'गाऊ नको किसना' सातासमुद्रापार, टाईम्स स्क्वेअरसमोरचा भारतीय तरुणीचा डान्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:45 PM2023-04-26T12:45:48+5:302023-04-26T12:48:33+5:30

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर या प्रसिद्ध ठिकाणी तिने 'गाऊ नको किसना' गाण्यावर डान्स केल्याने तिचं कौतुक होतंय.

krutika narkar dance viral on marathi song gau nako kisna at times square new york | 'गाऊ नको किसना' सातासमुद्रापार, टाईम्स स्क्वेअरसमोरचा भारतीय तरुणीचा डान्स व्हायरल

'गाऊ नको किसना' सातासमुद्रापार, टाईम्स स्क्वेअरसमोरचा भारतीय तरुणीचा डान्स व्हायरल

googlenewsNext

केदार शिंदे यांचा मराठी सिनेमा 'महाराष्ट्र शाहीर' मधील 'बहरला मधुमास नवा' आणि 'गाऊ नको किसना' ही दोन्ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. 'गाऊ नको किसना' गाण्याची क्रेझ तर सातासमुद्रापार पोहोचली आहे. न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर येथे कृतिका नारकर (Krutika Narkar) या भारतीय मुलीने गाण्यावर डान्स करत मराठी लोकांचं मन जिंकलं आहे.  

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. त्यातच गाणी लोकप्रिय झाल्याने चित्रपटाला फायदाच होतोय. 'बहरला मधुमास नवा' गाण्यावर रील्स तुफान व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे केदार शिंदेंनी कृतिका नारकर या तरुणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर या प्रसिद्ध ठिकाणी तिने मराठी गाण्यावर डान्स केल्याने तिचं कौतुक होतंय. 'न्यूयॉर्क शहरात गाऊ नको किसना' असं तिने व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. तर आजुबाजुला असलेले नागरिकही तिचा डान्स कौतुकाने बघत असल्याचं दिसत आहे.

'गाऊ नको किसना' या गाण्याला युट्यूबवर बरेच व्ह्यूज मिळाले आहेत. जयेश खरे या छोट्या मुलाने हे गाणं गायलं आहे. जयेशचा शाळेतील वर्गात 'चंद्रा' गाणं म्हणतानाचा त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्याच्या आवाजाची भुरळ अजय अतुल या दिग्गज संगितकारांनाही पडली. म्हणूनच त्यांनी जयेशला 'गाऊ नको किसना' हे गाणं गाण्याची संधी दिली.

'महाराष्ट्र शाहीर' सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना चौधी ही देखील मुख्य भूमिकेत आहे. 

Web Title: krutika narkar dance viral on marathi song gau nako kisna at times square new york

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.