शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

आयुष्य बदलून टाकणारं तंत्रज्ञान

By admin | Published: January 02, 2016 2:36 PM

तंत्रज्ञानाने सगळी घडीच बदलून टाकली, नवे संकेत रूढ केले, नवी मूल्यं जन्माला घातली असं आपण नेहमी म्हणतो आणि अनुभवतोही! पण ‘मागचं सारं सपाट करून’ सतत पुढे जात जात अखंड उन्नत होत जाणारं तंत्रज्ञान आता ‘मातीविना शेती’ करण्याची जादूही हस्तगत करू पाहतं आहे. नव्या वर्षाच्या क्षितिजावर उभे आहेत चार नवे बदल! त्यांचीच ही एक सुलभ झलक!

- शैलेश माळोदे
 
उगवत्या सूर्याला नमस्कार ही जगरहाटी आहे. त्यामुळे एखादी नवीन गोष्ट दिसली की त्याविषयी कुतूहल जागृत होणं साहजिकच आहे. त्यातही नवं ‘गॅजेट’ म्हटलं की त्यावर उडय़ा हमखास पडतातच. आपल्या जीवनातदेखील असंच आहे. नव्या गोष्टीचा आग्रह धरला जातोच. पण म्हणतात ना, वाईट सवयी सुटता सुटत नाहीत! तसंच काहीसं या गॅजेट्सचंही आहे. एकदा का सवय लागली की जणू ते आपला एक जास्तीचा अवयवच होऊन जातं. 
भारतीय लोकांचं गॅजेटवेड फार! एखादं नवीन उत्पादन बाजारात आलं की त्यावर उडय़ा पडतातच! वैयक्तिक वापराच्या प्रॉडक्ट्सविषयी तर काही विचारूच नका. त्यातही युवा पिढीचं बहुमत देशात असल्याचा डांगोरा पिटला जात असताना, बाजारपेठेत त्यांना टार्गेट करून तंत्रज्ञान उपलब्ध होणं स्वाभाविकच! तंत्रज्ञान हे सार्वत्रिक असतं. त्यामुळे भविष्यामध्ये आपलं जीवन आणखी कसं सुकर बनेल, या मूलभूत मानवी प्रेरणोतून आपण नव्या तंत्रज्ञानाला सामोरं जात असतो. ते आत्मसात करीत असतो.
 प्रत्येक नवं तंत्रज्ञान हे ‘डिसरप्टिव्ह’ (Disruptive) असतं म्हणजे पूर्वीच्या किंवा सध्याच्या तंत्रज्ञानस्थितीला संपूर्णपणो विस्कटून टाकणारं!
आज अत्याधुनिक असलेल्या तंत्रज्ञानाची जागा नवं तंत्रज्ञान घेतं आणि काही कळायच्या आत पहिलं मागं पडतं!
 ‘डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी’ हा शब्द ‘द इनोव्हेटर्स डायलेमा’ या पुस्तकात सर्वप्रथम वापरला तो क्लेटन एम.ख्रिस्टेनसेन यांनी आणि आज आपण त्याचा प्रत्यय वास्तवात घेतो आहोत.
 नवीन तंत्रज्ञानाधारित उत्पादनाची ‘प्रॉडक्ट सायकल’ - म्हणजे उत्पादनचक्र - हे लहान होतं आहे. म्हणजे त्यामध्ये नवे बदल तर होतच आहेत; पण जुन्याला मागे सारून, रद्दबातल करून संपूर्ण नवं उत्पादनही विकसित होतंय. 
भविष्यातल्या आपल्या जगण्याची दिशाच बदलून टाकण्याचं सामथ्र्य असलेल्या अशाच नव्या तंत्रज्ञानांपैकी काही मोजक्या परंतु क्रांतिकारी ठरू शकणा:या तंत्रज्ञान पर्यायांचा विचार करणारा हा लेख.
मॅकेन्झी या जागतिक स्तरावरील कॉर्पोरेट सल्लागार कंपनीनं पुढील काही वर्षामध्ये आर्थिक बदल घडवून आणणा:या काही तंत्रज्ञानांची यादी प्रकाशित केली होती. 
163 वर्षाच्या प्रवासानंतर ‘टेलिग्राम’ या संदेशवहन तंत्रज्ञानानं निरोप घेतला. त्या जागी ईमेल, मोबाइल, एसएमएस आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्ट्राग्राम, हाइक असे अनेक सोशल मीडिया पर्याय उपलब्ध होऊन आपण ते वापरण्यास सरावलोदेखील. 
- असेच काही मोठे सर्वव्यापी बदल काळाच्या क्षितिजावर उभे आहेत. आपल्याला भविष्यात मोठय़ा प्रमाणात आत्मसात करावे लागतील अशा या बदलांविषयी थोडंसं.
 
इंटरनेट ऑफ थिंग्ज
इंटरनेटमुळे झालेली क्रांती आपण अनुभवतच आहोत, नव्हे ती आपण आता ब:यापैकी पचवलीदेखील आहे. तंत्रज्ञान कॉन्व्हजर्न्समुळे मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर आपण आपल्या जीवनात जवळपास सगळ्या गोष्टींसाठी करत आहोत! अगदी सगळ्या! आता आणखी एक इंटरनेट आपल्यार्पयत सर्व गोष्टी केवळ क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज होतंय, नव्हे ब:यापैकी झालंय! ते म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’! आपल्यापैकी ब:याच जणांना हा शब्द नवा नसेल. 
इंटरनेट ऑफ थिंग्ज (आय.ओ.टी.) द्वारे सगळ्या गोष्टी म्हणजे टीव्ही, रेडिओ, मोबाइल, गॅस, फ्रीज, कम्प्युटर, सिनेमा, फॅक्स, ट्रॅफिक इत्यादि नेटवर्कद्वारे जोडल्या जाऊन त्यांचं व्हच्यरुअल (आभासी) प्रतिबिंब इंटरनेटवर पाहायला मिळेल. अनुभवता येईल. आपल्या स्वत:सकट सर्व जीवित आणि इतर वस्तूंमधील संवेदकाद्वारे त्यांचं मॉनिटरिंग होऊन दूरस्थ (रिमोट) पद्धतीनं त्यांचं नियमन होईल. संवेदकं वा मॅक्युएटर्स वस्तू ओळखण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून उपयोगकत्र्याच्या सवयी, हवामान स्थिती, पाण्याची गुणवत्ता आणि अशाच इतर अनेक गोष्टींची माहिती मिळवता येईल. त्यामुळे अशा एम्बेडेड उपकरणांचा (स्मार्ट वस्तूंसहित) वापर करून जवळपास सर्वच जीवनक्षेत्रत ऑटोमेशन घडवता येईल असा अंदाज आहे. (मग माणसाची गरज उरेल का? हा प्रश्न उरतोच.) अॅपलनं घराच्या ऑटोमेशनचं तंत्रज्ञान बाजारात आणलंच आहे. होमकिट प्रोटोकॉलद्वारे अॅप्समार्फत लोकांना घरातील कनेक्टेड उपकरणं नेटद्वारे हाताळणं शक्य झालं आहे. 2क्2क् र्पयत भारतामधील इंटरनेट ऑफ थिंग्जची बाजारपेठ 15 अब्ज डॉलर्सची असेल असा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान खात्याचा अंदाज आहे.
1क्क् स्मार्ट सिटीजच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये आयओटी (इंटनेट ऑफ थिंग्ज) तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकारने धोरणाचा मसुदा प्रसृत केलेला आहेच. त्यावर सर्व संबंधितांची मतमतांतरं जाणून घेऊन आयओटीविषयक मार्गदर्शक तत्त्वं आणि प्रमाणकं जारी करण्यात येतील. पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’ प्रकल्पात ई- हेल्थ, शेतीचं तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासाठी देखील हे इंटरनेट ऑफ थिंग्ज उपयुक्त ठरेल.
 
वेअरेबल्स
 
वेअरेबल्स किंवा वेअरेबल डिव्हाइसेस (उपकरणं) यांचे उपयोग आरोग्य आणि वैद्यकीय, फिटनेस आणि वेलनेस, तसंच औद्योगिक, सैनिकी आणि माहिती-मनोरंजन (इन्फोटेन्मेंट) क्षेत्रत खूपच वेगवेगळे आहेत. अशी उपकरणं वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत. उदा. ग्लासेस (गूगल ग्लास हे उत्तम उदाहरण), वॉचेस (घडय़ाळं), स्मार्ट बॅजेस, ब्रेसलेट्स, इअरपिसेस आणि हेडसेट्स इत्यादि!
 फिटनेस बॅण्ड्स, स्मार्ट वॉचेस आणि इतर वेअरेबल्स बाजारपेठेत उपलब्ध असून, त्यांनी ब:यापैकी पायही रोवलेत. वेअरेबल म्हणजे परिधान करून शरीरावर वागवता येण्याजोग्या उपकरणांनी मार्केटिंगची (विपणन) नवी क्षितिजं खुली केली आहेत.  
भविष्यात सरकार आणि उद्योगांद्वारे त्यांचा पुरेपूर वापर केला जाईल. कोपनहेगन विमानतळावरील कर्मचा:यांना प्रायोगिक तत्त्वावर गूगल ग्लास देण्यात आलाय. त्याद्वारे ते प्रवाशांना उपयुक्त माहिती आणि मदत त्याचक्षणी (म्हणजे रिअल टाइम बेसिसवर) उपलब्ध करून देऊ शकतात. औषधं देण्यास वा रक्त चाचण्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा वेअरेबल उपकरणांची चाचणी सध्या चालू आहे. सुयांमुळे होणारं दुखणं त्यामुळे सहन करावं लागणार नाही. मायकेल जे फॉक्स फाउंडेशनसोबत इंटेल या कंपनीनं विविध रोगांवर देखरेख आणि उपचार करण्याचा एक कार्यक्रम सुरू केला आहे.
2क्2क् र्पयत ही वेअरेबल्सची बाजारपेठ 11.61 अब्ज डॉलर्सची असेल असा मार्केटसूत्रंचा कयास आहे. सध्या जरी हे वेअरेबल्स बाल्यावस्थेत असले आणि औद्योगिक पातळीवरील वापरासंदर्भात फारसं काही झालेलं नसलं, तरी कोपनहेगन विमानतळावरील गूगल ग्लासचा वापर हे एक उत्साहवर्धक पाऊल म्हणायला हवं. सुरक्षा यंत्रणोतील उपयोगापासून ते त्याचक्षणीचं भाषांतर करण्यासारख्या अनेकानेक गोष्टींसाठी वेअरेबल्स उपयुक्त ठरतील.  
मात्र किंमत, प्रायव्हसीचा मुद्दा आणि डेटा सुरक्षा याबाबत अजून अपेक्षित प्रगत टप्पा गाठला गेलेला नाही.
 
मातीविना शेती
 
जलाधारित तंत्र वा हायड्रोपॉनिक्सचा वापर शेतीमधील पर्यावरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. त्यायोगे अनियमित हवामान, जमिनीचं प्रदूषण, पर्यावरणीय प्रदूषण, जलदुर्भिक्ष्य, खनिज इंधन आणि वनस्पतीजन्य जैवभार साधनांची कमतरता यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी पर्याय मिळू शकेल.
 या तंत्रज्ञानाला मातीविना शेती असंदेखील म्हणतात. कारण यामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषणद्रव्यं पाण्याच्या माध्यमातून पुरविण्यात येतात. त्यायोगे इनडोअर किंवा ग्रीन हाऊसेसमध्ये शेती करता येते. शिवाय या इनडोअर वनस्पती कारखान्यांमध्ये उभ्या स्टॅक्सचा (कप्प्यांचा) वापर वनस्पतींच्या वाढीसाठी बेस (आधार) म्हणून केला जातो. त्यामुळे लागवड क्षेत्रदेखील वाढतं. त्यामुळे शहरी शेती सुलभ होते. वाढत्या नागरीकरणाच्या काळात हे तंत्र खूपच उपयुक्त ठरेल. या इनडोअर कारखान्यात कृत्रिम प्रकाशयोजना आणि नियंत्रित पर्यावरण असतं. त्यामुळे कृषी उत्पादनाचा दर्जा चांगला आणि एकसमान राहतो. 
एप्रिल 2क्14 मध्ये जपानच्या मेबॉयल इन्कॉर्पोरेट या कंपनीनं 5क्क्क् चौ.मी. क्षेत्रवर फिल्म-बेस्ड टोमॅटो क्षेत्र संयुक्त अरब अमिरातीत लावलं आहे. चीनच्या काशिमा-नो-हा स्मार्ट सिटीतील वनस्पती कारखान्याद्वारे दररोज दहा हजार लेट्युसचं उत्पादन करण्यात येतं. हिरो मोटरकॉर्पनं राजस्थानात एका वनस्पती कारखान्याची उभारणी सुरू केलीय. सध्या जपानमध्ये कृत्रिम प्रकाशाधारित 17क् वनस्पती कारखाने असून, तैवानमध्ये 4क्, तर अमेरिकेत 1क् आणि मलेशियात अशा प्रकारचा एक कारखाना आहे. 
हे तंत्रज्ञान परिपक्व होत असून, त्याचा वापर भारतामध्ये शक्य असला तरी प्रचंड खर्चामुळे तूर्त त्याला पुरेसा प्रतिसाद नाही. कृषी मंत्रलयाच्या पुढाकारातून हायड्रोपॉनिक्स आणि कृत्रिम प्रकाशतंत्रद्वारे शेतक:यांना या तंत्रचा वापर करण्यासाठी प्रोत्साहनपर योजनांची आखणी अपेक्षित आहे.
 
क्लाउड कम्प्युटिंग
 
क्लाउड कम्प्युटिंग तंत्रज्ञानामुळे कम्प्युटिंग क्षेत्रत क्रांती होऊन प्रचंड आकडेवारीची साठवण, विश्लेषण आणि ज्ञान निर्मितीचं काम सुलभ होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे कम्प्युटर्स सॉफ्टवेअर (आज्ञावल्या) आणि कम्प्युटर साधनांना एकमेकांशी जोडून ठेवण्याबरोबरच एकाच ठिकाणी केंद्रीय पद्धतीनं डेटा स्टोअरेज आणि कम्प्युटर सेवांचा अॅक्सेस शक्य होईल. या केंद्रीय ‘क्लाउड’मुळे कम्प्युटिंग साधनं अधिक वेगवान होतील. वेबाधारित कम्प्युटर सेवा आणि साधनांचा वापर अधिक सुंदर आणि सोपा होईल. सध्या आपण तीन त:हेच्या क्लाउड्सविषयी विचार करत आहोत. हे क्लाउड खासगी, सार्वजनिक आणि हायब्रिड असून, खासगी क्लाउडच्या सेवा बिझनेस डेटा सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येतात. सार्वजनिक क्लाउड सेवा एका मध्यस्थामार्फत पुरविण्यात येतात. 
अमेरिकेनं फेब्रुवारी 2क्11 मध्येच फेडरल क्लाउड नीती जाहीर करून विविध शासकीय सेवांमध्ये ‘क्लाउड फस्र्ट’ धोरण अवलंबलं आहे.
ब्रिटननं 2क्12 मध्ये जी-क्लाउडद्वारे सार्वजनिक क्षेत्रतील उपक्रमांद्वारे प्राप्त केल्या जाणा:या माहितीची साठवण, त्यावरील प्रक्रिया सुलभ केल्या आणि फेब्रुवारी 2क्14 पासून क्लाउड फस्र्ट धोरण अवलंबलं.
भारतात राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेअंतर्गत (एन.ई.जी.पी.) मेघराज नावाचं क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलं आहे.
2क्15 र्पयत क्लाउड कम्प्युटिंगचा वार्षिक आर्थिक प्रभाव 1.7 ते 6.2 ट्रिलीयन डॉलर्स इतका प्रचंड असेल असं एका अभ्यास अध्ययनात सिद्ध झालं आहे. भारतीय केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याकडून खासगी आणि सरकारी संस्थांमधील क्लाउड वापरासाठीचा  धोरण आराखडा अभिप्रेत असून, त्याद्वारे खासगी, सार्वजनिक आणि हायब्रीड क्लाउडसाठीचे सुरक्षा निकष आणि प्रमाणकं बनतील.