शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पर्यावरणाला वाचवणारा ‘तीन’चा सेट कोणता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 7:15 AM

पर्यावरणविषयक एक स्पर्धा होती. शाळेला त्यासाठी टीम पाठवायची होती. मुलांची निवड झाली. प्रत्येकाचं कौशल्य वेगळं होतं. नेमका काय प्रकल्प करायचा यावर त्यांची खलबतं झाली आणि ठरला एक हटके प्रकल्प!

-गौरी पटवर्धन

‘सगळ्या गोष्टी ना, तीनच्या सेटमध्येच असतात नेहमी! त्यामुळे आपल्यालापण अशा तीन गोष्टी शोधायला पाहिजेत, ज्यामुळे आपला प्रोजेक्टपण छान होईल आणि आपल्या क्लायमेटलापण त्याने फरक पडेल.’ - अनाहिता म्हणाली.  ‘काहीप्पण असतं तुझं.’ पुष्करला अजिबातच पटलं नाही. ‘म्हणजे आपला प्रोजेक्ट छान व्हायला पाहिजे हे बरोबर आहे आणि क्लायमेटला त्याचा उपयोग व्हायला पाहिजे हेपण बरोबर आहे; पण त्यासाठी तीनचा सेट कशाला पाहिजे?’

 ‘अरे सगळे भारी लोक तसंच करतात.’ - अनाहिता त्या तीनच्या सेटवर ठाम होती.  ‘तुला माहितीये का असा एखादा सेट?’ - तेजलने विचारलं. तिला ही तीनच्या सेटची काय भानगड आहे तेच कळत नव्हतं.  ‘अगं ते नाही का? सगळ्यात नुकसान करणा-या तीन गोष्टी असतात असं मी ऐकलंय. त्याला ‘थ्री पी’ म्हणतात. पोल्युशन, पॉप्युलेशन आणि पॉलिटिक्स.’  ‘काहीप्पण!’ पुष्कर म्हणाला,  ‘पोल्युशन आणि पॉप्युलेशन ठीक आहे; पण पॉलिटिक्स काही दरवेळी नुकसान करत नाही.’  ‘असेल.’ अनाहिता खांदे उडवून म्हणाली,  ‘पण असं तीन-तीनमध्ये सांगितलं की लोक लक्षात ठेवतात.’ अनाहिता त्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त वाचायची. आणि तिने काहीही वाचलेलं असायचं. त्यामुळे पुष्करला तिचं म्हणणं फार कॅज्युअली बाजूला ठेवता येईना. शिवाय त्याला स्वत:ला प्रोजेक्टसाठी काही सुचलेलंही नव्हतं. खरं म्हणजे तो काही फार हुशार विद्यार्थी नव्हता. पण त्याची चित्रकला आणि हस्तकला खूपच चांगली होती आणि तेजलचं वक्तृत्व चांगलं होतं. म्हणून त्यांच्या शाळेने पर्यावरणविषयक एका स्पर्धेसाठी त्या तिघांची टीम पाठवायची ठरवली होती. आता ते तिघं मिळून काय प्रकल्प करायचा याची चर्चा करायला लायब्ररीत येऊन बसले होते. प्रकल्पाचा विषय चांगला निवडण्यावर खूप काही अवलंबून होतं. कारण ते तिघं आठवीत असले तरी त्यांचा गट आठवी - नववी असा संयुक्त गट होता. नववीच्या मोठय़ा मुलांना न घेता या तिघांना घेतल्यामुळे काहीही करून शाळेसाठी बक्षीस जिंकणं फारच प्रतिष्ठेचं होऊन बसलं होतं. अनाहिता ही वर्गातली कायम पहिली येणारी असल्यामुळे प्रकल्प फायनल होईपर्यंत तिच्या डोक्याने चालावं असं तिघांना वाटत होतं. आणि म्हणूनच पुष्कर तिची चेष्टा न करता शांतपणे चर्चा करत होता. तो म्हणाला, ‘असा अजून एखादा तीनचा सेट सांगू शकतेस का तू?’  ‘हो.. असे पुष्कळ आहेत. म्हणजे शिक्षणाचा पाया काय? बेसिक्स ऑफ एज्युकेशन? तर त्याला थ्री आर म्हणतात. रीडिंग - रायटिंग - अँरथिमॅटिक. पण सोनम वांगचूक नावाचे लडाखी शिक्षणतज्ज्ञ म्हणतात की या थ्री आर ला काही अर्थ नाही. त्यापेक्षा शिक्षणामध्ये थ्री एच जास्त महत्त्वाचे आहेत. हॅण्ड- हेड - हार्ट! तर याबद्दल दोन्ही बाजू खूप सविस्तर बोलतात. पण शेवटी त्यांचं म्हणणं असं तीन शब्दात त्यांनी मांडल्यावर लोकांच्या जास्त लक्षात राहातं.’  ‘हम्म्म.. हे इंटरेस्टिंग आहे.’ - तेजल म्हणाली. कारण तीन पी, तीन आर आणि तीन एच हे एकदाच ऐकून तिच्या पक्के लक्षात राहिले होते. आणि हे सगळं आपल्याला वक्तृत्व स्पर्धेत वापरायला चांगलं मटेरियल आहे हेही तिच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे आपल्या प्रोजेक्टचं नाव, थीम हे सगळं तीन शब्दात पाहिजे हे तिला मान्य होतं. प्रश्न असा होता की कुठले तीन शब्द?अनाहिता म्हणाली,  ‘हे बघ हं.. म्हणजे आपण जेव्हा पर्यावरण किंवा क्लायमेट म्हणतो तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी कुठला शब्द आठवतो?’   ‘पर्यावरणाला जोडून ‘वाचवा’ हा शब्द येतो आणि क्लायमेटला जोडून ‘चेंज’ हा शब्द येतो.’ पुष्करने निरुत्साहाने सांगितलं. त्याला अशा चर्चेतून काही चांगला प्रोजेक्ट सुचेल याबद्दल मुळीच आशा नव्हती.  ‘हे बघ.. तसे पर्यावरणाचे तीन आर पण आहेत.’ अनाहिता म्हणाली, ‘पण ते आपण वापरू शकत नाही.’   ‘का??’ - तेजल आणि पुष्कर एका आवाजात म्हणाले.  ‘पहिले म्हणजे ते आधीच कोणीतरी वापरलेले आहेत. तेच आपण वापरले तर ओरिजिनल आयडिया असण्याचे आपले मार्क्‍स जातील. आणि दुसरं म्हणजे ते इंग्लिशमध्ये आहेत. आपल्याला मराठीत प्रकल्प करायचा आहे.’  ‘पण आहेत कुठले तीन आर?’ तेजलला वक्तृत्व स्पर्धेसाठी मटेरियल पाहिजेच होतं.  ‘रिड्यूस - रियूज - रिसायकल’ - अनाहिता म्हणाली,  ‘म्हणजे वस्तूंचा वापर कमी करा, त्याच वस्तू शक्यतो पुन्हा पुन्हा वापरा आणि त्यांच्यावर पुनर्प्रक्रिया करा.’  ‘हा मग असं सांग ना..’ - पुष्कर अचानक उत्साहाने म्हणाला. त्याला या प्रकल्पासाठी काय करता येईल ते अचानक डोळ्यासमोर आलं होतं.  ‘काय सुचलं तुला?’ - तेजलने आशेने विचारलं.  ‘सुचतंय अजून. तुम्ही बोला. पण हा प्रोजेक्ट भारी होईल दिसायला.’आता अनाहिताला पण थोडा उत्साह आला. ती म्हणाली,  ‘मग आपण असं करूया ना? तीनचं काहीतरी? ज्यातून आपला मेसेजपण जाईल आणि लोकांच्या लक्षातपण राहील?’  ‘हो करूया.’ तेजलला पण आयडिया आवडली होती. ती म्हणाली, ‘आपण हे तीन आर मराठीत आणले तर?’  ‘चालेल ना.. पण कसे?’  ‘हे बघ हा..’ तेजल जरा विचार करत म्हणाली,   ‘पर्यावरण वाचवा असं तर आपण म्हणतोच. मग अजून ‘प’ वरून काहीतरी शोधूया का?’  ‘चालेल.’ पुष्कर म्हणाला, ‘प’ वरून काय बरं असेल? प्लॅस्टिक? पेपर?’  ‘अरे ते दोन्ही इंग्लिश शब्द आहेत..’ अनाहिता म्हणाली.  ‘खरंच की.. ‘प’ वरून नको तर ‘वा’ वरून शोधू..’ पुष्कर काहीसा खडूसपणे म्हणाला आणि त्यावर तेजलने एकदम एक्साइट होऊन टाळी वाजवली आणि  म्हणाली, ‘मला सुचतंय. जरा दोन मिनिटं गप्प बसा..’आणि मग एक कागद घेऊन तिने त्यावर डायरेक्ट प्रोजेक्टचं नावच लिहिलं..कमी वापरा. पुन्हा वापरा. पुनर्प्रक्रि या करून वापरा.

----------------------------------------------------

ही आहे थोड्या ‘सटक’ वयातल्यामुला-मुलींसाठी एक मोकळीढाकळी ‘स्पेस’- या जागेत आम्ही तर लिहूच; पण मुलांनीही लिहावं असा प्लॅन आहे. मुलांनी काय लिहायचं? - याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली.. कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणार्‍या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का, असा एक बेत आम्ही शिजत घातलाय. त्याविषयी सांगूच !तर भेटूया, येत्या रविवारी !अधल्या-मधल्या मुलामुलींसाठी काय काय शिजतंय हे पाहायचं असेल, तर एका गरमागरम, ताज्या ताज्या भांड्यात जरा पटकन डोकावून पाहायला सुरुवात करा :

www.littleplanetfoundation.org

lpf.internal@gmail.com(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)