शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
4
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
5
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
6
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
8
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
9
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
10
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
11
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
12
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
13
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
14
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
15
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
16
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
17
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
18
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
19
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
20
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या

...व्हय म्हाराजा

By admin | Published: July 10, 2016 10:08 AM

कोल्हापूरजवळच्या छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या माझ्यासारख्या तरुणासाठी आकाशी झेप घेतलेले विमान पाहणे हा अक्षरश: मान उंचावणारा विषय होता. ...पण पुढे याच महाराजावर मान खाली घालण्याची वेळ आलेलीही मी अनुभवली

 
दिनकर रायकर -
 
‘युवर पॅलेस इन द स्काय’  हे ब्रीदवाक्य आणि  महाराजा हे बोधचिन्ह यांच्या संगतीने उत्कर्षाला गेलेला एअर इंडियाचा दिमाख मी अनुभवला आहे. कोल्हापूरजवळच्या छोट्या खेड्यातून मुंबईत आलेल्या माझ्यासारख्या तरुणासाठी  आकाशी झेप घेतलेले विमान पाहणे हा अक्षरश: मान उंचावणारा विषय होता. 
...पण पुढे याच महाराजावर 
मान खाली घालण्याची वेळ आलेलीही मी अनुभवली...
 
गेल्याच आठवड्यात (तत्कालीन) केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सोशल मीडियावर एअर इंडियाचा जाहीर उद्धार केला. मंत्रिमहोदय हैदराबादला जाण्यासाठी वेळेत दिल्लीच्या विमानतळावर पोहोचले होते. दुपारी सव्वाच्या सुमारास सुटणारे विमान वेळ झाली तरी हलेना. मग कारण देण्यात आले, की पायलट पोहोचलेला नाही. दोन वाजेपर्यंत पायलटची वाट पाहून कंटाळलेले नायडू स्वच्छ भारत अभियानाच्या मीटिंगला जाण्याऐवजी चडफडत दिल्लीतल्या घरी परतले. या साऱ्या प्रकाराने झालेल्या संतापाची वाफ त्यांनी ट्विटरवर मोकळी केली. हा सारा प्रकार वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. एअर इंडियाने नायडूंची माफी मागितली. नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश एअर इंडियाला दिले. हे सारे घडत असताना मला माझ्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत पाहिलेला एअर इंडियाचा प्रवास लख्ख आठवला. 
स्पर्धेच्या युगात अपेक्षित असलेली उत्तम सेवा आणि पारदर्शकता या अनुषंगाने एका केंद्रीय मंत्र्याने सरकारचाच अंगीकृत उपक्रम असलेल्या एअर इंडियाच्या ढिल्या कारभारावर बोट ठेवले, हे बरेच झाले. एअर इंडिया आणि तिचा कारभार हा कोणे एकेकाळी समस्त भारतीयांच्या अभिमानाचा विषय होता. पण गेल्या काही वर्षांत तो टिंगलटवाळीचा विषय बनला. पुरस्कारापासून तिरस्कारापर्यंतचा हा प्रवास वेदनादायी आहे. कारण माझ्या लेखी हा देशाच्या अधिकृत राष्ट्रीय कंपनीच्या प्रतिमेचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. 
वयाच्या भाषेत बोलायचं तर मी आणि एअर इंडिया तसे बरोबरीनेच वाढलो. तांत्रिकदृष्ट्या एअर इंडियाची स्थापना १९३२ सालातली. पण तेव्हा ती टाटा एअरलाइन्स होती. भारताला स्वातंत्र्याचे आणि आपल्या देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना स्वगृही परतण्याचे वेध लागल्याच्या काळात म्हणजे १९४६ मध्ये ती पब्लिक लिमिटेड कंपनी अर्थात एअर इंडिया झाली. दुसऱ्या महायुद्धापर्यंत कराचीला टपाल पोहोचविणारी आणि इंग्लंडच्या रॉयल एअर फोर्सला युद्धकालीन मदतकार्यात हातभार लावणारी विमान कंपनी नव्या दिमाखात उभी राहिली. स्वातंत्र्योत्तर काळात तिने कात टाकली. 
हा सारा इतिहास सांगण्याचे कारण आहे. एक जमाना असाही होता, जेव्हा हीच विमान कंपनी काळाच्या पुढे राहत गगनाला गवसणी घालत होती. रोम, पॅरिस अशा युरोपीय ठिकाणांसह टोकियो, हाँगकाँग, सिंगापूर अशा आशियाई शहरांसाठी भरारी घेत होती.. ही भरभराट सुरू होती. ताफ्यात नव्या विमानांची भर पडत होती. अल्पावधीतच म्हणजे १९६२ साली ताफ्यात सर्व जेट विमाने असलेली जगातील पहिली विमान कंपनी ठरण्याचा मानही एअर इंडियाला मिळाला. तोवर अंतर्देशीय उड्डाणेही सुरू झाली होती. युवर पॅलेस इन द स्काय हे ब्रीदवाक्य आणि महाराजा हे बोधचिन्ह यांच्या संगतीने एअर इंडियाचा प्रवास सुरू होता. माझ्यासारख्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्या खेड्यातून मुंबईत दाखल झालेल्या तरुणासाठी आकाशी झेप घेतलेले विमान पाहणे हा अक्षरश: मान उंचावणारा विषय होता. मुंबई ते नागपूर या मार्गावर आयुष्यातला पहिला विमान प्रवास मी केला तो अवघ्या चौसष्ट रुपयात! कारण? - तिकीट दरात विद्यार्थ्यांना मिळणारी तब्बल पन्नास टक्क्यांची सवलत!
याच एअर इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयाला खेटून असलेल्या एक्स्प्रेस टॉवरमधून माझ्या पत्रकारितेच्या कारकीर्दीला सुरुवात होणार आहे, याची कोणे एकेकाळी मला कल्पनाही नव्हती! प्रवासी या नात्यापेक्षाही पत्रकार या नात्याने माझा या महाराजाशी जास्त संबंध आला. मी पत्रकारितेत स्थिरावू लागलो आणि मला एअर इंडियाच्या बाबतीत सुरू झालेल्या अधोगतीची जाणीव होऊ लागली. केंद्र सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपातून तिचे पंख आक्रसण्याची सुरुवात झाली होती. एकतर व्यावसायिक स्पर्धेतील गरजेचा विचार न करता केंद्राने काही निर्णय या महाराजावर लादण्यास सुरुवात केली. एअर इंडियाच्या महाराजाचे संस्थान खालसा करण्याचा चंगच जणू बांधला गेला. आणीबाणीनंतर सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारने एअर इंडियाच्या विमान प्रवासात दारूबंदी लागू केली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पीछेहाटीसाठीचा तो मोठा घाव ठरला. मग एकूणच हस्तक्षेप वाढत गेला. मग जेआरडी टाटांचा एअर इंडियातील रस स्वाभाविकपणाने कमी होत गेला. चित्र बदलले. प्रतिमाही डागाळली. महाराजा फक्त होर्डिंग्जपुरता रुबाबदार राहिला. 
एक्स्प्रेस टॉवरकडे जाताना एअर इंडिया बिल्डिंगवर लागलेल्या महाराजाच्या नावीन्यपूर्ण होर्डिंग्जकडे माझे लक्ष हमखास जात असे. बॉबी कुका हे एअर इंडियाचे कमर्शिअल डायरेक्टर असतानाच्या काळात दर आठवड्याला अंतर्गत सर्क्युलर जारी होत असे. कंपनीची प्रतिमा उजळ राहील, यासाठी कृतीतून दक्षता घ्यायला हवी, हा त्याचा गाभा असायचा. महाराजाच्या जाहिराती हा ब्रॅण्ड मजबूत करण्याचा भाग होता. जे. वॉल्टर थॉमसन एजन्सी महाराजाच्या जाहिरातींचे काम चोख पार पाडायची. चर्चगेटच्या नरीमन रोडच्या कोपऱ्यावरच्या फलकावरचे नाना चुडासामा यांचे राजकीय भाष्य आणि महाराजा हे दोन्ही तेव्हा लक्षवेधी विषय होते. नाना चुडासामांचे भाष्य बहरत राहिले आणि महाराजाची कळा उतरणीला लागली. बघता बघता ही बेभरवशाची सेवा झाली. विमानतळापर्यंत गेलेल्या प्रवाशांना तिकीट कन्फर्म नसल्याच्या वा अन्य काही ना काही कारणाने माघारी पाठविण्याचे प्रकार वाढीला लागले. 
या कंपनीच्या कमर्शिअल डायरेक्टरांबरोबर आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांसोबत होणारे संवाद मजेशीर असत. तिथे रमेश सट्टावाला नामक गृहस्थ होते. ते प्रसिद्धी वा बातमीशी संबंधित कामासाठी फोन करायचे, तेव्हा दिवस कुठलाही असला, तरी विषयाला हात घालण्यापूर्वी हॅपी बर्थ डे असे विश करीत. पण बघता बघता आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या बाबतीत एअर इंडियाची आणि देशांतर्गत वाहतुकीत इंडियन एअरलाइन्सची प्रतिमा खालावली. विश्वासार्हता इतिहासजमा होऊ लागली. तशात जागतिकीकरणाच्या रेट्यात इस्ट-वेस्ट, दमानिया अशा अनेक नव्या कंपन्या स्पर्धेत उतरल्या. यथावकाश जेट एअरवेज आणि किंगफिशर, स्पाइस जेटची त्यात भर पडली आणि अलीकडच्या काळात इंडिगोने आणि गो एअरनेही पंख पसरले. काळाच्या ओघात दमानिया, इस्ट वेस्ट, डेक्कन आणि अलीकडेच किंगफिशरही बंद पडली. सरकारी आधाराच्या कुबड्या नसत्या तर महाराजाही एव्हाना इतिहासजमा झाला असता. प्रफुल्ल पटेल मंत्री झाल्यावर त्यांनी इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचे एकत्रीकरण केले. पण त्यातूनही विश्वासार्हता काही वाढली नाही. त्या अगोदर उपरवाल्याच्या भरवशावर चाललेल्या इंडियन एअरलाइन्स (आयए) आणि एअर इंडियाचे (एआय) दोन लॉन्गफॉर्म प्रसिद्ध होते. आयए म्हणजे इन्फॉर्म अल्ला आणि एआय म्हणजे आॅलरेडी इन्फॉर्म्ड अल्ला!... याचा अर्थ, प्रवासाला जाणारच असाल, तर आधी त्या उपरवाल्याचे आशीर्वाद घ्या, आणि मगच विमानाची पायरी चढा!
विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी सेवेचा दर्जा आणि विश्वासार्हतेचा मुद्दा उरतोच! ती ढासळल्याने देश बदनाम होतो. जगाच्या पाठीवर स्विस एअरसारख्या कंपन्याही बंद पडल्या. अमेरिकेतही अंतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपन्यांची स्थिती उत्तम आहे, अशातला भाग नाही. पण आपल्या देशाची राष्ट्रीय विमान कंपनी हा थट्टेचा विषय बनतो, तेव्हा जीव जळतो. हा महाराजा पुन्हा रुबाबात उभा राहिला तर मला आनंद वाटेल. पण ही कात त्याने सरकारच्या नव्हे तर स्वत:च्या जिवावर टाकली, तर त्यासारखे सुख नसेल!
 
दिलगिरी आणि हनिमून
जुन्या काळात ‘बातमी’ झालेला एक एअर इंडिया स्पेशल प्रसंग मला चांगलाच आठवतो. तेव्हा मुंबई-नाशिक दरम्यान इंडियन एअरलाइन्सची दररोजची सेवा होती. 
एके दिवशी कोणीतरी व्हीव्हीआयपी आयत्या वेळी आले, म्हणून एका वकिलाला विमानातून खाली उतरवले गेले. पंचाईत अशी झाली, की या वकील महाशयांची वाग्दत्त वधू तिकडे नाशिक विमानतळावर यांची वाट पाहत उभी होती. तेव्हा तर मोबाइल फोनही नव्हते. त्यामुळे निरोपानिरोपी हाही कठीण मामला होता. अर्थात हे महाशय वकील असल्याने त्यांनी इंडियन एअरलाइन्सवर नोटीसच बजावली. 
आठवडाभरात दिलगिरीचे पत्र आले. विशेष म्हणजे, या वकील महाशयांच्या हनिमूनचा प्रवासखर्च उचलण्याची नामी ऑफरही दिली गेली!