"हे कधी आणि कसं थांबणार?" मणिपूर घटनेवरून हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, "हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:25 PM2023-07-21T12:25:33+5:302023-07-21T12:26:28+5:30

Manipur Violence : "सुन्न व्हायला होतं...", मणिपूर घटनेवरून हेमांगी कवीची पोस्ट, म्हणाली, "जशी ती क्लिप पसरतेय..."

manipur women violence marathi actress hemangi kavi insta post seeking attention | "हे कधी आणि कसं थांबणार?" मणिपूर घटनेवरून हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, "हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं..."

"हे कधी आणि कसं थांबणार?" मणिपूर घटनेवरून हेमांगीचा संतप्त सवाल, म्हणाली, "हे घाणेरडं कृत्य करणारी माणसं..."

googlenewsNext

मणिपूरमधील हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांची निर्वस्त्र अवस्थेत धिंड काढऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेही राज्य आणि केंद्र सरकारला दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूरमधील या घटनेवर कलाविश्वातील सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे भाष्य करत संताप व्यक्त केला आहे. मराठी अभिनेत्री हेमांगी कवीनेही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मणिपूर घटनेबाबत संतप्त पोस्ट शेअर केली आहे. "मणिपूर घटना!!! कधी थांबणार हे आणि कसं? सुन्न व्हायला होतं! हे घाणेरडं कृत्य करणारी २-३ माणसं असतील पण ते बघणारा अख्खा एक समुह असतो! त्या दोघा तिघांना अडवणारं त्यातलं कुणीच नसतं? बाप रे! इथं सोशल मीडियावर त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही वगैरे अगदी बरोबर आहे पण जशी ती क्लिप आणि बातमी पसरतेय...तसंच थोडंसं शहाणपण आणि माणूसपण पसरलं तर?" असं हेमांगीने इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं आहे. 

"गलिच्छ! या नराधमांना...", मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडिओ पाहून हेमंत ढोमे संतापला

दरम्यान मणिपूरमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी(२० जुलै) अटक केली आहे. या घटनेने मणिपूरमधील वातावरण तापलं आहे. जमावाकडून आरोपीचं घर जाळण्यात आलं आहे. 

"तिघेही वेगळ्या पक्षाचे, पण बरं वाटलं की...", संकर्षणने शिंदे-फडणवीस-अजितदादांसाठी केलेली पोस्ट चर्चेत

मणिपूरमध्ये नेमकं काय घडलं? 

मणिपूरमध्ये कुकी समुदायातील तीन महिलांची मैतेई समुदायातील लोकांकडून छेडछाड करण्यात आली होती. ४ मे रोजी त्यांना निर्वस्त्र करुन धिंड काढण्यात आली होती. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तीन महिलांना निर्वस्त्र करुन एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. यातील १९ वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. मणिपूरमधील या व्हायरल झालेल्या व्हिडिओची मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी दखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: manipur women violence marathi actress hemangi kavi insta post seeking attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.