शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

खरी माणुसकी!

By admin | Published: October 17, 2015 3:10 PM

सतत दुस:यांसाठीच काही करावं असं नाही; परंतु स्वत:साठीच काही करत असताना त्याचा आनंद दुस:यांनाही मिळाला तर चांगलंच ना? उगीच आपलं नाक जमिनीला लागायची वेळ येईर्पयत पगाराच्या दिवसाची वाट पाहत खुरडत जगायचं याला काय अर्थ आहे? - इतरांनाही आपला काही उपयोग झाला तर आनंदाची सीमा वाढतेच.

- दिलीप वि. चित्रे
 
मी आधीच ठरवून टाकलं होतं.
उगीच आपलं दर महिन्याला पगाराचा चेक पदरी पाडून घेण्यासाठी घासत बसायचं नाही. आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी कितीतरी गोष्टी उपलब्ध असताना का म्हणून हे करायचं? केवढे तरी छंद आहेत आपल्याला त्यातूनच उसंत नाही. त्यात पुन्हा प्रवास, पाहुणो, मित्र-मंडळी, लेखन-वाचन हेही आहेच. त्यात ही नोकरीची भानगड कशाला! फ्लोरिडात तीन-चार वर्षापूर्वीच घर घेऊन ठेवलंय. जरा निवांतपणा मिळेल. आयुष्यभरात करण्यासारख्या गोष्टींना न मिळालेला वेळ आता भरपूर मिळेल. पोटापुरती पुंजी असली म्हणजे झालं.
मनात विचार बळावला तेव्हा शोभाला बोलून दाखवला. ती या क्षणाचीच वाट पाहत होती.
पण पोटापुरती पुंजी असणं म्हणजे किती हे कसं ठरवायचं? हल्लीच्या दिवसांत नवनवीन वैद्यकीय शोधांमुळे दीर्घायुष्याचा माणसाला मिळालेला शाप हा तुमच्या आयुष्याच्या उत्तररंगातील स्वप्नांवर अतिक्रमण करतोच. अगदी सुखासीन चैनीचं नसलं, किंवा नुसतंच पोटापुरतं जगणं नसलं तरी या दोन्हींचा मध्य साधण्यासाठी लागणारं आर्थिक बळ निवृत्तीनंतरच्या उर्वरित आयुष्यात गाठीशी असायलाच हवं. तुमच्या जीवनशैलीशी तडजोड न स्वीकारता ते कसं साध्य करता येईल हे ठरवणं महत्त्वाचं नाही का?
निवृत्तीनंतर काही खर्चामध्ये आपोआपच कपात होते, पण काही अपेक्षित आणि अनपेक्षित खर्चसुद्धा वाढतातच. आता उतरत्या वयात ओघानं येणारी दुखणी-खुपणी कुणी पाहिलीत? परावलंबित्व नाहीच. मुला-नातवंडाची आपापल्या आयुष्याचीच घोडदौड चालू असते. तेव्हा आपलाच बैल नेटानं रेटण्याचं आर्थिक आणि शारीरिक बळ साठवून ठेवायला नको?
त्याची गुरुकिल्ली एकच ती म्हणजे तुम्ही तंदुरुस्त राहणं आणि तुमच्या आर्थिक पुंजीची सुरक्षित गुंतवणूक करून ठेवणं, त्या गुंतणुकीवर डोळस पहारा ठेवून तिला ओहोटी लागत नाही ना यावर नजर ठेवणं. नियमित व्यायाम आणि माफक आहार या तर मुद्दय़ाच्या गोष्टी. या दोन्हीही मला वज्र्यच. माङया बाबतीत तर अनियमित व्यायाम, अपूर्ण निद्रा, भरपूर धावपळ व यासाठी बळ मिळावं म्हणून अनियमित, तामसी, तिखट आहार या गोष्टी जणू पाचवीला पुजलेल्या.
पण माङया या जीवनशैलीवर केल्या जाणा:या टीकेला उत्तर देताना मी नेहमी एकच प्रश्न विचारतो, पण आनदाचं काय?
शेवटी आयुष्यात आनंदच महत्त्वाचा नाही का? तो जर कुणाला न दुखावता, न भांडता, न ओरबाडता, न फसवता, सचोटीनं, सत्यानं व जमेल तेव्हा व जमेल तसा इतरांना वाटून भरपूर मिळवता येत असेल तर तसं का करू नये? 
पण खरं सांगू, असा वादग्रस्त प्रश्न निर्माण करण्यात अर्थ नाही. कारण असं, की तुम्ही स्वत:पुरता तात्कालिक आनंद उपभोगू शकता, पण त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम इतरांना, तुमच्या कुटुंबीयांना भोगावे लागतात त्याचं काय?
तरुण वयाच्या उमेदीच्या काळात जीवनाविषयीचे धाडसी निर्णय घेता येतात. ते घ्यायलाच हवेत. कारण कित्येकदा निर्णय घेण्यात झालेल्या चुका सुधारण्यासाठी उर्वरित आयुष्यात भरपूर वेळ असतो. परंतु निवृत्तीनजीकच्या अथवा निवृत्तीनंतर घेतल्या जाणा:या निर्णयांमध्ये समतोल, आश्वासकता असायला नको? त्या काळात हव्यासापायी घेतले जाणारे निर्णय धोकादायक ठरण्याचीच शक्यता जास्त असते. आत्मसंतुष्टता असायला नको हे मान्य! माणूस आत्मसंतुष्ट बनला की त्यानं प्रगतीचे, सौख्याचे, वृद्धीचे आणि बुद्धीचेही दरवाजे धडाधड लावून घेतले म्हणायला हरकत नाही. पण ते दरवाजे उघडे ठेवून हव्यासाच्या पळवाटा शोधायला जाऊ नये एवढंच.
तुम्ही इतरांवर प्रेम केलं नाही तरी चालेल; पण फक्त स्वत:वरच प्रेम करीत राहण्याची वृत्ती इतरांना अत्यंत त्रसदायक, धोदायकही ठरू  शकते. माणूस अरेरावी स्वभावानं आजूबाजूच्यांशी वागू लागला की मला त्याच्या भविष्यकाळाची चिंता वाटायला लागते. हात-पाय-नाक-कान-डोळे यापैकी कोणताही अवयव निकामी झाला तर ती विकलांग अवस्था गुर्मीत आयुष्य घालवलेल्या सिंहाना लाचार उंदराचं जिणं जगायला लावते.
अशी कितीतरी उदाहरणं मी पाहिली आहेत आणि त्या-त्या वेळी त्या प्रसंगानं अवाक् झालो आहे. माङया लहानपणी - म्हणजे टीन एजर्सच्या वयात म्हणाना -आमच्या शेजारी राहणारे वसंतराव कधी नोकरी न करता विडय़ा फुंकता फुंकता बायकोवर नवरेपणाचा अधिकार गाजवणारे. इतका, की पाटावर बसून जेवताना भाजी आवडली नाही म्हणून भरलेलं जेवणाचं ताट समोरच्या भिंतीवर फेकणारे. आता आत्मप्रौढी, आत्मप्रेम, आत्मसंतुष्टता, आत्म-आत्म-आत्म काय म्हणायचं काय या वृत्तीला? 
आपल्याकडे एक म्हण आहे. ‘असतील शितं तर जमतील भुतं’. या म्हणीचा प्रत्यय देणारं एक विदारक उदाहरण मी अनुभवलं आहे.
माझा एक मित्र. हृदयविकारतज्ज्ञ सजर्न. श्रीमंत, प्रेमळ, माणसं-मित्र जोडून असलेला. प्रचंड मोठं घर. पुढे-मागे मिळून दोन चार एकराची जागा. वर्षातून दोन-चारदा 1क्क्-2क्क् मित्रंच्या मोठमोठय़ा पाटर्य़ा स्वत:च्या घरी, परसदारच्या प्रचंड जागेत करणारा, पाहुण्यांची तैनात ठेवणारा. त्याला पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग होतो तेव्हा मात्र सगळं एकदम सामसूम. वाटतं, गेले कुठे सगळे? 
पण हे असंच असतं. त्यात आश्चर्य वाटायचं कारण काय? गुळाच्या भोवती अथवा उसाच्या रसाच्या गु:हाळाभोवती माश्यांनी घणघणाट करू नये अशा अर्थाच्या मोठय़ा पाटय़ा जरी लावल्या तरी त्या घणघणणारच! पण नि:स्वार्थी माणसंही असतातच. दुस:यासाठी सदैव झटणारे. स्वत:आधी इतरांचा विचार करणारे कितीतरी महाभाग मला ठाऊक आहेत. तसे माङो मित्रही आहेत. अन् त्यांच्या या स्वभावाची लागण नकळतपणो आपल्यालाही होतेच. संथ तळ्यात खडा टाकल्यावर पसरत जाणा:या वलयांप्रमाणो ही लागण पसरत जायलाच हवी.
पण मी म्हणतो, सतत दुस:यांसाठी काही करा असं नाही, परंतु स्वत:साठीच काही करत असताना त्याचा आनंद-उपभोग जर दुस:यांनाही मिळू शकला तर ते काय कमी आहे का? उगीच आपलं नाक जमिनीला लागायची वेळ येईर्पयत पगाराच्या दिवसाची वाट पाहत खुरडत जगायचं याला काय अर्थ आहे?
अर्थात, आर्थिकदृष्टय़ा, कौटुंबिक जबाबदारीमुळे ज्यांना हे अपरिहार्यच आहे त्यांची गोष्ट निराळी.
माङो परिचित काही जण आहेत. त्यांना निवृत्तीनंतर निर्माण होणारी दिवसभरातली जी वेळेची पोकळी आहे त्यात करायचं काय ही भीतीच पोखरत राहते. त्या उलट उदाहरण म्हणजे आमच्या माहितीचं एक जोडपं. त्या दोघांनी एकदम तडकाफडकी अचानक निवृत्तं व्हायचं ठरवलं अन् झालेही.
मी विचारलं, आता दोघांनी काय करायचं ठरवलंय?
तर दोघेही समाधानानं हसले. पुढच्या दोन आठवडय़ातच कानावर आलं की दोघेही दिवसातले 2-3 तास हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा करायला जातात. एकाकी रुग्णांशी गप्पा-गोष्टी करतात. त्यांच्याशी जिवा-भावाच्या गोष्टी करतात. त्यात त्या रुग्णांना तर समाधान लाभतेच; पण या जोडप्याच्या आनंदाला सीमा नसते. यालाच खरी माणुसकी म्हणावं नाही तर काय?
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगितिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम/संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)
 
dilip_chitre@hotmail.com