आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:22 PM2021-02-02T16:22:25+5:302021-02-02T16:27:26+5:30

महेश मांजरेकर दिग्‍दर्शित या सिरीजमध्‍ये अभय देओल व सुमीत व्‍यास यांच्‍यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्‍यात येतील.

Akash Thosar Roped in for 1962: The War In The Hills; calls it his “dream role” | आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

googlenewsNext

'सैराट' चित्रपटामधून प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता या सिरीजमध्‍ये प्रमुख भूमिकेत दिसणार वास्‍तविक घटनांमधून प्रेरित सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' फक्‍त डिस्ने+ हॉटस्‍टार व्‍हीआयपी आणि डिस्ने+ हॉटस्‍टार प्रिमिअमच्‍या सबस्‍क्रायबर्ससाठी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठी चित्रपट 'सैराट'च्‍या यशानंतर भारतभरात त्‍वरित प्रसिद्धी मिळालेला अभिनेता आकाश ठोसर आता आगामी वॉर-एपिक सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स'मध्‍ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर दिग्‍दर्शित या सिरीजमध्‍ये अभय देओल व सुमीत व्‍यास यांच्‍यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्‍यात येतील. हॉटस्‍टार स्‍पेशल्‍स सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहे. ही सिरीज शौर्य व पराक्रमाची ऐकण्‍यात न आलेली कथा सादर करण्‍यासोबत कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले, त्‍या कथेला देखील दाखवते.

शूरवीरांपैकी एकाच्‍या भूमिकेत दिसण्‍यात येणा-या आकाश ठोसरने नुकतेच सांगितले की, त्‍याचे लष्‍करामध्‍ये जाण्‍याचे बालपणापासून स्‍वप्‍न होते. तो म्‍हणाला, ''सिरीज '१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स' माझ्यासाठी स्‍वप्‍नवत प्रोजेक्ट आहे.

 

बालपणापासून माझे भारतीय सेनेमध्‍ये जाण्‍याचे स्‍वप्‍न होते आणि मी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये येण्‍यापूर्वी लष्‍करामध्‍ये निवड होण्‍यासाठी दोनदा परीक्षा देखील दिली होती. फक्‍त सैन्‍य अधिकारीच नव्‍हे तर मी पोलिस सेवेमध्‍ये देखील दाखल होण्‍याचा प्रयत्‍न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्‍या देशाच्‍या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्‍यामध्‍ये असते.'' 

तो पुढे म्‍हणाला, ''पहिल्‍यांदाच मला सैनिकाची भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली. माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. मला वास्‍तविक जीवनात मिळाली नाही तरी रील जीवनामध्‍ये सैन्‍याचा पोशाख परिधान करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद झाला. मला अत्‍यंत खास वाटले. असे वाटले की, मी सैन्‍याचाच भाग आहे आणि मी स्‍वत:कडे त्‍याच दृष्टिने पाहिन.'' आकाश ठोसर किशनची भूमिका साकारेल, जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्वित बटालियनचा भाग आहे. 
 

Web Title: Akash Thosar Roped in for 1962: The War In The Hills; calls it his “dream role”

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.