गेले चार दिवस रणवीर सिंगचा न्यूड अवतार नेटकऱ्यांनी चांगलाच ट्रोल केला आहे. ते कमी म्हणून की काय अंकीत भाटिया, टीना दत्ता हेदेखील स्पर्धेत उतरले. याआधी मिलिंद सोमण, मधु सप्रे, सनी लिओनी, राधिका आपटे, आमिर खान, वनिता खरात, इशा गुप्ता अशा अनेक बॉलिवूडकरांनी असे फोटोशूट केले होते. यातून साध्य काय झाले? तर बॉलिवूडकरांना कुप्रसिद्धी, बातम्यांना विषय आणि लोकांच्या चर्चेला उधाण. पुन्हा काही काळासाठी परिस्थिती जैसे थे! मात्र असे बीभत्स प्रकार वारंवार घडण्यामागे नेमके जबाबदार कोण आहे. याचा खुलासा पुढील कथेत होईल. त्यासाठी कौस्तुभ केळकर नगरवाला यांची पुढील कथा शेवट्पर्यंत नक्की वाचा!
'बकरा'
तो तसा बरा होता.बर्यापैकी ऍक्टिंग वगैरे करायचा. ..निदान त्याला तरी तसं वाटायचं.अंगावर काय वाट्टेल ते घालायचा.घालायचा काहीतरी हे नशीब.चट्टेरीपट्टेरी बेलबाॅटमटाईप पॅन्टा.डोळ्यावर बेडूकछाप बटबटीत गाॅगल्स...सोबतीला त्याला शोभतील अशा आचरट माकडऊड्या...चालतंय की !त्याच्यावर पोट आहे त्याचं.आपल्याच येडपटपणाच आपणच भरपेट मार्केटींग केलं की झालं...तर काय सांगत होतो ?कुणास ठाऊक कसा तो नगरला आलेला.चितळे रोडला भाजी घ्यायला आलेल्यांना अनेकांना दिसला तो.आज काय नवीन ?ऊभा होता कमरेला पालापाचोळा गुंडाळून.बाकी ऊघडावाघडा निर्लज्ज.प्राणीप्रेमाचा प्रोमो वगैरे असायचापोरीबाळींचा आव्वा अय्याईचा कल्ला.सेल्फीश कचकचाट.काहींना त्यात कलात्मकता वगैरे दिसली.आम्ही समजावला त्याला.सांभाळ रे !हे नगर आहे.कधी कुणाला ऊताणा करून ऊघडा पाडतील नेम नाही.तसंच झालं.वाचनालयापासून एक बकरा त्याच्या मागे लागलेला.त्याच्या कमरेचा पाला बकर्याच्या आवडीचा बरं का !त्यानं तो पाला कुरतडायला सुरवात केली..तो पुढे मागे , बकरा मागे...चौपाटी कारंजापाशी तो तोंडघाशी आडव्वा पडलेला..बकर्यानं सगळा पाला पचवून नुकतीच ढेकर दिलेली..झाकली मूठ सव्वा...झाकण्यासारखं काही ऊरलेलंच नव्हतं.पुन्हा फ्लॅशचा चकचकाट.त्याच्या वासावरच्या चॅनलची भाऊगर्दी.ऊघडंवाघडं कलात्मक विश्लेषण.त्याच्या चेहर्यावरचे ऊर्मटी निरागस भावआम्ही विषण्ण झालो.कारणीभूत करणीबाज बकर्यास आम्ही गाठले.तो निवांत रवंथ करत ढिम्म ऊभा."गाढवा, एखाद्याच्या ईज्जतीचा भरल्या गावात असा पालापाचोळा करून काय मिळवलंस तू ?"बकरा खौट छद्मी हसला."एक्सक्यूझ मी..मी गाढव नाही.बकरा आहे.नीट ऐका..खरा 'बकरा' झालाय तुमचा.तुम्हाला म्हणून धंद्याचं सीक्रेट सांगतोय.मला त्यानंच पोसलाय.तो पुढेपुढे....मी मागेमागे.सगळं प्लॅन्ड असतंय.गावोगावी हिंडतो आम्ही.हाच खेळ दाखवत..जेमतेम पोटाएवढं सुटतं या खेळातून.पोटासाठी लाज सोडलीय आम्ही.खरं सांगू ?लाज आम्ही नाही तुम्ही सोडलीय.तुमचं पब्लीक.ऊभं राहून मजा बघतंय.एखाद्यानं तरी खिळा मारलेल्या चपलेनं ,त्याच्या ढुंगणावर लाथ घातली का ?पोत्यात घालून बडवला पायजेल त्याला.पर नाही ?पब्लीकला ह्येच पायजेल.तोवर हे असंच चालू र्हानार...खेळ त्योच, खिलाडी बदलतील.अभी तो शुरूवात है !डर्टी पिक्चर अभी बाकी है !बेष्टलक...."पटलं..खरी लाज आपणच सोडलीय.नंगे से तो खुदा भी डरता है..आपलं काय ?