Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 10:27 AM2023-01-19T10:27:07+5:302023-01-19T10:27:35+5:30

होय, फक्त कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये काेणताही आवडता सिनेमा फक्त 99 रुपयांमध्ये पाहायची संधी तुमच्याकडे आहे.

cinema lover day ved and this marathi movie watch only 99 rupees ticket on 20 january 2023 | Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?

Ved Marath Movie : वेड, वाळवी, व्हिक्टोरिया... फक्त 99 रुपयात पाहा 'हे' मराठी सिनेमे; पण कधी?

googlenewsNext

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपट प्रदर्शित होऊन २१ दिवस झाले आहे, पण चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर अजूनही कायम आहे. चित्रपटाने सोमवारपर्यंत तब्बल ४८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘वेड’बरोबरच आणखी मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर सध्या वेड, वाळवी, व्हिक्टोरिया आणि सरला एक कोटी हे मराठी सिनेमे देखील रिलीज झाले आहेत. या सिनेमांनाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. हिंदीचं म्हणाल तर अवतार २ आहे. वारिसू, कुत्ते, दृश्यम २ हे चित्रपटही चित्रपटगृहांत आहेत. आता आम्ही या चित्रपटांबद्दल का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असलेच. तर यापैकी कोणताही सिनेमा केवळ ९९ रूपयांत तुम्हाला पाहता येणार आहे. अर्थात ही ऑफर फक्त एकाच दिवसासाठी आहे.

 

होय, फक्त उद्या २० जानेवारीला कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये काेणताही आवडता सिनेमा फक्त 99 रुपयांमध्ये पाहायची संधी तुमच्याकडे आहे.   बुक माय शोवर तुम्ही सिनेमाची तिकिटं बुक करू शकता. मराठी सिनेमांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. आता 20 जानेवारीला ही ऑफर का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 20 जानेवारीला सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मल्टीप्लेक्समध्ये नॅशनल सिनेमा डे साजरा करण्यात आला होता. यानिमित्त तिकिटांची किंमत ७५ रूपये करण्यात आली होती. या ऑफरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. कोराना महामारीमुळे चित्रपट उद्योगात आलेली मंदी दूर करण्यासाठी तसेच प्रेक्षकांना थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा खास दिवस साजरा करण्याची संकल्पना समोर आली होती. 
 

Web Title: cinema lover day ved and this marathi movie watch only 99 rupees ticket on 20 january 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.