शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

टोरोण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला ब्लाइन्ड स्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 6:40 AM

प्रत्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये खणखणीत असे काही नवे क्षण वाट्याला येतात. चाकोरी मोडली जाते आहे, हे जाणवते. टोरोण्टोमध्ये तर जगभरातली नवी चित्र-प्रतिभा अनुभवायला मिळते आहे. या नव्या दिग्दर्शकांची ‘भाषा’ वेगळी आहे आणि त्यांच्या अनुभवाचे पोतही!

-अशोक राणे

(टोरोण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या  काही नोंदी : लेखांक एक)

जागतिक सिनेमात सर्गेई आयझेन्स्टिन, रोबटरे रोझेलिनी, व्हितोरिओ डिसिका, अकिरा कुरोसावा, मायकेलेंजलो अंतोनिओनी, आंद्रे वायदा, सत्यजित राय, इंगमार बर्गमन, ऋत्विक घटक, आंद्रे तारकोव्हस्की, प्रसान्स्वा त्नूफों, खिस्तोफ केस्लोव्हस्की असे किती तरी अभिजात दिग्दर्शक होऊन गेले. त्यांचे काही समकालीन आजही हयात आहेत. हे  केवळ  अभिजात  दिग्दर्शक नव्हेत तर ते सिनेमा माध्यमातील ऋ षी आहेत. कालपरवा ते इथे होते. आज नव्यांनी त्यांची जागा घेतलीय. या नवागतांमध्ये उद्याचे अभिजात, ऋषितुल्य फिल्मोसॉफर कोण आहेत हे ठरायचंय. ठरतंय. हा शोध जगभरच्या  आंतरराष्ट्रीय  चित्नपटमहोत्सवातून सतत चालू असतो.

टोरोण्टो  आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात तर डिस्कव्हरी नावाचा एक स्वतंत्र विभागच आहे. त्यातले चित्रपट  पाहताना उद्याचे मास्टर्स आहेत इथेच आसपास याची ग्वाही मिळते.

हे उद्याचे मास्टर्स सिनेमाची नवी भाषा बोलणारे असतात. पारंपरिक रचनाबंध, पठड्या तोडणारे असतात.  कधी कधी ही नवी भाषा जुन्याला कंडिशण्ड झालेल्यांच्या सरळ अंगावरच कोसळते. दोन पिढय़ांमधला हा पारंपरिक संघर्ष मणीरत्नमच्या ‘बॉम्बे’त नेमका आलाय त्याची आठवण करून द्यावीशी वाटते.

मुंबईत पत्रकार असलेला मुलगा केरळातल्या गावात येतो तेव्हा बापबेटे जेवत असताना वडील म्हणतात, या खेपेस तुझं लग्न ठरवायचं आहे. तो म्हणतो, ‘मी ठरवलंय.’

‘कोण आहे मुलगी?’

‘गावातल्याच मुसलमानाची.’‘जब तक मै जिंदा हूँ तुम उससे शादी नहीं कर सकते’ - ताडकन जागचा ऊठत बाप उसळतो.

‘तुम्हारे मरने तक मै इंतजार नहीं कर सकता’ - पोरगा त्याच शांतपणे उत्तर देतो.

हाच तो ‘बदला’चा नेमका, करकरीत क्षण. काळ बदलतो. गोष्टी बदलतात. तसा सर्वच गोष्टींचा पोत बदलतो.सिनेमात  नवा  प्रयोग  करणारे, नवी भाषा बोलणारे असाच सांस्कृतिक धक्का काहींना देत असतात. परवा,   टोरोण्टो आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात पाहिलेल्या    ‘ब्लाइण्ड स्पॉट’ने ही सारी चर्चा पुन्हा एकदा पुढे आणली.- स्टार अभिनेत्री  म्हणून मोठा लौकिक प्राप्त केलेल्या तुवा नावात्नी हीचा दिग्दर्शिका म्हणून हा पहिलाच चित्रपट.   जागतिक सिनेमातील उद्याचे मास्टर शोधणा-या डिस्कव्हरी   या विभागात तुवाच्या या चित्रपटाची निवडही तिने आपल्या प्रगल्भ कामगिरीने सार्थ करून दाखविली.

‘ब्लाइण्ड स्पॉट’मध्ये हॅण्डहेल्ड कॅमे-याने घेतलेले खूप  वेळ चालणारे शॉट्स आहेत. सिनेमात प्रत्यक्षात फारसं घडत काहीच नाही. त्यामुळे सगळं जग एकाच जागी बराच काळ थिजल्या अवस्थेत आहे, असं वाटत राहातं. या   थिजलेल्या अवस्थेत खूप काही घडतं मनाच्या, अंतर्मनाच्या पातळीवर आणि तीच या चित्नपटाची कथा आहे. 

चौघांचं सुखी कुटुंब. मारिआ, आंद्रायस या आईबाबांची तिआ आणि जॉर्न ही दोन मुलं. पण ही गोष्ट, एका गावात एक सुखी चौकोनी कुटुंब राहात होतं अशी सुरू होत नाही. ती सुरू होते शाळेच्या पटांगणात चाललेल्या मुलींच्या स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिसने ! हा पहिलाच केवढा तरी मोठा शॉट आहे. मागोमाग दुसरा, मुली कपडे बदलतानाचा. या दोन्ही शॉट्चं वैशिष्ट्य हे की ते एकाच अँगलने घेतलेले आहेत. पहिल्यात सर्वच मुली फोकसमध्ये तर दुस-यात तिआ आणि भोवताली इतर जणी. इतर मुलींचं बोलणं चाललंय. हे सर्वच नेहमीसारखं. नंतर तिआ आणि तिची जीवलग मैत्रीण दोघी घरी निघाल्यात हा तिसरा आणि तोही  तसाच तीन मोठय़ा शॉट्मध्ये घेतलेला. पुढे जे काही घडणार आहे त्याचा मूड एका संथ लयीत सेट होत जातो. वाटेने जाताना त्या दोघी रोजच्याच गोष्टी बोलत आहेत. विशेषत: शाळा, शिक्षक, इतर मुली, त्यातल्या काही व्रात्य, खोडकर, मुद्दाम कळ काढणार्‍या वगैरे. असा एक ग्रुप  अंगावर  आल्यासारखा त्यांच्या बाजूने जातोही एकदा. पुन्हा  दोघीच. पुढे काय घडणार आहे, कोणकोणत्या वळणाने तो  सरकणार आहे याचं कुतूहल नेहमीप्रमाणे असतंच; परंतु तेही सहज, साधं आहे. म्हणजे मनाच्या पृष्टभागावर आलंय, नाही आलंय असंच. परंतु तरीही इथवर, अजून सुरुवातच असून, जवळपास या वीसेक मिनिटात चित्रपट धरून ठेवतो. हे  कौशल्य जेवढं दिग्दर्शिकेचं तेवढंच ते या भूमिका करणा-या त्या दोन मुलींचं. सहजसाध्या गप्पा करत सलग चालत राहणं हे तितकंसं सोपं काम नाही.

घरी आलेली तिआ घराबाहेरच कोसळते. तिच्याकडे  धावत आलेली मारिआ प्रचंड घाबरते. नुसती घाबरतेच नाही तर अगदी हिस्टेरिक होते. अँम्ब्युलन्स, पोलीस व्हॅन येतात. तिआला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. इथून पुढे घडतं  ते असं की तिआवर ट्रीटमेण्ट चालू आहे. तिच्या मेंदूला मार लागलाय. न्यूरोसर्जनची टीम कामाला लागलीय. मारिआबरोबर तिचे सासरे आहेत. काही वेळाने आंद्रायस येतो आणि तोही कमालीच्या हिस्टेरिक अवस्थेतच बेभान होतो. रागाच्या भरात डॉक्टरांच्या अंगावर धावूनही जातो. त्याचा अगडबंब देह आणि तेवढंच त्याचं ते बेभान होणं आवरणं इतरांना अवघड होऊन बसतं. त्यातच तो बेशुद्ध होऊन कोसळतो. मारिआची अवस्था आणखीच बिकट होते. एकीकडे ऑपरेशन थिएटरमध्ये तिआवर शर्थीच्या  प्रयत्नांची ट्रीटमेण्ट चालू आहे, तर दुसरीकडे तिच्या हिस्टेरिक झालेल्या आईवडिलांना त्या अवस्थेतून सावरण्याचा प्रयत्न मुख्य डॉक्टर करतो आहे. डॉक्टरकडून त्यांना क्षणाक्षणाचा रिपोर्ट हवा आहे आणि तसा तो सहजी मिळणार नाही कारण अनेक टेस्टदरम्यान चालल्या आहेत, असं तो डॉक्टर सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो आहे. आणि हे सारं हॅण्डहेल्ड कॅमेरा मोठमोठय़ा शॉट्मधून टिपतो आहे. 

 सबंध चित्रपटभर हेच चाललं आहे. तिआचे आईवडील इतके का हवालदिल झाले आहेत? 

डॉक्टरांशी बोलताना एका क्षणी आजोबांच्या तोडून येतं की मारिआ ही तिआची सावत्र आई आहे. तिआच्या मनात आपल्याबद्दल कुठे अढी आहे का? वडिलांबद्दल आहे का? हे कधी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे का? वयात येणा-यामुलांच्या मनात काय चाललेलं असतं याचा आईवडील म्हणून आपण कधी विचार केला आहे का? - हे प्रश्न खरं तर ती दोघंही त्या अवस्थेत स्वत:शी किंवा एकमेकांनाही विचारत नाहीत. पोरीसाठी त्यांचा आकांत चालला आहे त्यातून तो परस्पर व्यक्त होतो. डॉक्टरांना ते घायकुतीला येत विचारत राहतात, पोर यातून सुखरूप बाहेर पडेल ना?

..आणि मग एका क्षणी डॉक्टर सांगतो. जगण्याची शक्यता कमीच आहे आणि जगली तर लोळगोळा अवस्थेत आयुष्य कंठेल. आकांत टिपेला जातो. काही वेळाने मारिआ नव-याला म्हणते, मी घरी जाते. कारण जॉन घरी एकटा असतो. घरी जाऊन ती बेडवर अंग आक्रसून पडते. विव्हळत असते. आपल्या खोलीत झोपलेला जॉन येतो. तिच्या कुशीत शिरतो. ती त्याला घट्ट मिठीत घेते आणि चित्रपट संपतो.  ..परंतु हा चित्रपट तसा संपत नाही. तो तुमच्या ध्यानीमनी रुतून बसतो. एक कारण म्हणजे त्याचा आशय आणि दुसरं म्हणजे तो मांडण्याची पद्धत. आपलं माणूस अत्यवस्थ असलं किंवा गेलं की अतीव दु:खाच्या क्षणी माणसं हिस्टेरिक  होतात. त्याच हिस्टेरिक अवस्थेचं चित्रण  करून त्यांच्या मनात काय चाललं असेल, कशामुळे ती एवढी हिस्टेरिक होत असतील यातला कार्यकारणभाव बारीकशा तपशिलानेही न सांगता, दाखवता जाणवून देणं हेच या ब्लाइण्ड स्पॉटचं वैशिष्ट्य आहे ! -  ते पुरेशा प्रगल्भतेनं मांडणारी तुवा नावात्री  म्हणूनच या महोत्सवातली ‘डिस्कव्हरी’ आहे.

( लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आहेत)

ashma1895@gmail.com