शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

निवृत्तीनंतर पुढे काय?

By admin | Published: May 16, 2015 2:12 PM

रिटायरमेण्ट सेमिनारमधल्या मास्तरांच्या गंभीर प्रश्नांची गंमतीदार उत्तरं

 दिलीप वि. चित्रे
 
रिटायरमेण्ट सेमिनारचा क्लास चालू होता.
‘मास्तरानं’ एकदम विचारलं 
What is your plan after  retirement?
मी हात वर केला. 
‘येस?’
मी म्हणालो,  Eat, sleep,wake up and eat again.
सगळे हसले. मास्तरसुद्धा.
मग म्हणाला, very good answer
मी ओशाळलो.
मग ‘निवृत्तीनंतर काय?’ या विषयावरचं एक सुंदर कीर्तनच ऐकायला मिळालं. मी कल्पनाच केली नव्हती कधी की आयुष्याबद्दलचा असा विचार करायचा असतो. 
मी लहान असताना बडोद्याच्या आमच्या वाडय़ातले घोसाळकरकाका रिटायर झाल्यावर रोज सकाळी त्यांच्या पूर्वाभिमुख असलेल्या गॅलरीत आंघोळ झाल्यावर उघडेबंब उभे राहून अंगाला खोबरेल तेल चोळत तासभर उभे असायचे. देसाईकाका पितळेच्या खलबत्त्यात पान-सुपारी कुटत बसायचे व ती गोळी गालफडात कोंबून थोडय़ावेळानं तोंडात जमा झालेल्या रंगीत रसाची बाहेर ओसरीवर येऊन वाडय़ात दीर्घ पिचकारी मारायचे. सप्रे मास्तर मोडकळीस आलेल्या त्यांच्या गॅलरीत उभे राहून खाली गोटय़ा खेळताना आरडा-ओरडा करणा:या मुलांवर खेकसायचे, तर गुप्ते कर्नल गॅलरीच्या कठडय़ावर उजवा पाय टेकवून, डाव्या हाताच्या मुठीत सिगारेट  धरून झुरके मारताना ठसका लागला की खोकलत बसायचे.. ही सगळी रिटायर झालेली माणसं. 
माङो वडील- काका म्हणायचो मी त्यांना- स्वभावानं अगदी शांत. कधी आरडा ओरडा नाही. कुणाशी भांडण नाही. कुणाविषयी कधीही अपशब्द नाही. पान-तंबाखू-विडी कसलंच व्यसन नाही. 
आई वैतागलेली असली की, माङयावर खेकसायची, ‘‘जा तुकाराम महाराजांना सांग, या आता जेवायला.’’
याचं दुसरं कारण असं की, काका सतत गुणगुणत असायचे-
‘एका बीजापोटी, तरू कोटी, जन्म घेती - सुमने फुले; आधी बीज ऐकले..’ हा अभंग. किंवा, मी लहान असताना मला झोपण्यासाठी थोपटताना रोज एकच गाणं म्हणायचे, ‘ते आले रे.., तुजला बाळ धराया, नीज रे नीज शिवराया..!
 
Do you have any hobbies ? मास्तरानं ठणकावून विचारलं, आणि माङया दिवास्वप्नातून मी एकदम जागा झालो. 
एक दोघांनी हात वर केले.
कसल्या थातूर मातूर हॉबिज!
कोणाला नुसतं दिवसभर टीव्ही बघत राहण्याचा छंद म्हणो! 
हा कसला छंद? मी मागून ओरडलो, Thsi not hobby, This called an addiction 
कोणाला पत्ते खेळण्याचाच छंद. तेही व्यसनच! कोणाला आठवडय़ातून एकदा तरी थेटरात जाऊन सिनेमा बघायचा छंद. कोणाला पोहण्याचा. कोणाला व्यायामाचा. 
मास्तर हट्टाला पेटलेला. त्याच्या चेह:यावर काही खरंखुरं समाधान दिसेना. तो प्रत्येकालाच विचारत सुटला. 
मग कोणी म्हणालं की त्याला व त्याच्या बायकोला प्रवासाचा छंद आहे. त्यानं भेट दिलेल्या वेगवेगळ्या देशांची, जगभर प्रवासाची कहाणी ऐकवली. एकजण म्हणाला त्याला चक्क कुकींगची आवड आहे. हे छानच! वेगवेगळ्या देशांतले पदार्थ स्वत: अभ्यास करून शिजवणं व पाहुण्यांना / मित्रंना खिलवणं! कोणाला नुसतं घरात बसून पुस्तकं वाचण्याचा, कोणाला टेनिस / गॉल्फ खेळण्याचा तर कोणाला पेंिटंग्जचा छंद!
मला मोठी गंमतच वाटत होती. 
काही जणांनी ठामपणो सांगितलं की त्यांना कसलाच छंद नाही. 
- असं कसं होईल? 
गाण्याचा, संगीताचा, वाचनालयातून पुस्तकं आणण्याचा- काहीतरी छंद असायलाच हवा ना? माङया एका मित्रला तर पक्ष्यांचे फोटो काढण्याचा विलक्षण नाद. त्यासाठी तो कितीतरी भटकंती करायचा सतत गळ्यात कॅमेरा अडकवून. जंगलातून, डोंगरांवरून पक्षी टिपत फिरायचा. हे छंद म्हणजे त्या नादानं भारावून, वेडावून जाण्यासारखंच आहे. असं एखाद्या छंदासाठी स्वत:ला झोकून देणं हेच महत्त्वाचं नाही का?
कोणीतरी विचारलं, ‘‘असल्या छंदांचा आयुष्यात उपयोग काय?’’
मास्तरानं तो प्रश्न आमच्यावरच उलटवला. त्यानं विचारलं, Can anyone answer this?
मग प्रत्येकानं आपापल्या परीनं उत्तरं दिली.
‘त्यातून एखादा व्यवसाय उभा करणं’, ‘पैसे मिळवणं’, ‘रिकाम्या वेळेचा सदुपयोग करणं’- वगैरे. पण स्वानंदासाठी छंद व त्या स्वानंदासोबत इतरांनाही आनंद देणं हे कोणीच सांगेना. 
खरं म्हटलं तर, हा रिटायरमेण्ट सेमिनारचा क्लास. रिटायरमेण्ट नंतरच्या काळात छंद हाच खरा तुमचा सोबती. मग तो कसलाही असो. जसजशी निवृत्तीची वेळ जवळ येते, तसतशी काही जणांना त्या गोरजवेळेची भीतीच वाटायला लागते. उलट छंद असणा:यांना केव्हा एकदा निवृत्त होतोय, आणि पगाराचा चेक मिळवण्याच्या झटापटीत आयुष्यात ज्या छंदोपासनेला पुरेसा वेळ मिळाला नाही तो केव्हा मिळेल असं होऊन जातं. 
माङया एका मित्रला तर सगळेच छंद. कुठलीही नवीन गोष्ट बघितली तर  त्यात पारंगत झाल्याशिवाय ती तो सोडतच नाही. मग त्यासाठी वाटेल तेवढा वेळ व पैसा तो खर्च करेल. अगदी सुतारकाम, शिवणकामापासून ते उत्कृष्ट चिवडा बनवण्यार्पयत कुठल्याही कामात तो निष्णात. मला नेहमी असं पाहिलं की परमेश्वराचाच राग येतो. एकाच माणसाला एवढी गुणसंपन्नता तो का बहाल करतो? 
- या प्रश्नाच्या उत्तराचा दुस:या एका मित्रनं तोडगा काढलाय. तो म्हणतो, माझी बोटं थोडी वाकडी आहेत म्हणून, नाही तर मी या गोष्टी अगदी सहज केल्या असत्या. या पळवाटेचा तो छान उपयोग करून घेतो. आम्ही मित्रमंडळी मुद्दाम त्याला एखादं काम सांगतो. मग तो आपली मुळात वाकडी नसलेली बोटं वाकडी करून दाखवतो. मग त्याच्यासह आम्ही सगळेच हसतो. 
हे झालं छंदांविषयी. पण आयुष्यातल्या गोरजवेळेसाठी कराव्या लागणा:या कितीतरी गोष्टी! वृद्धावस्थेत आयुष्यात पोकळी निर्माण व्हायला नको यासाठी छंद महत्त्वाचे खरेच. छंद नसताना नुसतं बसून करणार तरी काय? निवृत्त होणा:या एका पंजाबी मित्रला मी हा प्रश्न विचारला, तर तो लगेच म्हणाला, ‘‘बीबी के साथ झगडा करेंगे, और क्या?’’
रिटायरमेण्ट सेमिनारच्या मास्तरानं या मुद्यावर भर दिला होता. निवृत्त झाल्यानंतर घरी बसून बायकोला सतत छळणा:या अनेक पुरुषांची उदाहरणं त्यानं दिली तेव्हा आम्ही सगळेच हसलो होतो. 
मास्तरानं पुन्हा एकदा एका प्रश्नाची गुगली टाकली.
त्यानं विचारलं, "Does anyone know about down sizing after retirement?''
 
 
 
निवृत्तीची वेळ आली की
डोक्यावरचा भार हलका करणारं
डाऊन सायङिांग
अमेरिकेतला एक मोठाच आणि अत्यंत मह्त्वाचा
विषय आहे : डाऊन सायङिांग! म्हणजे उतारवयाच्या वळणावर डोक्यावरचा भार हलका हलका करत जायचं. घरातल्या नको त्या, उगीच साठवून ठेवलेल्या, कित्येक दिवसात वापरल्याच न गेलेल्या वस्तू, कपडे, भांडी, तरुण वयात हौसेहौसेने जमवलेल्या गोष्टी हे सगळं वाटून, देऊन टाकून मोकळं मोकळं व्हायचं.. आणि अखेरीस मोठ्या घरातून लहान, छोट्या घरात आपला बाडबिस्तरा हलवायचा.
-  मुख्य म्हणजे हे सगळं आनंदाने करायचं. परवडत नाही म्हणून नव्हे! भारतात हे सगळं मानवणं तसं अवघडच! - कारण संचयाची परंपरागत सवय. अमेरिकेसारखे देश कसे भोगवादी असतात म्हणून खरी-खोटी दूषणं देण्याची सवय असलेल्या भारतीयांनी / भारतीय कुटुंबांनी आणि मुख्य म्हणजे निवृत्तीच्या उंबरठ्यावरच्या लोकांनी समजून घ्यावी आणि आचरणात आणावी अशी ही संकल्पना : डाऊन सायङिांग!
- त्याबद्दल पुढच्या लेखात!!
 
(दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्याला असणारे ज्येष्ठ मराठी लेखक. ‘कुंपणापलीकडले शेत’ हा कथासंग्रह,  ‘अलिबाबाची हीच गुहा’ या सांगीतिकेसह विदेशातील अनेक मराठी उपक्रम / संस्थांचे संपादक, 
संयोजक, संघटक)