वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे फोटो तुम्ही पाहिले आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 02:58 PM2019-07-12T14:58:58+5:302019-07-12T15:07:44+5:30
मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते.
आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घ्यायची इच्छा नेहमीच त्यांच्या फॅन्सना असते. त्यामुळे ते सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकारांना फॉलो करतात. पण काही कलाकार सोशल मीडियावर तितकेसे अॅक्टिव्ह नसल्याने त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी, कुटुंबाविषयी त्यांच्या फॅन्सना खूपच कमी माहिती असते. तुम्हाला आज तुमच्या एका आवडत्या अभिनेत्रीविषयी आम्ही सांगणार आहोत.
मराठीसह हिंदी आणि राजस्थानी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.
वर्षा उसगांवकर आज चित्रपटात खूपच कमी काम करत असल्या तरी त्या अनेक समारंभात, पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वी एका कोंकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकामध्ये काम केले होते. वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 19 वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.
मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत त्या अनेक चित्रपटात झळकल्या होत्या. गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.