शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘झेडपी’च्या डिजिटल शाळा, प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 4:38 PM

‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी! नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!

- भाऊसाहेब चासकर‘झेडपी’च्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी!नशिबी कायम चणचण, ओसाड पडक्या इमारती आणि सगळ्यांची दूषणे!!त्यातून गावखेड्यातली मुले निसर्गाच्या साथीत रमणारी.त्यांना बंद वर्गखोलीत बसून शिक्षकांची भाषणे ऐकणे नकोसे होते.मन रमत नाही. मग शाळेत यावेसे वाटत नाही. शेत खुणावते.डोंगर खुणावतात. झाडे बोलावतात. न कळणारे इंग्रजी घोकण्यापेक्षामोकळ्या रानात गुरे वळायला जाणे जास्त मजेचेच असते....पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातल्या खेडोपाडीची, वाडीवस्त्यांवरची मुलेशहरी कॉन्व्हेण्टवाल्यांना टक्कर देत डिजिटल जगाच्या सफरीवर निघाली आहेत. या शाळांच्या भिंती चित्रांनी सजल्या आहेत.आधीच्या ओसाड अंगणात झाडांची, पक्ष्यांची गजबज आहे.शाळेत कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टर, टॅब्लेट, लॅपटॉप आणिवेब कॅमेरे आले आहेत.अनेक शाळांनी स्वत:च्या व्हर्च्युअल लॅब, डिजिटल स्टुडिओ उभारले आहेत. आॅगमेण्टेड रिअ‍ॅलिटी बुक्स वापरून खुर्द - बुद्रुकमधल्या वर्गांत पाठ्यपुस्तके जिवंत होऊ लागली आहेत.स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप, स्काइप अशी साधी साधने वापरूनही मुले जगाशी जोडली जात आहेत.... ही जादू कुणी केली?धडपड्या तंत्रस्नेही तरुण शिक्षकांनी !!!पदरमोड करून, मदत मागून, गावातून लोकसहभाग मिळवूनया शिक्षकांनी आपापल्या शाळांचा ‘सरकारी’ नक्षाचबदलून टाकला आहे.इटस ओके, नॉट टू बी ओके!

- आलिया भट‘जमतं आपल्याला’ हा एक ट्रॅप आहे.- हल्ली मी हे लक्षात ठेवते.आज लोक मला बेस्ट म्हणतात; पण उद्या माझ्यापेक्षा बेटर कुणीतरी येईल.आपल्यापेक्षा सर्वार्थानं बेटर असं कुणीतरी असतंच या जगात.त्यानं आपली जागा घेतली की आपण आउट! मग आपण काय करायचं?आपलं असं एक इन्स्टिंक्ट असतं, ते दाखवील त्या दिशेने जायचं.जाता-येता अखंड प्लॅनिंग-प्लॅनिंगचा खेळ नाही खेळायचा.सतत फार विचारबिचार करून निर्णय घेतले कीत्या निर्णयांतली सगळी गंमतनिघून जाते.

शेतात जेव्हा वीज  पिकते - समीर मराठेधुंडी हे गुजरातच्या खेडा जिल्ह्यातलं तिनेकशे उंबºयांचं छोटंसं खेडं.गावात कोणाकडेच मोठी शेती नाही. कोणी श्रीमंत नाही. बहुतेकांकडे दोन-तीन एकर शेती.पण याच गावातल्या काही शेतकºयांनी एकत्र येऊन एक जगावेगळं पीक आपल्या जमिनीच्या तुकड्यांवर लावलं आहे. त्याला बियाणांची, खतांची, कीटकनाशकांची,मजुरांची कसलीच गरज नाही. पाण्याचीही गरज नाही, पुराचा फटका बसत नाही, रोगराईनं हे पीक मरत नाही. दुष्काळही त्याचं काही वाकडं करू शकत नाही. उलट दुष्काळ उत्तम.अंग भाजून काढणारं ऊन या पिकाला भलतं मानवतं.धुंडीच्या शेतकºयांनी लोखंडी खांब रोवून वर टांगलेल्याया अनोख्या शेतीमध्ये भारतीय शेतकºयांचं नशीब बदलण्याची जादू आहे.धुंडीतले अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?- तर वीज!सौरऊर्जा.स्वत:च्या वापरापुरती वीज सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे;पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी सहकारी तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं आणिजगातलंही पहिलं गाव आहे.

अक्षय पात्र

- सायली राजाध्यक्षकृष्णाच्या थाळीतलं अन्न कधी संपत नसे म्हणतात.मी अशाच एका स्वयंपाकघरात पोहचले होते. हुबळी आणि धारवाड या दोन देखण्या गावांच्या मध्ये आशिया खंडातलं हे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे. इथं रोज सकाळी १२००० ते १५००० किलो गरमागरम भात शिजतो.तब्बल २५ हजार लिटर सांबार तयार होतं. या सांबारासाठी ८००० ते ९००० किलो भाज्यांचा वापर केला जातो. ज्या दिवशी गव्हाचं पायसम किंवा हुग्गी (एक प्रकारचा शिरा) असतं,त्या दिवशी इथं शिजलेल्या साजूक तुपातल्या हुग्गीचं वजन असतं ७०००० किलो.स्वयंपाकाला सुरुवात होते पहाटे साडेतीन वाजता. साडेआठच्या आत सगळे पदार्थ तयार असतात. अवघ्या चार तासांत तयार झालेलं हे अन्न मग इन्सुलेटेड वाहनांमधून हुबळीच्या जवळच्या शाळांच्या दिशेनं धावायला लागतं.ठरवून दिलेल्या वेळात एकूण ८०७ शाळांपर्यंत पोहचतं.त्या शाळांमधली १,३६,१११ मुलं रोज दुपारी अंगतपंगत करून जेवतात.