पद्धतीने जगतात हे समजून घेता आले. पुस्तके, सिनेमे आणि संगीत यांची देवाणघेवाण तरु ण पिढीने सुरू केली. पेन ड्राइव्ह आणि हार्ड डिस्कच्या काळात कुटुंबात राहूनही माणसाला आपले खासगी आयुष्य जपता येऊ लागले. आपण कुणाला काय देतो, कुणाकडून काय घेतो, काय पाहतो, काय ऐकतो यावरचे कुटुंबाचे नियंत्रण संपले. मोठ्या वयाच्या लोकांनी याविषयी आरडाओरड सुरू केली तरी त्याचा प्रवाह थांबला नाही. प्रत्येक तरु ण माणसाला आपापले आयुष्य हवे तसे रचून पाहण्याचे आणि नाही जमले तर पुन्हा नव्याने रचण्याचे शहाणपण मिळाले. अनोळखी माणसांशी संपर्कसोपा झाला. न पटणारी लग्ने तोडली, मोडली, नव्याने रचली गेली. नवी नाती उदयाला आली. प्रवास केले गेले. नव्या भाषा कानावर पडल्या... हे सगळे घडले कारण इंटरनेटवरती जगातील लाखो करोडो लोकांनी आपापले अनुभव नोंदवून ठेवले होते आणि आपल्याकडील सगळी चांगली वाईट सामग्री लोकांना मोकळेपणाने वापरायला, पाहायला, वाचायला उपलब्ध करून दिली. यामुळे एक महत्त्वाची भूमिका तयार होऊ लागली ज्याची आपल्यालाही जाण असायला हवी. मी इंटरनेटवरून इतके सगळे घेतो, तर मी इंटरनेटला काय परत देत आहे?इंटरनेट हे देवाणघेवाण करण्याचे माध्यम आहे. आपण जेव्हा इतकी माहिती आणि अनुभव सोप्या पद्धतीने घेतो आणि वापरतो त्यावेळी आपण आपल्याकडचे काही ज्ञान, आपले अनुभव, आपण धडपड करून शिकलेल्या चार गोष्टी इंटरनेटवर नोंदवून ठेवायला हव्यात. आपले विचार, आपण करत असलेल्या प्रवासातले अनुभव... या गोष्टी इतरांना कळायला हव्यात. दृश्याला भाषा लागत नाही. आपल्या प्रत्येकाच्या खिशात कॅमेरा आहे. फोनला माइक आहे. आपण नुसते बसून चॅटिंग करण्यापेक्षा काही गोष्टी रेकॉर्ड करून आपल्या फेसबुक, इन्स्टा किंवा ्ट्विटरवर अपलोड का करत नाही? आपले स्वत:चे अनुभव मांडण्याचे चॅनेल का सुरू करत नाही? ...मी गेल्या वर्षी माझा ब्लॉग या विचाराने सुरू केला आणि त्याचा मला फार चांगला अनुभव येऊ लागला. आपण प्रत्येकाने हा विचार करून काहीतरी नवे सुरू करूया : इंटरनेटला मी माझे असलेले काय परत देत आहे? आपल्या प्रत्येकाच्या खिशात कॅमेरा आहे. फोनला माइक आहे. आपण नुसते बसून चॅटिंग करण्यापेक्षा काही गोष्टी रेकॉर्ड करून आपल्या फेसबुक, इन्स्टा किंवा ्ट्विटरवर अपलोड का करत नाही? आपले स्वत:चे अनुभव मांडण्याचे चॅनेल का सुरू करत नाही? एक प्रश्न स्वत:ला विचारावा :मी इंटरनेटवरून इतके सगळे घेतो तर मी इंटरनेटला काय परत देत आहे?(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

kundalkar@gmail.com