सामाजिक जाणिवेतून चित्रपट निर्मिती : मिहीर सुधीर कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 06:09 AM2018-05-30T06:09:07+5:302018-05-30T11:39:07+5:30

आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, ही सद्भावना मनात असल्याशिवाय समाजहीत साधता येत नाही. समाज सेवेची माध्यमं असंख्य असु ...

Film production from social awareness: Mihir Sudhir Kulkarni | सामाजिक जाणिवेतून चित्रपट निर्मिती : मिहीर सुधीर कुलकर्णी

सामाजिक जाणिवेतून चित्रपट निर्मिती : मिहीर सुधीर कुलकर्णी

googlenewsNext
ण समाजाचे काही तरी देणे लागतो, ही सद्भावना मनात असल्याशिवाय समाजहीत साधता येत नाही. समाज सेवेची माध्यमं असंख्य असु शकतात; पण चित्रपट हे माध्यम निवडून समाजातील ज्वलंत विषयावर भाष्य करून निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या अनोख्या प्रवासाविषयी केलेली बातचीत....! 

ग्रॅव्हीटी ग्रुप चे राज्यात आदराने नाव घेतले जाते, आपण त्याचे सर्वेसर्वा आहात, पण अचानक चित्रपट निर्मिती कडे कसे? 
आपले म्हणने अगदी खरे आहे, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात गॅ्रव्हीटी ग्रुपने केलेले कार्य सर्वऋत आहे; या कार्यात अनेक सामाजिक समस्या जवळुन अनुभवल्या; त्या लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक होते आणि त्यासाठी चित्रपट या माध्यमाची निवड मला योग्य वाटली, म्हणून मी चित्रपट निर्मितीकडे वळलो.

आपण चित्रपटाच्या कथेची निवड कशी केली? त्या विषयी काय सांगाल? 
चित्रपट निर्मिती करण्याचे निश्चित केल्यानंतर मी अनेक कथा ऐकल्या, काही सामाजिक चित्रपट पाहिले, कथासंग्रह, लेखमाला अभ्यासिल्या पण माझ्या मनातलं सापडत नव्हते, याच दरम्यान दिग्दर्शक रामकुमार हे लेखक आबा गायकवाड यांना घेवून आले. त्यांनी कथा एैकविली आणि मी भारावून गेलो. माझे वडील सुधीर कुलकर्णी उत्तम अभ्यासक आहेत. त्यांनीही कथेचे कौतुक केले आणि आमची चित्रपट कथा फायनल झाली.

चित्रपटात अनेक दिग्गज हिंदी कलावंत आहेत, हा योग कसा जुळवून आणलात? 
मराठी चित्रपटातील कलावंतासह हिंदीतही माझा मोठा मित्र परिवार आहे. मी सुनिलजी, तमन्नाजी, रविकिशनजी यांना चित्रपटाची संकल्पना सांगितली. ती त्यांना मनापासून आवडली आणि त्यांनी आनंदाने अ.ब.क. या चित्रपटात अभिनय केला; या सह हिंदीतील आघाडीचे संगीतकार साजिद वाजिद यांनी चित्रपटात एक अप्रतिम गीत संगीतबद्ध केले आहे. 

मायबाप रसिक प्रेक्षकांना काय सांगाल? 
सामाजिक जाणिवेतून साकारलेला अ.ब.क. हा एक उत्तम चित्रपट आपल्या भेटीस ८ जूनला येतोय; आपण भरभरून त्यास प्रतिसाद द्यावा ही मनोमन इच्छा! ग्रॅव्हीटी ग्रुपच्या वतीने रसिकप्रेक्षकांना शुभेच्छा! 

 

Web Title: Film production from social awareness: Mihir Sudhir Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.