शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
3
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
4
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
5
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
6
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
8
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
9
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
10
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
11
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
12
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
14
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
16
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
17
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
18
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
19
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!

वक्त ने किया...

By admin | Published: October 25, 2014 2:47 PM

चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर व्यक्तिमत्त्व म्हणजे बी. आर. चोप्रा. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने चोप्रांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल आणि त्यांच्या चित्रपटविश्‍वाशी संबंधित आठवणींना दिलेला हा उजाळा.

 अशोक उजळंबकर 

 
बी. आर. चोप्रा यांचा १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वक्त’ हा चित्रपट त्या काळी मल्टिस्टार चित्रपट म्हणून गाजला. या चित्रपटाची गाणी साहिर लुधियानवी यांची होती, तर संगीतकार होते ‘रवी’. या चित्रपटाचे निर्माता बी. आर. चोप्रा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. १९५0नंतर त्यांनी चित्रपटाच्या दुनियेत पाऊल ठेवले. अनेक नामवंत निर्माता-दिग्दर्शक मंडळींकडे सहायक म्हणून उमेदवारी केल्यावर त्यांना गोपाल पिक्चर्सच्या ‘अफसाना’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मिळाली. या चित्रपटातील एक गीत होते, 
‘‘खुशियों के दिन मनाये जा, दिल के तराने गाये जा, 
तुझको जवानी की कसम, दिल की लगी बुझाये जा, 
दुनिया मेरी बसाये जा, आजा पिया-आजा पिया, 
अभी तो मै जवान हूँ, अभी तो मै जवान हूँ’’
बी. आर. चोप्रा यांनी त्यानंतर शोले, चांदनी चौक या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘चांदनी चौक’ची नायिका मीनाकुमारी होती. यानंतर चोप्रा निर्माते झाले. बी. आर. फिल्म्स या बॅनरखाली त्यांनी ‘एक ही रास्ता’ची घोषणा केली. नंतर आलेल्या ‘नया दौर’ या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले व बी. आर. फिल्म्स हा बॅनर प्रस्थापित झाला. नया दौर’ नंतर ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘कानून’, ‘धरम पुत्र’, ‘गुमराह’ या चित्रपटांना दणदणीत यश मिळाले. त्यानंतर आलेला ‘वक्त’ हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अभिमानी व स्वकर्तृत्वावर विश्‍वास असलेल्या माणसाच्या संसाराची भूकंपाच्या एका हादर्‍यामुळे कशी वाताहत होते, याची ही कथा. या चित्रपटाकरिता रफी यांनी गायलेले साहिर लुधियानवी यांचे गीत प्रत्यक्ष जीवनात बी. आर. चोप्रा यांचीच शोकांतिका ठरली. गीताचे बोल अप्रतिम होते, 
‘कल जहाँ बजती थी खुशियाँ, आज है मातम वहाँ, वक्त लाया था बहारें, वक्त लाया है फिजा’
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गीतात खूपच अर्थ दडला आहे. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना या गीतातील प्रत्येक ओळी आठवणीत ठेवाव्यात, अशाच आहेत. ‘आदमी को चाहिए, वक्त से डरकर रहे कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज,’ बी. आर. चोप्रा यांच्या यशाचा झेंडा ‘नया दौर’पासून सुरू झाला. तो ‘निकाह’पर्यंत थोड्या फार प्रमाणात यशस्वी होताच; परंतु एकदा उतरती कळा लागली, की सावरणे कठीण. ‘निकाह’नंतर दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या मालिकेला यश मिळाले. रामानंद सागर यांची ‘रामायण व बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत या मालिका एके काळी दूरदर्शनचे खास आकर्षण होते. नंतरच्या काळात या बॅनरला प्रचंड अपयशाचा सामना करावा लागला. हे बॅनर कर्जात बुडाले. चोप्रा यांच्या संपत्तीचा मध्यंतरी लिलाव झाला व त्या कर्जाची रक्कम चुकती करण्यात आली. यश चोप्रा यांच्या निधनानंतर रवी चोप्रा यांची प्रकृती खालावली. आजही हे कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाही. रवी चोप्रा यांनी या बॅनरच्या पुर्नउभारणीकरिता बरेच प्रयत्न केले; परंतु अपयश आले. यशाचे शिखर पादाक्रांत करणार्‍या चोप्रा कुटुंबाला हा फार मोठा धक्का होता. बी. आर. चोप्रा यांच्या जीवनावर बेतलेली ही घटना समोर आल्यावर असाच प्रसंग एका गायिकेवर आल्याची आठवण झाली. गीता रॉय या गायिकेचा गुरुदत्तसोबत विवाह झाला. गुरुदत्त यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब, बीबी और गुलाम’, ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटांना कलात्मक चित्रपटनिर्मिती म्हणून लोकप्रियता मिळाली. भारतीय चित्रपटसृष्टीत तयार झालेला हा पहिलावहिला सिनेमास्कोप चित्रपट. गुरुदत्तने स्वत:चीच कथा लिहीली होती. 
वक्त ने किया, क्या हँसी सितम
तुम रहे न तुम, हम रहे ना हम
आपणच गायलेलं गीत आपल्याच जीवनाची शोकांतिका ठरेल, असे गीता दत्तला त्या वेळी वाटले असेल का? इतकेच काय, गायन क्षेत्रात जेव्हा ती दाखल झाली, ते ‘दो भाई’ चित्रपटातील गीत तिचीच व्यथा सांगून जाते,
मेरा सुंदर सपना बीत गया
मै प्रेम में सब कुछ हार गई
बेदर्द जमाना जीत गया
 अशी असंख्य गाणी आहेत ज्यांमधून त्या कलावंताच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकला जातो. अर्थातच हा केवळ योगायोग होय. आपण सामान्य माणसांनी वेळेच भान ठेवूनच जीवनाचा प्रवास करावा. आपल्यावर कोणती वेळ केव्हा येणार आहे, याचा काही नेम नाही. 
वक्त की गर्दिश में है, चाँद तारों का निजाम, 
वक्त की ठोकर में है क्या हुकुमत क्या समाज. 
वक्त से दिन और रात 
वक्त की पाबन्द है ये आती-जाती रौनके
वक्त है फुलों की सेज, वक्त है काटों का ताज
खरोखरच शेवटी म्हणावे लागते,
वक्त से दिन और रात
वक्त से कल और आज..
साहिर लुधियानवी यांची ही रचना सर्वच पिढय़ांतील लोकांना संदेश देणारी आहे. 
(लेखक हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)