मंजिरी नव्हे तर 'हे' आहे प्रसाद ओकचं पहिलं प्रेम; आजही त्यावर करतो तितकंच प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 03:07 PM2023-06-12T15:07:32+5:302023-06-12T15:08:00+5:30

Prasad oak: अलिकडेच प्रसाद- मंजिरीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रसाद आणि तिच्या नात्यावर भाष्य केलं.

marathi actor director Prasad Oak's first love | मंजिरी नव्हे तर 'हे' आहे प्रसाद ओकचं पहिलं प्रेम; आजही त्यावर करतो तितकंच प्रेम

मंजिरी नव्हे तर 'हे' आहे प्रसाद ओकचं पहिलं प्रेम; आजही त्यावर करतो तितकंच प्रेम

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. आजवरच्या कारकिर्दीत असंख्य सुपरहिट सिनेमा देणाऱ्या प्रसादची पत्नी मंजिरीदेखील त्याच्याइतकीच कलाविश्वात सक्रीय आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रसाद आणि मंजिरी यांची लव्हस्टोरी तर साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, मंजिरी हे प्रसादचं पहिलं प्रेम नसल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

अलिकडेच प्रसाद- मंजिरीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रसाद आणि तिच्या नात्यावर भाष्य केलं. यावेळी बोलत असताना आमचं जरी लव्हमॅरेज असलं तरीदेखील मी प्रसादचं पहिलं प्रेम नसल्याचं त्याने मला सांगितलं होतं. तसंच त्याचं पहिलं प्रेम त्याच्या आयुष्यातून कधीही दूर जाणार नाही हेदेखील त्याने मंजिरीला ठामपणे सांगितलं होतं.

"प्रसादने ज्यावेळी मला प्रपोज केलं त्यावेळी त्याने मला तीन गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली मला मस्करा मारता येत नाही, दुसरी मला बाबू-शोना असं प्रेमाने फार बोलता येत नाही आणि तिसरी गोष्ट माझं पहिलं प्रेम माझं क्षेत्र, म्हणजेच माझा अभिनय आहे. त्यामुळे माझं पहिलं प्रेम कायम माझं प्रोफेशनचं राहिली. म्हणूनच, तू मनाची तयारी कर असं प्रसादने मला सांगितलं होतं. पण, वयाच्या १६ व्या वर्षी मी काय मनाची तयारी करणार होते?", असं म्हणत मंजिरीने प्रसादच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला.

दरम्यान, अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात करणारा प्रसाद आज लोकप्रिय दिग्दर्शक म्हणूनही ओळखला जातो. प्रसादचा चंद्रमुखी हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने तुफान कमाई केली.
 

Web Title: marathi actor director Prasad Oak's first love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.