शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

जबतक सनीमा है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 6:04 AM

आजच्या काळातले चतुर राजकारणी, जनतेच्या मनावरची सिनेमाची मोहिनी जाणून आहेत. त्याआधारे काहीही खपवता येतं, हेही त्यांना माहिती आहे. मुळात सिनेमाचा धंदाच खोट्याचं खरं करण्याचा. आज प्रत्येक राजकीय पक्ष प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी बनला आहे. अशावेळी खऱ्याचं खोटं करण्याच्या कामात राजकारण्यांना सिनेमावाल्यांइतकी उत्तम आणि नैसर्गिक साथ कोण करणार?

ठळक मुद्देविचार करा- काही काळाने जर जगातले सगळे संदर्भ नष्ट झाले आणि निव्वळ व्हिडीओ क्लिप्स राहिल्या, तर नेते कोणते आणि अभिनेते कोणते हे भविष्यातल्या संशोधकांना ओळखता तरी येईल का?

- मुकेश माचकर‘गँग्ज आॅफ वासेपूर’ या गाजलेल्या सिनेमामध्ये तिग्मांशू धुलियाने साकारलेला अफलातून रामाधीर सिंग म्हणतो, ‘जबतक हिंदुस्तान में सनीमा है, तबतक लोग.. ७७७ बनते रहेंगे...’संदर्भ आणि कारण वेगळं असलं तरी रामाधीर सिंग जे म्हणतो त्यात तथ्य आहे... कारण तो राजकारणी पुढारी आहे, त्याला हे फारच पक्कं माहिती आहे की, ‘देशात जोवर सिनेमा आहे, तोवर लोक ‘उल्लू’ (आपण सभ्य शब्द वापरू त्यातल्या त्यात) बनत राहतील...’...तोही त्याच धंद्यात आहे ना?आजच्या काळातले चतुर राजकारणी, खासकरून ग्रामीण, निमशहरी भागांतल्या जनतेच्या मनावरची सिनेमाची मोहिनी जाणून आहेत... तिच्या आधारे काहीही खपवता येतं, हे त्यांना माहिती आहे. सिनेमाचा धंदा खोट्याचं खरं करण्याचा, छोट्या छोट्या माणसांचे सर्वसामान्य चेहरे रंगवून, सोयीस्कर प्रकाशात भव्य पडद्यावर मोठे करून दाखवण्याचा. राजकारण आणि सिनेमाची खरं तर सुरुवातीला काही जोड जमण्याचं कारण नव्हतं. राजकारण हे जोवर समाजपरिवर्तनाचं, जागृतीचं, स्वातंत्र्यलढ्याचं साधन होतं तोवर त्यात खरेपणाचं मूल्य होतं, सद्सिद्ववेक होता. आता तोही एक शुद्ध धंदा झाला आहे, प्रत्येक पक्ष प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी बनला आहे; अशावेळी खऱ्याचं खोटं करण्याच्या कामात राजकारण्यांना सिनेमावाल्यांइतकी उत्तम आणि नैसर्गिक साथ कोण करणार?रशीद किडवार्इंनी ‘नेता अभिनेता : बॉलिवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स’ या पुस्तकात असं नमूद केलं आहे की, एकेकाळी चित्रपटसृष्टीने महात्मा गांधीजींना शुभसंदेश देण्याची गळ घातली होती. १९३०च्या आगेमागे आलेल्या या पत्रावर बापूजींचे सचिव महादेवभाई देसाई यांनी उत्तर दिलं होतं की, बापूजींना सिनेमात शून्य रस आहे, त्यामुळे ते तुम्हाला काही संदेश देऊ शकतील असं वाटत नाही. महात्माजींनी आयुष्यात रामराज्य हा एकच सिनेमा पाहिला होता, तोही रामाचा सिनेमा म्हणून. तरीही व्ही. शांताराम, मेहबूब खान, राज कपूर यांच्यापासून आजच्या विधू विनोद चोपडाच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’पर्यंत अनेक सिनेमांवर, अभिनेत्यांवर, दिग्दर्शकांवर, निर्मात्यांवर गांधीविचारांचा पगडा आहे.सिनेमाची आणि कलावंतांची खरी ताकद ओळखली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. त्यांच्या रसिक आणि उमद्या व्यक्तिमत्त्वाने हिंदी सिनेजगताला भुरळ घातली होती. त्यांनी पृथ्वीराज कपूर यांच्या रूपाने हिंदीतला स्टार पहिल्यांदाच राज्यसभेवर नियुक्त केला. पृथ्वीराज यांना त्यांनी देशाच्या अनेक शिष्टमंडळांवर पाठवलं. पंडितजींच्या रशियाभेटीत स्टॅलिन सतत एका हिंदी सिनेमाचा उल्लेख करत होता, हे पाहून नेहरू चकित झाले आणि परतल्यावर पृथ्वीराजना बोलावून त्यांनी विचारलं की, तुझ्या मुलाने हे ‘आवारा’ नावाचं काय प्रकरण तयार केलंय? स्टॅलिन सतत त्याच्याबद्दलच बोलत होता.राज कपूरची रशियातली लोकप्रियता त्या देशाबरोबर नागरी आणि सांस्कृतिक संबंध जोडण्यासाठी नेहरूंनी वापरून घेतली. त्या काळातही सिनेमावाल्यांची शिष्टमंडळं नेहरूंना भेटायला दिल्लीला जात, त्यांच्याबरोबर फोटो काढून घेत. त्यांना ‘जयहिंद’चे नारे वगैरे द्यायला लावायचं नेहरूंनाही सुचलं नाही आणि नेहरूंच्या कारकिर्दीत त्यांच्यावर तीन सोडा, एकही बायोपिक निघाला नाही आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दामटून प्रदर्शितही झाला नाही.तरीही १९६०च्या दशकाच्या मध्यापर्यंत, म्हणजे नेहरूंच्या निधनापर्यंत हिंदी सिनेमाचे नायक हे नेहरूवादी समाजवादी मूल्यांचा स्वप्नाळू पुरस्कार करताना दिसत होते. मध्यमवर्गाच्या मनात गोरगरिबांबद्दल तुच्छता निर्माण झाली नव्हती आणि शेतकऱ्यांना ‘फुकटे साले’ म्हणण्यापर्यंत मजल गेली नव्हती.राजकीय पटलावर इंदिरा गांधींच्या आगमनाने देशाची सगळी दिशा बदलू लागली, राजकारण व्यक्तिकेंद्री होऊ लागलं आणि हिंदी सिनेमातल्या अभिनेत्यांची लोकप्रियता ही सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी वापरून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. लोकाश्रय आणि राजाश्रय यांच्यासाठी लोटांगणं घालण्यात पटाईत असलेल्या सिनेसृष्टीच्या वातकुक्कुटांनी वारा वाहील तशी पाठ फिरवण्यात धन्यता मानली.भाबडी जनता जशी नेत्याला मायबाप मानत होती, तशीच सिनेमाच्या पडद्यावर भव्य दिसणाºया अभिनेत्याला आपला ‘नायक’ मानत होती. पडद्यावरचे इतर कोणीतरी लिहून दिलेले संवाद म्हणणाºया अभिनेत्यांची राजकीय समजशक्ती काय होती आणि त्यांनी राजकारणात नेमकं काय केलं, याचा लेखाजोखा शेजारच्या चौकटीत पाहायला मिळेल. काही मोजके अपवाद वगळता हिंदी सिनेमातल्या कोणाही अभिनेत्याने राजकारणावर स्वतंत्रपणे ठसा उमटवलेला दिसत नाही. काहींनी तर सिनेमातली झाकली मूठ राजकारणात उघडली आणि हात दाखवून अवलक्षणच करून घेतलं.दक्षिण भारतात ‘पराशक्ती’सारख्या जबरदस्त ताकदीच्या सामाजिक सिनेमांनी सामाजिक क्र ांतीचा बिगुल फुंकला होता. या सिनेमांमागचे लोक राजकारणात आले आणि त्यांनी राज्याची सत्ता काबीज केली. द्रविड अस्मितेच्या हुंकारातून जुळलेलं सिनेमा आणि राजकारणाचं नातं हे उर्वरित भारतातल्या नात्यासारखं कचकडी आणि चकचकीत, ग्लॅमरस नाही. त्यांचा साठीचा सुपरस्टार पडद्यावर चिकणाचुपडा बनतो आणि सामान्य जीवनात कोणत्याही अण्णा-आप्पासारखा लुंगी गुंडाळून स-टक्कल वावरू शकतो.हिंदी सिनेमातल्या मंडळींच्या चेहºयावरचा मेकअप मात्र राजकारणात आल्यावर आणि सामान्य माणसांसमोर गेल्यानंतरही उतरला नाही आणि इतरांनी लिहून दिलेल्या ओळी अभिनयकुशलतेने वाचून दाखवणंही थांबलं नाही... हेलिकॉप्टरमधून उतरून गव्हाची कापणी करणाºया हेमामालिनीची ताजी छबी पाहिली आहे ना व्हॉट्सअ‍ॅपवर?... तसेच आहेत हिंदी राजकारणातले बहुतेक सिनेमावाले... जनतेपासून, त्यांच्या खºया सुखदु:खांपासून तेवढेच दूर.गंमत म्हणजे आता तर ग्लॅमर आणि अभिनय या दोन्हीमध्ये सिनेमानटांपेक्षा अव्वल असलेले लोक राजकारणात धुरंधर बनून बसले आहेत. त्यांचा सार्वजनिक जीवनातला सगळा वावरच नाट्यमयतेने भरलेला आहे आणि आपल्यावर २४ तास सतत रोखलेल्या कॅमेºयांच्या माध्यमातून आपली कोणती प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, याबद्दल ते फारच सजग आहेत. केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा यांच्याबाबतीतही राजकीय नेते सिनेमावाल्यांपेक्षा अधिक सजग झाले आहेत.विचार करा- काही काळाने जर जगातले सगळे संदर्भ नष्ट झाले आणि निव्वळ व्हिडीओ क्लिप्स राहिल्या, तर नेते कोणते आणि अभिनेते कोणते हे भविष्यातल्या संशोधकांना ओळखता तरी येईल का?म्हणूनच विवेक ओबेरॉयबद्दलचा एक विनोद सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे... त्यात असं म्हटलंय की विवेकला खरंच दाद दिली पाहिजे, स्वत: इतका सुमार अभिनेता आहे आणि पडद्यावर चक्क अभिनयसम्राटाची भूमिका साकारतोय... धाडसच आहे ना हे?अभिनेत्यांचा ‘राजकीय’ लेखाजोखापृथ्वीराज कपूर : राज्यसभेवर नियुक्त होणारे पहिले मोठे स्टार. कट्टर काँग्रेसी, पंडित नेहरूंचे जिव्हाळ्याचे मित्र. कला-संस्कृती क्षेत्रातल्या अनेक शिष्टमंडळांचं नेतृत्व त्यांनी केलं होतं.देव आनंद : आणीबाणीनंतर देव आनंदवर राजकारणाचं भूत स्वार झालं होतं, त्याने स्वत:चा पक्ष काढून पाहिला. मात्र, फार वेळेवर सावध होऊन त्याने राजकारणाला रामराम ठोकला.नर्गिस दत्त : राज्यसभेच्या खासदार. काँग्रेससमर्थक. इंदिरा गांधी यांच्याशी स्नेहाचे संबंध होते.सुनील दत्त : थरो जंटलमन. राजकारणातलं राजकारणापलीकडचं व्यक्तिमत्त्व. काँग्रेसची तत्त्व अंगात भिनलेल्या दत्तसाहेबांना चिरंजीवांच्या प्रतापामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपकारांची परतफेड म्हणून एक निवडणूक न लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेसमधल्या गलिच्छ राजकारणातून संजय दत्तच्या माध्यमातून दत्तसाहेबांवर सूड घेतला गेला, अशी चर्चा होती.अमिताभ बच्चन : भारतीय जनतेची सर्वात मोठी कचकडी फसवणूक. अमिताभच्या अँग्री यंग कारकिर्दीत तो पडद्यापेक्षा मोठा बनला होता, लोकांनी त्याच्यात जननायक शोधला. मात्र, तो निव्वळ इतरांनी दिलेले संवाद प्रभावीपणे म्हणणारा अभिनेताच आहे, नेता नव्हे हे त्याला आणि जनतेला ९०च्या दशकात समजलं. अर्थात, तेव्हापासून सावध अमिताभने गांधी घराण्यापासून अंतर जपलं आणि वारा वाहील तशी पाठ फिरवण्याचा खेळ एखाद्या राजकारण्यालाही लाजवेल अशा रीतीने आत्मसात केला.

रेखा : जिथे जिथे ‘त्यां’चे पाऊल पडले असेल, तिथे तिथे आपलीही पदचिन्हं उमटली पाहिजेत, या एकमेव असोशीने रेखाने राज्यसभा सदस्यत्व स्वीकारलं असावं. रेखा ओ रेखा, जबसे तुम्हे देखा अशी अवस्था करून पुरु ष सदस्यांच्या हृदयांची धडधड वाढवण्यापलीकडे तिने संसदेत काय केलं, हा प्रश्नच आहे.राजेश खन्ना : हिंदी सिनेमाचा हा पहिला सुपरस्टार सगळी जादू ओसरून गेल्यावर आणि संपूर्णत: या बाद झाल्यावर राजकारणात आला. थोडाफार टिकला; पण फारच थोडा प्रभाव टाकू शकला.विनोद खन्ना : लोकसभेच्या चार निवडणुका जिंकणारा एकमेव स्टार. गुरु दासपूर या मतदारसंघावरची त्याची पकड एकदाच ढिली झाली. पण, दोन महत्त्वाच्या खात्यांची राज्यमंत्रिपदं मिळूनही राष्ट्रीय राजकारणात काही भरीव कामगिरी करता आली नाही.शत्रुघ्न सिन्हा : शॉटगन सिन्हाची जीभ कैचीसारखी चालते आणि समोरच्याच्या चिंध्याचिंध्या करते. एखाद्या बंदुकीसारख्या शाब्दिक फैरी झाडणारा शत्रुघ्न बिहारचा मुख्यमंत्री बनू शकला असता तर कदाचित आणखी पुढे गेला असता. पण, पक्षांतर्गत वैºयांनी त्याला कोपºयात ढकललं. २०१४ पासून ही तोफ आपल्याच पक्षाकडे वळलेली आहे. आता तिची ‘शत्रू’गोटात स्थापना झाली तर अस्तनीतला निखारा गेला म्हणून भाजपेयीच सुस्कारे सोडतील.हेमा मालिनी : हिंदी सिनेमातली बसंती राजकारणात चांगलीच स्थिरावली आहे. आधी राज्यसभेची खासदार आणि आता मथुरेची लोकसभेतील प्रतिनिधी आहे. राजकारण, मतदारसंघ, संसद, नृत्याचे कार्यक्र म आणि मुलींचे संसार या सगळ्यांचं संतुलन तिने उत्तम साधलं असावं. म्हणूनच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदापर्यंत मजल मारली तिने.जयाप्रदा : अप्रतिम सौंदर्य आणि अभिनय कौशल्याचा संगम जिच्या व्यक्तिमत्त्वात झाला, त्या जयाप्रदाच्या राजकीय कारकिर्दीचं सार चारच शब्दांत सांगता येतं... जेथे अमर सिंग तेथे जयाप्रदा. ती पाच वर्षं अधूनमधून दिसते, डोळे सुखावत राहतात, यातच तिचे मतदार खूश असावेत.राज बब्बर : हा मूळचा राजकारणी. चुकून सिनेमात आला होता की काय काही वर्षं असं वाटण्याइतका उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुरलेला आहे. सिनेमातल्या अनेक सीनिअर सहकाऱ्यांना तो राजकारणात सीनिअर आहे. कारकिर्दीच्या (त्याच्या वकुबानुसारच्या) शिखरावर असताना त्याने विश्वनाथ प्रताप सिंगांच्या नेतृत्वाखाली जनता दलात उडी मारली. तिथून समाजवादी पार्टी, नंतर काँग्रेस असे पक्षबदल करत करत आता तो काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे. अधून मधून विरंगुळा म्हणून तो सिनेमांतही काम करतो.धर्मेंद्र : पडद्यावरचा गरम धरम राजकारणात मात्र नरम धरमच ठरला. पत्नी हेमामालिनीने गळ घातल्यामुळे तो राजकारणात आला असावा इतकी त्याची राजकीय कारकीर्द प्रभावशून्य ठरली. लोकसभेचा सदस्य असतानाही तो कधी संसदेकडे फारसा फिरकला नाही. फार्म हाऊसचा मतदारसंघ काही त्याने सोडला नाही.शबाना आझमी : चळवळीच्या राजकारणात राहून, स्पष्ट भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाच्या विचारसरणीचा थेट टिळा शबानाने लावून घेतला नाही, हे तिचं वैशिष्ट्य. पुरु षवर्चस्ववादी समाजात स्वतंत्र विचार मांडणाऱ्या अरुंधती रॉय, मेधा पाटकर, वगैरेंच्या बरोबरीने तिचा दुस्वास केला जातो, हे तिचं यश.जया बच्चन : अमिताभ बच्चनची अर्धांगिनी त्याच्यापेक्षा अधिक काळ राजकारणात टिकून राहिली आहे. अमिताभने काँग्रेस सदस्यत्व ते भाजपच्या जाहिरातींचा चेहरा अशी मजल मारलेली असताना जया चार वेळा समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यानेच राज्यसभेवर गेली आहे.लता मंगेशकर : गानसरस्वती म्हणून मिळवलेला लौकिक लताबार्इंना संसदेत सांभाळता आला नाही. लोकांनी फार आग्रह केला म्हणून स्वीकारली खासदारकी, हे त्यांचं संसदीय कामकाजातल्या अनुपस्थितीचं समर्थनच पुरेसं बोलकं आहे.परेश रावल : लष्कराने दगडफेक्या काश्मिरी तरु णाऐवजी अरु ंधती रॉयला जीपला बांधायला हवं होतं, असं काश्मीर प्रश्नाचं सम्यक आकलन आणि स्रीदाक्षिण्य यांचं एकसमयावच्छेदेकरून दर्शन घडवणाºया परेश रावलने ट्विटरवर मोदींच्या बाजूने अत्यंत अर्वाच्य आणि नि:संगपणे तोफ चालवली होती. आता तो खासदारकीची निवडणूक लढवणार नाहीये; पण भाजपचा कट्टर समर्थक म्हणून काम करणार आहे.स्मृती इराणी : जन्मजात राजकारणी असावी अशी तिखट, लागट भाषाशैली, रेटून बोलण्याची पद्धत आणि अनेकदा अनाठायी ठरलेली धडाडी लाभलेली स्मृती इराणी ही कधीकाळी संस्कारी तुलसीबहू बनून जनतेच्या हृदयावर राज्य करत होती, ही तिच्या अभिनयाची कमालच म्हणायला हवी. थेट राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक लढवून तिने राज्यसभा पक्की केली आणि मंत्रिपदाचं शौर्यपदकही पटकावलं.गोविंदा : राम नाईकांसारख्या दिग्गजाला हरवून लोकसभेत गेलेल्या ‘विरार का छोकरा’ गोविंदाच्या डोक्यावरचं जनसेवेचं भूत दोन वर्षात उतरलं आणि तो त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये, सिनेमामध्ये परतला. खासदारकीची आठवणही त्याला आता नकोशी असेल.अनुपम खेर : यूपीएच्या राज्यात जे जे खटकत होतं, ते मोदी सरकारच्या काळात ज्यांना गोड वाटू लागलं, अशा सेलिब्रिटींमधला हा शिरोमणी. त्याची पत्नी किरण भाजपची खासदार आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील सिनेमात त्यांची भूमिका केल्यानंतर त्यांच्याबाबतीत आपलं मतपरिवर्तन झालं, असं तो सांगतो.याव्यतिरिक्त अरु ण गोविल, नितीश भारद्वाज, दीपिका चिखिलया, अरविंद त्रिवेदी असे टीव्हीवरचे कलावंतही संसदेची वारी करून आले. या सगळ्यांनी देशाचं समाजकारण आणि राजकारण नकळत बदलवणाºया रामायण आणि महाभारत या महामालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या आणि सगळे भारतीय जनता पक्षाकडून लढून जिंकले होते, हा काही योगायोग नव्हे.(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय चित्र-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)mamanji@gmail.com