शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

भारत- चीन : ‘ती’ वेळ आली आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:00 AM

चिनी नागरिकांना योगाचे मोठे आकर्षण. योगाभ्यास ही आपल्यासाठी आध्यात्मिक अनुभूती असली तरी चिनी लोकांसाठी ते ‘तरुण दिसण्याचे शास्र’ आहे. चिन्यांना आकर्षून घेणारी दुसरी भारतीय गोष्ट म्हणजे ‘बॉलिवूड’ आणि तिसरा अर्थातच बुद्ध!! भारताने आपली ही ‘सॉफ्ट पॉवर’ ओळखून आता चिनी भाषा आत्मसात करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे!!

ठळक मुद्देसमरांगणात संघर्षाचे पर्व आता ओसरले आहे! शत्रूच्या तिरस्कारापेक्षा त्याच्या जन-मनाचा अभ्यास महत्त्वाचा!!

राष्ट्रप्रेमाची प्रतीके असतात. काळ बदलला की ही प्रतीकेही बदलतात. चीनसमवेत गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर ‘चिनी वस्तूंवर बहिष्कार’ हे आपल्या राष्ट्रप्रेमाचे प्रकटीकरण झाले. जागतिक व्यापार संघटनेच्या करारामुळे असा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही; पण शक्य तिथे स्वदेशीच्या वापराचा आग्रह सुरू झाला आहे. या साऱ्या पाश्र्वभूमीवर एक संदर्भ : 1937 साली जपान-चीनचे युद्ध. जपान प्रबळ होता त्या वेळी. आजही जपानविषयी मनात अढी असलेली एक मोठी पिढी चीनमध्ये आहे. तर मुद्दा असा की, तत्कालीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जपानी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन भारतवासीयांना केले होते; आपण चीनसमवेत आहोत हे दाखवण्यासाठी! (संदर्भ : हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया- बिपीन चंद्रा)  पुढे भारत स्वतंत्र झाला. साठच्या दशकात जे झाले त्याचे पडसाद अजूनही उमटतातच. चिनी मनसुबा न ओळखण्याचा आरोप आपल्यावर झाला. मुदलात अगम्य चिनी भाषा! त्यातून त्या देशाविषयी सामान्यांचे अज्ञान इतके अगाध आहे की, चीन म्हटला की आपण त्याचा संबंध राष्ट्रहिताशीच जोडतो. आज जगातील प्रत्येक देशात चीनचे अस्तित्व आहे. तंत्रज्ञान, बांधकाम, व्यापार, संरक्षण, अर्थकारण, शिक्षण नि अगदी अलीकडे ‘आरोग्य’ क्षेत्रतदेखील.  गेल्या सत्तर वर्षात चीनने प्रत्येक क्षेत्रत आपले पाय पसरले. कधी थेट धमकावून तर कधी गुंतवणूक वाढवून, तर एखाद्या देशाला चर्चेत गुंतवून हवे ते इप्सित साध्य करण्याची अफाट क्षमता विकसित केली.  धोरणांनी पराभूत करायचे ही आंतरराष्ट्रीय रणनिती आहे. गलवान खो:यात युद्धजन्य स्थिती असली तरी तो पर्याय दोन्ही देश कधीच स्वीकारणार नाही. किंबहुना ते संपूर्ण आशिया खंडाच्या हिताचेही नसेल... भारत सरकारवर पूर्ण विश्वास असलेल्या नागरिकांनी अशावेळी काय विचार करायला हवा?गेल्या सहा वर्षात चीनचा भारताशी व्यापार दुप्पट झाला आहे. भारतीय ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक चिनी कंपन्यांनी केली. चीनची व्यापारी उलाढाल 60 बिलिअन डॉलर्स इतकी आहे. म्हणजे आपल्या संरक्षण आर्थिक तरतुदीइतकी. चीनच्या भारताशी व्यापारी संबंधातील 60 टक्के वाटा ज्या वस्तू आपण सहज भारतात निर्माण करू शकू अशा वस्तूंच्या विक्रीचा आहे. . समरांगणात संघर्षाचे पर्व आता ओसरले आहे.  आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतो आहे. दरवर्षी ‘गेट्र वॉल’वर आयोजित विशेष योगवर्गापासून चीनमध्ये सर्वत्र योग दिनाचे कार्यक्रम होतात. स्थानिक चिनी नागरिकांना योगाचे मोठे आकर्षण. योगाभ्यास ही आपल्यासाठी आध्यात्मिक अनुभूती असली तरी चिनी लोकांसाठी ते ‘तरुण दिसण्याचे शास्र’ आहे. चिनी विद्यार्थी, महिला-पुरुष सारे योग दिनाचा लोगो असलेल्या टी-शर्टमध्ये सामूहिक योगसाधना करतात.  चीनच्या संदर्भातील सॉफ्ट डिप्लोमसीत भारताला अलीकडच्या काळात आलेले हे सर्वात मोठे यश आहे. 15 जूनर्पयत बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या फेसबुक पेजवर योगशिक्षकांचे व्हिडिओ अपलोड होत होते. योगातून भारत-विचार दर्शनविस्तार आपण जगभरात केला. चीनही त्याला अपवाद नव्हता.भारतीय सिनेमांचे गारुड चीनमध्ये आहे.‘आवारा हूँ.’मधील राज कपूरची मोहिनी आजही कायम आहे. माङया चीनमधील वास्तव्यात तिबेट प्रवासाचाही योग आला. तेथील घराघरांत ‘हम आपके हैं कौन’मधील माधुरी दीक्षितच्या भल्या मोठय़ा पोस्टर्सनी व्यापलेल्या भिंती मी पाहिल्या आहेत. आमीर खानच्या थ्री इडियट्सने चीनमधील घराघरांत कहर केला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढचे वर्षभर भारत म्हटला की केवळ हाच सिनेमा लोकांना आठवत असे. भारतीय व्यक्तींची तुलना थ्री इडियट्समधील पात्रंशी करण्याइतपत भारताविषयी चीनमध्ये उत्सुकता होती.भारत हा बुद्धाचा देश ही अजून एक आपली चीनमधील ओळख. बुद्धाचे स्वरूप चीनने बदलले; पण बुद्धीझम जाणणा:या चिनी माणसाला खरा मार्ग कळला. तिबेटच्या ल्हासामधील पटोला पॅलेसमध्ये हिज होलिनेसच्या रिक्त आसनासमोर भक्तिभावाने बसलेल्या भिक्खूने ‘आम्ही त्यांना अजूनही मिस करतो’ असे मोडक्या-तोडक्या इंग्रजीत सांगितले होते मला. बुद्ध मूर्तीच्या पायाशी चीनी यूआन विखुरलेले दिसले! भारताचा हा सांस्कृतिक वारसा कम्युनिस्ट चीनमध्ये असा विस्तारलेला आहे... अर्थात हे झाले सॉफ्ट डिप्लोमसीचे. सामान्य चिनी माणसाला काय वाटते- याच्याशी तेथील सरकारला काहीही देणो-घेणो नसते. भारतात मात्र याचा संबंध राष्ट्रप्रेमाशी जोडला जातो. तो स्वाभाविक आहे. वारंवार चीनकडून येणा:या अनुभवातून आपण काय शिकलो, हाही प्रश्न त्यामुळेच अनुत्तरित आहे.विश्वासार्हतेच्या प्रश्नामुळे भारताने चीनच्या सॉफ्ट डिप्लोमसीला नाकारणो सुरूच ठेवले, हे खरे आहे. अगदी आपल्या औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कन्फ्युशिअस सेंटर स्थापण्याची प्रक्रिया ऐनवेळी रद्दही केली. चिनी दूरसंचार कंपन्या भारतात प्रवेशासाठी जंग-जंग पछाडत असताना भारतीय कंपन्यांनादेखील तुमच्या देशात प्रवेश देण्याची अट सरकारने ठेवल्यावर तोही मुद्दा निकाली निघाला. यूसी ब्राऊझर हा चिनी न्यूज अॅग्रिगेटर असल्याचे आपल्याला माहिती असेलच. पण ओपेरा हे नॉर्वेच्या कंपनीच्या मालकीचे ब्राऊझरदेखील 2016 पासून चिनी कंपनीच्या ताब्यात आहे, हेही आपण विसरलो. या ब्राऊझरवरून दक्षिण चीन समुद्र, तिबेट, हाँगकाँग, तैवानविषयक बातम्या योजनापूर्वक दाखवल्या जात नाहीत; परंतु सॉफ्ट पॉर्न, प्रमुख नेत्यांसंबंधी ‘चघळल्या’ जाणा:या बातम्यांच्या नोटिफिकेशन्सची चलती ही सर्च इंजिन्स वापरणा:यांच्या मोबाइलमध्ये हमखास असते. खासगी माहिती चौर्य हा सायबर युद्धाचा भाग इथर्पयत ठीकच; पण निवडक माहितीचा मारा करून ‘जनमानस’ प्रभावित केले जाते.  सरकारचे यावर नियंत्रण नाहीच; पण वापरकत्र्याचे असायला हवेच.भारतीय सिनेमा, योगा व बुद्ध ही त्रिसूत्री जगात भारताची सॉफ्ट पॉवर ठरली आहे. या तीनही गोष्टी जगभरात गेल्या. पण लूक ईस्ट’ धोरणामुळे 2015 साली भारतात झालेल्या आफ्रिकन राष्ट्रांच्या शिखर परिषदेचे फलित आपण मांडले नाही. नायजेरियासारख्या देशात चीनने भली मोठी गुंतवणूक केली. आफ्रिकेतील प्रत्येक देशाचे अर्थकारण चीनने प्रभावित केले आहे. तशी तयारी चीनने 50 वर्षापूर्वीच केली होती. आता धोरण आखायचे नि पन्नास वर्षानी अंमलबजावणी- हे चीनच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण. एकाच वेळी भारत, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, तैवान, हाँगकाँगला चीनने अस्वस्थ केले आहे. 

युद्ध आणि तहातदेखील चीनला मात द्यायची असल्यास एक मोठी पिढीच आपल्याला चीनच्या अभ्यासासाठी रुजवावी लागेल. चिनी भाषा जाणणारे परराष्ट्र खात्यातील अधिकारी, भाषांतरकार वगळले तर आपल्याकडे भारतात चीनचे जाणकार अगदीच विरळा.  शाळा- महाविद्यालयांत भारत-चीन युद्धाचा इतिहास शिकवताना धोरणीपणाऐवजी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हीच भावनिक मांडणी आपण करीत आलो. प्रवासवर्णनातून उमजणारी ‘चिनी माती’ आता बदलली आहे. तिचा रंग, पोत, स्वभाव बदलला आहे. आपण मात्र ‘कधी कुणावर आक्रमण केले नाही’ या उदात्त विचारांची पेरणी करीत राहिलो, आणि आता वर्तमान स्थिती अनुभवतो आहोत.  स्वदेशीचा आग्रह धरताना आपल्याला वस्तुस्थितीचे भान राखून माहिती तंत्रज्ञान, डेटा क्लाऊड सेंटर्स (हे चीनचे अजून अस्र) क्षेत्रचा पुर्नविचार करावा लागेल. पर्यावरण रक्षणासाठी आपण सरसकट इलेक्ट्रिक वाहनांचे प्रचार धोरण स्वीकारले. या वाहनांमध्ये लागणा:या बॅटरीतील महत्त्वाचा घटक लिथिअमसाठी भारताचे या घडीला पूर्ण अवलंबित्व चीनवरच आहे. आंतरराष्ट्रीय संबंध गुंतागुंतीचे असतात. चीन-भारत नात्याची गुंतागूंत कमी-जास्त होतच राहील; पण गलवान खो:यातील घटनेमुळे संबंध पूर्वीसारखे नसतील. मुळात आपण पाश्चिमात्यांच्या प्रभावाखाली असल्याने जगाकडे पाहण्याची दृष्टीही तीच असते. संकटकाळी मग बलाढय़ देशांकडे पाहण्याची वेळ येते. आत्मनिर्भर होताना याचेही भान राखण्याची गरज आहे. लोकसहभाग, सामूहिक प्रय} या नव्या दिशाही आपल्याला चीनबाबतच्या आपल्या धोरणात समाविष्ट कराव्या लागतील. चिनी  भाषा शिकणो, चीनचा अभ्यास करणा:या संस्था, व्यक्ती, विद्यापीठांना आर्थिकदृष्टय़ा  सक्षम करणो आदी मार्गानीच पुढच्या पाच दशकांची आखणी करता येईल. कारण आता ती वेळ आली आहे!

(‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीत विशेष प्रतिनिधी असलेले लेखक संशोधन-शिष्यवृत्ती घेऊन चीनमध्ये दोन वर्षे वास्तव्याला होते)