शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

मकसद.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 6:03 AM

नव्वदीच्या दशकात मी भारतात आले तेंव्हा  या देशाचे संगीत मला माझ्या आयुष्याचा  जोडीदारही मिळवून देईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.  कलाकार म्हणून वेळोवेळी मिळणार्‍या सन्मानापेक्षाही  जगण्याला हेतू देणारा तो अनुभव अधिक रोमांचकारी होता. पण दिल्लीच्या निजामुद्दीन वस्तीतील मुलांना  गाणे शिकवण्याच्या अनुभवाने या कहाणीत एकदम नवा रंग भरला. त्यानंतर संगीत मुलांपर्यंत आनंदाने नेणारे दूत तयार करणे, याच ध्यासाने आम्हाला झपाटून टाकले.

ठळक मुद्देअभिजात भारतीय संगीतासाठी जीव वेचणार्‍या परदेशी साधकांच्या दुनियेत

- सास्कीया हास-राव

दिल्लीमधील सर्वात जुनी बस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या निझामुद्दीन बस्तीमधील चिंचोळ्या गल्ल्या, त्या गल्ल्यांमध्ये एकमेकांच्या अंगावर रेलून उभ्या असलेल्या छोट्या-छोट्या खोल्यांच्या भिंती आणि गळकी छपरं..सगळ्यांचे कान त्या दिवशी वस्तीमधील एका जुनाट खोलीकडे लागले होते. खोलीच्या दाराबाहेर उत्सुक बघ्यांची ही गर्दी, तर खोलीत, तीन वर्षांपासून वीस वर्षांपर्यंतच्या मुलांची अस्वस्थ चुळबुळ. कोणी, बस्तीत गाणे शिकवायला आलेल्या आम्हा पाहुण्यांना (आणि मी तर गोरी पाहुणी!) बघण्यासाठी आलेले, तर बाकी सगळी बस्ती या संगीत शिक्षण नावाच्या आमच्या नव्या उद्योगाविषयी कुतूहल म्हणून डोकवायला आलेले. एरवी फक्त कव्वाली आणि मुशायरे कानावर पडणार्‍या बस्तीत त्या दिवशी प्रथमच मुलांना कोणीतरी गाणे शिकवायला येत होते. ‘आदाब, सलाम, नमस्ते, आप कैसे है?’ असे रोजचे जाता-येता म्हटले जाणारे उपचाराचे शब्द चालीत आणि ठेक्यात म्हणायला शिकवत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे असे काही शिकायला मुलांना मनापासून आवडत होते. एखादे गाणे आपल्या मित्नांसोबत एका स्वरात, एकत्न म्हणण्याची मजा ते प्रथमच अनुभवत होते. आणि मीही..! माझ्यासाठी हा अनुभव केवळ नवा, वेगळा नव्हता तर अगदी अविश्वसनीय असा होता. माझाच विश्वास बसू नये असा. आणि बसणार तरी कसा? अँमस्टरडॅमच्या सीमेवरील सुंदर, निवांत गाव आणि त्या गावातील प्रसन्न संगीत ते निझामुद्दीन नावाची, आपल्या धर्माची जागोजागी ओळख देणारी बस्ती हा माझा प्रवास मीच आजही कित्येकदा चकित होऊन पुन्हा-पुन्हा बघत असते आणि तो करणारी मीच आहे हे स्वत:ला परत-परत सांगत असते..! या प्रवासाचे र्शेय माझे कसे? ते र्शेय जगण्याच्या अतक्र्य वाटा माझ्यासमोर उलगडणार्‍या आणि माझे बोट धरून त्यावर मला नेणार्‍या संगीताच्या सुरांचे..नव्वदीच्या दशकात मी भारतात आले तेंव्हा या देशाचे संगीत मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळवून देईल असे सांगणारे मला कोणी भेटले असते तर मी त्याला वेड्यात काढले असते. तेव्हां मनात ओढ होती ती इथल्या संगीताची. कुतूहल होते ते मौखिक परंपरेने शिकवल्या जाणार्‍या गुरु -शिष्य नात्याबद्दल आणि मनात नितांत आदर होता संगीताच्या साधनेसाठी न कुरकुरता कितीतरी वर्ष देणार्‍या कलाकारांबद्दल.! पण माझ्या सुदैवाने मला असाच गुरु -शिष्य परंपरेत राहिलेला एक कलाकार आधी मित्न म्हणून मिळाला आणि अगदी सहज त्याचे प्रेमात रु पांतर झाले. ‘इस्ट मीट वेस्ट’ हे वास्तव रंगमंचापुरते कलेच्या प्रांताने, विशेषत: जगभरातील संगीताने स्वीकारले होते, पण मी आणि शुभेंद्र राव, आम्ही ‘इस्ट मॅरी वेस्ट’ हे नवे समीकरण रूढ आणि यशस्वी केले. संगीताची, स्वरांची भाषा ज्यांना येते, समजते, त्यांना अन्य कोणतीही भाषा संवादासाठी गरजेची नसते हे सिध्द करणारे असेच आमचे लग्न होते. सतारवादक शुभेंद्र हे पंडित रविशंकर यांचे शिष्य. आमच्या दोघांच्या कुटुंबांत संगीत परंपरेने आलेले. आधी शुभेन्द्रचे वडील रविशंकरजींचे शिष्य होते. मग, दहा वर्षं गुरूच्या घरी राहून शिक्षण घेण्याचे भाग्य शुभेंद्र यांना लाभले. आमची दोघांची वाद्यं निराळी, दोघे संगीत शिकलो, ती शिक्षण पद्धती भिन्न आणि आपले संगीत सादर करण्याची पद्धती पण अगदी वेगळी. आणि तरीही लग्नानंतर आम्ही अनेक संगीत सभांमध्ये जुगलबंदी करू लागलो. चेलो नावाचे भारतीयांना अनोखे असणारे वाद्य आणि सतार नावाचे भारतीयांसाठी जिव्हाळ्याचे असलेले वाद्य, यांची जुगलबंदी. कसे जमते या दोन वाद्यांचे? आणि ते वाजवणार्‍या पती-पत्नीचे? मैफलीपूर्वी उत्सुक समीक्षक आणि र्शोते यांच्या चौकस नजरांमध्ये असलेले अनेक प्रश्न आम्हाला दिसत असत. पण आम्हा दोघांना आमच्या वाद्यांची सार्मथ्यस्थळे ठाऊक होती. चेलो हे मानवी, विशेषत: पुरु षाच्या स्वरांशी खूप जवळचे नाते सांगणारे वाद्य आणि सतार हे कोणत्याही वाद्याशी आणि त्याच्या स्वरांशी सहजपणे जमवून घेणारे मोकळ्या मनाचे वाद्य. आम्हाला आमच्या वाद्यांना परस्परांशी जमवून घेणे सहज जमले. आणि एकदा वाद्य हातात घेतले कि त्या क्षणी सर्वोत्तम ते द्यायचे हे कलाकार म्हणून आमचे दोघांचे मूल्य आहे. त्यामुळे आजवर कलाकाराचा अहंकार वगैरे प्रश्न कधी आमच्या जुगलबंदीमध्ये आडवे आले नाहीत. खरंतर कहाणीचा हा टप्पा म्हणजे,  ‘आणि ते सुखाने मैफली करीत जगू लागले’ असे भरतवाक्य लिहावे अशी वेळ. कारण कलाकार असलेल्या नवरा-बायकोचे आयुष्य ज्या मार्गाने जाते आणि जात राहते त्यात नवीन असे घडणार ते काय? बदलत जातो तो फक्त तपशील. पण आमच्या कहाणीत यापेक्षा काही वेगळे घडले. कलाकार म्हणून वेळोवेळी मिळणार्‍या सन्मान आणि यशापेक्षा अधिक रोमांचकारी. जगण्याला हेतू देणारे. त्याने या कहाणीत एकदम नवा रंग भरला..हा रंग भरला तो निजामुद्दीन वस्तीतील मुलांना गाणे शिकवण्याच्या अनुभवाने. आणि त्यापूर्वी आमच्या दोघांच्या मनात सुरु  झालेल्या असंख्य प्रश्नांनी. आमचा मुलगा इशान तेव्हा लहान होता आणि या वयात घरात अखंड सुरु  असलेल्या संगीताचा त्याच्यावर होत असलेला परिणाम आम्ही बघत होतो. आमच्या मनात एकच प्रश्न होता, आणि तो म्हणजे, लहान वयापासून शाळेत आपल्या मुलांना संगीताची ओळख आपण का करून देत नाही? आईच्या (आणि अनेकदा बाबांच्याही) कुशीत अंगाई गीत ऐकत वाढणार्‍या, कुशीत असताना नियमित पडणारे हृदयाचे ठोके ऐकतांना त्याला स्वर आणि लयीची ओळख सहजतेने होतच असते. मग उघडतात शाळेचे दरवाजे, त्यातून एकदा आत गेले की असते गणीत, शास्त्न आणि इतिहासाचे राज्य.! संगीत जवळजवळ वज्र्यच.  या अभ्यासक्र माची मजा अशी की, ज्या मुलांना गणीत किंवा सायन्स येत नाही त्यांना ते सोडता येत नाही, पण ज्यांना स्वरज्ञान नाही किंवा गोड गळा नाही (?) त्यांना संगीत  विषय सोडण्याचा पर्याय मात्न तत्परतेने उपलब्ध असतो. संवेदनशील आणि विचारी व्यक्ती घडण्याच्या प्रवासात, मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी संगीताचा वाटा सिंहाचा. शरीरासाठी जसा व्यायाम हवा, तसे मन सुदृढ करण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या पातळीवर संगीत हवेच असे संशोधन सांगते. त्यासाठी आपला वाटा देण्याच्या हेतूने मग आम्ही स्थापन केले सास्कीया-शुभेंद्र फाऊण्डेशन आणि त्याद्वारे सुरु  केला ‘म्युझिक फॉर ऑल’ हा उपक्र म. याचे ध्येय काय?.- ‘संगीत म्हणजे चैन, मजा’, हा त्याच्यावर अन्याय करणारा दृष्टिकोन बदलून ती एक आवश्यक बाब आहे हे सत्य समाजात रु जावे. शांतपणे परस्परांशी संवाद करणारा संयम शिकवणारे, बुद्धीला तरतरी देणारे आणि समुदायाला एकत्न बांधण्याची ताकद असणारे संगीत हा अभ्यासक्र माचा एक भाग व्हायला हवा. आणि आमचे मिशन? भारतीय दृष्टिकोनातून संगीताच्या जागतिक संकल्पनांची ओळख देणारा सशक्त अभ्यासक्र म बनवून त्याचे शिक्षकांना प्रशिक्षण देणे. म्हणजे, संगीत मुलांपर्यंत आनंदाने नेणारे दूत तयार करणे. आणि मग शालेय वयातच जगभरातील जाणते कलाकार, त्यांची कला याची मुलांना ओळख करून देणे. भारतीय संगीत म्हणजे केवळ राग, त्यातील, लोकांना अनाकलनीय वाटणारे आलाप आणि ताना, बंदिशीच्या न समजणार्‍या चार ओळी हे अजिबात नाही. जगण्याला शहाणपण देणारे, त्यासाठी आवश्यक दृष्टिकोन देणारे असे त्यात आहे, हे सोप्या तर्‍हेने सांगण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या फाऊण्डेशन मार्फत करतो आहोत. या प्रयत्नांमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे संगीत ही समाजातील कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नाही. ज्याला परवडेल त्यालाच हे शिक्षण मिळणे म्हणजे त्याचा अवकाश र्मयादित करणे आहे. ते असे आयसोलेटेड राहून चालणार नाही, प्रत्येकाच्या जगण्याशी ते जोडण्यासाठी काय करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. आम्ही आमच्या फाऊण्डेशनमार्फत जे शिकवतो त्याला आम्ही ‘ग्लोकल’ म्हणजे ग्लोबल आणि लोकल हे दोन्ही प्रवाह एकत्न येऊन घडलेले संगीत  म्हणतो.‘होप’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे आम्ही आमच्या मनातील हे संगीत निजामुद्दीन बस्तीमधील मुलांना शिकवले. कमालीच्या वंचित वर्गातील या स्थलांतरितांच्या मुलांचा कॉयर बालदिनी दिल्लीतील एका ऐटबाज, झगमगीत मॉलमध्ये शेकडो दिल्लीकरांनी ऐकला, तो क्षण केवळ आमच्यासाठी नाही, पण त्या मुलांचे आयुष्य आरपार बदलणारा होता.. आपण कलाकार आहोत आणि संगीत आपल्या आयुष्यात आहे याचा असीम आनंद आपल्याला आहे ही भावना मनात असणारी आणि तो आनंद चेहर्‍यावर व्यक्त करणारी शेकडो मुले आमच्या स्वप्नात येत असतात. आम्हाला नव्या-नव्या गोष्टी करण्याची प्रेरणा देत असतात. तोच आमच्या जीवनाचा आता मकसद आहे..सास्कीया हास-रावसास्कीया हास-राव या नेदरलँड्समध्ये ‘चेलो’ हे वाद्य शिकत असताना भारतीय संगीताबद्दलच्या कमालीच्या ओढीने भारतात वाद्यवादन शिकण्यासाठी आल्या. नव्वदीच्या दशकात जे अनेक परदेशी कलाकार भारतात संगीत शिकण्यासाठी आले, त्यापैकी त्या एक. जागतिक कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याखेरीज सतारवादक शुभेंद्र राव, व्हायोलीनवादक पंडित डी. के. दातार, गायिका मालती मुटाटकर अशा विविध गुरूंकडे त्यांनी शिक्षण घेतले. ‘चेलो’मध्ये भारतीय गरजेनुसार बदल करीत त्याला स्वतंत्न मैफलीचे वाद्य बनवण्याचे र्शेय त्यांच्याकडे जाते. देशासह जगभरातील सर्व प्रसिद्ध संगीत महोत्सवात त्या आणि त्यांचे पती शुभेंद्र राव यांची जुगलबंदी झालेली आहे. त्या प्रवासाचा हा उत्तरार्ध(उत्तरार्ध) 

मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रेvratre@gmail.com(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)