निखिल चव्हाण म्हणतोय,'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 05:15 PM2019-04-13T17:15:09+5:302019-04-13T17:15:48+5:30

कलाकार असण्याआधी आपण एका देशाचे सुजाण नागरिक आहोत याची जाण ठेवत निखिल चव्हाणने आपल्या रसिक जनतेला निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मौलिक संदेश दिला आहे.

Nikhil Chavan says, 'Voters should be awake, become a democracy's thread' | निखिल चव्हाण म्हणतोय,'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो'

निखिल चव्हाण म्हणतोय,'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो'

googlenewsNext

कलाकार असण्याआधी आपण एका देशाचे सुजाण नागरिक आहोत याची जाण ठेवत निखिल चव्हाणने आपल्या रसिक जनतेला निवडणुकीच्या पार्शवभूमीवर मौलिक संदेश दिला आहे. 'विचार करून प्रतिनिधी निवडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा' असे आपले मत ठामपणे मांडणारा निखिल एका व्हिडिओद्वारे आपल्या मतदारांशी हितगुज करताना दिसतो आहे.

सध्या आपल्याकडे असंख्य पर्याय उपलब्ध असतात अगदी सगळ्याच गोष्टींत केवळ मनोरंजनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर पहा ना... चित्रपट, मालिका, गाणी, इंटरनेट सर्फिंग... २४ तास सारं काही तुमच्या मनोरंजनासाठी तत्पर. बरे चॅनेल्स ते ही असंख्य. एक झाले की दुसरे.. अगदी मिनिटा-मिनिटाला तुम्ही चॅनल्स बदलू शकता. का बदलता कारण तुम्हाला बदल हवा असतो. तुमच्याकडे निवडीचे पर्याय उपलब्ध असतात. इतक्या साध्य गोष्टींत तुम्हाला बदल हवाच असतो शिवाय तुम्ही पर्यायही विचारपूर्वक निवडत असताना देशात दर ५ वर्षांनी घडणारा बदल तुमच्या नजरेतून कसा सुटतो? भारत लोकशाहीप्रधान देश आहे. घटनेनुसार आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला असून ह्या देशाचे भवितव्य कणखर हातात सोपवण्यासाठी आपण मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे.  जेणेकरून सत्ता एककेंद्री न राहता चांगल्या कर्तृत्वान नेतृत्त्व असणाऱ्यांच्या हाती सत्ता जाईल व देशाचं विकास होईल. असा संदेश देणारा निखिलचा व्हिडिओ हलका-फुलका पण मार्मिक संदेश देतो.

कलाकारांचे फॅनफॉलोईंग प्रचंड असते. या फॅन्सच्या प्रेमाचा योग्य उपयोग कसा करायचा हे प्रत्येकालाच कळते असे नाही.

निखिलने किमान आपल्या प्रेक्षवर्गात 'मतदान बजावा' हा संदेश देत जनजागृती केली आहे जे वाखाणण्याजोगे आहे. 

Web Title: Nikhil Chavan says, 'Voters should be awake, become a democracy's thread'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.