शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

वॉल्डेनचे तळे

By admin | Published: February 27, 2016 2:38 PM

ते थोरोला सापडले हे खरे, पण मोहाचे धागे तोडून आपापले वॉल्डेन शोधणो वाटते तेवढे सोपे नसतेच!

- शर्मिला फडके
 
आयुष्य जास्तीत जास्त सोपे करणे, कमीत कमी वस्तू वापरणे, गरजेपुरतेच जमवणे आणि कोणत्याही ताणतणावाशिवाय आनंदात जगणे हा विचार वाचताना कितीही आकर्षक, हवासा वाटला तरी प्रत्यक्षात वॉल्डेनकाठी जाऊन राहणारा थोरो एखादाच असतो. शहरातल्या दगदगीच्या, घडय़ाळाच्या काटय़ाशी बांधलेल्या दिनक्रमाचा, पैसे मिळवण्याकरता कराव्या लागणा:या कष्टाचा, मग त्या जमा केलेल्या पैशांच्या व्यवस्थापनाचा, त्यातून विकत घेतलेल्या वस्तू, सुखसोयी सांभाळण्याचा, उपभोगाकरता बांधलेल्या आलिशान घरांचा, ती सुस्थितीत राखण्याकरता, सजवण्याकरता पुन्हा कराव्या लागलेल्या कष्टाचा आणि दगदगीचा एका विशिष्ट टप्प्यावर कितीही उबग आला तरी त्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न लाखामध्ये एकाचाही नसतो. का? कारण सुखासीन जीवनशैलीची, उंचावलेल्या राहणीमानाची झालेली सवय मोडणो, पुन्हा साधेपणाकडे येणो जवळपास अशक्य असते असा सर्वांचाच समज असतो. 
त्याऐवजी मग प्रश्नाच्या उत्तरांमधून उपटलेले नवे प्रश्नच वाटय़ाला येतात. घेतलेल्या वस्तू ठेवायला घरात जागा कमी पडणो यावर एक सोपा आणि महागडा उपाय अनेकांच्या मनात असतो. मोठे घर घेणो. पण या उत्तराने प्रश्न सुटत नाही. कारण मर्फीच्या नियमानुसार जितकी मोठी जागा तितका जास्त पसारा. पण हे सहजासहजी मान्य होणारे नसते. हा उपाय अमलात आणला की सगळेच प्रश्न सुटतील. भरपूर जागा होईल भरपूर वस्तू नीट ठेवायला असे वाटत राहते. म्हणून आहे त्यापेक्षा मोठे घर असावे हे स्वप्न बाळगून असतात अनेक जण. राहते घर पुरत नाही या एका विचाराने भारतात. निदान मुंबईसारख्या शहरात अनेकांची आयुष्य असमाधानी केली आहेत.
तरी धडपड करतोच आपण. पण आपल्या अगदी साध्या प्रयत्नांमधेही सातत्य राहतेच असे नाही. कारण बहुतेक वेळा आपल्या मनात त्यासंदर्भातला विचार नुसताच सतत मनात घोळत राहिलेला असतो. यात माझा समावेश अर्थातच आहे. आजवर विकत घेतलेल्या वस्तू निदान एकदा तरी वापरून झाल्याशिवाय, कपाटात जमवलेल्या साडय़ा वर्षातून निदान एकदा तरी नेसल्याशिवाय, घेतलेली पुस्तके पूर्ण वाचून झाल्याशिवाय नवे काही घ्यायचे नाही हा मनाशी केलेला साधासुधा संकल्पही प्रत्यक्षात अनेकदा मोडतो. घरात नवनव्या वस्तू, कपडे, पुस्तके येतच राहतात. 
असे का होते नेमके? क्लटरफ्री, मिनिमलिस्ट लाइफस्टाइलची संकल्पना प्रत्यक्षात आपल्या स्वत:च्या, आपल्या खिशाच्या, आपण ज्यात राहतो त्या पर्यावरणाच्याही भल्याची आहे हे पटूनदेखील ती जगण्याचा विचार दहा टक्केही प्रत्यक्षात उतरतच नाही. 
एक दिवस मी माङया धावपळीच्या दिनक्रमातून, ताणतणावांमधून स्वत:ला मुक्त करून कुठेतरी लांबवर प्रवासाला, जंगलात निघून जाणार आहे, किंवा एक दिवस शरीरावर चढलेले अतिरिक्त चरबीचे थर भरपूर व्यायाम करून वितळवून टाकणार आहे या शेखचिल्ली स्वप्नांपैकीच हेही अजून एक स्वप्न असते बहुतेकांचे. 
प्रत्येक शहरवासीयाच्या मनातले हे आपापले वॉल्डेन. 
मिनिमलिस्ट लाइफस्टाइल प्रत्यक्षात जगणो वाचताना वाटते तितके सोपे नाही. सगळ्यांना तसे जगणो शक्य नाही हे एकदा मान्य केले की मात्र प्रश्न सोपा होतो. काही मार्ग सापडू शकतात. मिनिमलिस्ट जीवनशैलीच्या दिशेने घेऊन जाणारे लहान लहान सोपे रस्ते. थोरो आपल्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर जसे जगला, त्यातून त्याचे जे विचारचिंतन झाले, त्याला जी मन:शांती लाभली हा एक शंभर टक्के पूर्णत्वाला गेलेला आदर्श मानला तरी तिथवर येऊन पोचण्याकरता त्यानेही अनेक लहान लहान प्रयत्न आयुष्यभर केले. काही वर्षं करिअरमधे ब्रेक घेऊन हिमालयात किंवा जगात कुठेही भटकंती करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारेही अनेक असतात. ते प्रत्यक्षात आणण्याकरता त्यांनाही कितीतरी आर्थिक नियोजने, शारीरिक तंदुरु स्ती, कौटुंबिक अडचणींवरचे उपाय शोधून, त्यावर मार्ग काढून मगच असे मुक्तपणो भटकणो साधते. अर्थात तिथवर पोचण्याच्या मार्गात पण-परंतुचे अडथळे चिक्कार आणि गोंधळ तर पावलोपावली. या गोंधळावर कोणतेही एक रेडिमेड उत्तर अर्थातच नाही. आणि हा गोंधळ असणोही पूर्ण नैसर्गिकच. मग राहते इतकेच शिल्लक की यापैकी इतरांनी काय काय केले आहे यापेक्षा नेमक्या कशाने आपल्याला जास्तीत जास्त आनंद होईल आणि नेमके काय करणो आपल्याला जास्तीत जास्त सोपे/शक्य आहे त्याचा शांतपणो विचार करायचा.
- आणि वेळेची एक चौकट ठरवून त्यानुसार वागायला सुरुवात करायची.
 असे वागत असताना ज्या ज्या वेळी आपल्याला ठरवल्यानुसार वागणों कठीण जाईल, आपला नियम आपण मोडत आहोत असे वाटेल तेव्हा आपले प्रामाणिक उत्तरच आपल्या मदतीला धावून येते, हा माझा वैयक्तिक अनुभव. 
माङयापुरता मी एक प्रश्न प्रत्येक नव्या खरेदीच्या वेळी क्रे डिट कार्ड पुढे करण्याआधी स्वत:ला विचारणो बंधनकारक केले आहे-
 ‘खरेच याची गरज आहे का?’ - हा तो प्रश्न. 
असा एक प्रश्न अनेक उत्तरे नजरेसमोर आणतो. उदा. घरात मुळातच अशा प्रकारच्या दुस:या वस्तू आहेत, घरातली आधीची वस्तू दुरुस्त करून, बदलून वापरता येणो शक्य आहे, या किमतीत मला इतर काही गरजेच्या वस्तू विकत घेणो शक्य आहे. इत्यादि. 
वेगवेगळे सेल लागतात, भरभरून वाहणारे एक्स्पो मोह घालतात, आनंदाचे समारंभ समोर असतात जे साजरे करायला वस्तू हव्याच आहेत घ्यायला असे वाटते. नियम मोडतो, संकल्प धुळीला मिळतो. पण हार मानायची नाही. हा अपवाद होता असे स्वत:ला पटवायचे आणि मग एक वस्तू घरात आली म्हणून तिच्या जागी आधीच्या पाच घराबाहेर काढायच्या, गरजूंना दान करायच्या, पुनर्वापराकरता द्यायच्या. हा नियम पाळायचा. 
असे झाले, की एक ना एक दिवस आपल्याला आपल्या भोवतालची अडगळ, पसारा कमीत कमी होऊन आपण मिनिमलिस्ट जीवनशैलीची एक पायरी तरी यशस्वीपणो चढलो आहोत याचे समाधान मिळेल. याच आशेवर निदान मी तरी आहे. एक ना एक दिवस मला माङो वॉल्डेन सापडेल.
- ते काहींना सापडले आहे.
अमेरिकेतल्या ह्यूस्टन टिलोस्टन विद्यापीठातले एक कलंदर प्रोफेसर डॉ. जेफ विल्सन हे त्यातले एक.
- एकेकाळी तब्बल अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत राहणारे हे गृहस्थ एक प्रयोग म्हणून चक्क छत्तीस चौरस फुटांच्या एका चौकोनात राहायला गेले आहेत.
आणि ते म्हणतात, मी जास्त सुखी आहे!
- जगभरात चर्चेचा विषय असलेल्या या ‘डम्प्स्टर प्रोजेक्ट’बद्दल पुढच्या लेखात!
 
नेमके काय हवे आहे?
 
क्लटरफ्री, मिनिमलिस्ट लाइफस्टाइल आपण जगायला हवी या वरवर साध्या वाटणा:या ध्येयातही अनेक उपप्रकार असतात. एक साधा प्रश्न आपण स्वत:ला प्रामाणिकपणो विचारायला हवा-
 मिनिमलिस्ट, क्लटरफ्री जीवनशैली मला नेमकी का हवीशी वाटते आहे? 
1. साधे राहणीमान हवे आहे?
2. पैसे वाचवायचे आहेत?
3. खरेदी कमीत कमी करायची आहे, पर्यावरणस्नेही जगायचे आहे?
4. धावपळ-दगदग कमी करायची आहे, आहे तो व्याप कमी करून अडगळमुक्त आयुष्य जगायचे आहे?
5. ताण-तणाव कमी करून हवे आहेत, पैसे कमावण्याचा हव्यास व त्याकरता करावे लागणारे कष्ट कमी करायचे आहेत?
..काय नेमके हवे आहे आपल्याला वैयक्तिकपातळीवर? की नेमके काय हवे तेच कळत नाही? की हे सगळेच हवेसे आहे?
 
 
 36 चौरस फुटांच्या पत्र्याच्या कचराकुंडीमधे आपलं घर वसवून डॉ. जेफ विल्सन तिथे राहायला गेले, तो हा दिवस. प्रोफेसरांचे हे कचराकुंडीतले घर साधेसुधे नाही. या 36 फुटी पत्र्याच्या घरात त्यांनीे स्वत: बनवलेले कपाट, झोपण्याकरता पलंग, वातानुकूलन, उघडझाप करणारे छप्पर आहे. या लहान जागेत राहताना अगदी गरजेपुरतेच कपडे, खाद्यपदार्थ, वस्तू त्यांना आपल्याजवळ ठेवायला लागतात. तशा ते ठेवतात आणि त्यांना त्या आरामात पुरतात. अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत राहणारे प्रोफेसर विल्सन आता या 36 चौरस फूट जागेत जास्त सुखी आहेत, कारण.. त्याबद्दल पुढच्या लेखात! 
 
(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत)
sharmilaphadke@gmail.com