भालचंद्र नेमाडे यांच्यावर बायोपिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2016 06:12 AM2016-05-10T06:12:00+5:302016-05-10T11:42:00+5:30
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनपटावर बायोपिक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव उदाहरणार्थ नेमाडे असे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय इंडीकर यांनी केले आहे. कोसला ते हिंदू या उण्यापुºया पाच दशकांच्या साहित्य प्रवासाने मराठी भाषेला एक उंच यशाच्या शिखरावर पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावरील उदाहरणार्थ नेमाडे या डॉक्युफिक्शन चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला.
ज येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनपटावर बायोपिक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव उदाहरणार्थ नेमाडे असे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय इंडीकर यांनी केले आहे. कोसला ते हिंदू या उण्यापुºया पाच दशकांच्या साहित्य प्रवासाने मराठी भाषेला एक उंच यशाच्या शिखरावर पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावरील उदाहरणार्थ नेमाडे या डॉक्युफिक्शन चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये नेमाडे यांच्या पुस्तकातील काही पात्रे आणि जागा पाहायला मिळतात. २७ मे रोजी भालचंद्र नेमाडे यांच्या जन्मदिनी हा चित्रपट सर्व ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात संजय मोरे, केतकी नारायण आणि दस्तुरखुद्द भालचंद्र नेमाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून नेमाडेंचे विचार आणि त्यांचा साहित्यिक प्रवास सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.