“नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 01:11 PM2023-07-22T13:11:26+5:302023-07-22T13:12:00+5:30

निवेदिता सराफ यांनी शेअर केला अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो, चाहते म्हणाले...

nivedita saraf shared photo with ashok saraf fans reacted with love | “नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

“नजर लागायला नको”, निवेदिता-अशोक सराफ यांच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ ही लाडकी जोडी आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक दशकं अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या कलाकारांचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सध्या अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या एका फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

निवेदिता सराफ या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अशोक सराफ याच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी ‘ऑस्ट्रेलियातील आठवणी’ असं कॅप्शन दिलं आहे. निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला अशोक सराफ यांच्याबरोबरचा हा गोड फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“इर्शाळवाडीशी माझा खूप जवळचा संबंध आहे”, जुई गडकरी भावुक, म्हणाली, “मी गेल्याच वर्षी...”

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा हा फोटो चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. अनेकांनी कमेंट करत या सदाबहार जोडीचं कौतुक केलं आहे. एकाने कमेंट करत “फोटो एकदम भारी आलाय”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “माझी सर्वात आवडती जोडी”, अशी कमेंट केली आहे. “जबरदस्त” अशी कमेंटही केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत “तुम्हाला नजर लागायला नको”, असं म्हटलं आहे. कित्येकांनी हार्ट इमोजी कमेंट करत अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

“मर्द असाल तर मणिपूर फाइल्सवर चित्रपट काढा”, नेटकऱ्याच्या प्रश्नावर विवेक अग्निहोत्रींनी दिलं उत्तर, म्हणाले...

दरम्यान, अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या ऑन स्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘फेका फेकी’, ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटांत ते एकत्र काम करताना दिसले. सध्या निवेदिता सराफ कलर्स वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.

Web Title: nivedita saraf shared photo with ashok saraf fans reacted with love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.