शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

धुकं दूर होतं, तेव्हा..

By admin | Published: May 09, 2015 6:39 PM

ब:याचदा अनुभव असा की, शरीराचं अपंगत्व दिसणारी माणसं लैंगिक सुख देण्या-घेण्याबाबतीत अक्षम असतात असं सरसकट मानलं जातं. लैंगिकतेबाबतीत जरा मोकळं बोलणं किंवा एकमेकांना समजावून घेणं आपल्या समाजात निषिद्ध आहे, तर एरवीही ‘अपंग’ म्हणून ‘वेगळ्या’च असलेल्यांच्या जगात कोण कशाला डोकावून पाहणार? ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ नावाचा सिनेमा ही अदृश्य रेघ पार करण्याची निदान सुरुवात करतो.

सोनाली नवांगुळ
 
लैला.. सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूचा पक्षाघात असणारी कॉलेज तरुणी. बुद्धीने तल्लख, दंगेखोर, बदमाश, चुकणारी, खळखळून हसणारी आणि बंडखोर. तिचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ म्हणजे तिची उत्सुकता. या उत्सुकतेमुळं तिचे गोंधळ उडतात,  पण उत्सुकता शाबुत राहते.
लैला सतत मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात.. मोटराईज्ड व्हीलचेअरवरून भर्रकन इथून तिथे पोहोचणारी. समोरची गोष्ट पाहताना, ऐकताना जी प्रतिक्रिया मेंदूत तयार होते ती अवयवांर्पयत येऊन समोरच्याला तिचं म्हणणं समजेर्पयत वेळ जातो. पाहणा:याला हे विचित्र वाटू शकतं, पण लैलाला या गोष्टींची तमा नाही. 
स्वत:च्या अभ्यासाखेरीज दिल्ली युनिव्हर्सिटीतल्या इंडी बँडमध्ये लैला रमते. त्यातला मुख्य गाणारा आसामी मुलगा तिला मनोमन आवडतो. ती कार्यक्रमासाठी गाणं लिहून देते, इलेक्ट्रॉनिक साऊंड नोटेशन्स बनवून देते. परफॉर्म करताना ग्रुपबरोबर स्टेजवरही येते. बक्षीस त्यांच्याच बँडला मिळतं. ते जाहीर करताना संयोजक बाई सगळ्यांचं कौतुक करून मग त्यांचा रोख व्हिलचेअरवरल्या लैलाकडे वळवतात. 
‘हिच्यासारखी मुलगी काम करते यामुळे या बक्षिसाचा अधिक हक्क या बँडचा आहे. लैला, अशा त:हेनं जगणं खरंच कठीण आहे. तू आम्हा सगळ्यांशी काही बोलशील का?’ असं म्हणून माईक तिच्याकडे सोपवला जातो.
 लैलाचा पारा चढतो. पण काहीही न बोलता ती फक्त रागानं डाव्या हाताचं मधलं बोट निषेधासाठी उंचावते आणि तडक निघून जाते. 
- आपल्या गुणवत्तेला, रसिकतेला सतत शारीरिक असामथ्र्याचं कोंदण देऊन झाकोळून टाकणा:यांचा अस्साच राग येणं स्वाभाविक म्हणायला हवं.
लैला न्यू यॉर्कला क्रिएटिव्ह रायटिंगचा कोर्स करायला जाते त्यावेळी तिथल्या पद्धतीप्रमाणं तिच्या काही अडचणी आहेत का हे विचारलं जातं. खरंतर लैला कॉम्प्युटर आणि त्यावरचं टाई¨पग याला सरावलेली, पण तिच्यासारख्या हालचालींवर मर्यादा असणा:या व्यक्तीला लेखनिक लागू शकतो म्हणून त्याचीही सोय युनिव्हर्सिटीनं केलेली असते. तिचे शिक्षक तिला याबद्दल सांगतात तेव्हा लैला स्वत:ला टाय¨पग येतं हे सांगेर्पयत ‘अवकाश’ जातो.. तोवर मदतनीस मुलगा समोर येतो. त्या गो:यापान ब्रिटिश तरुणाला पाहून लैला सुखावते. आणि मदतनीसाची सोय स्वीकारते.. तिच्या वयातल्या मुलींना असं आकर्षण असणं अगदीच स्वाभाविक.. लैला ते एन्जॉय करते. तिच्यासारखी मुलगी मिश्किलपणानं ही गंमत भोगू शकते! 
लैला इंटरनेटवरून तिच्या वयातल्या इतर मुलामुलींप्रमाणो पॉर्न साइट घरातच लपूनछपून पाहणारी. त्यातले दबले हुंकार ऐकून मजा घेणारी. उत्सुक! तिच्या कॉम्प्युटरवर ह्या गोष्टी चुकून तिच्या आईच्या पाहण्यात येतात तेव्हा आई तिला जाब विचारते.. स्पष्टीकरण काय देणार हे न कळून लैला तिला म्हणते, ‘हाऊ डेअर यू? इट इज माय प्रायव्हसी!’ 
- आई वैतागून प्रतिप्रश्न करते, ‘तुम्हे मुझसे प्रायव्हसी चाहिए?’ 
- या छोटय़ाशा संवादात स्वातंत्र्याबद्दलचे आणि खासगीपणाबद्दलचे खोलवरचे प्रश्न आहेत. कुठल्याही शारीरिक मर्यादा असणा:या व्यक्तीला सामाजिक मदत अपरिहार्यपणो घ्यावी लागतेच. ती घेत असणा:या व्यक्तीने अशी खासगी स्पेस मागणं याचे अर्थ नेहमी तिरकेच काढले जातात. माणूस म्हणून त्यांची ही गरज सहजमान्य नसतेच.
 थेट ओठांना ओठ भिडवून चुंबन घेण्याबद्दल लैलाला उत्सुकता आहे.. त्यामुळं सेरेब्रल पाल्सीमुळे नव्हे, पण अन्य कारणाने व्हीलचेअरवर असणा:या मित्रला गाठून ती हा अनुभव मिळवते. हाच मित्र लैलाला बॅण्डमधला आसामी मुलगा आवडतोय म्हटल्यावर तिला सावध करतो. सांगतो, की ‘हे ‘नॉर्मल’ लोक काही खूप काळ साथ करत नाहीत, त्यांच्यात अडकू नकोस.’ 
- लैला एकतर्फी प्रेमाच्या तारेत असते. प्रेमभंग होतो. आईला हे सांगितल्यावर ती बोलून काहीच प्रतिक्रिया देत नाही. दरम्यान, लेखनासाठीच्या एका परदेशी कोर्सची स्कॉलरशिप मिळते आणि लैला या औदासिन्यातून बाहेर पडते. तिथे एका मोर्चाच्या दरम्यान लैलाला नेत्रहीन खानुम भेटते. पाकिस्तानी-बांगलादेशी मुळं असणारी खानुम सुंदर, आत्मविश्वासाने खचाखच आणि जीवनाला भिडणारी. तिच्याबरोबर राहताना एका क्षणी शरीरानंही संवाद साधला जातो. सहजच!
 आपण ‘अपंग’ नाही असं स्वत:ला पटवण्याकरता नॉर्मल मित्रमंडळींच्यात सतत वावर ठेवणारी लैला या अनुभवामुळं लैंगिक टप्प्यावर आपण नॉर्मल नाही की काय या गोंधळात अडकते.. सावरण्याच्या धडपडीत मदतनीस मुलाबरोबर तिचे शरीरसंबंध येतात.. ती खानुमसमोर ते कबूलही करते. नॉर्मल असणं म्हणजे नेमकं काय नि ते सिद्ध व्हावं म्हणून किती भावनिक आणि व्यावहारिक आयाससायास! - अपंग व्यक्तींना आधीच शारीरिक पातळ्यांवरचा फरक आणि त्यातून निर्माण होणारे अनेक पातळीवरचे झगडे रिचवत जगावं लागतं. शिवाय भावनांच्या पातळीवर नॉर्मल असूनही समतोल काही साधला जात नाही. लैलाच्या गोष्टीतून हा न दिसणारा संघर्ष पाहायला मिळतोय हे काही कमी नाही.
- शारीरिकदृष्टय़ा अॅबनॉर्मल माणसांच्या सर्वसाधारणपणाच्या प्रदेशात घेऊन जाणारा ‘नॉर्मल’ सिनेमा म्हणून ‘मार्गारिटा विथ ए स्ट्रॉ’ हा नवा सिनेमा मला खूप महत्त्वाचा वाटला.
महत्त्व यासाठी सुद्धा की, ‘या’ सिनेमात व्हीलचेअरला जखडलेली तरुण मुलगी दिसते, पण तरीही हा ‘प्रेरणादायी’ कॅटेगरीत मोडणारा सिनेमा नाही. 
- नाहीतर अपंग ‘असूनही’ पाहा या अमक्याने वा अमकीने कशी गगनाला गवसणी घातलीच, असा  ‘संदेश’ असलेल्या कलाकृतीच अपंग नायक/ नायिकांच्या वाटय़ाला येतात.
लैलासारखी मुलगी रोज जगते कशी, करते काय हे या सिनेमात दिसतं. पण इथे भावनांचा घाऊक पूर नाही.. पॉङिाटिव्ह अॅटिटय़ूड किंवा संघर्षाबद्दलचं भाषण नाही. लैंगिकतेबाबत काही दृश्यं असूनही नैतिकतेबद्दल काही सारवासारव नाही, सर्वसाधारणपणो जिथं टाळ्या मिळतात, पुरस्कारांना वर्णी लागते किंवा कौतुक लाभतं तिथं कदाचित विषयापासून हात सुटू शकतो. तर असं ‘स्टिरिओटाइप’ इथं फारसं नाही.
हा सिनेमा ‘विषय’ म्हणून कसा वाटला आणि अपंग माणसांच्या भावनिक जगाबद्दल काय नवं समजलं असं मी माङया मित्रमैत्रिणींना विचारलं तर उत्तर आलं, ‘या माणसांनासुद्धा लैंगिक गरज असू शकते हे कळलं.’ - केवळ जिद्द, प्रेरणा वगैरे रूढ साच्यामध्ये अडकवून टाकलेल्या अपंग व्यक्तीच्या लैंगिकतेबद्दलच्या भावना सर्वसाधारण माणसासारख्याच असतात या नैसर्गिक सत्याचा साक्षात्कार या सिनेमाच्या निमित्तानं यांना प्रथमच होतोय म्हणून चीड यावी, की किमान या निमित्तानं याही बाजूचं आकलन येण्याची सुरुवात होते आहे याचा आनंद मानावा? की या शिडीवरून धुकं फिटण्याची चिन्हं सापडताहेत म्हणून वर चढावं? - मी थोडी गोंधळले खरी! ब:याचदा अनुभव असा की, शरीराचं अपंगत्व दिसणारी माणसं लैंगिक सुख देण्या-घेण्याबाबतीत अक्षम असतात असं सरसकट मानलं जातं. लैंगिकतेबाबतीत एरवीही मोकळं बोलणं किंवा एकमेकांना समजावून घेणं आपल्या समाजात निषिद्ध आहे. अपंग माणसांच्या बाबतीतल्या या प्रांताबद्दल ना धड पालक पुढे येऊन बोलतात ना संस्था-संघटना. कोवळ्या वयातल्या लैंगिकतेबद्दलच्या नैसर्गिक उत्सुकता न भागवल्या गेल्यामुळे जर विकृती आली तर त्याचा दोष कोणा एकावर कसा लादणार? 
अपंगत्वाचे असंख्य प्रकार, त्या दृष्टीने प्रत्येकाची मर्यादा समजून त्याला/तिला साथ करणारा सहप्रवासी लाभू शकेल इथर्पयत समजूत येण्यासाठी मुळात
 
अपंगत्वाचे असंख्य प्रकार, त्या दृष्टीने प्रत्येकाची मर्यादा समजून त्याला/तिला साथ करणारा सहप्रवासी लाभू शकेल इथर्पयत समजूत येण्यासाठी मुळात शंकांची, गैरसमजांची, अंधविश्वासांची, प्रश्नांची कोंडी तर फोडायला हवी! अवघडलेपण सैलावायला हवं! स्वत:च्या ओळखीच्या परिघावर असणारी लैला अनेक प्रश्नांचं प्रतिनिधित्व गाजावाजा न करता निभावते. तिच्या प्रेमाचा, इच्छांचा शोध तिला शरीराची क्षमता आणि फरकांच्या पल्याड घेऊन जातो. हे असं ‘पलीकडे’ जाण्यासाठी खूप जण केवळ संकोचानं तिष्ठत राहतात. 
अपंग व्यक्तीला पडद्यावर दाखवतानाची भाषा व चित्र बदलू घातलं आहे, हे मात्र खरं.. खरं तर अपंगत्व ही अडचण नव्हे, त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व स्वच्छ आकलन करून घेण्याची इच्छाशक्ती नसणं ही खरी अडचण आहे. अपंग व्यक्ती आणि तिच्याबद्दलची शारीरिक व भावनिक जाणीव याबद्दल मुळातच पाणी डहुळलेलं आहे,  पण अशा सिनेमांमधून काही जाणिवा स्पष्ट होऊ शकण्याची सुरुवात होईल कदाचित. 
- एरवी मोजके अपवाद वगळता सिनेमातही आणि रोजच्या जगण्यातही अपंग माणसांना सतत आशादायी राहण्याचा, समाजाला प्रेरणा देत राहाण्याचा ‘वसा’ दिला जातो. एकतर दुर्लक्ष नाहीतर आवश्यकता नसतानाही सक्तीची मदत. पुन्हा या मदतीला  ‘सेवा’ हे नाव!- हेच अपंगांच्या नशिबी लिहिलेलं. एखाद्या अपंगत्वामुळं त्या-त्या व्यक्तीच्या काही हालचालींवर बंधनं येतात, पण याचा अर्थ ती व्यक्ती सर्व बाबतीत असमर्थ किंवा अक्षम असते असं नव्हे. अपंगत्व हे जगण्यावरचं ओझं किंवा सततच्या ताणाचा विषय नसतो, पण सतत प्रेरणादायी असण्याची अट मात्र अपंगत्वासह ‘नॉर्मल’ जगणा:यावर फार ओझं टाकते. 
 ब्रेलमधलं वाचून दाखवलं की टाळ्यांचा कडकडाट, कुणी पायानं चित्रं काढली, हार्मोनियमसारखं वाद्य वाजवलं की हेलावून जाणं. यामुळे अपंग  माणसं वाढत नाहीत आणि प्रतिक्रिया देणारेही आकलनाच्या वेगळ्या प्रांतात शिरू शकत नाही, सगळं ‘जैसे थे’ राहतं. 
खरी गरज आहे ती आपल्या प्रतिक्रिया जाणत्या करण्याची!  
 
‘मार्गारिटा’ संपताना..
 
‘मार्गारिटा..’ संपताना एक फ्रेम झळकते, त्यावर काहीसं असं लिहिलं आहे, ‘जिथं जखम असते तिथं प्रकाश असतो..’ 
खरंच आहे ते! एखादा दुखरा, नकोसा वाटणारा किंवा दिसणारा अनुभव किंवा अवस्था नवं ज्ञान आणि समजूत घेऊन येऊ शकतेच.. जखमेच्या ठिकाणचा प्रकाश केवळ हळवं होऊन कसा दिसणार? 
(लेखिका ‘स्पर्शज्ञान’ या विशेष मासिकाच्या संपादनासह अनुवाद आणि लेखनामध्ये कार्यरत आहेत)