शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

गरज तेव्हा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 3:21 PM

सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत कण्डोमच्या जाहिराती टीव्हीवर दाखविण्यास सरकारनं नुकतीच बंदी घातली आहे. त्यानिमित्त या विषयावर मत व्यक्त करणाऱ्या या दोन बाजू...

- डॉ. राजन भोसले 

कण्डोमच्या वापराचा प्रश्न थेट स्त्रियांच्या आरोग्याशीही संबंधित आहे. गर्भनिरोधक गोळ्या किंवा तांबी हे सारं स्त्रियांना त्रासदायकही ठरू शकतं. पुरुषानेच त्याचा वापर करणं सोयीचं. मात्र त्याऐवजी केवळ लैंगिक सुखदर्शक गुदगुल्या करत उत्तान जाहिरातींनी मूळ हेतूलाच हरताळ फासायला सुरुवात केली.

ज्यांच्यावर बंदी घालण्यात आली त्या कण्डोमच्या जाहिराती लोकशिक्षण करतात? की लोकांना फक्त उत्तेजित करतात? मला वाटतं सध्या दाखवल्या जात असलेल्या जाहिराती, त्यांचं चित्रिकरणं, त्यातले दृश्य हे सारं कण्डोम वापराविषयी माहिती देणं, जनजागृती करणं यापासून कोसो दूर आहे. मुळात कण्डोमच्या जाहिरातीत सनी लिओनीची गरज काय? कारण या जाहिराती ‘टिटिलेटिंग’ आहेत. म्हणजे काय तर लैंगिक भावना हलक्याच चाळवणं किंवा त्या भावनेच्या गुदगुल्या करणं हा त्यांचा उद्देश असल्यासारखं त्यांचं दृश्यरूप आहे.हा (आणि हाच) या जाहिरातींचा मुख्य किंवा मूळ हेतू आहे का? आणि असेल तर माझाही त्यांच्या प्रक्षेपणाला आक्षेप आहे. कण्डोमच्या जाहिराती करण्याला आणि त्या टीव्हीवरून कधीही दाखवण्याला मात्र आक्षेप नाही, मात्र ‘या अशा’ जाहिरातींना नक्कीच आहे. त्याचं कारण असं की, कण्डोम हे तुम्ही एक प्रॉडक्ट म्हणून जर विकणार असाल तर ते प्रॉडक्ट नेमकं काय आहे, त्याच्या गुणात्मक बाजू, त्यांचा दर्जा याविषयी बोला. त्या उत्पादनाची ‘गरज’ आणि योग्य वापराची माहिती द्या. त्यातून समाजाला ते उत्पादन वापरणं ‘आवश्यक’ आहे असं वाटलं पाहिजे. ते न होता केवळ लैंगिक सुखदर्शक गुदगुल्या या जाहिराती करत असतील तर त्या जाहिरातींचा मूळ हेतूच साध्य होत नाही.

कण्डोम वापरणं हे काही लपूनछपून बोलण्याची गोष्ट नाही. किंवा त्यात दडवावं असं काही नाही. अगदी मुलांना लैंगिक शिक्षण देतानाही त्याविषयी मोकळेपणानं बोलत शास्त्रीय माहिती द्यायला हवी. कण्डोमची गरज, त्याचा वापर करण्याची सुयोग्य रीत, त्यातली सुरक्षितता हे सारं मुलांशीही बोलण्यात काही गैर नाही. अगदी जाहिरातीतूनही ही शास्त्रीय माहिती दाखवली गेली तर त्याविषयीचं अज्ञान आणि धास्ती कमी होऊ शकेल. आणि मग अशा जाहिराती कुठल्याही वेळी दाखवायला काहीच हरकत नाही. मात्र हे न करता फक्त ‘गुदगुल्या’ करत जाहिरात करण्यानं कण्डोम वापराच्या जनजागृतीचा मूळ हेतूच साध्य होत नाही. जाहिराती दाखवण्यातही तारतम्य असावं, जाहिरातींचा कण्टेण्ट पाहणारं काही सेन्सॉरसारखी नियमन संस्था असेल तर त्यांनी या साऱ्याचा विचार करायला हवा. ते न होता या जाहिराती भलतंच काही दाखवत असतील तर त्यानं जनजागृतीच्या हेतूला हरताळ फासला जातो.

आणि कण्डोम वापराची आणखी एक बाजू म्हणजे स्त्रीच्या आरोग्याचा विचार. तो विचार आपल्या समाजात केला जात नाही. स्त्रियांनी गर्भनिरोधक साधनं वापरणं हे तसं आरोग्यासाठी फार सोयीचं नाही. अनेकजणी गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पती बाहेरगावी राहत असेल आणि महिन्यातून दोन-चारदा किंवा अगदी एकदा जरी शरीरसंबंध होणार असेल तर महिनाभर ठरावीक वेळेस गोळी घ्यावीच लागते. त्या हार्मोन्सच्या गोळ्या असतात. त्या सतत घेतल्याचा शरीरावर परिणाम होतोच. तेच तांबी बसवण्याचंही. त्यानं काही स्त्रियांना रक्तस्राव होऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या आयपीलसारख्या गोळ्या, त्या ही हार्मोन्सच्याच. अपत्यप्राप्ती अपेक्षित नसेल तर त्या ही स्त्रियांनाच घ्याव्या लागतात. मात्र कण्डोमचं तसं नाही. शरीरसंबंधापुरता त्याचा वापर करता येतो, त्याचा आरोग्यावर अगर लैंगिक सुखावर काहीही परिणाम होत नाही. शिवाय सुरक्षित संबंधाचीही खात्री राहते. त्यामुळे मी नवविवाहित जोडप्यांनाच काय; पण लग्न होऊन अनेक वर्षं झालेल्या जोडप्यांनाही कण्डोम वापरण्याचा सल्ला देतो. शरीरसुखाच्या आनंदाआड हा वापर येत नाही हे पुरुषांनीही समजून घ्यायला पाहिजे.त्यामुळे कण्डोमचा वापर, त्याविषयी जनजागृती व्हायला पाहिजे. ती जाहिरातींनी केली, जनमानसापर्यंत माहिती पोहचवली तर त्यात अडचण काहीच नाही. मात्र त्या जाहिरातींनीही थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे!

(लेखक सुप्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट आहेत.) शब्दांकन -मंथन टीम