'गाढवाचं लग्न'मधील 'गंगी'ला हवाय मराठमोळा साज...; रिअल लाइफमध्ये आहे Bold & Beautiful!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:00 AM2022-02-08T07:00:00+5:302022-02-08T07:00:00+5:30

'गाढवाचं लग्न'मधील गंगी म्हणजेच अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajashree Landge) हिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'Gangi' in 'Gadhavacha Lagna' has want's Marathmola Saaj ...; Rajashree Landge is Bold & Beautiful in Real Life! | 'गाढवाचं लग्न'मधील 'गंगी'ला हवाय मराठमोळा साज...; रिअल लाइफमध्ये आहे Bold & Beautiful!

'गाढवाचं लग्न'मधील 'गंगी'ला हवाय मराठमोळा साज...; रिअल लाइफमध्ये आहे Bold & Beautiful!

googlenewsNext

गाढवाचं लग्न (Gadhavach Lagna) हा असा मराठी चित्रपट आहे ज्याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षक आवडीने पाहतात आणि खळखळून हसतातही. अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure)आणि अभिनेत्री राजश्री लांडगे (Rajashree Landge) या दोघांनीही या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राजश्री लांडगेने सावळ्या कुंभाराच्या पत्नीची म्हणजेच गंगीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गावरान गंगी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या बोल्ड फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

गाढवाचं लग्नमधील गंगी म्हणजेच अभिनेत्री राजश्री लांडगे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर या चित्रपटातील तिचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा. तिच्या या फोटोला खूप पसंती मिळते आहे. 


‘गंगी’ या व्यक्तिरेखेसाठी राजश्रीची वेशभूषा, बोलण्याचा लहेजा गावरान पद्धतीचा होता. तिने या व्यक्तिरेखेचा लहेजा एवढा उत्तम पकडला, की तिच्या या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले. या चित्रपटात जरी गावरान गंगीची भूमिका राजश्रीने केली असली, तरी खऱ्या आयुष्यात तिला मॉडर्न राहायला आवडते. गंगीचा मॉडर्न लूक बऱ्याचदा सोशल मीडियावर चर्चेत येत असतो.


राजश्री लांडगे हिने सुरुवातीला काही नाटकांमध्ये काम केले. मात्र, ‘गाढवाचं लग्न’मधील गंगीच्या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. तिने ‘सिटीझन’ या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. तसेच यात प्रमुख भूमिका देखील तिने साकारली होती. चित्रपटाची कथा आणि वेशभूषेची जबाबदारी तिने उत्तमरित्या सांभाळली होती.

Web Title: 'Gangi' in 'Gadhavacha Lagna' has want's Marathmola Saaj ...; Rajashree Landge is Bold & Beautiful in Real Life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.