लॉकडाऊनमध्येही गली क्रिकेटचा आनंद, बेजबाबदार तरुणांवर संतापली मराठमोळी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 07:51 PM2021-04-17T19:51:47+5:302021-04-17T19:58:52+5:30
महाराष्ट्रात लाॅकडाऊन आहे मग आयपीएलचे सामने कसे सुरू असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रात दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी संचारबंदीसह कठोर नियम लागू केले आहेत. बागबगिचे, मैदानं, मॉल, सिनेमागृह, बीच यासारखी गर्दीची ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे सगळंच पुन्हा एकदा बंद झाल्याने उदरनिर्वाहासाठी अनेकांना हालाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय. मात्र, अनकेजण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत.
अभिनेत्री हेमांगी कवीने गल्तीत आणि मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्यांचे फोटो फेसबुकवरुन शेअर करत बेजबादार युवकांना टोला लगावला आहे. यांसारख्यांना 15 वर्षे जरी लॉकडाऊन लावला तरी काही फरक पडणार नाही, असेही तिने म्हटलंय.
*IPL पेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे *रस्त्यावर यायच्या आधी 14 दिवस यांना quarantine करण्यात आलं होतं *दर ७२...
Posted by Hemangi Kavi-Dhumal on Saturday, 17 April 2021
सोशल मीडियावर तिने भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये हेमांगीने म्हटलंय,आयपीएलपेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे.रस्त्यावर यायच्या आधी 14 दिवस यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. दर ७२ तासांनी या सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते.दर 1 तासाने बॅट आणि बॉल सॅनिटाईज करण्यात येत आहेत. मास्क न लावता खेळण्याची परवानगी काढण्यात आलेली आहे ( मास्क घालून कसं खेळणार, रन्स कमी नाही का होणार,वेडीच आहे मी)
ब्रेक टाईममध्ये शक्तिवर्धक काढा पेय म्हणून देण्यात येत आहे. खेळून झाल्यावर या सर्व खेळाडूंना सोशल बबलमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे. बॅकगाऊंडला दर दोना तासांनी अँम्बुलन्सच्या आवाजाने खेळाची रंजकता अजूनच वाढतेय.तर, कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की लॉकडाऊन अजून 15 दिवस काय 15 वर्ष लागला तरी काही हरकत नाही. : खेळा क्रिकेट आणि काढा कोरोनाची विकेट.- एक जबाबदार (जळखाऊ) नागरिक. असा खोचक टोमणा तिने गली क्रिकेटच्या गली बॉयला लगावला आहे.