शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

dinosaurs: डायनासोर खरंच पुन्हा जिवंत होईल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:30 PM

dinosaurs: नैसर्गिक पद्धतीने डायनासोर पुन्हा अस्तित्वात येईल की नाही माहीत नाही; पण विज्ञानातील प्रगतीमुळे संशोधकांच्या हाती भविष्य सुरक्षित जुरासिक पार्कमध्ये डायनासोरचे ज्याप्रकारे अस्तित्व दाखविण्यात आले आहे, तसेच चित्र पृथ्वीवर पुन्हा उमटल्यास त्यात माणसाचे अस्तित्व कितपत उरेल किंवा माणसाने पृथ्वीवर आज जेवढी जागा व्यापली आहे, तितकी त्याच्याकडे भविष्यात राहील का, असाही प्रश्न शास्त्रज्ञांच्या मनात आहे. अस्तित्व नष्ट झालेले टास्मानियन वाघ किंवा डायनासोरसारख्या प्राण्यांचे पुनरुज्जीवन करणे हा काहींना पैशाचा अपव्यय वाटतो. जे नष्ट झाले ते गेले, ते पुन्हा परत आणण्याचा व्याप कशाला करत आहात, असाही प्रश्न विचारणारे महाभाग आहेतच; पण अशा प्रश्नांच्या पलीकडे जाऊन विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही मोजके लोक पाहत असतात. म्हणून तर त्यांना संशोधक म्हणतात. नष्ट झालेल्या डायनासोरचे भवितव्य अशाच संशोधकांच्या हाती सुरक्षित आहे.हे स्वप्न सत्यात उतरू शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.

 - समीर परांजपे(मुख्य उपसंपादक)जगातून विविध कारणांमुळे नष्ट झालेले प्राणी पुन्हा अस्तित्वात येऊ शकतात का? अनेक लोकांना पडलेल्या या प्रश्नावर जनुकीय विज्ञान, डीएनएसारख्या गोष्टींनी काही सकारात्मक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीवर साधारण ६.६ कोटी वर्षांपूर्वी १५ किलोमीटर रुंदीचा एक अशनी कोसळला होता. हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबाम्बपेक्षा १० अब्ज जास्त तीव्रतेचा त्याचा आघात होता. त्यामुळे पृथ्वीवरील सर्व वातावरण होरपळले व ७५ टक्के सजीव नष्ट झाले होते. त्यावेळी लहान आकार व पंख असलेले व त्यामुळे उडू शकणारे डायनासोर वाचले. मोठ्या आकाराचे तसेच उडू शकणारे डायनासोर नामशेष झाले.पृथ्वीवर डायनासोरचे विश्व कसे असेल अशी कल्पना करून १९९० साली जुरासिक पार्क नावाची कादंबरी लिहिली गेली. त्यावर १९९२ साली चित्रपट निघाला. डायनासोर हा महाभयानक प्राणी असल्यामुळे तसा त्याचा आवाज व इतर वैशिष्ट्ये दाखविणे आवश्यक होते. ते अत्याधुनिक तंत्राच्या साहाय्याने चित्रपटात दाखविण्यात आले. जुरासिक पार्क चित्रपटात आपण जे पाहतो ते कधीतरी या पृथ्वीतलावर पुन्हा अस्तित्वात येईल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला असेलच. नैसर्गिक पद्धतीने डायनासोर पुन्हा अस्तित्वात येईल की नाही माहीत नाही; पण विज्ञानातील प्रगतीमुळे हे स्वप्न सत्यात उतरू शकेल असे शास्त्रज्ञांना वाटत आहे.

पुन्हा अस्तित्व कसे गवसेल? १९३०ची गोष्ट. टास्मानियन वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवटच्या प्राण्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि हा प्राणीच पृथ्वीतलावरून नाहीसा झाला. कोलोसल बायोसायन्सेस ही कंपनी व मेलबर्न विद्यापीठाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. जनुक संपादन तंत्रज्ञानाचा वापर करून टास्मानियन वाघाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम या प्रकल्पात करण्यात येईल. अशी प्रेरणा जुरासिक पार्क या चित्रपटापासून मिळाली. यासाठी कोलोसल बायोसायन्सेस कंपनीने ७५ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे. टास्मानियन वाघ या प्राण्याशी खूप साधर्म्य असलेल्या प्राण्यातील पेशीला डनर्ट किंवा नुम्बॅट - थायलासिन सेलमध्ये बदलण्यासाठी जनुक संपादन तंत्राचा वापर करण्याची योजना आहे. पेट्री डिशमध्ये किंवा जिवंत प्राण्याच्या गर्भाशयात भ्रूण तयार करण्यासाठी या थायलासिन पेशी लागतील. नेमके याच तंत्रज्ञानाचा वापर डायनासोर याच्या पुनरुज्जीवनासाठी करता येईल, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

संशोधकांच्या हाती भविष्य सुरक्षितजुरासिक पार्कमध्ये डायनासोरचे ज्याप्रकारे अस्तित्व दाखविण्यात आले आहे, तसेच चित्र पृथ्वीवर पुन्हा उमटल्यास त्यात माणसाचे अस्तित्व कितपत उरेल किंवा माणसाने पृथ्वीवर आज जेवढी जागा व्यापली आहे, तितकी त्याच्याकडे भविष्यात राहील का, असाही प्रश्न शास्त्रज्ञांच्या मनात आहे. अस्तित्व नष्ट झालेले टास्मानियन वाघ किंवा डायनासोरसारख्या प्राण्यांचे पुनरुज्जीवन करणे हा काहींना पैशाचा अपव्यय वाटतो. जे नष्ट झाले ते गेले, ते पुन्हा परत आणण्याचा व्याप कशाला करत आहात, असाही प्रश्न विचारणारे महाभाग आहेतच; पण अशा प्रश्नांच्या पलीकडे जाऊन विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही मोजके लोक पाहत असतात. म्हणून तर त्यांना संशोधक म्हणतात. नष्ट झालेल्या डायनासोरचे भवितव्य अशाच संशोधकांच्या हाती सुरक्षित आहे.

कसा होता डायनासोर? पृथ्वीवर १६ कोटी वर्षांपूर्वी डायनासोर या प्राण्याचे वर्चस्व होते. त्याच्या ९ हजारांहून अधिक जाती अस्तित्वात होत्या. त्यातील काहींमध्ये उडण्याची क्षमता होती. अतिविशाल आकाराबरोबरच माणसाच्या आकाराचेही डायनासोर पृथ्वीतलावर होते. त्यातले काही शाकाहारी, मांसाहारी, काही व्दिपाद, काही चतुष्पाद होते. मादागास्कर बेटांमध्ये डायनासोरच्या पायांचे अवशेष आढळले. त्यांच्या रचनेवरून डायनासोर मांसाहारीही होते हे कळले. आपला पाय उचलून पावलामार्फत जोरदार प्रहार करण्याची क्षमता डायनासोरमध्ये होती. त्यामुळे शिकार रक्तबंबाळ होऊन गतप्राण होत असे. आशिया, आफ्रिका, युरोप व उत्तर अमेरिका खंडात डायनासोरचे जीवाश्म, अंडी अशा गोष्टी सापडल्या आहेत. त्याच्या आधारे शास्त्रज्ञांनी डायनासोरच्या जगण्याचा वेध घेतला.

पृथ्वीवर १६ कोटी  वर्षांपूर्वी डायनासोर या प्राण्याचे वर्चस्व होते. त्याच्या ९ हजारांहून अधिक  जाती अस्तित्वात होत्या. 

टॅग्स :scienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय