चिन्मय उदगीरकर करणार सामाजिक चित्रपट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 01:15 PM2016-12-14T13:15:20+5:302016-12-14T13:22:56+5:30

 बेनझीर जमादार मराठी चित्रपटसृष्ट्रीत आर्थिक, राजकीय, लव्हस्टोरी असे विविध विषयांवर चित्रपट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांचा लाडका ...

Chinmay Udgirkar social film? | चिन्मय उदगीरकर करणार सामाजिक चित्रपट?

चिन्मय उदगीरकर करणार सामाजिक चित्रपट?

googlenewsNext
 बेनझीर जमादार


मराठी चित्रपटसृष्ट्रीत आर्थिक, राजकीय, लव्हस्टोरी असे विविध विषयांवर चित्रपट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता चिन्मय उदगीरकर हा लवकरच एका सामाजिक मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाविषयी चिन्मय लोकमत सीएनएक्सला सांगतो, मला सामाजिक कार्यात सहभाग घेण्यास फार आवडते. मी स्वत:देखील काही सामाजिक काम करत असतो. अशावेळी एका सामाजिक चित्रपटाची स्क्रीप्ट येणे माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे हा चित्रपट करण्यास मी होकार दिला आहे. या चित्रपटात माझ्यासोबत एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा असे चित्रपट करत असल्यामुळे खूप आनंद होत आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की, काही ग्रामीण भाग अजून ही विकासापासून दूर आहेत. अशावेळी गावातील काही माणसे शहरात चांगल्या पदावर काम करत असेल, तर त्यांनी गावाच्या विकासासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. कारण शासन प्रत्येक गावापर्यत पोहोचू शकत नाही. अशावेळी आपल्या गावाची जबाबदारी आपणच घेऊन त्याचा विकास करणे यातच खरा आनंद आहे. चिन्मयची नुकतीच नांदा सौख्य भरे ही मालिका संपली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी  ही एक आनंदाची गोष्ट आहे. तसेच चिन्मयने स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचप्रमाणे त्याने आपल्या अभिनयाची जादू काही चित्रपटांमधूनदेखील दाखविली आहे. त्याने श्यामचे वडिल, वाजलाच पाहिजे असे चित्रपट केले आहे. यावर्षीच चिन्मय अभिनेत्री गिरीजा जोशी हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. त्यामुळे मालिकेनंतर चिन्मय आता चित्रपटात येणार असल्याने त्याचे चाहते आनंदित झाले असणार हे नक्की. 


 

Web Title: Chinmay Udgirkar social film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.