शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

मनोरुग्णांच्या जगात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 6:10 AM

तो अचानक उठला,  हातातली नारळाची करवंटी त्यानं  जवळून वाहणार्‍या गटारात बुचकळली आणि  ते पाणी तो घटाघटा प्यायला.  त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. 

ठळक मुद्देडॉ. भरत वटवानी लिखित, ‘मेनका प्रकाशना’चे ‘बेदखल’ हे पुस्तक 10 फेब्रुवारी रोजी पुण्यात प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्त.

- डॉ. भरत वटवानी

माझी पत्नी आणि मी एका रेस्तराँमध्ये बसलो होतो. रस्त्याच्या पलीकडे एक तरुण मुलगा दिसला. हाडांचा सापळाच. केस पिंजारलेले आणि एकूणच अत्यंत गलिच्छ अवस्थेत. प्रामाणिकपणे सांगायचं, तर त्याच्यासाठी काही करावं, असं आमच्या मनातही आलं नाही; पण आम्ही दोघंही मानसोपचारतज्ज्ञ. त्यामुळे तो स्किझोफ्रेनियाचा रु ग्ण आहे, हे आम्हाला कळत होतं. आम्ही आमच्या बसल्या जागेवरून त्याला पाहत असतानाच तो अचानक उठला, हातातली नारळाची करवंटी त्यानं जवळून वाहणार्‍या गटारात बुचकळली आणि ते पाणी तो घटाघटा प्यायला. त्या एका घटनेनं आमच्या आयुष्याला कलाटणी दिली. गटारातलं पाणी पिण्याच्या त्याच्या त्या कृतीचा आम्हाला एवढा धक्का बसला, की आपण काय करतो आहोत याचा शांत डोक्यानं विचारही न करता आम्ही दोघं रस्त्याच्या पलीकडे अगदी उत्स्फूर्तपणे धावलो. ‘आमच्याबरोबर येतोस का’, असं त्याला विचारलं. तो लगेच तयार झाला. अगदीच खंगलेल्या अवस्थेत असल्यानं त्याला आधार देऊन आम्ही नुकत्याच सुरू केलेल्या आमच्या खासगी रु ग्णालयात त्याला आणणं अवघड गेलं नाही.लग्नामध्ये स्मिताला भेट म्हणून मिळालेले दागिने विकून आणि आमची जागा बँकेकडे कर्जासाठी गहाण ठेवून आम्ही आमचं रु ग्णालय उभारलं होतं. आम्हाला पूर्णपणे अपरिचित असलेला, अगदी अचानक भेटलेला तो तरुण त्या रुग्णालयात दाखल होणारा स्किझोफ्रेनियाचा पहिला मनोरुग्ण. आवश्यक ते औषधोपचार करून आम्ही त्याची शुर्शूषा केली. हळूहळू तो बरा झाला. दोन आठवड्यांनंतर तो आमच्याशी इंग्रजीत बोलायला लागला, तेव्हा आम्हाला कमालीचं आश्चर्य वाटलं. तो विज्ञानाचा पदवीधर होता, असं लक्षात आलं. ‘डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी’ (‘डीएमएलटी’) ही पदविका मिळवून नोकरीच्या शोधात तो मुंबईला आला; पण नोकरी न मिळाल्यानं नैराश्याच्या गर्तेत गेला आणि मनोरुग्ण होऊन रस्त्यावर आला.संपर्कासाठी पोस्टानं पत्र पाठवायचा तो काळ. त्यामुळे त्याच्याकडून त्याच्या वडिलांचा तपशीलवार पत्ता घेऊन आम्ही त्यांना पत्र पाठवलं. गेलं वर्षभर बेपत्ता मुलाचा शोध घेता घेता ते घायकुतीला आले होते. त्यामुळे पत्र मिळाल्यावर ते तातडीनं विमानानं हैदराबादहून मुंबईला येऊन धडकले. त्यांचं त्वरित येणं हे आमच्यासाठी सुखदाश्चर्य होतं. आंध्र प्रदेशातल्या कडाप्पा जिल्हा परिषदेचे पर्यवेक्षक (सुपरिंटेण्डण्ट) या मोठय़ा जबाबदारीच्या पदावर ते काम करत होते. याचा अर्थ एवढाच, की अगदी उत्तमातली उत्तम पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलासुद्धा मानसिक आजारपण येऊ शकतं आणि त्यातून त्या व्यक्तीची अतिशय दयनीय अवस्था होऊ शकते.रस्त्यात कितीदा तरी स्वत:च्याच जगात हरवलेले, दिशाहीन फिरणारे अभागी स्री-पुरुष आपल्याला दिसत असतात. स्वत:शी बडबडणारे, मधूनच मोठय़ांदा हसणारे. डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेल्या लांब, अस्वच्छ केसांचं टोपलं, अंगावर धड कपडे नाहीत, आणि शरीर म्हणजे हाडांचा सापळाच. कचरापेटीतले अन्नकण किंवा येणार्‍या-जाणार्‍यानं त्यांच्या दिशेनं फेकलेलं स्वत:चं उरलेलं खरकटं अन्न खाऊन आणि गटाराचं पाणी पिऊन त्यांची जेमतेम गुजराण होत असते. मानवी प्रतिष्ठेचा लवलेशही त्यांच्या वाट्याला येत नाही. पण इतकं सगळं असलं, तरी तीही ‘माणसं’च आहेत ! हे जाणवल्यामुळे माझ्या पत्नीनं आणि मी 1988मध्ये ‘र्शद्धा रिहॅबिलिटेशन फाउण्डेशन’ची स्थापना केली. वर उल्लेख केलेल्या रस्तोरस्ती भटकणार्‍या निराधार, दुर्लक्षित मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी ही संस्था काम करते. (‘बेदखल’ या पुस्तकाच्या एका प्रकरणातील संक्षिप्त भाग.)